[12/30, 6:42 PM] Mahesh Lokhande: 🔴 ग्रुपचर्चासत्र १४ 🔴
🌍आजचा चर्चेचा विषय🌍
🔶 शारीरिक शिक्षण विषयासाठी क्रीडाकौशल्य विकासासाठी कोणते मनोरंजनत्मक खेळ व पारंपारिक खेळ घेता येतील.🔶
मुद्दे=१) मनोरंजनात्मक खेळ
२) पारंपारिक खेळ
🔶चर्चेस वेळ आज दि.३०/१२/२०१५ रात्री ९.३० ते १०.३०पर्यंत.🔶 सर्वांनी चर्चेत सहभागी व्हावे.🔵
[12/30, 9:35 PM] खोतसर ज्ञा: 1)मलखांब लठी हे पारंपारीक खेळ आहेत. 2)लेझिम टिपरी कवायत प्रकार इ.
[12/30, 9:35 PM] समीरअॅ: १.सर्वांनी सर्वांशी खेळावयाचे खेळ : उदा.,
शर्यत, मोकाट-दौड इत्यादी. यांत प्रत्येकजण दुसऱ्याचा प्रतिस्पर्धी असतो. प्रत्येकालाच पहिले येण्याची इच्छा असते. मोकाट-दौडीत पळणे,चालणे, रांगणे, लंगडणे, उड्या मारणे या निरनिराळ्या हालचालींचा अंतर्भाव होतो.
संगीतखुर्ची, चमचा-लिंबयांसारख्या रंजनपर
खेळांच्या सामुदायिक स्पर्धा होतात. तद्वतच मुली दोरीवरच्या उड्यांसारख्या खेळांत रस घेतात.
२.एकाने अनेकांबरोबर खेळावयाचे खेळ : यांत शिवाशिवी,लपंडाव ,आंधळी कोशिंबीर , छप्पापाणी, तोबा, वाघ-शेळी, धबाधबी इ. खेळांचा समावेश होतो.यातूनच पुढे लहान गट मोठ्या गटांशी खेळतात. उदा.,साखळीची शिवाशिवी.
३.एकट्याने एकठ्याशी खेळावयाचे खेळ:द्वंद्वयुद्ध,कुस्ती, मुष्टियुद्ध, जंबिया,
कमरओढ,रेटारेटी अशा अनेक प्रकारच्या
लढती या गटात मोडतात. तद्वतच बुद्धिबळासारखे बौद्धिक कौशल्यावर आधारित खेळही यात येतात.
४.लहान संघाने दुसऱ्या लहान संघाशी खेळणे : यात निरनिराळ्या टप्प्यांच्या शर्यतींचा समावेश होतो.तीन पायांच्या शर्यती, उदा., पळण्याच्या गट-शर्यती(रिले-रेस), तसेच लंगडी,कबड्डी ,खोखो हे नियमबद्ध सांघिक खेळ.
५.मिश्र खेळ : यात दोन किंवा अधिक खेळांचा मिलाफ झालेला असतो.वाकड्यातिकड्या उड्या, छूटचे खेळ तसेच विनोदी हालचालींचे खेळ, गोष्टीरूप खेळ असे रंजनाबरोबरच मानसिक व बौद्धिक शिक्षण देणारेही खेळ यात येतात. ‘जागा बदला!’ या खेळातून स्मरणशक्ती,‘राम-रावण’ या खेळातून एखादी गोष्ट लक्षपूर्वक करण्याची पात्रता,‘किल्लाफोड’ या खेळामधून चढाईचे गुण व चातुर्य अशा गुणांची जोपासना होते.
६.टप्प्यांचे खेळ व शर्यती : लहान संघांच्या गटां टप्प्यांचे खेळ हा एक रूढ प्रकार आहे. त्यात प्रामुख्याने टप्प्यांच्या शर्यतीचा समावेश होतो. या शर्यतीत अंतर काटण्याच्या विविध पद्धती वापरून रंगत आणता येते.या शर्यती वेगवेगळी साधने वापरून व अंतर काटण्याच्या वेगवेगळ्या पद्धती वापरून विविध प्रकारे खेळता येतात.
७.खास मुलींचे खेळ : व्यायाम व
करमुणकीबरोबरच भावी आयुष्यात उपयुक्त
ठरतील, अशा गुणांची जोपासना या खेळांमुळे
होऊ शकते.फुगडी, झिम्मा, कोंबडा, पिंगा,‘किकीचे पान बाई किकी’, ‘किसबाई किस’ हे मुलींचे काही खेळ होत.
