[1/14, 4:12 PM] Mahesh Lokhande: 🔴 ग्रुपचर्चासत्र २ ९🔴
🌍 चर्चेचा विषय🌍
🔶 प्रकल्प🔶
मुद्दे=१)प्रकल्पलेखन
२) प्रकल्प
🔶चर्चेस वेळ दि. १४/१/२०१६ रात्री ९.३० ते१०.३०पर्यंत.🔶 सर्वांनी चर्चेत सहभागी व्हावे.🔵 आपले योगदान आमच्यासाठी अनमोल आहे.🙏🙏🙏🙏🙏🙏
[1/14, 9:37 PM] Mahesh Lokhande: प्रकल्प व उपक्रम कृती फरक काय?
[1/14, 9:37 PM] Mahesh Lokhande: प्रकल्पाचे प्रकार कोणते?
[1/14, 9:38 PM] Mahesh Lokhande: प्रकल्पाचे लेखन कसे करावे?
[1/14, 9:38 PM] प्रदिप कांबळे लातुर: मुलांच्या आवडीनुसार प्रकल्प द्यावे
मुलांच्या बूध्दीमतेनूसार प्रकल्प द्यावे
[1/14, 9:39 PM] Mahesh Lokhande: सर्व विषयांचे प्रकल्प घ्यावेत का?
[1/14, 9:40 PM] प्रदिप कांबळे लातुर: प्रकल्प मध्ये आपल्या परिसरातील वस्तू चा परिचय करून देणारे प्रकल्प हवेत
[1/14, 9:41 PM] प्रदिप कांबळे लातुर: हो सर्व विषयांचा सखोल अभ्यास व माहिती करून घेण्यासाठी सर्व विषयांवर प्रकल्प हवेत
[1/14, 9:43 PM] प्रदिप कांबळे लातुर: आनंददायी प्रकल्प असावा
[1/14, 9:44 PM] प्रदिप कांबळे लातुर: प्रकल्पात सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात यावे
[1/14, 9:45 PM] उदय भंडारे: एखादा विषय किंवा समस्या ठरवुन स्वंयअध्ययन पद्धतीने अभ्यास करणे . प्रयोग , निरीक्षणातुन माहीती मिळवणे. त्याचे विश्लेषण करुन योग्य निष्कर्ष काढणे म्हणजे प्रकल्प .
[1/14, 9:50 PM] उदय भंडारे: अध्यापनातील समस्या सोडवण्यासाठी , अध्ययनाची गोडी वाढवण्यासाठी केलेले कृतींचे आयोजन म्हणजे उपक्रम .
[1/14, 9:50 PM] Mote Gondi: प्रकल्प हे स्वयंअध्ययनाचे साधन होऊ शकते त्या साठी शिक्षकांनी प्रकल्प निर्मितीला योग्य दिशा द्यावी .
मुलांचा सर्किय सहभाग वाढवावा .
म्हणजे प्रकल्पाचा ऊद्देश सफल होईल.
[1/14, 9:51 PM] प्रदिप कांबळे लातुर: प्रकल्प मार्फत विद्यार्थी व शिक्षक पालक यांच्या अडचणी सोडवण्यात यावेत
[1/14, 9:52 PM] उदय भंडारे: प्रकल्पाचे प्रकार ...
संग्रहात्मक
सर्वेक्षणात्मक
प्रतिकृती तयार करणे
संशोधनात्मक
[1/14, 9:53 PM] Mote Gondi: मुलांचा कल पाहूण प्रकल्प द्यावा ,लादू नये .
स्वातंत्र्य विद्यार्थ्याला असावे .
[1/14, 9:54 PM] प्रदिप कांबळे लातुर: प्रकल्प मधून विद्यार्थी पालक समाज शिक्षक यांना नवीन काहीतरी शिकण्यास मिळेल असे प्रकल्प हवेत
[1/14, 9:55 PM] Mote Gondi: अध्ययन समृद्धी साठी प्रकल्प असावा.
