सराव प्रश्नसंच 33
1. 'मोराच्या मादीला लांडोर म्हणतात' या वाक्यातील 'मोराच्या' या नामाऐवजी खालीलपैकी कोणते सर्वनाम वापराल ?
त्याच्या
तिच्या
ते
माझ्या
2. 'नक्कल' या नामाचे अनेकवचनी रुप पर्यायामधून निवडा.
नकली
नकले
नकला
नक्कल
3. खालीलपैकी कोणत्या पर्यायात भूतकाळी वाक्य आलेले आहे ?
मी मोठ्याने बोलतो
मी मोठ्याने बोलणार आहे
मी मोठ्याने बोलेन
मी मोठ्याने बोललो
4. 'बारा वर्षांचा काळ' या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता ?
डझन
दशक
रौप्य
तप
5. 'अचानक पानांची ..... ऐकून राधा बावरुन गेली' या वाक्यातील रिकाम्या जागेसाठी योग्य ध्वनिदर्शक शब्द निवडा.
खळखळ
सळसळ
छनछन
खणखण
6. गटात न बसणारा शब्द ओळखा.
but
cut
hut
put
7. False या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता ?
Yes
No
Good
True
8. 'लक्षपूर्वक ऐका' ही सूचना इंग्रजीमध्ये कशी द्याल ?
Be careful
Don't shout
Listen carefully
Look carefully
9. Tuesday comes before .....
Monday
Thursday
Wednesday
Sunday
10. बरोबर spelling असलेला शब्द निवडा.
Menkey
Monkey
Moonkey
Munkey
11. प्रत्येक अंक एकदाच वापरुन तयार होणारी पाच अंकी लहानात लहान विषम संख्या खालीलपैकी कोणती ?
१०२३५
१०२४३
१०४२३
१२३४५
12. ४१ ते ५० पर्यंत ४ हा अंक कितीवेळा येतो ?
९ वेळा
११ वेळा
१२ वेळा
१० वेळा
13. खालीलपैकी कोणत्या संख्येत ४ मिळवल्यास त्या संख्येला ८ ने नि:शेष भाग जाईल ?
६४
६१
६२
६८
14. समभुज त्रिकोनाचे सर्व कोन ..... असतात.
लघुकोन
काटकोन
विशालकोन
यापैकी नाही
15. ग्रॅम हे ..... मोजण्याचे प्रमाणित एकक आहे.
धारकता
उंची
लांबी
वस्तुमान
16. खालीलपैकी कोणत्या पर्यायात वाहतुकीचे साधन आलेले नाही.
मोटार सायकल
बस
नाव
दूरध्वनी
17. सर्व सजीवांना श्वसन करण्यासाठी कोणत्या वायूची गरज असते ?
ऑक्सिजन
नायट्रोजन
कार्बन डायऑक्साईड
हायड्रोजन
18. शेतीला पूरक असणारा व्यवसाय पर्यायामधून निवडा.
मासेमारी
व्यापार
दुग्ध व्यवसाय
खाणकाम
19. पाण्यामध्ये एखादा पदार्थ विरघळला की ..... तयार होते.
मिश्रण
द्रावण
द्रव
द्रावक
20. जे प्राणी दिवसा विश्रांती घेतात आणि रात्री अन्न शोधण्यासाठी बाहेर पडतात त्यांना ..... म्हणतात.
उभयचर
खेचर
जलचर
निशाचर
सराव प्रश्नसंच 34
1. 'घेतली आकाशात भरारी फुलांची पक्ष्यांनी' या शब्दांचा योग्य क्रम लावला असता एक अर्थपूर्ण वाक्य तयार होते व एक अनावश्यक शब्द शिल्लक राहतो तो शब्द पर्यायातून निवडा ?
फुलांची
पक्ष्यांनी
आकाशात
भरारी
2. सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आपण कोणता दिन म्हणून साजरा करतो ?
शिक्षणदिन
शिक्षकदिन
बालिकादिन
बालदिन
प्रश्न ३ ते ५ रिकाम्या जागी योग्य शब्द भरुन सुसंगत वाक्याचा परिच्छेद पूर्ण करा.
3. अंघोळीनंतर मुले ..... उभी राहिली.
पाय जोडून
डोके ठेवून
कान देऊन
हात जोडून
4. अगरबत्तीचा मंद ..... हवेत दरवळला होता.
