[1/18, 9:36 PM] Mahesh Lokhande: 🔴 ग्रुपचर्चासत्र ३३ 🔴
🌍 चर्चेचा विषय🌍
🔶 शारिरीक शिक्षण विषयाचे मूल्यमापन करताना कोणत्या गोष्टींचा विचार करावा ?🔶
मुद्दे=१) शारिरीक शिक्षण मूल्यमापन पध्दती
२) शारिरीक शिक्षण मूल्यमापन घटक.
🔶चर्चेस वेळ दि. १८/१/२०१६ रात्री ९.३० ते१०.३०पर्यंत.🔶 सर्वांनी चर्चेत सहभागी व्हावे.🔵 आपले योगदान आमच्यासाठी अनमोल आहे.🙏🙏🙏🙏🙏🙏
[1/18, 9:38 PM] खोतसर ज्ञा: मूल्यमापनाचे घटक 1)आवड व उत्स्फूर्त सहभाग 2)हालचालीतील समन्वय 3)आरोग्य विषयक सवयीचे पालन 4)समूहवृत्ती5)शिस्त व वर्तणूक 6)सादरीकरण 7)कौशल्यवरील प्रभूत्व. ♦♦♦♦♦♦♦♦♦♦पध्दती अनुभव, वस्तूनिष्ठ, उद्दिष्टे तसेच दैनंदिन निरक्षण, कृती_उपक्रम, प्रत्यक्षिक या साधनतंत्राच्या साधनाच्या सहाय्याने मूल्यमापन करता येइल. ♦शारीरीक मूल्यमापनामध्ये संकलित मूल्यमापन करण्यात येऊ नये. ♦शारीरीक शिक्षण विषयाचे अध्ययन अनूभव व प्रात्यक्षिकाद्वारे मूल्यमापन करता येते.
[1/18, 9:44 PM] Mahesh Lokhande: मूल्यमापनाने विद्यार्थी गरजा व कमकुवतपणाचे निदान करता येते.
[1/18, 9:45 PM] Mahesh Lokhande: विद्यार्थ्यांचे पात्रतेप्रमाणे वर्गीकरण करता येते.
[1/18, 9:45 PM] Mahesh Lokhande: खेळाडूच्या दर्जाबाबत अंदाज वर्तवता येतो.
[1/18, 9:46 PM] Mahesh Lokhande: विद्यार्थी दर्जाचे स्थान ठरवता येते. प्रगती ठरवता येते.
[1/18, 9:47 PM] Mahesh Lokhande: विद्यार्थ्यांस प्रवृत्त करता येते.
[1/18, 9:47 PM] Mahesh Lokhande: श्रेणी गुणांकन निश्चित करणे.
[1/18, 9:50 PM] Mahesh Lokhande: गुणात्मक तंत्रांचा वापर करुन मूल्यमापन करावे लागते.
[1/18, 9:53 PM] उज्वला पाटील रेठरे: कृतींवर भर दयावा.
[1/18, 9:54 PM] Mahesh Lokhande: १)पदनिश्चयनश्रेणी
यातुन धडाडी आत्मविश्वास कल्पकता सहकार्यवृत्ती खेळताना दिसून येते का पहाता येते.
पदनिश्चयनश्रेणीचे २ प्रकार
आलेखात्मक=खेळात किती प्रमाणात भाग घेतो.
कधीही नाही
क्वचित
कधीकधी
बरेचवेळा
नेहमी
✔योग्य घरात करावे लागते.
[1/18, 9:56 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: प्रत्येक मुलांमध्ये अपेक्षित पूर्ण क्षमता असतीलच असे नाही..परंतू कुवतीनुसार मूल्यमापनात लवचिकता आवश्यकच आहे!!
[1/18, 9:57 PM] Mahesh Lokhande: वर्णनात्मक पदनिश्चयनश्रेणी
विद्यार्थी खेळात किती प्रमाणात भाग घेतो?
भाग घेत नाही केवळ पहातो
मुद्दाम सांगीतले तरच भाग घेतो
इतरांइतकाच भाग घेतो
बरेचवेळा भाग घेतो
इतरांपेक्षा जास्त भाग घेतो.
[1/18, 9:59 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: विद्यार्थ्यांकडून मूल्यमापनाच्यावेळी अपेक्षित क्षमता..किंवा कृती ..वर्षभरात मूलांकडून करून घेणे फार गरजेचे आहे!
[1/18, 10:00 PM] अरविंद गोळे: Varnan , nirikshan karun tyachi avad, shamta pahun tharva
[1/18, 10:01 PM] Mahesh Lokhande: पडताळासुची
खेळ-हाॅकी
घटक | रामु
खेळ सुरु होण्यापुर्वी हाॅकी नीट तपासुन घेतो x
हाताची हालचाल सफाईने करतो x
हाॅकीस्टिकची पकड व्यवस्थित असते x
ड्रीबलिंग करताना गडबड फार करतो ✔
हाॅकीस्टिकमधील बारीक सारीक दोष दूर करु शकतो x
[1/18, 10:02 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: कवायत,मूक्तहालचाली,योगासने,प्राणायाम,साधन कवायत,मूक्तखेळ...यांसाठी कृतींवरच भर द्यावा..
