Thursday, 19 February 2015

शिष्यवृत्ती सराव प्रश्नसंच 11ते20

ऑनलाईन सराव प्रश्नसंच क्रं.11

1. 'कळप' हा समूहदर्शक शब्द कोणत्या शब्दासाठी येत नाही ?

गुरांचा
हरिणांचा
मेंढ्यांचा
माणसांचा

2. 'रेडकू' या शब्दाचे लिंग कोणते ?

पुल्लिंग
स्त्रीलिंग
नपुसकलिंग
सर्व बरोबर

3. जशी पोत्यांची थप्पी तशी करवंदाची ?

जाळी
मोळी
गाथण
जुडी

4. पक्ष्याच्या पिल्लाला काय म्हणतात ?

रेडकू
पिल्लू
पाडस
बच्चा

5. 'फूल' या अर्थाचा शुद्ध शब्द कोणता ?

पूष्प
सुमन
मन
पाकळी

6. farmer ---

catches the thief
grows the vegetables
makes the table
tolls the bell

7. We can ..... with our legs.

see
eat
smell
walk

8. १०० रुपयाच्या नोटेचे मूल्य २० रुपयाच्या नोटेच्या मूल्याच्या कितीपट आहे ?

तीनपट
पाचपट
पन्नास पट
ऐंशी पट

9. पतंगाला किती शिरोबिंदू असतात ?




10. कोणत्या आकृतीची केवळ परिमिती दिली असता क्षेत्रफळ काढता येते ?

आयत
चौरस
चौकोन
त्रिकोण

11. ५००० रुपये म्हणजे ५० रुपयांच्या किती नोटा ?

१००
१०
१०००
२००

12. संत तुकाराम कोणत्या गावचे रहिवासी होते ?

आपेगाव
देहू
पैठण
आळंदी

13. महाराष्ट्रात ......... लेण्यांजवळ घृष्णेश्वराचे सुंदर मंदिर आहे ?

घारापुरी
अजिंठा
शिवनेरी
वेरुळ

14. सलीम एका रांगेत डावीकडून १३ वा आणि उजवीकडून १७ वा आहे, तर रांगेत एकूण मुले किती ?

२९
२५
३०
२८

15. लो. टिळक पुण्यतिथी गुरुवारी असल्यास क्रांतिदिन कोणत्या वारी येईल ?

बुधवार
शनिवार
रविवार
शुक्रवार

16.आईच्या भावाच्या बहिणीला काय म्हणतात ?

मामी
मावशी
आत्या
मावसबहीण

17. अभिजीत हा पूर्वेकडे तोड करुन उभा होता. तो डावीकडे काटकोनात वळल्यास त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल ?

पूर्व
दक्षिण
उत्तर
पश्चिम

18. १३ : १५ : : २३ : ? .

२८
२७
२५
२९

19. खालीलपैकी कच्चा खाण्याचा पदार्थ कोणता ?

करडई
मुळा
ज्वारी
कारले

20. धरण कशावर बांधतात ?

जलाशय
विहिर
तलाव
नदी

ऑनलाईन सराव प्रश्नसंच क्रं.12

1. 'रानावनात मोर थुईथुई नाचतो' या वाक्यातील विशेषण ओळखा ?

रानावनात
थुईथुई
मोर
नाचतो

2. खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता ?

ती नदी
ती लेखणी
तो हुशारी
ती गवळण

3. गावाच्या प्रवेशद्वारास काय म्हणतात ?

शिव
तट
वेसण
वेस

4. जसे स्थिरस्थावर तसे रहाट.....

घागर
गाडगे
बाेल
सोयरे

5. 'शिकारीसाठी उंच बांधलेला माळा' या शब्दसमूहासाठी एक शब्द कोणता ?

माहूत
मचाण
दारवान
हवेली

6. आपण शरीराच्या कोणत्या अवयवावर घड्याळ घालतो ?

hand
wrist
arm
elbow

7. खालीलपैकी कोणती भाजी नाही ?

brinjal
tommato
ladiesfinger
rose

8. How many months of a year have 31 days ?

Six
Seven
Eight
Five

9. चुकीचा शब्द ओळखा ?

mother
sister
fater
uncle

10. We read from a .....

bank
book
bulk
bunk

11. कोणत्या ऊर्जेमुळे गोफणीतून दगड दूरवर जातो ?

