[1/22, 9:35 PM] Mahesh Lokhande: 🔴 ग्रुपचर्चासत्र ३७ 🔴
🌍 चर्चेचा विषय🌍
🔶विद्यार्थ्यांच्या दहा जीवनकौशल्याच्या विकसनासाठी काय काय करता येईल?🔶
मुद्दे=१) दहा जीवनकौशल्ये
२)जीवनकौशल्यविकसनासाठी उपक्रम
🔶चर्चेस वेळ दि. २२/१/२०१६ रात्री ९.३० ते१०.३०पर्यंत.🔶 सर्वांनी चर्चेत सहभागी व्हावे.🔵 आपले योगदान आमच्यासाठी अनमोल आहे.🙏🙏🙏🙏🙏🙏
[1/22, 9:36 PM] Mahesh Lokhande: नेल्सन मंडेला यांनी म्हटल होतं- ‘शिक्षणच एक असे आयुध आहे ज्यातून जगात सकारात्मक बदल होऊ शकतात.’ परंतू त्यांचे हे म्हणणे केवळ शालेय शिक्षणापुरते मर्यादीत आहे? एक मूल जीवन जगण्याची कला आणि अनुभवातून मिळालेले शिक्षण कुठून शिकून येते? कोणत्याही मुलाला शिक्षणाव्यतिरिक्त इतरही कौशल्य तितकीच आवश्यक आहेत जितके शिक्षण आवश्यक आहे.
[1/22, 9:37 PM] Mahesh Lokhande: जीवन कौशल्ये
स्व-ची जाणीव
समानानुभूती
समस्या निराकरण
निर्णयक्षमता
परिणामकारक संप्रेषण
व्यक्ती-व्यक्तीतील सहसंबंध
सर्जनशील विचार
चिकित्सक विचार
भावनांचे समायोजन
ताणतणावांचे समायोजन
ध्येये
१. स्वतःमधील गुणवैशिष्ट्यांमधील माहिती करून घेण्यास मदत करणे.
२. व्यक्तीचा भावनिक, वैचारिक, सामाजिक विकास होण्यास मदत करणे.
३. ताणतणावविरहित जीवन जगण्यास सक्षम करणे.
४. परिसरातील घटकांशी समन्वय साधून समस्यांवर व अडचणींवर मात करता येण्यासाठी सक्षम बनविणे.
५. मानवी जीवन सुखी व समृद्ध होण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची जाणीव निर्माण करणे.
उद्दिष्टे
विद्यार्थ्यांना –
१. व्यक्तीमध्ये असलेल्या आंतरिक शक्ती व गुणवैशिष्ट्यांची जाणीव होण्यास मदत करणे व त्यानुसार आवश्यक तो बदल घडवून आणण्यास प्रेरित करणे.
२. दैनंदिन जीवनात येणा-या अडचणींचा व समस्यांवर विचारपूर्वक निर्णय घेऊन योग्य मार्ग काढण्यास समर्थ करणे.
३. परिसरातील माहिती, ज्ञान, इतरांचे विचार इ. व्यवस्थितपणे ग्रहण करून त्यानुसार स्वतःचे मत बनविण्यास, ते योग्य प्रकारे मांडण्यास आणि प्रभावी संवाद साधण्यास सक्षम करणे.
४. परिस्थितीची जाणीव करून घेऊन योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणे.
५. इतरांबद्दल द्वेष, मत्सर, दूषित विचार न ठेवता त्यांच्याबद्दल आदर, प्रेम, समानानुभूती बाळगुन समाजासाठी हितकारक कृती करण्याची वृत्ती निर्माण होण्यास समर्थ करणे.
६. इतरांबद्दल दया, प्रेम, आदर, सद्भावना बाळगून एकमेकांमधील वैयक्तिक व सामाजिक संबंध निकोप ठेवण्यास प्रवृत्त करणे.
७. परिसरातील घटना, कृती प्रसंग इ. बाबत सहजतेने व विचारपूर्वक निर्णय घेण्याची व ताणतणाव विरहित आनंदी जीवन जगता येण्याची क्षमता निर्माण करणे.
८. आपल्या स्वतःच्या सुखदुःखाच्या प्रसंगात सहभागी होण्यास प्रवृत्त करणे.
