Thursday, 19 February 2015

शिष्यवृत्ती सराव प्रश्नसंच २१ते२५

सराव प्रश्नसंच २१

1. 'अंधार' या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.

प्रकाश
तामस
तमा
तम

2. जसे साधूंचा जथा, तसे लमाणांचा ......

घोळका
जमाव
तांडा
ताफा

3. रयत शिक्षण संस्था कोणी स्थापन केली ?

कर्मवीर भाऊराव पाटील
स्वामी विवेकानंद
रवींद्रनाथ टागोर
महाराजा सयाजीराव गायकवाड

4. पुढील शब्दापैकी पुल्लिंगी शब्द कोणता ?

गाय
बैल
वासरू
पिलू

5. प्रत्यय असणारा शब्द ओळखा.

सुगंध
कष्टकरी
विचित्र
कुप्रसिद्ध

6. जर blackboard शी निगडीत duster हा शब्द असेल, तर farm शी निगडीत शब्द कोणता ?

play
plough
bird
dust

7. ग्रेगरीयन वर्षाची सुरुवात पुढीलपैकी कोणत्या महिन्याने होते ?

December
July
June
January

8. Golden या शब्दापासून अर्थपूर्ण होणारा शब्द कोणता ?

gode
gold
gen
ned

9. तूमच्या वर्गाच्या कबड्डी संघाने सामना जिंकला आहे. तुम्ही तुमच्या कर्णधाराचे अभिनंदन कसे कराल ?

Thank you !
Very good !
Congratulations !
What a surprise !

10. 'छत्तीस हजार एकोणऐंशी' ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कशी लिहाल ?

36089
36079
३६०७९
३६०८९

11. खालील संख्यांपैकी कोणत्या संख्येतील ७ या अंकाची स्थानिक किंमत ७०० येईल ?

३५७३९
५३७४
७८९०
७७०७७

12. एका गावामध्ये १४०८४ पुरुष व १३१०९ स्त्रिया आहेत, तर त्या गावची एकूण लोकसंख्या किती ?

२७२९३
२७१९३
२७०९३
२७१८३

13. ४४ च्या आधीची पाचवी विषम संख्या कोणती ?

३७
३३
३९
३५

14. २ हा अंक असलेल्या दोन अंकी संख्या एकूण किती आहेत ?

१८
१९
२०
२१

15. सुती कापडाचा मूळ स्रोत कोणता ?

प्राणी
रेशमी किडे
खनिज तेल
वनस्पती

16. खालीलपैकी पाण्यात तरंगणारी वस्तू कोणती ?

खोडरबर
प्लॅस्टीकची पट्टी
खिळा
खडे

17. पृथ्वीवर दिवस व रात्र कशामुळे होतात ?

पृथ्वीचे परिवलन
चंद्राचे परिवलन
सूर्याचे परिवलन
चंद्राचे परिभ्रमण

18. 'बंड केलिया मारले जाल' हे उद्गार कोणाचे ?

चंद्रराव मोरे
आदिलशाहा
शिवाजी महाराज
यशवंतराव मोरे

19. शिवराय बालपणी कर्नाटकात असताना कोंढाण्याचे सुभेदार कोण होते ?

तानाजी मालुसरे
दादाजी कोंडदेव
उदेभान
चंद्रराव मोरे

20. मुरारबाजीने कोणत्या किल्ल्यावर अतुल पराक्रम गाजवला ?

कोंढाणा
पन्हाळा
शिवनेरी
पुरंदर

सराव प्रश्नसंच २२

1. खालीलपैकी वर्तमानकाळी क्रियापद ओळखा ?

आणतो
आणेल
आणणार
आणले

2. बैलाच्या ओरडण्याला काय म्हणतात ?

हंबरणे
रेकणे
डुरकणे
भुंकणे

3. जल या अर्थाचा शुद्ध शब्द कोणता ?

पाणी
पाणि
पानि
पानी

4. 'ससा हा चपळ प्राणी आहे' या वाक्यातील ससा या शब्दाचा अनेकवचनी शब्द कोणता ?

ससा
ससे
ससवे
ससू

5. खालील गटातील नाम ओळखा.

धीट
आंबा
उत्कृष्ट
शूर

6. शनिवार व सोमवार यामध्ये कोणता दिवस येतो ?

monday
sunday
friday
thursday

7. दूधवाला खालीलपैकी काय विकतो ?

sugar
bottle
bread
milk

8. small या शब्दाचा अर्थ कोणता ?

मऊ
लहान
सुंदर
मोठा

9. ४००२५ ही संख्या अक्षरात कशी लिहाल ?