[1/18, 10:03 PM] Mahesh Lokhande: प्रासंगिक नोंदी
शंकर संघाचे नेतृत्व करतो. इतर त्याच्या मताला मान देतात
[1/18, 10:05 PM] Mahesh Lokhande: आत्मनिरीक्षणात्मक तंत्र
मुलाखती -खेळाडूची
अभिरुची प्रश्नावली=
--आवडते होय/नाही
[1/18, 10:09 PM] Mahesh Lokhande: समस्यासूची
खेळण्यास पालक विरोध
शाळेपासुन घर दूर शाळा सुटल्यावर सराव खेळाचा करता येत नाही
प्रकृती साथ देत नाही
घरी भांडणे
खेळायला मिळत नाही
पैसा नाही
घरच्या कामात वेळ जातो
थकवा लवकर येतो
खेळल्यास शरीर दुखते
[1/18, 10:10 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: शारीरिक शिक्षणात बौध्दीक चाचणीही घेता येईल.भारतातील प्रत्येक खेळानुसार खेळाडूचे नाव सांगा...उदा..टेनिसपट्टू ,क्रिकेटर.बॅडमिंटन पट्टू,कुस्तीपट्टू,धावपट्टूइ.,
[1/18, 10:10 PM] Mahesh Lokhande: व्यक्तीमत्व प्रश्नावली
सारखा थकवा आल्यासारखे वाटते होय/नाही
[1/18, 10:11 PM] Mahesh Lokhande: अविष्कार तंत्र
वाक्य पुर्ण करणे
मी एकटा असतो तेव्हा........
[1/18, 10:12 PM] Mahesh Lokhande: दैनंदिनी लेखन
मुलांचा त्रास होतो का?
[1/18, 10:13 PM] Mahesh Lokhande: समाजमिती तंत्र
सामाजिक ओळख
ओळखा बरे
[1/18, 10:17 PM] Mahesh Lokhande: शारीरिक क्षमता कसोट्या
ताकद
चपळता
शरीराची कार्य करण्याची क्षमता
तोल
गती
लवचिकता
वेग व प्रतिसाद
शक्ती
स्नायुंची सहनशक्ती
ह्रदय स्नायुंची सहनशक्ती
शारिरीक तंदुरुस्ती
[1/18, 10:19 PM] Mahesh Lokhande: खेळ कौशल्याच्या कसोट्या
कल शोधणार्या कसोट्या
ज्ञानाच्या कसोट्या
वैद्यकिय कसोट्या
[1/18, 10:20 PM] Mahesh Lokhande: एकाच कौशल्याचीही स्वतंत्र कसोटी घेता येते.
[1/18, 10:22 PM] खोतसर ज्ञा: मुलाच्या शारीरीक क्षमताचा विचार करून खेळ घेऊन मूल्यमापन करावे.
[1/18, 10:22 PM] पळसेसाहेब: शारीरिक शिक्षणाच्या मूल्यमापनामध्ये बौध्दिक विषयाशी संबंधित अशा साधन तंत्राऐवजी विद्यार्थ्यांमधील कारक कौशल्यांचा विकास करणेसाठी आवश्यक अशा साधनांबरोबर विविध कसोट्यांचाही विचार होणे आवश्यक आहे.
[1/18, 10:24 PM] Mahesh Lokhande: नैदानिक कसोटी
घटक ठरवणे
कौशल्य पृथ्थकरण करणे
कौशल्यभागाचे मुद्दे व मार्ग तयार करणे
निदान केलेनंतर कमकुवत मुद्दे शोधणे
कमकुवत गोष्टींकडे विशेष लक्ष देणे
विशिष्ट कौशल्याचा सराव
[1/18, 10:26 PM] Mahesh Lokhande: विद्यार्थ्यांचे विभाग करावे लागतात
अतिखराब
सर्वसाधारण
हुशार
अतिहुशार
तुलनात्मक अभ्यास करता येतो.
[1/18, 10:30 PM] Mahesh Lokhande: लांबउडी तपासणी
उद्दीष्ट ज्ञान समज कार्य करण्याची क्षमता कौशल्य =एकूण
धावमार्गावर...८+६+२+४=२०...
झेप घेणे....८+६+२+४=२०...
हवेतील झेप...८+६+२+४=२०....
हिच किक.....८+६+२+४=२०
जमीनीवर येणे....८+६+२+४=२०..
एकूणगुण=४०+३०+१०+२०=१००
[1/18, 10:35 PM] Mahesh Lokhande: खांदा बाहु स्नायु सहनशीलता
तपासणीस पुलअप्स,पुशअप्स घेतात.
पोटाच्या स्नायुची सहनशीलता तपासताना सिटअप्स घेतात
पळण्यातील चपळता तपासताना
शटल रन घेतात.