९. परिसरात घडलेली घटना / कृती कशा प्रकारे घडते याचा सखोल माहितीच्या आधारे विचार करून त्यावर तर्क व अनुमान, निष्कर्ष काढता येण्याची क्षमता विकसित करणे.
१०. एखादी कृती, विचार, पारंपारिक रीतीने मांडण्याऐवजी त्यात नावीन्य, सोपेपणा, आनंद निर्माण करून वेगळेपणाने मांडण्यास मदत करणे.
[1/22, 9:43 PM] Mahesh Lokhande: जीवन कौशल्य "
काल जि प प्राथ शाळा केवणीदिवे शाळेत कार्यानुभव विषया अंतर्गत उत्पादक उपक्रमातील "अन्न एक उपक्रम" या अंतर्गत प्रात्यक्षिक घ्यायचे होते, काय घ्यावं? कोणता उपक्रम घ्यावा या विचारात असतानाच मुलींबरोबर चर्चा चालू होती. माझ्याकडे इयत्ता आठवीचा वर्ग असल्यामुळे मी वेगळ्या पदार्थाच्या विचारात होते .नक्की कोणता उपक्रम घ्यावा ? अखेर शाळेतील मुलींनी माझ्यापुढील संकट दूर केले आणि आमचा उपक्रम ठरला. ....... उपक्रम होता प्रत्यक्ष कृती युक्त उपक्रम ...आणि मुलींनी उपक्रम सुचवला होता.
"वेज मंचुरियन "
सुरवातीला मी देखील गोंधळून गेले कारण मी चायनीज डीश बनवणे हा उपक्रम कधी शाळेत घेतला नव्हता . फक्त इंडीयन डिशच घेतल्या होत्या . पण म्हणतात न मुलं फार उपक्रमशील असतात .आणि अखेर कृती साठी आवश्यक असणारे साहित्य गोळा केले .हा उपक्रम जरा अवघड वाटत होता कारण प्रत्यक्ष स्वयंपाकाची कृती करायची होती . मुलींनी सुंदर पाककृती करत "वेज मंचुरियन" बनविले त्यांनी त्यांची कृती फार सुदर रीत्या पार पाडली .
पण एक अनुभव येवून गेला....... की मुले फार उपक्रमशील असतात .आणि शालेय अभ्यासक्रमामध्ये अश्या जीवन कौशल्यावर आधारित घटकांचा समावेश असला पाहिजे.शेवटी शाळेतील सर्व मुलांनी आपण स्वतः केलेल्या पाककृतीचा मनमुराद आनंद लुटला....
ज्योती दिपक बेलवले
जि प शाळा केवणीदिवे,ठाणे
कृतिशील शिक्षक महाराष्ट्र (ATM)
[1/22, 9:45 PM] Mahesh Lokhande: जीवन कौशल्य शिक्षण ( life skills education):-
१) स्व-जागृती
२) सामानुभूती
३) समस्या निराकरण
४) निर्णय घेणे
५) प्रभावी संप्रेषण
६) चिकित्सक विचारप्रक्रिया
७) सर्जनशील विचारप्रक्रिया
८) अंतरव्यक्ती संबंध
९) भावनांचे समायोजन
१०) ताण तणावांचे समायोजन
या दहा जीवनकौशल्याच्या विकसनासाठी उपक्रम सुचवा.
[1/22, 9:46 PM] Mahesh Lokhande: मुलांमध्ये स्व जागृती (स्वची जाणीव)कशी विकसित होईल?
[1/22, 9:48 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: १)वर्गातील एखादा विद्यार्थी आजारी असला तर सर्वच मुलांनी मिळून त्याला पहायला जाणे. २)शिक्षकही आजारी असतील तर मुलांनी त्यांची चौकशी करणे.३)दिवाळी,वाढदिवस,नववर्षानिमीत्त मिञांना स्वता बनवलेले ग्रिटिंग भेट देणे...यासारखे उपक्रम मूल्यशिक्षणासाठी उपयोगी आहेत
[1/22, 9:48 PM] Mahesh Lokhande: मुले स्वतःस ओळखु शकतील स्वाभिमान जागृत होईल व आत्मविश्वास वाढेल स्वतःच्या क्षमता व मर्यादा कळतील तेव्हाच मुलामध्ये स्व जागृती झाली व स्व ची जाणीव परिपुर्ण विकसित झाली म्हणता येईल.