चार हजार पंचवीस
पंचवीस हजार चाळीस
चाळीस हजार पंचवीस
चाळीस हजार दोनशे पाच

10. ५ ने नि:शेष भाग जाणारी संख्या पुढीलपैकी कोणती ?

१२६७३
१२०७५
१२०७४
१२३९२

11. खालीलपैकी चुकीचे विधान कोणते ?

चौकोनाच्या सर्व बाजू नेहमी समान असतात
आयताचे सर्व कोन काटकोन असतात
त्रिकोणाला तीन शिरोबिंदू असतात
चेंडू गोल असतो

12. आयताचे किती कोन काटकोन असतात ?




13. हापूस आंबा या फळासाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील गाव कोणते ?

ठाणे
पंढरपूर
कोल्हापूर
रत्नागिरी

14. दूधापासून आपणास कोणता पदार्थ मिळत नाही ?

तेल
तूप
दही
लोणी

15. ऊसापासून काय तयार करता येत नाही ?

गूळ
साखर
काकवी
साबूदाणा

16.'मामांनी मोनिकासाठी मासिक मागवले' या वाक्यात म हे अक्षर किती वेळा आले आहे ?




17. आदिलशहाने 'सरलष्कर' हा किताब कोणाला दिला ?

शहाजीराजांना
शिवाजीराजांना
संभाजीराजांना
यशवंतराव मोरे यांना

18. निजामशहाची हत्या करणारा खालीलपैकी कोण ?

मलिकअंबर
अफजलखान
फत्तेखान
बडीसाहेबा

19. शिवनेरी हा किल्ला कोणत्या राज्यात आहे ?

कर्नाटक
महाराष्ट्र
आंध्रप्रदेश
केरळ

20. महाराष्ट्रातील कोणते संत पंजाबात गेले होते ?

संत तुकाराम
संत रामदास
संत ज्ञानेश्वर
संत नामदेव


सराव प्रश्नसंच २३

1. ‘वामनराव उत्तम गवई आहेत’ या वाक्यातील ‘गवई’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

लेखक
कवी
गीतकार
गायक

2. खालील अक्षरांपासून तयार होणार्या अर्थपूर्ण शब्दाचे मधोमध येणारे अक्षर कोणते ? : भा र त हा म


हा
भा

3. ‘गिर्हाईकाने दुकानदाराला तांदळाचा भाव विचारला’ या वाक्यातील ‘भाव’ हा शब्द कोणत्या अर्थाने वापरला आहे ?

किंमत
भक्ती
भावना
मान

4. खालीलपैकी वर्तमानकाळी वाक्याचा पर्याय कोणता ?

स्नेहा गोष्ट सांगणार आहे
स्नेहा गोष्ट सांगत आहे
स्नेहाने गोष्ट सांगितली
स्नेहा गोष्ट सांगेल

5. 'गौरवचे वडील आजारी पडल्यावर ....... घेतात.' या वाक्यात गाळलेल्या जागी शुद्ध शब्द निवडा ?

अवषद
औषध
औषद
औशद

6.’सुधीर नेहमी उधळपट्टी करतो, पैसे नसल्यास शांत राहतो’ या वाक्यासाठी योग्य म्हण सुचवा.

आवळा देऊन कोहळा काढणे
असल्यास दिवाळी नसल्यास शिमगा
आपला हात जगन्नाथ
आडात नाही तर पोहर्यात कोठून

7. ‘हसे करुन घेणे’ या वाक्प्रचारातील ‘हसे’ या शब्दाचा अर्थ कोणता ?

आनंद
हसणे
नाराजी
फजीती

8. बालकवी कोणास म्हणतात ?

राम गणेश गडकरी
त्र्यंबक बापूजी ठोंबरे
कुसुमाग्रज
प्रल्हाद केशव अत्रे

9. वेगळ्या अक्षराने सुरु होणारा शब्द शोधा

dust
dark
print
drink

10. वेगळ्या अक्षराने शेवट होणारा शब्द शोधा

paid
pot
said
cloud

11. The person who grows vegetables is …………..

farmer
hawker
peon
milkman

12. What is the plural form of ‘bus’ ?
(‘bus’ या शब्दाचे अनेकवचन खालीलपैकी कोणते ?)

bushes
buses
buss
busis

13. १ ते १०० पर्यंत ३ हा अंक किती वेळा लिहावा लागतो ?

११
२१
१९
२०

14. कोणत्याही दोन मूळ संख्यांचा गुणाकार निश्चितपणे कोणती संख्या असते ?

