Sunday, 24 January 2016

शैक्षणिक ग्रुपचर्चा ३९

[1/24, 8:09 PM] Mahesh Lokhande: 🔴 ग्रुपचर्चासत्र   ३९ 🔴
🌍 चर्चेचा विषय🌍
🔶राष्ट्रीय सण कसे साजरे करावेत?🔶
💎ध्वजसंहिता💎

🔶चर्चेस वेळ  दि. २४/१/२०१६   रात्री ९.३० ते१०.३०पर्यंत.🔶 सर्वांनी चर्चेत सहभागी व्हावे.🔵 आपले योगदान आमच्यासाठी अनमोल आहे.🙏🙏🙏🙏🙏🙏
[1/24, 9:41 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: राष्ट्राचा नावलौकिक वाढेल असे..उपक्रम.घ्यावेत
[1/24, 9:41 PM] खोतसर ज्ञा: ‬ 🇮🇳🇮🇳 ध्वजसंहिता 26 जानेवारी 2002 ला नवीन ध्वजसंहिता अंमलात आली.

🇮🇳 ध्वजसंहितेत झालेले बदल-

1) डोक्यावर शिरस्त्राण (टोपी) असो अगर नसो सर्वांना सॅल्यूट करून मानवंदना देता येईल.

2) ध्वजाच्या घडीत फुलांच्या पाकळ्या ठेवल्या तरी चालतील.

3) कोणत्याही व्यक्तिला आपल्या संस्थांवर/ कार्यालयांवर ध्वजाचा मान राखून ध्वजारोहन करता येईल. (सूर्योदयानंतर ध्वजारोहन व सूर्यास्तापूर्वी ध्वजावतरण करावे.)

4) ध्वजापेक्षा जास्त उंचावर कोणतीही पताका लावू नये.

🇮🇳🇮🇳ध्वजप्रतिज्ञा 🇮🇳🇮🇳

"मी राष्ट्रध्वजाशी आणि तो ज्याचे प्रतीक आहे त्या सार्वभौम,समाजसत्तावादी, धर्मनिरपेक्ष,लोकशाही प्रजासत्ताकाशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा करीत आहे."

🇮🇳🇮🇳ध्वजारोहन क्रम🇮🇳🇮🇳

1) ध्वजारोहन/ध्वज फडकवणे
2) राष्ट्रीय सलामी
3) राष्ट्रगीत
4) ध्वजप्रतिज्ञा
5) ध्वजगौरव गीत याप्रमाणे क्रम असावा.

*****!!!!!*****‬: राष्ट्रध्वज फडकवण्याची नियमावली
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀

❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀

देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण व अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातो.

राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकावित असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही, यासाठी काही नियम करण्यात आले आहेत.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने भारतीय राष्ट्रध्वज संहिता तयार करण्यात आली आहे.

ध्वज संहितेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

राष्ट्रीय ध्वजाबाबत संहिता तयार करण्यात आल्याचे खूप कमी नागरिकांना माहिती असते.

संहितेनुसार महत्त्वाचे राष्ट्रीय कार्यक्रम, सांस्कृतिक व मैदानी खेळाच्या वेळी नागरिक कागदाचा झेंडा हातात घेऊन फडकवताना दिसतात.

मात्र, कार्यक्रम झाल्यानंतर तेच झेंडे जमिनीवर इतरत्र फेकलेले दिसतात. ते टाळले पाहिजे. प्लॅस्टिकपासून तयार करण्यात आलेल्या झेंड्यांचा उपयोग करू नये.

ध्वज संहितांनुसार जेव्हा राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो तेव्हा त्याला सन्मानपूर्वक उच्च स्थान दिले पाहिजे.

राष्ट्रीय ध्वज अशा जागेवर फडकवला पाहिजे की, तो सगळ्यांना दिसला पाहिजे.

शासकीय इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवण्याचा प्रथा आहे.

रविवार व अन्य सुटीच्या दिवशीही सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकवला गेलाच पाहिजे.

प्रतिकूल हवामानातही ध्वज फडकवणे आवश्यक आहे.

संहितेनुसार राष्ट्रध्वज नेहमी स्फूर्तीने फडकवला पाहिजे व आदरपूर्वक ध्वज हळूहळू उतरवला गेला पाहिजे.

ध्वज फडकवताना व उतरवताना बिगूल वाजविलाच पाहिजे.

ध्वज कुठल्याही इमारतीच्या खिडकी, बाल्कनी अथवा दर्शनी भागात आडवा व तिरपा फडकवताना ध्वजातील केशरी रंगांचा पट्टा हा वरच्या बाजूला हवा.

राष्ट्रध्वज सभेच्या वेळी फडकविताना अशा पद्धतीने फडकाविला गेला पाहिजे की, मान्यवराचे तोंड हे उपस्थिताकडे पाहिजे व ध्वज हा त्यांच्या डाव्या बाजूला पाहिजे.

अथवा ध्वज भिंतीवर असेल तर मान्यवरांच्या मागे व भिंतीवर आडवा फडकाविला पाहिजे.

कुठल्या पुतळ्याचे अनावरण असेल तर ध्वज सन्मानपूर्वक व वेगळ्या पद्धतीने फडकविला गेला पाहिजे.

ध्वज गाडीवर लावताना गाडीच्या बॉनेटवर एक दंड उभा करावा व त्यावर फडकवावा.

संहितेनुसार राष्ट्रीय ध्वज कुठल्या मिरवणूक किंवा परेडच्या व्यक्तीच्या उजव्या हातात ध्वज असावा.