[1/22, 9:49 PM] खोतसर ज्ञा: सानेगुरुजीचे चरित्र वाचण्यास द्यावे
[1/22, 9:51 PM] Mahesh Lokhande: खोतसर श्यामची आईने बालमनावर खूपच छान परिणाम होतील खूपच परिणामकारक 👍👍👍👍👍👍👍👍
[1/22, 9:51 PM] खोतसर ज्ञा: सर्वधर्मियांच्या सणसमारंभात सहभागी होणे.
[1/22, 9:54 PM] Mahesh Lokhande: विविध स्पर्धामधून व संधीमधून मुलांस अभिव्यक्त होता येईल व त्यांना त्यांच्याआतला (खेळाडू गायक वादक नर्तक गणितज्ज्ञ शास्रज्ञ शिक्षक ....)सापडेल खरी स्वतःची ओळख होईल.
[1/22, 9:54 PM] खोतसर ज्ञा: राष्ट्रीय सणांचे महत्त्व पटवून देणे. राष्ट्रीय सणांमध्ये सहभागी होणे.
[1/22, 9:56 PM] Mahesh Lokhande: समानुभूती जीवन कौशल्यविकसनासाठी काय करता येईल.
[1/22, 9:56 PM] खोतसर ज्ञा: शेतकरी शेतमजूर कष्टकरी लोकांची मुलाखती घेणे.
[1/22, 9:57 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: महात्मा गांधीचा एक परीणामकारक उपक्रम ज्याची आज फारच गरज आले.....सर्वधर्मीय प्रार्थना....स्काऊटच्या प्रशिक्षणात.याचा सुंदर अनूभव घेता आला....प्रत्येक धर्माच्या एका प्रतिनिधी मुलाने त्याच्या धर्माची प्रार्थना म्हणायची...इतर सर्वच मुलांनी पाठीमागून तीच प्रार्थना म्हणायची...असे सर्वच धर्मीयांची प्रार्थना घ्यायची..
[1/22, 10:01 PM] Mahesh Lokhande: सम + अनुभूती=
[1/22, 10:02 PM] खोतसर ज्ञा: महान व्यक्तीचे सूविचार सांगणे विविध धर्मातील निवडक वचने सांगणे.
[1/22, 10:04 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: सामान्य सुचना...जसे,१)गुड माॅर्निंग २)हाउ आर यु? ३)हाउ इज युवर ग्रॅंडमदर? ४)यू आर अ गुड बाॅय ५)आय लाईक युवर ड्रेस...६)यु आर व्हेरी क्लेवर ....यांचा वापर मुलांनी व शिक्षकांनी जास्तीत जास्त करावा...वर्गात,घरात..
[1/22, 10:04 PM] Mahesh Lokhande: जीवनकौशल्यामुळेच जीवनातील आव्हानांचा सामना सक्षमपणे करता येतो.
[1/22, 10:09 PM] खोतसर ज्ञा: भूकंपग्रस्त धरणग्रस्त अंधव्यक्ती यांच्या विषयी सहानभुती व्यक्त करणारे कार्यक्रम शाळेत साजरे कारणे
[1/22, 10:09 PM] Mahesh Lokhande: प्रत्येक मूल स्वतंत्र व्यक्तीमत्व असते त्याला स्वतंत्र भावना विचार असतात व प्रत्येकाचे स्वतंत्र अस्तित्व व स्थान असते.ते स्वतंत्र सामाजिक मानवप्राणी असल्याने स्वतंत्र ज्ञानरचना करत असते.
[1/22, 10:12 PM] Mahesh Lokhande: समानुभूतीनुसार विद्यार्थी सर्वांशी समभावनेने वागू लागेल मोठा छोटा गरीब श्रीमंत कसलाही भेदभाव करणार नाही सर्वांशी समभावाने वागेल मी तसाच तो समजुन इतरांस समजुन घेईन दुसर्यास दुखवणार नाही.
[1/22, 10:16 PM] Mahesh Lokhande: समस्यानिराकरण हे जीवनकौशल्य विकसित होणेसाठी मुलास problem solvingपध्दतीने सतत आव्हान बुध्दीस चॅलेंज देत शिकणे घडायला हवे तरच जीवनातील समस्यांचा प्राधान्यक्रम ठरवुन कौशल्याने सर्व बाजुंचा विचार करुन समस्या सोडवु शकेल.