८.साभिनय खेळ : या खेळात एखादी मनोरंजक गोष्टी सांगायची असते आणि ती
सांगताना मुलांनी प्रसंगानुसार हावभाव करायचे असतात किंवा अभिनयासह गीत गायचे असते.
९.पूरक खेळ : या खेळातील हालचाली
सांधिक मैदानी खेळांना पोषक व पूरक ठरतात. उदा.,आट्यापाट्या, लगोऱ्या, लंगडी.
१०.सांघिक मैदानी खेळ : हे खेळ नियमबद्ध
असतात. कबड्डी, खोखो,विटीदांडू,
रस्सीखेच, चेंडूचे खेळ इत्यादी.
११.वैयक्तिक मैदानी खेळ : या खेळांतून मुलांचे वैयक्तिक कौशल्य वाढीस लागते. मेहनतीचे महत्त्व कळते आणि जीवनाला आवश्यक असणाराआत्मविश्वास बळावतो.
१२.विदेशी खेळ : लहान मुले क्रिकेट,रिंग टेनिस, टेबल-टेनिस इ. व मुली नेटबॉलसारख्या खेळांचा सराव करू शकतात. पाश्चात्त्य देशांत हे खेळ तसेच व्यायामी खेळ बालवयातच शिकविले जातात.भारतातही अलीकडे नवव्या-दहाव्या वर्षांपासून मुलांना ह्या खेळांची ओळख करून देण्यात
येते.
१३.बैठे खेळ : यात पत्ते व पत्त्यांचे खेळ,कॅरम,पटावरील खेळ , व्यापार, बुद्धिबळ इ. खेळ मुले फावल्या वेळात व सुटीत खेळतात.
१४.कवायतीचे खेळ : यातून मुलांना शिस्त व स्वच्छता यांचे महत्त्व पटते. कवायत व खेळ यांची हल्ली सांगड घालण्यात आलेली आहे.
१५.मनोरंजनात्मक खेळ : शिवाजी म्हणतो,गाढवाला शेपटी लावणे,भेंड्या, संगीतखुर्ची,तळ्यात-मळ्यात' सुईदोऱ्याची शर्यत इ.
[12/30, 9:40 PM] Mahesh Lokhande: मनोरंजनात्मक खेळ
१) खुंटीवर फेक=जमीनीवर अर्धा मीटर वर राहील अशी खुंटी रोवावी.५ मीटर अंतरावरुन एकेकाने तीन रिंगा खुंटीवर फेकाव्या एक अडकली एक गुण द्यावा.
२)स्मृती चाचणी=टेबलावर ३० वस्तु बटण,कंगवा,सुई, दोरा,पेन,पेन्सिल......अशा ठेवाव्या सर्वांना ठराविक वेळ पहाण्यास सांगावे.नंतर त्या झाकुन ठेवाव्यात व कागद द्यावे सर्वांनी यादी बनवावी.सर्वात जास्त वस्तुंची नावे लिहिणारा जिंकेल.
३) जोडी खाली पाडणे=दीड मीटर वर्तुळातील करेल किंवा १५ वस्तु उभ्या कराव्यात ८मीटरवरुन टेनिसचेंडूने पाडणे तीन संधी द्याव्यात जास्त पाडणारा विजेता.
४)चेंडूटोपली=टप्प्याने चेंडू टोपलीत घालवणे तीन संधी जो जास्तवेळा घालवेल तो विजेता.
५)पत्तेफेक=खुर्चीवर बसुन डाव्या हाताने उजव्या हाताचे कोपर पकडून उजव्या अंगठा व तर्जनीने १०पत्ते २ मीटरवरील हॅटमध्ये टाकावेत.फक्त मनगटातुन हालचाल करावी.जास्त टाकणारा विजेता.