वास
दुर्गंध
धूर
सुवास
5. मुलांनी देवाला ..... केला.
टाटा
नमस्कार
आशिर्वाद
उपवास
6. एक संख्या ९ वेळा घेऊन तिची बेरीज केली तेव्हा बेरीज ७६५ आली, तर ती संख्या कोणती ?
८२
८०
६५
८५
7. क ही एक सम संख्या असून तिचे विषम संख्येत रुपांतर करण्यासाठी तिच्यात खालीलपैकी कोणती संख्या मिळवावी लागेल ?
२१०
६१८
१०००
३१५
8. ९७०१, ३५३७, ६५७६, ४५०२, २३०१ या संख्या उतरत्या क्रमाने मांडल्यास चौथ्या संख्येतील दशकस्थानचा अंक कोणता असेल ?
०
७
३
६
9. २०८ या संख्येचा पाव भाग म्हणजे किती ?
५१
७५
५२
५०
10. पावणे दोन हजार ही संख्या विस्तारीत रुपात कशी लिहाल ?
१००० + २०० + ५० + ०
१००० + ७०० + ५० + ०
१००० + ५०० + ०० + ०
२००० + ७०० + ५० + ०
11. संत ज्ञानेश्वरांनी तरूण वयात कोणत्या गावी समाधी घेतली ?
आळंदी
देहू
आपेगाव
पैठण
12. शिवरायांनी आयुष्यभर कोणता बाणा जोपासला ?
सत्तेचा
पितृभक्तीचा
मातृभक्तीचा
'सज्जनांना राखावे, दुर्जनांना ठेचावे' या उक्तीचा
13. शिवरायांनी ..... ठार मारण्यासाठी तलवार उपसल्याने, तो खिडकीवाटे पळू लागला.
दिलेरखानाला
फाजलखानाला
सिद्दी जौहरला
शायिस्ताखानाला
14. शिवरायांनी राज्याभिषेकापासून कोणता शक सुरु केला ?
राज्याभिषेक शक
विक्रम संवत
स्वराज्य शक
शालिवाहन शक
15. लोकांना शक्तीची उपासना करण्याची शिकवण देण्यासाठी रामदास स्वामींनी ठिकठिकाणी कोणाची मंदिरे उभारली ?
शंकराची
गणेशाची
दुर्गामातेची
हनुमानाची
16. पाण्यात साखर टाकून पाणी ढवळले की साखर दिसेनाशी होते, कारण .....
पाणी शुद्ध असते
पाणी पारदर्शक असते
पाण्याला रंग नसतो
साखर पाण्यात विरघळते
17. टॉवेल खरबरीत आहे हे आपल्याला कोणत्या ज्ञानेंद्रियामुळे समजून येते ?
त्वचा
डोळे
कान
जीभ
18. वनस्पतीस पाणी कोणत्या अवयवामुळे पुरविले जाते ?
फांदी
फूल
मूळ
पान
19. खालीलपैकी सेवा पुरवणारा घटक़ कोणता नाही ?
शिक्षक
शेती
बॅंक
डॉक्टर
20. महाराष्ट्र दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो ?
१५ ऑगस्ट
२६ जानेवारी
५ मे
१ मे
सराव प्रश्नसंच 35
1. 'लोणार हे खार्या पाण्याचे सरोवर आहे' या वाक्यात किती नामे आली आहेत ?
तीन
चार
दोन
एक
2. खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी नाम ओळखा ?
ठोके
झोके
खोके
बोके
प्रश्न ३ ते ५ रिकाम्या जागी योग्य शब्द भरुन सुसंगत वाक्याचा परिच्छेद पूर्ण करा.
3. वर्गात एकदम ..... पसरली.
गडबड
हास्याची लहर
मस्ती
शांतता
4. बाईंनी हेमंतचे नाव वक्तृत्व स्पर्धेतील ..... म्हणून जाहीर केले.
निवेदक
मुलगा
स्पर्धक
विजेता
5. वक्तृत्व कलेतील ..... पाहून सर्वांनी हेमंतचे अभिनंदन केले.
तयारी
नैपूण्य
ज्ञान
कारागिरी
6. ७३५५२ + २५३३१ = ?
९७७७३
९८७८३
९७८८३
९८८८३
7. रोहितने ७५ रुपयांचा पेन व २० रुपये किमतीची तीन रजिष्टर विकत घेतली. त्याने दुकानदारास ५०० रुपयाची नोट दिल्यास दुकानदार त्याला किती रुपये परत करील ?