जर इतरही ध्वज असतील तर त्यांच्या मध्यभागी राष्ट्रध्वज असला पाहिजे. फाटलेला, मळलेला ध्वज फडकविला जाता कामा नये.

कोणत्या व्यक्तीला अथवा वस्तूला वंदन करताना ध्वज जमिनीच्या दिशेने झुकवू नये.

इतर ध्वजांची पताका अथवा ध्वज राष्ट्रध्वजापेक्षा उंच लावू नये.

राष्ट्रध्वजाचा उपयोग वक्त्याचे व्यासपीठ झाकण्यासाठी अथवा ते सजविण्यासाठी करू नये.

केशरी पट्टा जमिनीच्या बाजूने ठेवून ध्वज फडकविला जाऊ नये.

तसेच राष्ट्रध्वजाला माती व पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नये.

ध्वज फडकविताना तो फाटणार नाही, अशा पद्धतीने बांधला पाहिजे.

ध्वजाचा दुरुपयोग थांबविण्या संदर्भात स्पष्ट दिशा ठरविण्यात आली आहे.

त्यानुसार राजकीय व्यक्ती, केंद्रीय सैनिक दलाच्या संबंधित व्यक्तीच्या अंत्ययात्रेव्यतिरिक्त इतरत्र कोठेही त्याचा उपयोग करू नये.

ध्वज कुठलेही वाहन, रेल्वे, जहाजावर लावला जाऊ शकत नाही.
ध्वजाचा उपयोग घराच्या पडद्यासाठी करू नये.

कुठलाही पेहराव करताना ध्वजाचे कापड घेता येणार नाही.

तसेच राष्ट्रध्वज गादी, रुमाल अथवा नॅपकीनवर काढू नये.

राष्ट्रध्वजावर कुठेलीही लिखाण केले जात नाही किंवा त्यावर कुठलीही जाहिरात केली जात नाही.

ध्वज ज्या खांबावर फडकविला जातो त्यावरही जाहिरात लावता येणार नाही.

केवळ प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन याच दिवशी ध्वज फुलांच्या पाकळ्या ठेवून फडकविला जातो.

राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिक कवायतीच्या सावधान स्थितीत पाहिजेत.

शासकीय पोषाखात असलेले सरकारी अधिकारी ध्वजाला मानवंदना देतील.

जेव्हा ध्वज सैन्याच्या तुकडीतील जवानाच्या हातात असेल व तो सावधान स्थितीत उभा राहिल.

सरकारी अधिकार्‍यांच्या जवळून ध्वज जात असताना त्यांनी ध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना दिली पाहिजे.

आदरणीय व्यक्ती डोक्यावर टोपी न घालताही राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊ शकतात.
[1/24, 9:45 PM] थोरात ond: राष्ट्रीय एकात्मता जोपासली जाईल असे उपक्रम आयोजित करण्यात यावेत.
[1/24, 9:45 PM] खोतसर ज्ञा: राष्ट्रगीताचा व राष्ट्रध्वजाचा मान राजा वा.
[1/24, 9:55 PM] अरविंद गोळे: Rashtriya san sajare kartana kahi niyam astat te samjun gheun ase san sajare karave jene karun deshacha avman honar nahi
[1/24, 9:55 PM] थोरात ond: देशाच्या सिमेवर स्वतःच्या जिवाची पर्वा न करता आपल्या सर्वांच्या रक्षणासाठी अहोरात्र तैनात असलेल्या जवानांविषयी माहिती भाषण, चित्रफित, सांस्कृतिक कार्यक्रम याद्वारे आवर्जून द्यावी.
[1/24, 9:58 PM] थोरात ond: शाळा व सार्वजनिक ठिकाणी ध्वज फडकविण्याच्या वेळेचे पालन करावे.
[1/24, 9:59 PM] थोरात ond: प्लास्टिक ध्वज वापर टाळावा.
[1/24, 10:01 PM] अमोल पैठणे बुलढाणा: राष्ट्रीय सनानिमीत्त परिसरातिल माजी सैनिक, माजी पोलिस कर्मचारी यांचा सत्कार करणे. त्यांचे अनुभव, मार्गदर्शन विद्यार्थ्यासाठी प्रेरक ठरेल.
[1/24, 10:04 PM] थोरात ond: लाल किल्ल्यावर आयोजित संचालन व सांस्कृतिक कार्यक्रम चित्रफित विद्यार्थ्यांना दाखवणे.
[1/24, 10:05 PM] अमोल पैठणे बुलढाणा: राष्ट्रीय एकात्मता या विषयावर चित्रकला, वकृत्त्व, रांगोळी स्पर्धा आयोजित करणे.
[1/24, 10:13 PM] थोरात ond: साहसी विद्यार्थी, महिला यांना शाळांमध्ये बोलावून त्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी होईल.
[1/24, 10:16 PM] अमोल पैठणे बुलढाणा: राष्ट्रीय शौर्य पुरस्कारप्राप्त बालकांविषयी माहिती सांगणे.
[1/24, 10:37 PM] खोतसर ज्ञा: स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले प्राण गमविले त्या स्वातंत्र्य सेनानीचे कार्य सांगणे. व त्यांचे स्मरण करणे.
शफीसर,रशिद तांबोळीसर,खोतसर,थोरातसर,अरविंद गोळेसर,अमोल पैठणेसर,जोशीसर सर्वांचे खूप खूप आभार.