[12/30, 9:42 PM] Mote Gondi: दिनांक- ३०/१२/२०१५
मनोरंजनात्मक पारंपरीक खेळ -
१)अांबा कोय खेळ-
२)चिंचोके खेळ -
३)सळीची गाडी-
४)चाकोरी फिरवणे-
५)चिखलात सळी मारणे-
६)गारगोट्यांचा खेळ -
७)सागर गोट्या -
८)जिबल्यांचा खेळ-
९)सूर-पारंब्या-
१०)काचा कवड्या-
११)लगोर चेंडू-
१२)विटि-दांडू-
१३)भोवरा फिरवणे-
१४)काटवट कणा-
१५)स्टॅच्यू करणे -
१६)पैज लावणे-
१७)दोर उडी-
१८)लंगडी-
१९)अांधळी कोशिंबीर-
२०)पोहणे-
२१)झिंमा-फुगडी-
२२)कांदा फोडणी-
२३)फुलपाखरू पकडणे -
२४)पत्यांचा बंगला-
२५)दोरी मल्लखांब -
२६) खांब मल्लखांब -
२७)मनोरे-
२८)डबलबार-
२९)सिंगलबार-
३०)करेल फिरविणे-
३१)रिंगण कुस्ती-
३२)मातीतील कुस्ती -
३३)लपाछपी-
३४)चोर-पोलीस-
३५)भातूकलीचा खेळ-
नितीन मोटे 🙏🀊?
[12/30, 9:43 PM] Mahesh Lokhande: ६)कागद पदन्यास=दीडफुटाचे पुठ्याचे तुकडे घेवुन त्यावरुन १०मीटर अंतरापर्यंत जाणे.पाय जमीनीला लागुन देवु नयेत.जो प्रथम जाईल तो विजेता.हा खेळ जोडीनेही घेता येईल एकाने पुठ्ठे ठेवणे एकाने चालणे.असा खेळ वीटा वापरुन कागद वापरुनही घेता येईल.
७)पोत्यात पाय घालुन चालणे(पोत्याची शर्यत)=२०मीटर अंतरावर पोत्यासह उड्या मारत धावत जाणे.जो प्रथम जाईल तो विजेता.
८)गोळी शोधणे=हात मागे बांधुन गुडघ्यावर बसावे समोर बशीत गव्हाच्या पीठात तळाशी लिमलेटची गोळी
असेल ती बशीवर फुंकर मारुन गोळी तोंडाने उचलुन खावी जो प्रथम खाईल तो विजेता.
९)बाटलीत वाटाणे टाकणे=उंच पाठीच्या खुर्चीवर असलेल्या लहान तोंडाच्या बाटलीत खुर्चीमागे उभे राहुन खुर्चीला धक्का न लावता हात सरळ करुन ५ वाटाणे टाकणे ज्याचे जास्त बाटलीत पडतील तो विजेता.
१०)बाटली भरण्याची स्पर्धा=बादलीतील पाणी ओंजळीने बाटलीत टाकुन बाटली भरणे व ३० मीटरवरील प्रारंभ रेषेवर भरलेली बाटली घेवुन पळत येणे.प्रथम येणारा विजेता.हीच स्पर्धा ६ मीटरवरील बादलीतील ओंजळीने पाणी आणून बाटली भरणे अशी ही घेता येईल.
[12/30, 9:44 PM] भालदारमॅडम ज्ञा: 🙏🏻🙏🏻भांडीकुंडी, बिट्या, दुकानदुकान,भातुकली,लपाछपी,
[12/30, 9:46 PM] खोतसर ज्ञा: ठराविक अंतर ठेवून गोल मारून एक खुंटी रोवून खंटीत रिंगा टाकणे व त्यामधे अडकवणे. जास्त अडकवतील तो जिंकले. असाही खेळ घेता येईल.
[12/30, 9:49 PM] Mahesh Lokhande: ११)पाठीवरील फुगा फोडणे=प्रत्येकाच्या कमरेस फुगा बांधणे प्रत्येकाने आपला फुगा वाचवुन दुसर्याचा फुगा फोडणे.वर्तुळाबाहेर जावु नये.शेवटी फुगा टिकुन राहील तो विजेता.
१२)फुगायुद्ध=डाव्या पायाच्या पोटरीस फुगे बांधावेत.प्रत्येकाने आपला फुगा वाचवुन दुसर्याचि फुगा हाताने फोडणे.शेवटी राहणारा फुगेवाला विजेता.
१३)हातातला फुगा फोडणे=१५मीटरवर पळत जावुन हातातल्या फुग्यास फुगवुन दोरा बांधुन फोडावा.आधी फोडणारा विजेता.
१४)बसुन फुगा फोडणे=१५ मीटर अंतरावर पळत जावुन फुगा फुगवुन बांधुन खाली ठेवुन त्यावर बसुन फोडणे.प्रथम फोडणारा विजेता.
१५)पदार्थ परिचय=डोळे बांधुन पाकीटाचा वास घेवुन पदार्थ ओळखणे.कांदा लसुन कापुर डांबर गोळी फुले अत्तर ठेवावे.