४०५ रुपये
३५० रुपये
३५५ रुपये
३६५ रुपये
8. पावणेसात वाजता घड्याळात मिनिटकाटा कोणत्या अंकावर असतो ?
८
७
९
१०
9. एका वर्तुळाची त्रिज्या १४ सेंमी असल्यास त्या वर्तुळाचा व्यास किती ?
३० सेमी
६० सेमी
२८ सेमी
२९ सेमी
10. साडेसहा किलोमीटर = किती मीटर ?
६००
६५००
३००
६५०
11. अंड्यामध्ये पिल्लांची वाढ होण्यासाठी ..... गरज असते.
उबेची
कवचाची
बदलाची
फोडण्याची
12. पिण्याचे पाणी निर्धोक करण्यासाठी कोणती क्रिया आवश्यक आहे ?
गाळणे
चाळणे
साठवणे
उकळणे
13. आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालण्यासाठी कशाची गरज असते ?
अन्न
हवा
पाणी
सर्व बरोबर
14. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत ?
कापेश्वर
कंधार
कार्ले
सज्जनगड
15. आजच्या काळात नियम ..... बनवते.
न्यायालय
स्थानिक शासनसंस्था
संविधान
शासन
16. शरीराच्या सर्व हालचालींवर शरीराचा कोणता अवयव नियंत्रण ठेवतो ?
heart
eye
leg
brain
17. well या शब्दाशी यमक जुळणारा शब्द निवडा.
bell
girl
apple
ball
18. खालील शब्दातील अनेकवचनी शब्द कोणता ?
woman
girl
men
boy
19. कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला निश्चित वेळ समजते ?
sun
watch
newspaper
cock
20. पक्ष्याने केलेला अावाज कोणता ?
creak
squeak
bray
chirp
सराव प्रश्नसंच 36
1. मैदानावर प्रत्येक ओळीत समान विद्यार्थी याप्रमाणे ५२५ विद्यार्थी २५ ओळीत उभे केले आहेत, तर त्यातील ७ ओळीतील विद्यार्थी किती ?
१७५
१४७
२१
२५
2. एका वाचनालयात ४५ पुस्तकांचे १२ गठ्ठे आहेत. त्यातील पुस्तके ९० विद्यार्थ्यांना समान वाटली तर प्रत्येकाला किती पुस्तके मिळतील ?
५४०
६०
६
४५
3.एका माठातून तीन सेकंदामध्ये दोन थेंब गळतात, तर एका तासात किती थेंब गळतील ?
७२००
१२००
५४००
२४००
4. १ क्वींटल = किती ग्रॅम ?
१००
१०००
१००००
१०००००
5. एका बागेत ४५४५ झाडे होती. त्यातील निलगिरीची ६५२ झाडे तोडली आणि आंब्याची नवीन २४२ झाडे लावली तर आता बागेत एकूण झाडे किती असतील ?
३८६३
४१३५
२५४
४५४५
6. 'ambulance' हा शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाशी संबंधित आहे ?
School
Water
Factory
Hospital
7. खालीलपैकी वेगळा पर्याय ओळखा ?
P
M
K
f
8. तुम्ही तुमच्या मित्राला दिवाळीच्या शुभेच्छा कशा द्याल ?
Happy Holi
Happy Dasara
Happy Diwali
Happy Birthday
9. April नंतर येणारा महिना कोणता ?
March
June
May
January
10. Who am I ? या वाक्यात विरामचिन्ह कोणते आले आहे ?
Full stop
Question mark
Comma
Dash
11. स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा किती साली घेण्यात आली ?
१६४५
१६५०
१६४६
१६४७
12. ..... म्हणजे राज्याचा एक मुख्य आधार.
घोडा
सैनिक
प्रजा
डोंगरी किल्ला
13. जिंजी किल्ला कोणत्या शहराच्या दक्षिणेस आहे ?
पुणे
नाशिक
दिल्ली
चेन्नई
14. सोन्याचे छत्र शिवाजी महाराजांनी कोणाला अर्पण केले ?
भवानी देवीला
महालक्ष्मीला
तुळजाईला
शिवाईदेवीला
15. शायिस्ताखान कोठे तळ ठोकून राहिला होता ?