उडी मारण्याची पात्रता मोजताना
उंचउडी लांबउडी घेतात
[1/18, 10:38 PM] Mahesh Lokhande: लवचिकता तपासताना कमरेच्या व पाठीच्या स्नायुंची लवचिकता पाहिली जाते.पुढे मागे डावीकडे उजवीकडे झुकण्याची मर्यादा मोजली जाते.
[1/18, 10:39 PM] खंदारेसाहेब: Good discussion
Keep it up all teachers and give directions to all ur friends.
Good night
[1/18, 10:40 PM] Mahesh Lokhande: गतीशील लवचिकता तपासताना
वाकून जमीनीस स्पर्श करणे
२०सेंकदात पटकन डावीकडून उजवीकडून वळुन मागे भिंतीस स्पर्श गतीने कितीवेळा केला जातो पाहिले जाते.
[1/18, 10:42 PM] लीना वैद्यमॅडम: शा.शि. विषयाचे मूल्यमापन करताना शारीरिक दृष्ट्या विद्यार्थ्यास आजारपण[तात्पुरता /दिर्घकालीन] नसावे... आणि जर असे असल्यास त्यास झेपेल अशाच कृती /उपक्रम निवडावेत.. 🙏🏼
[1/18, 10:43 PM] Mahesh Lokhande: विस्फोटकशक्ती तपासताना
१०० यार्डवर पळत जावुन वाकुन रेषेस स्पर्श करणे तीनवेळा जाणे स्पर्श करुन दोन्ही रेषांस येणे तपासले जाते.
[1/18, 10:45 PM] Mahesh Lokhande: मेडिसिन बाॅल थ्रो
साॅफ्ट बाॅल थ्रो
एकाच ठिकाणी पाय न हालवता दूर फेकून अंतर मोजले जाते.
[1/18, 10:46 PM] Mahesh Lokhande: हाताची पकड पाहताना हॅंन्ड ग्रीच हाताच्या पंजात दाबणेस देवुन पकडीची अचलस्थिती पाहिली जाते.
[1/18, 10:48 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: मूल्यमापनाद्वारे कोणताही विद्यार्थी नाउमेद होणार नाही याची कृपया मूल्यमापकाने दक्षता जरूर घ्यावी!!🙏
[1/18, 10:49 PM] Mahesh Lokhande: पुलअप्स
सिंगलबारला ९०अंश कोन ठेवुन शरीर उचलत हनुवटी बारच्यावर नेणे.पुन्हा खाली नेणे.थकेपर्यंत.झटके मारलेले, अर्धवट ,बारच्यावर न गेलेले मोजु नये.
[1/18, 10:51 PM] Mahesh Lokhande: पाय उचलणे
कमरेची स्नायुंची शक्ती मोजली जाते.गुडघ्यात पाय न वाकवता वर ९०अंशापर्यंत उचलणे परत खाली आणणे.२०सेंकदात कितीवेळा करतो पाहणे.
[1/18, 10:52 PM] Mahesh Lokhande: दोरास धरुन उडी मारणे
५संधी देणे.
[1/18, 10:53 PM] Mahesh Lokhande: शरीरसंतुलन
डोळे बंद करुन एका पायावर उभे राहणे
[1/18, 10:54 PM] Mahesh Lokhande: दम
१०० मीटर पळणे १००मीटर चालणेअसे ६००मीटर करणे
[1/18, 10:55 PM] Mahesh Lokhande: पाठीच्या स्नायुंची क्षमता मोजणे
पाठीच्या सहाय्याने ओढणे.
[1/18, 10:56 PM] Mahesh Lokhande: पायाची शक्ती मोजणे
पायाने उचलणे
[1/18, 10:57 PM] Mahesh Lokhande: हातांची शक्ती मोजणे
पुशअप्स+पुलअप्स=हातांची शक्ती
[1/18, 10:59 PM] Mahesh Lokhande: पोटाची शक्ती
दुसर्याने घटट पाय पकडलेले असताना झोपलेल्याने हात मानेमागे ठेवुन उठणे झोपणे १०वेळा करणे
[1/18, 11:01 PM] Mahesh Lokhande: कमरेची
खांद्याची गतीशील लवचिकता मोजणे
[1/18, 11:05 PM] Mahesh Lokhande: खूप काही सांगणेसारखे आहे पण वेळ पुरेसा नाही.या कसोट्या वापरुन एक एक कौशल्य पाहु लागलो तर आदर्श खेळाडू व क्रीडासंस्कृती विकसित होईल व भविष्यात आॅलम्पिक पदकांची भारत लयलुट करेल पण खेळाडूंची घडवणुक प्राथमिक शाळेपासुनच व्हायला हवी.
[1/18, 11:09 PM] Mahesh Lokhande: खोतसर ,उज्वला पाटीलमॅडम,रशीद तांबोळीसर,अरविंद गोळेसरआदरणीय पळसेसाहेब,आदरणीय खंदारेसाहेब,लीना वैद्यमॅडम
आपण सहभागी झालात आम्ही आपले आभारी व ॠणी आहोत अशीच प्रेरणा लाभो ही सदिच्छा.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