संयुक्त
विषम व मूळ
सम
मूळ

15. अहमदनगरजवळील भिंगार या गावात ९०५३ पुरूष असून ८७०७ स्त्रिया आहेत. एकूण लोकसंख्येतील १२०४८ साक्षर आहेत, तर त्या गावातील निरक्षरांची संख्या किती ?

४९३३
६०२५
६०६२
५७१२

16. पंधरवडा हा काळ किती दिवसांचा असतो ?

३० दिवस
१५ दिवस
७ दिवस
८ दिवस

17. दगडी कोळसा हे इंधन वापरुन कोणते वाहन चालते ?

आगगाडी
विमान
मोटारकार
ट्रक

18. गाईम्हशींच्या शेणाचा उपयोग कशासाठी होतो ?

खत म्हणून
गोवर्या थापण्यासाठी
सर्व पर्याय बरोबर
गोबरगॅस चालवण्यासाठी

19. उत्तर भारतात यमुना नदीवरील ........ ही आपल्या देशाची राजधानी आहे ?

मथुरा
दिल्ली
वाराणसी
आग्रा

20 खालीलपैकी पाण्याचा कोणता स्त्रोत नैसर्गिक नाही ?

झरे
ओहळ
नदी
कूपनलिका

सराव प्रश्नसंच २४

1. खालील वाक्यांपैकी शुद्ध वाक्याचा पर्याय क्रमांक शोधा.

रयत शिक्षन संस्थेने उच्च शिक्षनासाठी महाविद्यालये सुरू केली.
रयत शिक्षण संस्थेणे उच्च शिक्षनासाठी महाविद्यालये सुरू केली.
रयत शीक्षण संस्थेने उच्च शिक्षणासाठी महाविद्यालय सुरू केली.
रयत शिक्षण संस्थेने उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये सुरू केली.

2. 'उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग' या म्हणीचा अचूक अर्थ कोणता ?

नवरा उतावळा असू नये.
नवरा उतावळा असावा, परंतु त्याने गुडघ्याला बाशिंग बांधू नये.
उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन करणे.
कितीही अवघड गोष्ट प्रयत्नांनी साध्य होते.

3. जसे साधासुधा तसे साधा........

भोळा
सौदा
गोळा
अर्धा

4. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
१७, डॉ. आंबेडकर रोड, पुणे – ४११००१
वरील पत्त्यातील ४११००१ हा ........ आहे.

फोन नंबर
पिनकोड नंबर
दिनांक
घर नंबर

5. 'हिप हिप हुर्रे !' या वाक्याचा प्रकार कोणता ?

नकारार्थी
उद्गारार्थी
प्रश्नार्थी
होकारार्थी

6. चपाती तयार करण्याकरता कोणती वस्तू वापरली जात नाही ?

rolling board
spoon
pan
rolling pin

7. खालीलपैकी कोणता शब्द क्रियावाचक नाही ?

come
go
jump
happy

8. जर प्रत्येक रांगेत १८ रोपे लावली, तर अशा २८५ रांगांमध्ये किती रोपे लावता येतील ?

५२१०
५१३०
५१२०
५३१०

9. नेहाजवळ शंभर रूपयांच्या आठ नोटा, पाच रूपयांच्या सात नोटा व दहा रुपयांच्या पाच नोटा आहेत, तर नेहाजवळ एकूण रुपये किती ?

८५८
८९५
८८५
८५९

10. साडेतीन किलोमीटर = किती मीटर ?

३००
३५००
३५०
५००

11. ताशी १२ कि.मी. वेगाने ६ तासात एका सायकलस्वाराने कापलेले अंतर किती ?

७२ कि.मी.
७२० कि.मी.
७२० मी.
७२ मी.

12. गोदावरी नदी कोठून उगम पावते ?

महाबळेश्वर
त्र्यंबकेश्वर
भीमाशंकर
सातपुडा

13. पोष्टाच्या तिकिटांवरील चित्रातून आपल्याला कोणती माहिती मिळते ?

माणसांचा इतिहास
प्राण्यांची माहिती
पक्ष्यांची माहिती
समाजात झालेल्या बदलांची माहिती

14. मतदान यंत्रावर केलेल्या ........ लिपीच्या सोयीमुळे दृष्टिहीन व्यक्तीही इतरांप्रमाणे गुप्त मतदान करु शकतात.

ब्रेल
मोडी
देवनागरी
रोमन

15. घड्याळातील तासकाटा व मिनिटकाटा हे किती वाजता एका सरळ रेषेत असतात ?

११.३० वाजता
३ वाजता
९ वाजता
६ वाजता

16. फूल : पाकळ्या :: पुस्तक : ?