यांत्रिक
सौर
ध्वनी
उष्णता

12. आपल्या राज्याच्या कोणत्या दिशेस मध्यप्रदेश हे राज्य आहे ?

पूर्व
पश्चिम
दक्षिण
उत्तर

13. नवेगाव बांध हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे ?

मोठा जलाशय
थंड हवेचे ठिकाण
तेलक्षेत्र
राष्ट्रीय उद्यान

14. किती वर्षाखालील मुलांना खाणीत कामाला ठेवता येत नाही ?

चौदा
सोळा
अठरा
वीस

15. लोणार हे खार्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ?

गोंदीया
ठाणे
गडचिरोली
बुलढाणा

16. पायदळाच्या प्रमुखाला ..... म्हणत ?

सुभेदार
शिलेदार
हवालदार
सरनोबत

17. शिवरायांच्या संस्कृत भाषेतील राजमुद्रेचा भावार्थ काय ?

हे राज्य लोककल्याणासाठी आहे
हे हिंदूंचे राज्य आहे
हे मराठ्यांचे राज्य आहे
हे शिवाजीचे राज्य आहे

18. मलिकअंबर हा ..... कर्तबगार वजीर होता.

कुतुबशाहीचा
इमादशाहीचा
निजामशाहीचा
आदिलशाहीचा

19. दिलेरखान कोणाचे शौर्य पाहून थक्क झाला ?

बाजी पासलकर
फिरंगोजी नरसाळा
उदेभान
मुरारबाजी

20. ..... हा सागरी किल्ला आहे.

राजगड
पुरंदर
विजयदुर्ग
रायगड

ऑनलाईन सराव प्रश्नसंच क्रं.13

1. खालील पर्यायातील एकवचनी पर्याय ओळखा ?

सारा
धारा
गारा
वारा

2. 'पोपट' या शब्दाला विरूद्धार्थी शब्द ओळखा ?

रावा
मिठू
मैना
शुक

3. खालील पर्यायातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा ?

नदी
ओढा
समुद्र
प्रवाह

4. 'किल्याभोवतालची भिंत' या शब्दसमूहासाठी खालीलपैकी कोणता शब्द वापरला जातो ?

गड
तट
पट
चिरेबंदी

5. लता मंगेशकर या कोण आहेत ?

लेखिका
गायिका
कवयित्री
नर्तकी

6. खालीलपैकी कोणती जोडी गटात बसत नाही.

A-a
d-d
E-e
B-b

7. 'क़' या उच्चारासाठी खालीलपैकी कोणते अक्षर वापरतात ?

A
B
S
C

8. Sunday, Monday, Tuesday यानंतर क्रमाने येणारा वार कोणता ?

Friday
Wednesday
Saturday
Thursday

9. आपल्याकडून एखादी चूक झाली असल्यास कोणता शब्द वापराल ?

Please
Thanks
Sorry
Hello

10. 'रेड' या शब्दाचे खालीलपैकी योग्य स्पेलिंग कोणते ?

Rad
Red
Rid
Rod

11. ५४९ - ४४३ = ? याचे उत्तर आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कोणते ?

106
206
306
406

12. ४०४०४ ही संख्या अक्षरी कशी लिहाल ?

चाळीस हजार चारशे चाळीस
चाळीस हजार चारशे चार
चार हजार चारशे चार
चार लाख चार हजार चार

13. १, २, ३ हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरुन तीन अंकी दोनशे पेक्षा मोठ्या किती संख्या तयार होतील ?





14. ५५४९ चे विस्तारीत रुप निवडा

५००० + ५०० + ४० + ९
५००० + ५०० + ३० + ९
५०००० + ५०० + ४० + ९
५०० + ५० + ४ + ९

15. १ ते ५० संख्यांमध्ये १ हा अंक किती वेळा येतो ?

१४
१५
१६
१७

16. गटात न बसणारा पर्याय ओळखा ?

तलाव
टाक्या
धरणे
नदी

17. मिठागर म्हणजे काय ?

मीठ तयार करतात ते ठिकाण
मीठाचे दुकान
मिठाईचे दुकान
मीठ साठवून ठेवतात ते ठिकाण

18. पृथ्वीला स्वत:भोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती अवधी लागतो ?

एक वर्ष
एक आठवडा
एक दिवस
एक महिना

19. पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत ?

कार्ले
कापेश्वर
सज्जनगड
कंधार

20. झाडावरील मोहोर म्हणजे काय ?