[12/30, 9:52 PM] भालदारमॅडम ज्ञा: रेन फाॅल हाखेळ घेता येईल शिक्षकांनी आपला हात वर वर केला की टाळ्यांचा आवाजवाढवावा.हात खाली येईल तसा आवाज कमी कमी करावा.पाऊस पडल्याचा भास होतौ.
[12/30, 9:53 PM] Mahesh Lokhande: १६)वस्तुपारख=सर्वांच्या चपला बुट मोजे पेन एकत्र करुन ढिगातुन आपल्या वस्तु प्रथम काढणारा विजेता.
१७)फुगेफोड=भितींवर बांधलेले फुगे चेंडूने फोडणे ३संधी.जास्त फोडणारा विजेता.
१८)मेणबत्या विझवणे=टेबलावरील २डझन मेणबत्या उशीवर हनुवटी ठेवुन जोरात फुंकर मारुन ६इंच अंतरावरुन विझवणे.जास्त मेणबत्त्या विझवणारा विजेता.
१९)चेंडूफेकस्पर्धा=चेंडु फेकुन पहिला टप्पा पडेल तिथे उभे राहावे.दुसर्याचा मागे पडला तर तो बाद जर पुढे गेला तर पहिला बाद.सर्वात लांब टप्पा पडणारा विजेता.
२०)गुंडाळीतुन शरीर काढणे=५ फुट दोरीची टोके जोडुन केलेल्या गुंडाळीतुन शरीर काढणे गटाने करणे एकाचे नंतर दुसर्याचे असे जो गट करेल तो जिंकेल.
[12/30, 9:56 PM] भालदारमॅडम ज्ञा: सर👌🏻👌🏻रेनफाॅल हा खेळ आपण एका बोटाने टाळी दोन बोटाने टाळी तिन बोटाने नंतर चार बोटाने नंतरपाच बोटाने असा देखील खेळता येतो.
[12/30, 10:00 PM] Mote Gondi: बालअानंद मेळाव्यात वरिल पेकी निवडक पारंपारीक स्मृतीअाड खेळाला स्पर्धात्मक उजाळा मिळावा .✔🙏?
[12/30, 10:01 PM] Mahesh Lokhande: २१)कलिंगड खाणे=५ पावलावरील पानावरील कलिंगड खाप हात मागे बांधुन तोंडाने खाणे संपुर्ण लाल भाग प्रथम खाणारा विजेता.
२२)खजिनाशोध=सहलीवेळी पिशवीत वस्ती ठेवुन लपवुन ठेवणे दुसर्या गटाने खजिना शोधुन काढणे.
२३)पादत्राणशोध=चपला बुट ढिग एकत्र करुन त्यातुन आपले पादत्राण शोधणारा विजेता.
२४)सुईदोरा=डोळे बांधुन सुईत प्रथम दोरा ओवणारा विजेता.
२५)पुष्पगुच्छ तयार करणे=२०मिनिटात आसपासची पाने फुले गवत फांद्या वापरुन पुष्पगुच्छ बनविणे उत्कृष्ट बनवणारा विजेता.
[12/30, 10:05 PM] उदय भंडारे: या चर्चेतुन आपले बालपण डोळ्यासमोर आले . याच खेळातुन खरा आनंद मिळायचा .
[12/30, 10:08 PM] उदय भंडारे: यातील कितीतरी खेळ आपण सहज शाळेत घेऊ शकतो .
[12/30, 10:08 PM] Mote Gondi: रोज एक वेगळा खेळ शाळेत मुलांसमवेत घेऊया
[12/30, 10:11 PM] Mahesh Lokhande: २६)स्ट्राॅने वाटाणे उचलणे=स्ट्राॅ तोंडात धरुन १ मिनिटात एका बशीतील वाटाण स्ट्राॅने उचलुन दुसर्या बशीत टाकणे जास्त वाटाणे टाकणारा विजेता.
२७)चेंडू सरळ रेषेत नेणे=कॅरमसारख्या बोर्डवर खिळे ठोकुन ओळी तयार कराव्या ओळीतुन चेंडू १मिनिटात फुंकर मारीन अंतिम टोकाकडे नेणे.
२८)डोळे बांधुन खाऊ भरवणे=दोघांस २०पावलावर डोळे बांधुन हातात बिस्किट द्यावे तिथुन चालत येवुन एकमेकास भरवणे.