[1/22, 10:16 PM] Mahesh Lokhande: विविध कोडी
[1/22, 10:17 PM] Mahesh Lokhande: गणितखेळ
भाषिकखेळ
शब्दकोडी
[1/22, 10:22 PM] Mahesh Lokhande: निर्णय घेणे (डिसिजन मेकिंग)
झटपट विचार करुन पटकन निर्णय घेता येणे हे जीवनकौशल्य मुलांमध्ये विकसित करता येईल
कथेवर तु काय केले असते असे झाले तर तु काय करशील असे प्रश्न मुलाची निर्णयक्षमता कशी आहे.हे आपणास कळते.पटकन निर्णय व पटकन अमंलबजावणी समस्या सोडविण्यास देणे जबाबदारी दिल्याने त्याचे निर्णयकौशल्य विशिष्ट परिस्थितीत कसे आहे हे कळते.
[1/22, 10:25 PM] Mahesh Lokhande: प्रभावी संप्रेक्षण (प्रभावी सांगणे)
आपण सांगतो हे सर्वांस पटेल असे सांगणे.दुसर्यास समजावुन देण्याचे कौशल्य म्हणजे प्रभावी संप्रेक्षण.
[1/22, 10:29 PM] Mahesh Lokhande: चिकित्सक विचार
critical thinking प्रत्येक गोष्टीचा कार्यकारणभाव समजुन घेण्यासाठी का कसे कशामुळे असा विचार व शोधवृत्ती विकास चिकित्सक विचार विकसनाने होतो.
[1/22, 10:30 PM] Mahesh Lokhande: परिक्षणात्मक विचार कसलीही समीक्षा या चिकित्सक विचार जीवनकौशल्यात येतात.
[1/22, 10:31 PM] सुनिता लोकरे: स्वत्वाच्या जाणीवेसाठी प्रत्येक विद्यार्थ्याला विविध उपक्रमात सहभागी करुन घेणे त्याच्यात गुण क्षमताआवड यांचीजाणीव करुन देणे
[1/22, 10:31 PM] Mahesh Lokhande: सर्जनशील विचार creative thinking यामध्ये नवनिर्मितीचे विचार येतात.
[1/22, 10:35 PM] Mahesh Lokhande: आंतरव्यक्ती संबंध कौशल्य
आपआपसातील संबंध विकसन बंधुभाव मैत्रीभाव व नाती जपणे माणुसकी जपणे सर्वांशी प्रेमाने वागणे यातुन आंतरव्यक्ती संबंध विकसित होतील .
[1/22, 10:35 PM] सुनिता लोकरे: प्रभावी संप्रेषणासाठी गटचर्चा विविध विषयावर मत मांडणे मुलाखत घेणे भाषण स्पर्धा यासारखे उपक्रम घेता येतील
[1/22, 10:38 PM] Mahesh Lokhande: भावनांचे समायोजन
आपला राग लोभ यावर ताबा ठेवणे व संयमी जीवन संतुलित जीवन जगणे.वेळेवर भावनांच्या उद्रेकावर नियंत्रण मिळवणे या गोष्टी भावना समायोजनात येतात.
[1/22, 10:40 PM] सुनिता लोकरे: समानुभूतीमुळे दूरच्या व्यक्ति शी ही संबंध प्रस्थापित करण्याची क्षमता प्राप्त होते
यासाठी वर्गाची बैठक व्यवस्था मुलगा मुली अशी एकाआड एक करावी तसेच मुलांचे गट करताना ही मुले मली असा गट करावा
[1/22, 10:42 PM] Mahesh Lokhande: ताणतणावाचे व्यवस्थापन
कितीही खडतर परिस्थिती मनाची शांतता स्थैर्य जावु न देण्यासाठी मनाला आनंदी राहण्याची कला अवगत होणे व ताण न घेणे ताण येऊ न देणे या गोष्टी मानसिक आरोग्यासाठी आहेत.व मन स्थिर असेल कसलाही स्ट्रेस नसल्यास खर्या अर्थाने ताणाचे व्यवस्थापन करता आले म्हणता येईल.
[1/22, 10:44 PM] सुनिता लोकरे: विद्यार्थ्याकडून विविध उपक्रम ,प्रकल्प घेवून सर्जनशील कौशल्याचा विकास करता येईल
[1/22, 10:47 PM] Mahesh Lokhande: खोतसर ,रशीद तांबोळीसर,सुनिता लोकरेमॅडम आपले खूप खूप आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