झाडावरील कोवळी पाने
झाडावरील छोटी फळे
झाडाची पानगळ
झाडावरील फुलोरा
ऑनलाईन सराव प्रश्नसंच क्रं.14

1. 'ल, सू, फू, र्य' या अक्षरापासून तयार होणार्या अर्थपूर्ण शब्दातील शेवटून तिसरे अक्षर कोणते ?

फू
सू

र्य

2. 'गीताई' हे पुस्तक कोणी लिहिले ?

व्यास
वाल्मिकी
विनोबा भावे
महात्मा गांधी

3. योग्य शब्द भरुन घोषणा पूर्ण करा.
'....... पर्यावरण, शुद्ध जीवन !'

शुद्ध
अशुद्ध
बेशुद्ध
अशुभ

4. 'सु' हा उपसर्ग पुढीलपैकी कोणत्या शब्दाला लावता येईल ?

मराठी
संस्कृत
गणित
इतिहास

5. 'चमक्तार' हा अशुद्ध शब्द शुद्ध कसा लिहाल ?

चकत्मार
चमत्कार
चमतकार
चमम्कार

6. पक्षी या अर्थाचा समानार्थी शब्द निवडा.

किटक
खग
पंख
पशु

7. 'bird' या शब्दाशी संबंधित शब्द खालीलपैकी कोणता ?

hands
jaws
mouth
wings

8. पाहुणे घरी आल्यावर काय म्हणाल.

Best wishes
Welcome
Congratulations
Good evening

9. bus : bus stop :: aeroplane : ?

stand
station
airport
junction

10. Grass is .....

Red
Green
White
Blue

11. ३ एप्रिल १६८० रोजी शिवरायांचे ..... किल्ल्यावर निधन झाले.

रायगड
राजगड
सिंहगड
पुरंदर

12. शिवरायांनी लाल महालात शायिस्ताखानावर कोणत्या तारखेला हल्ला केला ?

७ एप्रिल १६६३
५ एप्रिल १६६३
५ एप्रिल १६७३
७ एप्रिल १६७३

13. राज्याभिषेकासाठी शिवरायांनी ..... सिंहासन तयार करुन घेतले.

चांदिचे
संगमरवरी दगडाचे
तांब्याचे
सोन्याचे

14. शिवरायांची राजमुद्रा ..... भाषेत होती.

संस्कृत
मराठी
फारसी
हिंदी

15. निजामशाही वाचवण्यासाठी कोण निकराने लढले ?

शहाजीराजे व शरीफजी
शहाजीराजे व मलिक अंबर
मालोजी आणि विठोजी
विठोजी आणि लखुजीराव

16. पुढीलपैकी कोणता पदार्थ कच्चा खाण्याचा नाही ?

काकडी
बटाटा
चिंच
द्राक्ष

17. शरीरात ग्रासिकेचे स्थान कोठे आहे ?

वक्षपोकळीत
उदरपोकळीत
कटीपोकळीत
शिरोपोकळीत

18. पुढीलपैकी कोणती गोष्ट नैसर्गिक गोष्ट नाही ?

नदी
तळे
धरण
जंगल

19. आंब्याच्या फुलोर्याला काय म्हणतात ?

पालवी
मोहर
कैरी
बोंडे

20. स्थानिक शासनसंस्थांवर लोक त्यांचे ..... निवडून देतात.

नातेवाईक
मित्र
परिचित
प्रतिनिधी
सराव प्रश्नसंच 15

1. 'त्रास सहन केल्याशिवाय मोठेपण मिळत नाही' या अर्थाची म्हण ओळखा.

गाढवाला गुळाची चव काय
प्रयत्नांती परमेश्वर
पालथ्या घड्यावर पाणी
टाकीचे घाव सोसल्याशिवाय मोठेपण मिळत नाही

2. 'प्रवासी लोक मोरांना पाहण्यासाठी जयपूरला जातात' या वाक्यातील उद्देश्य विभाग ओळखा.

मोरांना
जयपूरला जातात
प्रवासी लोक
प्रवासी लोक मोरांना

3. खालीलपैकी पुल्लिंगी असलेला शब्द कोणता ?

समुद्र
होडी
लाट
नदी

4. खालीलपैकी भूतकाळी क्र‍ियापद कोणते ?

पाहीन
पाहिला
पाहणार आहे
पाहतो

5. '........ सुंदर फूल आहे' या वाक्यात गाळलेल्या जागी शुद्ध शब्द निवडा.