[1/14, 9:56 PM] Kesekar: प्रकल्प म्हणजे माहित नसलेल्या निष्कर्षाकडे विद्यार्थ्यास घेवून जावून निष्कर्षासह स्पष्टीकरण देणे व उपक्रमामध्ये निष्कर्ष माहित असतो.
[1/14, 9:56 PM] Mahesh Lokhande: कोणता प्रकल्पप्रकार इयत्ता १ ते ५
व कोणते प्रकल्पप्रकार इयत्ता ६ते८ ला असावेत असे वाटते.
[1/14, 9:57 PM] प्रदिप कांबळे लातुर: विद्यार्थी सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असे प्रकल्प असावेत
[1/14, 9:58 PM] उदय भंडारे: १ली...
विशिष्ट शब्दाने सुरू होणार्या शब्दांचा संग्रह
[1/14, 9:58 PM] Mahesh Lokhande: प्रकल्पलेखन टप्पे (पायर्या)काय असावेत?
[1/14, 9:59 PM] प्रदिप कांबळे लातुर: 1-5 साठी
चित्रे संग्रह
पानांचा संग्रह
बियाणे संग्रह
[1/14, 10:00 PM] Mahesh Lokhande: सर्वेक्षणात्मक व संशोधनात्मक प्रकल्प लहान गट करु शकेल का?
[1/14, 10:00 PM] उदय भंडारे: १ली,२री...
पाने,फुले,फळे,पक्षी इ. चित्र ! नावांचा संग्रह.
[1/14, 10:01 PM] Kesekar: विज्ञानात वैज्ञानिक शोध
[1/14, 10:02 PM] Mahesh Lokhande: संग्रहात्मक प्रकल्प लहान गटात अधिक होतात असे दिसते.
[1/14, 10:03 PM] उदय भंडारे: ३री ,, ४थी ..
हस्ताक्षरातील नमुन्यांचा संग्रह
[1/14, 10:04 PM] Mahesh Lokhande: प्रकल्पातुन ज्ञानरचनेसाठी मोठा फायदा होतो
[1/14, 10:04 PM] खोतसर ज्ञा: विषयानुरूप प्रकल्प द्यवेत
[1/14, 10:05 PM] Mahesh Lokhande: प्रकल्पातुन ज्ञानकक्षा रुंदावतात
[1/14, 10:06 PM] Mote Gondi: प्रकल्पासाठी उपयुक्त वातावरण निर्मिती हा पहिला टप्पा असु शकतो.
[1/14, 10:07 PM] खोतसर ज्ञा: प्रकल्पमुळे विद्यार्थची विचार करण्याची क्षमता वाढीस लागते.
[1/14, 10:08 PM] Mahesh Lokhande: बरोबरमोटेसर शिक्षकांनी प्रकल्पयादी प्रदर्शित करुन मुलांस निवडीचे स्वातंत्र्य दिले पाहिजे.
[1/14, 10:08 PM] Mahesh Lokhande: पालकसहभाग सहकारीसहभागही फार महत्वाचा ठरत असतो.
[1/14, 10:11 PM] Mahesh Lokhande: तोटा हा ही आहे की पालकच किंवा मोठे भाऊ ताई यांचेकडूनच सगळे करुन घेतले तर हेतु सगळा हरवुन जाईल.
[1/14, 10:13 PM] उदय भंडारे: सध्या अवस्था अशीच आहे .
पालक पण प्रकल्प करण्याची हौस भागवुन घेत आहेत .
[1/14, 10:14 PM] खोतसर ज्ञा: प्रकल्प करताना महत्वाचे. विद्यार्थ्याला मर्गदर्शन करणे.
[1/14, 10:14 PM] Mahesh Lokhande: प्रकल्प
1. शैक्षणिक प्रकल्प,प्रकल्पासाठी लागणाऱ्या बाबी
व कसा तयार करून घ्यावा.
