Friday, 30 January 2015

पटीचे पाढे

दुसरीला पाढे शिकवताना प्रथम सर्वांना छोटे डबे दिले.मुलांनी विचारले याचे काय करायचे,मी माझ्याजवळची गोट्यांची पिशवी दिली म्हटले,प्रत्येकाने एक दशक गोट्या डब्यात भरा.प्रथम ओमकारने एक एक गोट्या मोजून डब्यात टाकायला सुरुवात केली.मी पहात होतो तो दहा गोट्या झाल्यातरी टाकत राहिला त्याने चाळीस गोट्या डब्यात भरल्या.डबा भरला मी काही बोललो नाही वाटले कोणीतरी बरोबर करेल का पहाव.पण सर्वात गणितात हुशार ओमकारने जे केले तेच सर्वांनी केले.अमनला तर गोट्या पुरल्या नाहीत.मग मात्र मी विचारले मी तुम्हाला किती गोट्या डब्यात टाकायला सांगीतल्या होत्या मुले म्हणाली एक दशक मग एक दशक म्हणजे किती गोट्या होतात विचारले मुलांचे पहिलीचे पुर्वज्ञान जागृत झाले  ती म्हणाली दहा गोट्या म्हणजे एक दशक गोट्या.
         मग चला एक दशक गोट्या डब्यात भरा.मुले कामास लागली प्रत्येकाने दहा गोट्या डब्यात भरल्या.आता मी दोन दशक गोट्या डब्यात भरण्यास सांगीतले मुलांनी आणखी दहा गोट्या डब्यात भरल्या मी विचारले डब्यात किती गोट्या आहेत मुले म्हणाली वीस,मी किती गोट्या डब्यात टाकणेस सांगीतले होते.दोन दशक मुले म्हणाली.दोन दशक म्हणजे किती ?वीस,मग शिल्लक गोट्या चार घेऊन विचारले २दशक गोट्या  व ४ किती झाल्या मुलांनी चोवीस सांगीतले.मग २डब्यातील गोट्या किती?चाळीस मुले म्हणाली.चाळीस म्हणजेचा चार दशक.अशा तीन,चार,पाच डब्यातील गोट्या किती हे विचारले मुलांनी उत्तरे दिली.
           १ ची दुप्पट किती? मुले म्हणाली २,२ची दुप्पट किती?काही मुले तीन व काही चार म्हणाली.मी म्हटले अरे २दोनवेळा घेतल्यावर किती होतात ४ तीच दोनची दूप्पट,आता २ गोट्या ३ वेळा मांडा मुलांनी मांडून सांगीतले दोन तीनवेळा ६ ,दोनची तिप्पट ६,दोनची चौपट,पाचपट,सहापट,सातपट,आठपट,नऊपट,दहापट गोट्यांच्या सहाय्याने मांडून दाखवा मुलांनी गोट्या मांडून दाखवल्या.आता दोनची चौपट कशी लिहायची मुले शांत होती.२चारवेळा म्हणजे २ची चौपट २चारवेळा लिहिताना २x४ असे लिहितात म्हणजे २ ची चौपट लिहिताना २x४ अशी लिहितात.आता सांगा ३ची पाचपट कशी लिहितात मुले म्हणाली ३x५ ,४ची आठपट,५ ची नऊपटाअशी उदा. फळ्यावर लिहून गुणाकार रुपात लिहिण्यास सांगीतले मुलांनी पटपट लिहिले.आता दोनची एकपट दोन,दोनची दुप्पट चार,दोनची तिप्पट सहा,....असा दहाच्या पटीपर्यंत पाढा म्हणून घेतला.x चिन्ह किती पट आहे किंवा किती वेळा घेतले हे दाखवते हे सांगीतले.आता फळ्यावर गुणाकार रुपात पाढा लिहिला.तो एकवेळा,दोनवेळा,तीनवेळा.......असा नंतर एकपट,दुप्पट,तिप्पट,चौपट........असा म्हणून घेतला व घरचा अभ्यास ...ची एकपट,....एकवेळा,....x१ असा तीनप्रकारे एकच पाढा लिहुन आणणे व पाठ करणेस व घरी दगड ,काड्या,टिकल्यांपासुन पाढा बनवणे सांगीतले.