गूलाब
गुलाब
गुलाभ
गुलब

6. वेगळ्या उच्चाराने सुरु होणारा शब्द निवडा.

bag
pad
bat
bad

7. तुमच्या शिक्षणाची काळजी कोण घेते ?

neighbours
elder brother
uncle
parents

8. मालवाहतूक करणार्या वाहनाचे नाव सांगा.

car
truck
jeep
tanker

9. द्राक्षांना खालीलपैकी इंग्रजी शब्द कोणता ?

Bannana
Apple
Grapes
Chickoo

10. गाईच्या पिल्लाला काय म्हणतात ?

cub
calf
lamb
kid

11. पिवळ्याला हिरवा म्हटले, हिरव्याला लाल म्हटले, लालला पांढरा म्हटले, पांढर्याला काळा म्हटले, काळ्याला निळा म्हटले तर गवताचा रंग कोणता ?

लाल
हिरवा
पांढरा
काळा

12. पाच प्राण्यांच्या धावण्याच्या शर्यतीत हत्तीच्या मागे वाघ पळत होता, सशाच्या पुढे घोडा पळत होता, हत्ती आणि ससा यांच्यामध्ये उंट पळत होता तर सर्वात शेवटी कोण पळत होते ?

हत्ती
वाघ
उंट
घोडा

13. संगिताचे वय आईच्या वयाच्या निमपट आहे. जर संगिताचे वय ३१ वर्षे असेल तर आईचे वय किती ?

९३
४३
६१
६२

14. एका घड्याळात ६ ठोके होण्यास अर्धा मिनिट वेळ लागतो, तर त्याच घड्याळात १५ ठोके होण्यास किती सेकंद लागतील ?

७५
९०
१५०
१०५

15. ४२ मुलांच्या रांगेत समोरुन ८ व्या मुलाचा मागून कितवा क्रमांक येईल ?

३४ वा
३५ वा
३६ वा
३७ वा

16. अफजलखानाच्या वधानंतर शिवरायांनी विजापूरकरांच्या ताब्यातील ..... किल्ला जिंकला.

विशाळगड
पन्हाळगड
पुरंदर
रोहिडा

17. बडा सय्यदला कोणी ठार केले ?

जिवा महालाने
संभाजी कावजीने
येसाजी कंकने
पंताजी गोपीनाथने

18. आदिलशाहाने 'चंद्रराव' हा किताब कोणाला दिला ?

शहाजीराजांना
खंडोजी आणि बाजी घोरपडेला
जावळीच्या मोर्यांना
फलटणच्या निंबाळकरला

19. मावळात राहणार्या लोकांना ..... म्हणत.

माळकरी
मावळे
सैनिक
मराठे

20. आदिलशाहाने शहाजीराजांना ..... हा किताब दिला.

सरनोबत
सरनाईक
वजीरे आजम
सरलष्कर

सराव प्रश्नसंच 16

1. पुढील गटातील चुकीचे पद ओळखा ?
वांगी, टोमॅटो, भोपळा, बटाटा, दोडका

दोडका
भोपळा
टोमॅटो
बटाटा

2. दिवाळीची २१ दिवसांची सुट्टी ११ ऑक्टोबरला सुरु झाली, तर सुट्टी संपल्यानंतर शाळा कोणत्या तारखेला सुरु होईल ?

३ नोव्हेंबर
४ नोव्हेंबर
१ नोव्हेंबर
२ नोव्हेंबर

3. कवायतीसाठी जेवढ्या रांगा आहेत, तेवढीच मुले प्रत्येक रांगेत आहेत. जर प्रत्येक रांगेत १८ मुले असतील, तर मैदानावरील सर्व मुलांच्या पायांची संख्या किती ?

६४८
३२४
१६२
५७८

4. संग्राम मंदिराकडे तोंड करुन उभा होता. त्याच्या उजव्या बाजूला उत्तर दिशा होती. तो तीन वेळा काटकोनात डावीकडे वळला, तर त्याच्या पाठीमागील दिशा कोणती ?

उत्तर
दक्षिण
पश्चिम
पूर्व

5. पुढीलपैकी चुकीची तारीख ओळखा ?

३१ जानेवारी २०१८
३१ जून २००९
३० ऑगस्ट २०२९
३० डिसेंबर २०१२

6. शरीराच्या वाढीवर व हालचालींवर कोणत्या इंद्रियाचे नियंत्रण असते ?