शालेय प्रकल्प म्हणजे काय ?-
विद्यार्थ्यानी शालेय विषयांच्या अभ्यासक्रमाशी संबंधित असणारा
एक विषय निवडून पुढील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपले
वय,आकलन शक्ती,स्वतःभोवतालचा परिसर व त्यात सहज
उपलब्ध असणारे प्रकल्प साहित्य यांचा विचार करून केलेला
उपक्रम म्हणजे प्रकल्प होय.
[1/14, 10:16 PM] Mahesh Lokhande: पालकांनी करु नये करवुन घ्यावे अशा सुचना द्यायला हव्यात
[1/14, 10:16 PM] Mahesh Lokhande: अ. प्रकल्पाची उद्दिष्टे-
स्वयंअध्ययनाची सवय लागणे.
स्व-कुवतीनुसार अध्ययनाची संधी मिळवणे.
स्वतःमध्ये उपजतच असणाऱ्या निरिक्षण,निवेदन,संकलन, सादरीकरण आदी क्षमताचा विकास घडवणे.
तर्कसंगत विचार करून अनुमान मांडणे.
कल्पकता,सृजनशीलता,संग्रहवृत्ती,श्रमप्रतिष्ठा,स्वयंशिस्त,चिकाटी,सौंदर्यदृष्टी, वक्तशीरपणा नीटनीटकेपणा,संघभावना इत्यादी गुणांचा विकास घडविणे.
आत्मविश्वास प्राप्त करणे.
या व्यतिरिक्त निवडलेल्या विषयाची खास वैशिष्टे अभ्यासणे. उदा. भाषा विषय-उच्चतमशुद्धता,
पाठांतर क्षमता,विचार मांडण्याची क्षमता इत्यादी
[1/14, 10:16 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: बरेच शिक्षकही जुनेच विषय नवीन मुलांना देवुन....तेच तेच प्रकल्प नव्याने घेतल्याचा आव आणतात....साॅरी...मिञानो पण यावर पर्याय असेल..तर नक्किच सांगा.....
[1/14, 10:17 PM] Mote Gondi: वर्तमान पत्राच्या रद्दितुन खालच्या गटाला चित्ररूप व वरच्या गटाला शब्दकोडी संग्रह हा प्रकल्प गट स्तरावर वा वैयक्तीक देता येउ शकतो.
[1/14, 10:17 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: कारण आपल्याला मुलांमधील संशोधन वृत्ति वाढवायची तर..,अस करून शक्य आहे का??
[1/14, 10:18 PM] Mahesh Lokhande: मुलास विषय ठरवु द्या त्याला त्यासबंधी वेगवेगळ्या प्रकारे माहिती गोळा करणेस सांगा त्याने ती गोळा करायला हवी.व स्वतः मांडणी करायला हवी
[1/14, 10:19 PM] उदय भंडारे: प्रकल्पाचे टप्पे ....
निवड
योजना
प्रत्यक्ष कार्यवाही
परीक्षण
मुल्यमापन
[1/14, 10:19 PM] Mahesh Lokhande: पाठांतर क्षमता,विचार मांडण्याची क्षमता इत्यादी
ब. प्रकल्प कार्य लेखन कसे करावे -
प्रकल्प कार्य करणे जितके महत्वाचे आहे,तितकेच केलेल्या प्रकल्प कार्याचे सुयोग्य प्रकारे लेखन करणेही महत्वाचे आहे, कारण निवेदन,सादरीकरण आदी क्षमतांचा विकास घडवणे आणि तर्कसंगत विचार करून अनुमान मांडणे हि प्रकल्पाची उद्दिष्टे तुमच्या प्रकल्प कार्य लेखनातून मूर्त स्वरूप घेणार आहेत. प्रकल्प कार्य लेखन कसे करावे, याचे मुद्धेसूद मार्गदर्शन पुढे दिलेले आहे-
[1/14, 10:20 PM] Mahesh Lokhande: विद्यार्थ्यांसाठी-
1. प्रकल्पाचे नाव विषयासह-निवडलेल्या अभ्यासक्रमातील विषयाचे नाव प्रथम लिहा. नंतर त्या विषयाची निवड केलेल्या प्रकल्पाचे नाव लिहा.