२९)खेचाखेच=२संघांनी समोरासमोर कंबरेस पकडुन थांबावे रेषेवर पहिल्या खेळाडूंनी हात धरुन खेचावे इतरांनी कंबरेस पकडून खेचणे.
३०)टिकली लावणे=स्त्री चित्रावर डोळे बांधुन टिकली लावणे.
[12/30, 10:21 PM] Mahesh Lokhande: ३१)पासिंग द पार्सल=वर्तुळाकार वस्तु पास करणे संगीत थांबता ज्याजवळ पार्सल (पेन रुमाल टोपी)असेल त्याने चिठ्ठी वाचुन कृती (गमतीदार शिक्षा)करावी.(रडणे,नाचणे,नक्कल,आवाज काढणे)
३२)ठो म्हणा=वर्तुळाकार बसुन १,२,३....म्हणणे ५येणाराने ठो म्हणावे ५पटीच्या संख्या आली की ठो म्हणावे.चुकेल तो बाद शेवटी राहणारा विजेता.
३३)पत्त्यांचा खेळ=चौकोनावर पळणे चार कोपर्यांस चार रंग नावे.कोपर्यावर गोल.मध्येच पत्ते रंगीत त्यातुन जो रंग पत्ता निघेल त्या गोलात असणारे बाद.
३४)चेंडूचा वर्षाव=२ गटांनी एकमेकांचे अंगणात चेंडू वर्षाव करतील चेंडु पडला की १गुण पण चेंडु झेलला तर झेलणार्या संघास गुण.ज्यांचे प्रथम १० गुण होतील तो संघ विजेता.
३५)नेमबाजी=भिंतीवर टार्गेटबोर्डवर बाण मारणे तीन संधी बोर्डवर ज्या वर्तुळात बाण लागेल तेवढे गुण द्यावेत जास्त गुण तो विजेता.
[12/30, 10:35 PM] Mahesh Lokhande: ३६)कडीचेंडू=४मीटरवर भिंतीवर कडी लावणे त्यात ३संधीत चेंडू कडीत टाकणे.
३७)काॅल बाॅल=चेंडु वर उडवावा दोन गटातील जे झेलतील त्यांस एक गुण.जो गट १०झेल प्रथम घेईल तो संघ विजेता.
३८)दात व ब्रश=लहान गट करावेत एकास टुथब्रश बाकींच्यापैकी काही दात व जास्त किटाणु होतील.दातवाले ओळीत थांबतील.किटाणु दातांभोवती पळतील टुथब्रशने किटाणु पकडणे.पकडल्यावर किटाणु बाद होतील.ज्या गटातील सर्व किटाणुबाद होतील तो गट विजेता.
३९)काड्यापेटी पाडणे=जोडीने उवा हात पकडावा एक हात मागे ठेवावा.पालथ्या हातावर काडीपेटी ठेवावी.आपली काडीपेटी पडू न देता दुसर्याची पाडणे ज्याची शेवटी राहील तो विजेता.
४०)दोरीफेक=५ मीटर अंतरावरच्या तीन वर्तुळात दोरी टाकणे मधल्या वर्तुळात पडल्यास १गुण.५संधी जो अधिक गुण घेईल तो विजेता.
[12/30, 10:39 PM] Mahesh Lokhande: खोतसर,समीरसर,मोटेसर,भालदारमॅडम,सुनिता लोकरेमॅडम,भंडारेसर,वाघमॅडम, होनरावमॅडम सर्वांचे आभार🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
गुणवत्तेचे ध्येय गाठण्या करी जीवाचे रान त्या गुरूजनांना माझे कोटी कोटी प्रणाम.
Pages
- Home
- शैक्षणिक ग्रुपचर्चा १ ते ७
- गणित धडे
- प्रश्नपेढी
- शैक्षणिक विडीओ
- शाळा
- फोटो
- शैक्षणिक बेबसाईड
- माहित आहे का?
- नवीन काय
- शिक्षकांसाठी
- उपक्रमशील शाळा
- कविता डाऊनलोड
- डाउनलोड
- ई-वाचनालय
- ई-लर्निंग
- २ डी गेम डाऊनलोड
- विडिओ शिक्षकांसाठी
- शैक्षणिक ग्रुपचर्चा ८ ते १४
- my apps
- वाक्यपेढी व शब्दपेढी
- चौथी ऑनलाईन चाचणी
- प्रश्नपत्रिका डाउनलोड
Wednesday, 30 December 2015
शैक्षणिक ग्रुपचर्चा १४
Subscribe to:
Posts (Atom)