फुफ्फुसे
मेंदू
डोळा
जठर

7. पुढीलपैकी सरड्याचे अन्न कोणते ?

गवत
उंदिर
झाडपाला
किडे

8. मानवाच्या अन्नमार्गाची लांबी सुमारे ..... असते.

१ मीटर
९ मीटर
५० मीटर
४ मीटर

9. उजनी धरण ..... नदीवर आहे.

पूर्णा
नीरा
भीमा
प्रवरा

10. आपल्यासाठी सर्वात मोठा दिवस कोणता ?

२२ डिसेंबर
२१ जून
२२ मार्च
२१ मे

11. पुढीलपैकी वर्तमानकाळी वाक्य कोणते ?

मी अभ्यास करतो
मी अभ्यास करीत होतो
मी अभ्यास करीन
मी अभ्यास केला

12. खांब या शब्दाचे अनेकवचन कोणते ?

खांबा
खांब
खंबा
खांबे

13. 'डोंगराआडून सूर्य उगवला. ...... दृश्य सुंदर होते' या वाक्यात रिकाम्या जागी कोणते सर्वनाम येईल?

तो
ती
त्या
ते

14. घुबडाच्या घराला काय म्हणतात ?

ढोली
पागा
गोठा
वारुळ

15. पुढीलपैकी कोणत्या शब्दाला प्रत्यय लागलेला नाही ?

यशवंत
जिवंत
गुणवंत
बलवंत

16. तानाजी हा कोकणातील ....... गावचा राहणारा होता.

महाड
उमरठे
रत्नागिरी
पोलादपूर

17. स्वराज्याची पहिली राजधानी कोणती ?

राजगड
रायगड
पुणे
प्रतापगड

18. ...... रक्ताने घोडखिंड पावन झाली.

बाजी घोरपडेच्या
तानाजी मालुसरेच्या
बाजीप्रभूच्या
मुरारबाजीच्या

19. ....... हे मूळ गुजरातमधील एक राजपुत्र होते.

संत ज्ञानेश्वर
श्रीचक्रधर स्वामी
संत एकनाथ
समर्थ रामदास

20. चाकणचा किल्ला ..... ने दोन महिने लढवला.

मुरारबाजी
तानाजी मालुसरे
बाजीप्रभू देशपांडे
फिरंगोजी नरसाळा

सराव प्रश्नसंच 17

1. 'कर' या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा ?

काम
डोके
कर्म
हात

2. 'माझ्या आजोबांनी मला वर दिला.' या वाक्यातील 'वर' या शब्दाचा अर्थ काय ?

दिशा
पण
आशीर्वाद
खाली

3. 'आपली सहल फेब्रुवारी महिन्यात दौलताबादला जाईल.' या वाक्याचा काळ ओळखा ?

भविष्यकाळ
वर्तमानकाळ
भूतकाळ
यापैकी नाही

4. 'मोरगावला खूप मोर असतात.' या वाक्यात किती नामे आली आहेत ?




5. 'बालवीर' या शब्दाचा विरूद्धलिंगी शब्द पुढीलपैकी कोणता ?

राजपुत्री
वीरबाला
अभिनेत्री
भगिनी

6. How many letters comes between a and i ?

six
seven
eight
nine

7. जर girl : boy तर man : ?

aunt
sister
mother
woman

8. तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर पुढीलपैकी कोणत्या योग्य ठिकाणी खेळाल ?

Hospital
Garden
Bus-stop
Theatre

9. गाणी ऐकण्यासाठी शरीराच्या कोणत्या अवयवाचा प्रामुख्याने उपयोग होतो ?

Nose
Eyes
Ears
Teeth

10. घोड्याच्या पिल्लाला ...... म्हणतात ?

Cub
Foal
Kid
Calf

11. १०० मधून १६ ची चार पट वजा केल्यास उत्तर किती येईल ?

३६
६४
१६
८४

12. आयताचे सर्व कोन ..... मापाचे असतात ?

६० अंश
९० अंश
४५ अंश
१८० अंश

13. घनापेक्षा इष्टिकाचितीला किती पृष्ठे जास्त अथवा कमी असतात ?

२ ने जास्त
१ ने कमी
४ ने जास्त
समान असतात

14. एकाच वर्तुळातील त्रिज्या व्यासाच्या ...... असते ?

निमपट
दुप्पट
तिप्पट
चारपट

15. दिड किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम ?