2. प्रकल्पाचा प्रकार- निवड केलेला प्रकल्प पुढील पैकी कोणत्या प्रकारचा आहे, त्याचा उल्लेख करा- सर्वेक्षणात्मक प्रकल्प, संग्रहात्मक प्रकल्प, संकलनात्मक प्रकल्प, रचनात्मक प्रकल्प,तक्त्यांच्या निर्मितीचा प्रकल्प, प्रतिकृती निर्मितीचा प्रकल्प.
3. प्रकल्पाची सुयोग्य उद्दिष्टे लिहा.
4. प्रकल्पाचे साहित्य- विषयासंबंधित पाठ्यपुस्तक, लेखन साहित्य, उपयुक्त साधने यांचा उल्लेख करावा.
5. प्रकल्पाची कार्यपद्धती- प्रकल्प सकारात असताना कर्नुअत येणाऱ्या कृतीचा उल्लेख क्रमवार पद्धतीने करा.
6. प्रकल्पाचे निवेदन- यामध्ये निवड केलेल्या प्रकल्प करण्यामागचा हेतू अधिक स्पष्ट करून मांडा.
7. प्रकल्पाचे सादरीकरण- संकलित केलेल्या माहितीची योग्य प्रकारे मांडणी करा. संकलन करतेवेळी आलेल्या विशेष अनुभवांची नोंद करा. तसेच त्यावेळी मिळालेल्या सहकार्याचा, मदत्कार्याचाही उल्लेख करा.घेतलेल्या संदर्भसाहित्याची नोंद करा.
8. आकृत्या व चित्रांकणासाठी- येथे प्रकल्पाशीसंबंधित चित्रे आकृत्या नकाशे चिटकवा आणि योग्य प्रकारे सुशोभन करा.
9. प्रकल्पपूर्तीसाठी वेळोवेळी केलेल्या विशेष बाबींची नोंद-यामध्ये निवड केलेल्या प्रकल्पाबाबतीतील वैशिष्ट्यपूर्ण बाबींची नोंद करा.
10. मूल्यमापन- यामध्ये केलेल्या प्रकल्पाची कोणकोणती उद्दिष्टे साध्य झाली? कोणते ज्ञान प्राप्त झाले?
11. प्रकल्पाबाबत स्वतःचे मत किंवा अभिप्राय लिहा. तसेच प्रकल्प पूर्ण करताना मिळालेल्या स्व-आनंदाचा उल्लेख एक दोन वाक्यात करा.
[1/14, 10:20 PM] उदय भंडारे: प्रकल्प वैयक्तिकही करता येतो ,
आणि गटातही .
[1/14, 10:21 PM] उज्वला पाटील रेठरे: कृतींची मालिका म्हणजे उपक्रम
[1/14, 10:21 PM] खोतसर ज्ञा: नाविन्यपूर्णच प्रकल्प हवेत त्यासाठी आपली सुद्धा शोधकवृत्ती ठेवून प्रकल्प दिले पाहिजेत.
[1/14, 10:21 PM] Mahesh Lokhande: क. शालेय प्रकल्पासाठी यादी-
1. माहीती संकलन - थोर संत, थोर समाजसुधारक,थोर राष्ट्रपुरुष,थोर शास्त्रज्ञ,थोर खेळाडू,थोर समाजसेवक,थोर समाजसेविका इत्यादी.