धडे
पाने
परीच्छेद
मजकूर

17. रस्त्यावर केळीचे साल पडलेले दिसले, तर काय कराल ?

स्वत: साल उचलून कचराकुंडीत टाकू
पाय घसरुन कोण पडेल याचे निरीक्षण करु
मित्राला साल उचलण्यास सांगू
दुर्लक्ष करु

18. मालोजीराजे कोणत्या लढाईत मारले गेले ? .

भातवडीच्या
पन्हाळगडाच्या
इंदापूरच्या
अहमदनगरच्या

19. गागाभट्टांचे घराणे मूळचे ....... ?

काशीचे
पैठणचे
पुण्याचे
नाशिकचे

20 . .... रक्ताने घोडखिंड पावन झाली.

बाजी घोरपडेच्या
तानाजी मालुसरेच्या
मुरारबाजीच्या
बाजीप्रभू देशपांडे याच्या

सराव प्रश्नसंच २५

1. राई कोणाची ?

फुलांची
फळांची
पानांची
झाडांची

2. खालील शब्दातून शुद्ध शब्द निवडा ?

सूरक्षित
सुरक्षीत
सुरक्षित
संरक्शित

3. 'मृत्यूवर जय मिळविणारा' या शब्दसमूहाबद्दल शब्द निवडा ?

मृत्यूंजय
अमर
अजिंक्य
मृत्यदाता

4. 'जाणून घेण्याची इच्छा' या वाक्यासाठी खालीलपैकी कोणता शब्द वापरला जातो ?

आवड
जिज्ञासा
आस्तिक
तत्त्वज्ञान

5. खालीलपैकी चुकीची जोडी शोधा ?

दुसर्यावर अवलंबून असणारा - परावलंबी
घोडा बांधण्याची जागा - गोठा
सापाचे खेळ करणारा - गारुडी
पंधरा दिवसांचा - पंधरवडा

6. १ ते २० अंकांमध्ये किती मूळ संख्या आहेत ?




१०

7. 'क़' ही एक विषम संख्या आहे तर तिच्यामागील समसंख्या कोणती ?

क + १
क - २
क + २
क - १

8. खालीलपैकी कोणत्या संख्येला ४ ने पूर्ण भाग जाईल ?

२५३४
९४२०
२३४६
३५८२

9. ३५० किलोमीटरवरील एका गावात सुरेशला मोटारसायकलने जाण्यास ७ तास लागले व परत येण्यास ५ तास लागले तर परत येताना सुरेशने मोटारसायकलचा वेग ताशी किती किलोमीटरने वाढवला ?


१०
२०
३०

10. वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेला ..... म्हणतात.

परीघ
व्यास
त्रिज्या
वर्तुळकेंद्र

11. कळसूबाई शिखराची उंची किती ?

१६४६ मीटर
१६४६ फूट
१६४६ इंच
१६४६ किमी

12. एका वर्षात किती महिने असतात ?

४८
१२
२४
३६५

13. राष्ट्रीय वीरता पुरस्कार कोणाच्या हस्ते दिले जातात ?

मुख्यमंत्र्यांच्या
राज्यपालांच्या
राष्ट्रपतींच्या
पंतप्रधानांच्या

14. पिण्यासाठी पाणी निर्धोक करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात ?

जलशुद्धीकरण
जलवितरण
जलसंजीवन
जलसिंचन

15. समाजाची वाटचाल कोणत्या दिशेने व्हावी याविषयीच्या तरतुदी ...... असतात.

संसदेत
संविधानात
न्यायालयात
कायद्यात

16. योगेशचा रांगेतील क्रमांक दोन्हीकडून २३ वा आहे तर रांगेत मुले किती ?

४६
४५
२२
२३

17. वर्षाची सुरुवात एप्रिल महिन्यापासून झाल्यास क्रमाने पाचवा महिना कोणता येईल ?

ऑगस्ट
सप्टेंबर
मे
जून

18. माधव व विकास क्रिकेट खेळतात, केतन व विकास फुटबॉल खेळतात, माधव व केतन बास्केटबॉल खेळतात, अभय व माधव कॅरम खेळतात तर फक्त एक खेळ खेळणारा कोण आहे ?

माधव
विकास
अभय
केतन

19. कोमल, स्वाती व अंजली यांच्या आजच्या वयाची बेरीज ५२ वर्षे आहे तर ३ वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती ?

४९ वर्षे
४३ वर्षे
५२ वर्षे
४५ वर्षे

20. 'महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद' या वाक्यात प हे अक्षर किती वेळा आलेले आहे ?

एक
तीन
दोन
चार

No comments:

Post a Comment

आपली प्रतिक्रिया द्या .