२५०० ग्रॅम
१५०० ग्रॅम
३५०० ग्रॅम
१००० ग्रॅम

16. रयतेला सुखी करण्यासाठी शिवाजी महाराजांनी ...... स्थापना केली.

वतनाची
स्वराज्याची
न्यायाची
जहागिरीची

17. आदिलशाहाने शहाजीराजांची ...... प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली.

कर्नाटकातील
खानदेशातील
कोकणातील
बंगालमधील

18. शिवरायांकडे पुणे, सुपे, चाकण व ...... या परगण्यांची जहागिरी होती.

सासवड
वेल्हे
इंदापूर
जुन्नर

19. आग्र्याच्या कैदेत शिवरायांबरोबर कोण राहिले ?

संभाजीराजे
संभाजीराजे, हिरोजी फर्जंद व मदारी मेहतर
हिरोजी फर्जंद
येसाजी कंक

20. शिवरायांच्या मुलकी व्यवस्थेत परगण्यावर ..... हा अधिकारी असे.

सुभेदार
जुमलेदार
शिलेदार
हवालदार

सराव प्रश्नसंच 18

1. 'भारतीय जवान आघाडीवर लढले' या वाक्यातील उद्देश्य विभाग ओळखा.

भारतीय
जवान
आघाडीवर
भारतीय जवान

2. मला पाणी नको या वाक्याचा प्रकार ओळखा ?

प्रश्नार्थी
उद्गारार्थी
नकारार्थी
होकारार्थी

3. 'गड आला पण ....... गेला' गाळलेल्या जागी शुद्ध शब्द निवडा ?

सिंह
सींह
सिंग
सिह

4. शुद्ध वाक्य ओळखा ?

दौलताबादचे जुने नाव देवगीरी होय.
दौलताबादचे जुने नाव देवगिरी होय.
दौलताबादचे जुने नाव देवगिरि होय.
दौलताबादचे जुने नाव देवगीरि होय.

5. 'मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची .........' या वाक्यातील गाळलेल्या जागी कोणत्या वाक्प्रचाराचा योग्य वापर करता येईल.

करामत केली
आहुती दिली
बाजी मारली
खळगी भरली

6. आंबट फळाचे नाव निवडा.

mango
tamarind
orange
pineapple

7. खालीलपैकी कोणते क्रिकेट या खेळाचे साहित्य नाही ?

pads
stumps
gloves
racket

8. खालीलपैकी कोणत्या वस्तूचा आकार वेगळा आहे ?

ball
box
sun
apple

9. कुत्र्याच्या पिल्लाला ..... म्हणतात ?

cub
kid
puppy
colt

10. टीव्ही पाहताना शरीराच्या कोणत्या भागाचा प्रामुख्याने उपयोग होतो ?

ears
eyes
mouth
back

11. ६ सेंमी बाजू असलेल्या चौरसाची परिमिती खालीलपैकी कोणती ?

२४ सेंमी
१२ सेंमी
६ सेंमी
२० सेंमी

12. ४८६० रुपये ९ जणात समान वाटले तर प्रत्येकाच्या वाट्याला किती रुपये येतील ?

४५०
५४०
५१५
५५१

13. एकाने दरमहा २४५ रुपये याप्रमाणे ३६ हप्त्यात पैसे देऊन धुलाईयंत्र खरेदी केले तर त्या धुलाईयंत्राची किंमत किती झाली ?

७८२०
९८२०
८७२०
८८२०

14. २ तास ५० मिनिटे = किती मिनिटे

१७०
१५०
२५०
२५००

15. नऊशे नऊला नवाने भागले तर भागाकार किती येईल ?

१११
१०

१०१

16. सह्याद्री पर्वत कोणत्या नावाने ओळखला जातो ?

सातपुडा
पश्चिम घाट
पूर्व घाट
गोदावरीचे खोरे

17. कोकणात कोणता अन्नघटक जास्त पिकतो ?

तांदूळ
गहू
ज्वारी
हरभरा

18. दृष्टिहीन व्यक्ती ..... काठीच्या मदतीने सार्वजनिक ठिकाणी मनमोकळेपणाने वावरू शकतात.

काळ्या
लाल
पांढर्या
हिरव्या

19. कोणत्या व्यक्तींसाठी खुणांची भाषा असते ?

दृष्टिहीन
कर्णबधिर
अपंग
गतिमंद

20. 'दो बॅूंद जिंदगी के' हे बोधवाक्य कोणत्या आजाराच्या संदर्भात आहे ?