2. संग्रह : म्हणी संग्रह, वाक्यप्रचार संग्रह, अभंगसंग्रह, श्लोकसंग्रह,
सुविचारसंग्रह, कवितासंग्रह, भावगीतसंग्रह, पोवाडासंग्रह, समरगीतसंग्रह, देशभक्तीपरसंग्रह, गीते पशु-पक्षी यांच्या चित्रांचा संग्रह इत्यादी
3. प्रदर्शन : चित्रकलाकृती प्रदर्शन,ग्रंथप्रदर्शनपुस्तकेप्रदर्शन विज्ञान प्रकल्प प्रदर्शन विविध प्रकारच्या खेळण्यांचे प्रदर्शन इत्यादी.
4. तक्ते : शालेय शैषणिक विषयातील विविध घटकांचे तक्ते इत्यादी
5. आदर्श : आदर्श बालक-बालिका, आदर्श विद्यार्थी-विद्यार्थिनी, आदर्श शिक्षक-शिक्षिका, आदर्श शाळा, आदर्श समाजसेवक-समाजसेविका आदर्श महिला आदर्श गाव आदर्श शहर आदर्श राष्ट्र इत्यादी
[1/14, 10:22 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: चाकोरी बध्द प्रकल्प सोडून कोणी वेगळं.काही केलं असेल तर प्लीज अनुभव शेअर करा....कारण निवडश्रेणी प्रशिक्षणाच्या पुस्तकात वरील सर्व माहीती..छापलेली आहे..🙏
[1/14, 10:25 PM] उदय भंडारे: English..
collection of rhyming word.
[1/14, 10:27 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: गावातील कुंभार,परीट,लोहार,चांभार,सायकल दूरूस्ती करणारा,खाटीक,भाजी विकणारे,यासारख्या व्यावसायिकांच्या मुलाखती.मुलांनी स्वतः घेवून...सादर केलेला प्रकल्प मुलांना फार मोठा अनुभव देवून जाईल
[1/14, 10:30 PM] Mahesh Lokhande: 📝शालेय प्रकल्प यादी 🌀
==================
1) थोर संताची माहिती मिळविणे
2) थोर समाजसेवकांची माहीती
3) थोर राष्ट्रपुरूषांची माहिती
4) थोर समाजसेविकांची माहिती
5) आदर्श महिलांची माहिती
6) नामवंत खेळाडूंची माहिती
7) थोर शिक्षकतज्ञांची माहिती
8) थोर शास्त्रज्ञांची माहिती
9) थोर विरांगनांची माहिती
10) श्रेष्ठ गायिकांची माहिती
11) श्रेष्ठ गायकांची माहिती
12) आदर्श शिक्षक
13) आदर्श शिक्षिका
14) माझा गाव /आदर्श गाव 15) आदर्श समाजसेवक
16) माझा भारत महान
17) थोरांचे विचार
18) थोर हुतात्मा
19) राष्ट्रीय स्मारके
20) राष्ट्रीय प्रतिके
21 )प्राचीन मंदिर
22) ऐतिहासिक वाडे
23) महाराष्ट्रातील किल्ले
24) जलाशय तलाव
25) धरणे
26) सरोवरे
27) खनिज संपत्ती
28)जलसंपत्ती /समुद्र संपत्ती
29) वनसंपत्ती/वन हिच संपत्ती
30) औषधी वनस्पती
31) वाहतुकीचे नियम
32) वाहनांची घ्यावयाची दक्षता
33) माझे आवडते वाहन
34) रेल्वे स्टेशन
35) बसस्थानक
36) निबंध कसा लिहावा?
37) विरामचिन्हांचा वापर
38) पत्रलेखन कसे करावे ?
39)कथा कशी सांगावी ?
40) कथालेखन कसे करावे?
41) कवितांचा संग्रह
42) भावगीतांचा संग्रह
43) सारलेखन कसे करावे ?