हिवताप
टी.बी.
पटकी
पोलिओ

सराव प्रश्नसंच 19

उतारा वाचा आणि त्याखाली दिलेल्या प्रश्न क्रमांक १ ते ३ यांची उत्तरे द्या.

औरंगाबाद शहरापासून जवळच असलेला देवगिरी किल्ला हे मराठवाड्यातील एक प्रेक्षणीय स्थळ. या किल्ल्याला दॉलताबादचा किल्ला असेही म्हणतात. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो एका चक्रव्यूहासारखा आहे. म्हणूनच हा किल्ला पाहताना पर्यटकांना मार्गदर्शनाची गरज भासते. बालेकिल्ल्यापर्यंत जाण्यासाठी भुयारासारखे रस्ते व असंख्य पायर्या आहेत. किल्ल्याची तटबंदी शिळा कापून बनवलेली असल्याने त्याला फार घसरण आहे. या किल्ल्यात चिनी महालाच्या डावीकडे एका बुरुजावर एक प्रचंड तोफ आहे. या तोफेचा मागील बाजूच्या टोकाचा आकार मेंढ्याच्या तोंडासारखा आहे, म्हणून या तोफेचे नाव मेंढातोफ आहे. अशा या किल्ल्यात सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, खिलजी, तुघलक, बहमनी, निजामशाही, मोगल राज्यकर्त्यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले. दौलताबादच्या जवळच वेरुळच्या जगप्रसिद्ध लेण्या आणि घृष्णेश्वराचे मंदिर आहे. यामुळे याठिकाणी एक छोटीशी सहल होऊ शकते.

1. दौलताबाद किल्ल्याचे वैशिष्ट्य कोणते नाही ?
हा किल्ला चक्रव्यूहासारखा आहे
या किल्ल्याची तटबंदी शिळा कापून बनवलेली आहे
या किल्ल्यातील बालेकिल्ल्यापर्यंत जाण्यासाठी भुयारासारखे रस्ते आहेत
हा किल्ला पाण्यात आहे

2. देवगिरी किल्ल्याच्याजवळ कोणत्या लेण्या आहेत ?

घारापुरी
कार्ले
वेरुळ
पित्तळखोरा

3. 'जमिनीखालील गुप्त मार्ग' या शब्दसमूहाबद्दल कोणता शब्द उतार्यात आला आहे ?

भुयार
चक्रव्यूह
तटबंदी
रस्ता

4. 'त्या पिशवीत शंभर मोहरा होत्या' या वाक्यातील सर्वनाम ओळखा ?

शंभर
त्या
मोहरा
होत्या

5. 'साने गुरुजी ...... सांगत' या वाक्यातील गाळलेल्या जागी शुद्ध शब्द निवडा.

गोष्टि
गोष्टी
गोश्टी
गोश्टि

6. पुढीलपैकी कोणता जोडशब्द नाही ?

हलकाफुलका
कळतनकळत
गोडधोड
हिरवेपान

7. वचन लक्षात घेता गटातील वेगळा शब्द ओळखा ?

हात
पाय
कान
डोळे

8. शेजारी या शब्दाकरता असलेल्या इंग्रजी शब्दाचे योग्य स्पेलिंग निवडा.

niebar
neighbour
neibour
neghbour

9. इतर शब्दाशी यमक न जुळणारा शब्द निवडा.

pick
tick
pink
kick

10. कॅपिटल व लहान अक्षरांची बरोबर असलेली जोडी निवडा

V-u
N-n
M-w
D-b

11. वाघाला शेळी म्हटले, शेळीला हत्ती म्हटले्, हत्तीला कासव म्हटले तर सर्वात मोठा प्राणी कोणता ?

कासव
शेळी
वाघ
हत्ती

12. सागर सरीतापेक्षा हुशार आहे, सरीता सुरेशपेक्षा हुशार आहे व सुरेश सुजातापेक्षा हुशार आहे, तर सर्वात हुशार कोण ?

सरीता
सागर
सुरेश
सुरज

13. सरळ रांगेत उभा असलेल्या सिद्धेशचा समोरुन ५ वा क्रमांक असून त्याच्या लगत पाठीमागे उभा असलेल्या तेजसच्या पाठीमागे १७ मुले उभी आहेत तर रांगेत एकूण किती मुले आहेत ?

२०
२१
२२
२३

14. 'जवाहरलाल नेहरु स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते' या वाक्यातील सर्वात जास्त अक्षरे असलेल्या शब्दाचे मधले अक्षर लिहा.