44) मुद्यांवरून गोष्ट
45) चित्रमय गोष्ट
46) संवाद लेखन
47) वक्तृत्व कसे करावे ?
48) नृत्यप्रकार ओळखणे
49) वाद्यांची ओळख
50) हुमाउपंथी मंदिरे
51) वाक्प्रचारांचा संग्रह करणे
52) म्हणींचा संग्रह करणे
53) सुविचारांचा संग्रह करणे
54) सुभाषितांचा संग्रह करणे 55) अभंगाचा संग्रह करणे
56) श्लोकांचा संग्रह करणे
57) देशभक्तीपर गीतांचा संग्रह करणे
58) राष्ट्रीयगीतांचा संग्रह
59) 'आई' या विषयावरील कवितांचा-गीतांचा संग्रह
60) गणितातील गमतीजमती
61) आकाशवाणी
62) दूरदर्शन
63) वर्तमानपत्र
64) प्रदर्शन खेळण्याचे
65) प्राणिसंग्रहालय
66) पशुसंग्रहालय
67) पुरातनवस्तु संग्रहालय
68) भाजीपाला मंडई
69) किराणा दुकान
70) आपली वाहने
71) बियांचा संग्रह
72) जुन्या टिकिटांचा संग्रह
73) नाण्यांचा संग्रह
74) भेटकार्डांचा संग्रह
75) लग्नपत्रिकांचा संग्रह
76) निसर्ग चित्रांचा संग्रह
77) पिसांचा संग्रह
78) खेळण्यांचा संग्रह
79) मातीचे नमुने
80) खडकांचे प्रकार
81) दगडांचे नमुने
82) वैज्ञानिक खेळणी
83) शंख -शिंपल्यांचा संग्रह
84) राख्यांचा संग्रह
85) दो-यांचा संग्रह
85) वाहनांच्या चित्रांचा संग्रह
86) माझी शाळा
87) फुलांच्या चित्रांचा संग्रह
88) प्राण्यांच्या चित्रांचा संग्रह
89) विविध धर्मियांची प्रार्थना स्थळे
90) नूतन वर्षांभिनंदन
91) भारतीय सैनिकांची शौर्यगाथा
92) आपला आवडता छंद
93) आवडते पुस्तक
94) आवडता लेखक
95) आवडता गायक
96) आवडती गायिका
97) आवडता चित्रकार
98) आवडते गीत
99) आपल्या जवळचा मित्र
100) ग्रामदेवता
101) माझा देश
[1/14, 10:30 PM] खोतसर ज्ञा: शेती शेतकरी त्याची औवजारे पिके यांचाही अनुभव देता येईल.
[1/14, 10:31 PM] उज्वला पाटील रेठरे: अहवाल लेखनाच्या पायऱ्या .१.प्रकल्पाचा शिषक२.पाश्वभूमी३.प्रकल्प गरज (आवश्यकता व महत्त्व )४.प्रकल्प उदिदष्ट५.व्याप्ती ६.कालावधी ७.कायर्वाहीचे टप्पे ८.मूल्यमापन ९.समारोप
[1/14, 10:32 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: तसेच गावातील शेतमजूर,गवंडी मजूर,खाणकामगार,दगडफोडणारे,खड्डे काढणारे....किंवा.किराणा दूकानदार पोष्टमन.पोलीस,शिक्षक,तलाठी,यांसारख्यांच्या.मुलाखती योग्य भाषेसह सादर करता येतील...स्वानुभवाचे ज्ञान...नेहमी महान🙏
[1/14, 10:34 PM] उज्वला पाटील रेठरे: वैचारिक किंवा बौद्धिक .सिंदधांतिक प्रकल्प
[1/14, 10:49 PM] Mahesh Lokhande: प्रदिप कांबळे,उदय भंडारे,मोटेसर,केसेकरसर,खोतसर,रशीद तांबोळीसर,उज्वला पाटीलमॅडम सर्वांचे आभार🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