ला


कोणतेही नाही

15. गार्गीला तीन बहिणी व दोन भाऊ आहेत. तिच्या एका भावाचे नाव अनुज आहे. अनुजला किती बहिणी आहेत ?




16. शिवजन्मापूर्वी विजापूरवर कोणाची सत्ता होती ?

कुतुबशाहाची
आदिलशाहाची
मुघल बादशाहाची
निजामशाहाची

17. शिवरायांनी १६४५ साली स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा कोणत्या मंदिरात घेतली ?

रायरेश्वराच्या
भवानीमातेच्या
शंकराच्या
गणपतीच्या

18. अफजलखानाच्या भेटीच्यावेळी शिवरायांचा कोणता वकील बरोबर होता ?

कृष्णाजी भास्कर
काझी हैदर
पंताजी गोपीनाथ
जिवा महाला

19. शिवरायांच्या राज्याभिषेकाचे पौरोहित्य कोणी केले ?

मोरोपंत पिंगळे
गागाभट्ट
मोरेश्वर पंडितराव
निराजी रावजी

20. शिवाजी महाराजांनी 'राज्यव्यवहार कोश' कोणत्या भाषेत तयार करून घेतला ?

संस्कृत
फारसी
हिंदी
मराठी

सराव प्रश्नसंच 20

1. 'खोक्यात पंधरा आंबे होते' या वाक्यातील पंधरा या शब्दाची जात ओळखा.

नाम
सर्वनाम
क्रियापद
विशेषण

2. स्त्रीलिंगी असलेला शब्द कोणता ?

टेबल
आरसा
खुर्ची
स्टूल

3. 'केलेला उपदेश वाया' या अर्थाची म्हण खालीलपैकी कोणती ?

पालथ्या घड्यावर पाणी
थेंबे थेंबे तळे साचे
चोरावर मोर
इकडे आड तिकडे विहिर

4. खुराडे कोणाचे ?

सापाचे
कोंबडीचे
उंदराचे
मधमाशीचे

5. 'पाणी व जमीन यावर राहणारे प्राणी' या शब्दसमूहाबद्दल कोणता एक शब्द आहे ?

जलचर
उभयचर
खेचर
भूचर

6. भारताच्या राष्ट्रीय प्राण्याचे नाव काय ?

सिंह
वाघ
हत्ती
हरीण

7. श्रृतीने तृप्तीच्या वहीवर पाणी सांडले. ती तृप्तीला काय म्हणेल ?

Thank you
Very nice
Well done
I am sorry

8. पुढील पर्यायांपैकी कोणते वाहन चार चाकांचे आहे ते ओळखा ?

bicycle
car
auto-rickshaw
train

9. यमक न जुळणारी जोडी निवडा ?

sand - band
sink - link
pen - pin
fall - hall

10. bottom या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द कोणता ?

up
top
down
above

11. ऑगस्ट महिन्यानंतर येणारा महिना कोणता ?

September
December
July
October

12. २६ नंतर येणारी आठवी विषम संख्या कोणती ?

३७
४१
३९
४३

13. १ ते १०० या संख्यांमध्ये कोणता अंक एकूण ११ वेळा येतो ?




14. ३, ५, ८ व ० हे अंक एकदा घेऊन बनवलेल्या चार अंकी संख्यांमधील सर्वात लहान संख्या कोणती ?

३०५८
८५३०
३०८५
३५०८

15. पावणेपाच लिटरचे मिलीलीटर किती ?

५७०५
५७५०
५०७५
४७५०

16. गोदावरी नदीवर ..... धरण आहे.

काटेपूर्णा
जायकवाडी
येलदरी
उजनी

17. पुढीलपैकी कोणता पदार्थ पाण्यावर तरंगेल ?

लाकडाचा भुसा
साखर
वाळू
खडे

18. पुढीलपैकी संदेशवहनाचे आधुनिक साधन कोणते ?

तार व टपाल
कबूतर
भ्रमणध्वनी
शाहीर

19. अन्न शिजवताना जर त्यात चिंच टाकली तर कोणती चव येईल ?

तिखट
आंबट
तुरट
खारट

20. आपण घरी कोणत्या भाषेत बोलतो ?

स्थानिक भाषेत
राज्याच्या भाषेत
राष्ट्रीय भाषेत
मातृभाषेत

No comments:

Post a Comment

आपली प्रतिक्रिया द्या .