विजापुरात
पुरंदरात
प्रतापगडाच्या पायथ्याशी
लाल महालात
16. स्पर्शाचे ज्ञान देणारे इंद्रिय कोणते ?
डोळे
कान
नाक
त्वचा
17. महाराष्ट्राची राजभाषा कोणती ?
मराठी
हिंदी
कन्नड
इंग्रजी
18. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती ?
कृष्णा
तापी
गोदावरी
प्रवरा
19. आपल्या देशातील मुख्य व्यवसाय कोणता ?
व्यापार
शेती
पशुपालन
कुक्कुटपालन
20. गोफणीचा वापर करुन कोणाला पळवून लावले जाते ?
प्राणी
चोर
साप
पाखरे
सराव प्रश्नसंच 37
1. ५ किलोग्रॅम रांगोळीच्या प्रत्येकी ५ ग्रॅमच्या पुड्या बांधल्या तर तर एकूण किती पुड्या होतील ?
१०००
१००
१०
१
2. ५१ ते ८० दरम्यान एकूण मूळ संख्या किती ?
२५
१५
७
१०
3.वर्तुळकडाची लांबी म्हणजेच ?
व्यास
त्रिज्या
जीवा
परीघ
4. हेमंत एका तासात २१० शब्द टंकलिखित करतो तर १८० मिनिटात किती शब्द टंकलिखित करेल ?
६३
६०३
६३००
६३०
5. एका चौरस भूखंडाची लांबी ३० मीटर आहे. त्याच्या कडेने तारेचे तीन पदरी कुंपण घालायचे आहे तर किती लांबीची तार लागेल ?
१२० मी.
३६० मी.
२४० मी.
९० मी.
6. खालीलपैकी कोणते एकवचन नाही ?
tooth
foot
child
mice
7. She is writing ..... a ball pen.
to
in
into
with
8. यमक न जुळणारी जोडी निवडा.
sand - band
sink - link
pen - pin
fall - hall
9. वेगळ्या ध्वनीने शेवट होणारा शब्द निवडा.
half
laugh
plough
giraffe
10. खालीलपैकी sound शी संबंधित शब्द कोणता नाही ?
Bell
Black
Cry
Song
11. आराखडे तयार करण्यासाठी कशाचा वापर करतात ?
खुणा
रंग
चिन्ह
सर्व पर्याय बरोबर
12. खालीलपैकी कोणता सण दिवाळीत साजरा करतात ?
रक्षाबंधन
होळी
विजयादशमी
भाऊबीज
13. अयोग्य सवय कोणती ?
आवडीने अभ्यास करणे
शाळेचा गणवेश घालणे
जेवणापूर्वी हात धुणे
आवडीने अभ्यास न करणे
14. अनेक गावे मिळून काय तयार होतो ?
तालुका
जिल्हा
राज्य
देश
15. नकाशात कोणती दिशा 'उ' या अक्षराने दर्शवितात ?
पूर्व
पश्चिम
दक्षिण
उत्तर
16. तोरणा किल्ल्यावर कोणत्या माच्या होत्या ?
झुंजार माची
बुधला माची
रण माची
पर्याय १ व २
17. शिकारीच्या प्रसंगी कोणाचे अपघाती निधन झाले ?
शहाजीराजे
शिवाजीराजे
संभाजीराजे
येसाजी कंक
18. राज्याचा जमाखर्च कोण पाहत ?
प्रधान
मंत्री
अमात्य
सुमंत
19. शिवरायांच्या पुढील रांगेत कोण होते ?
मिर्झाराजे जयसिंग
जसवंतसिंग राठोड
दिलेरखान
अण्णाजी दत्तो
20. शिवरायांची बालपणातील किती वर्षे धावपळीत गेली ?
सात वर्षे
पाच वर्षे
चार वर्षे
सहा वर्षे
सराव प्रश्नसंच 38
1. साधूंच्या समूहाला काय म्हणतात ?
जथा
पथक
झुंबड
जत्रा
2. हत्तीला काबूत ठेवणार्या माणसाला ..... म्हणतात.
मदारी
गारुडी
माहूत
घोडेस्वार
3. खालील पर्यायातून क्रियापद असलेला शब्द निवडा.
फळा
काळा
गळा
पळा
4. 'वंत' हा प्रत्यय कोणत्या शब्दाला गैरलागू आहे ?
गुण
धन
शील
वेडा
5. 'उताणा' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा.
वाकडा
पालथा
सरळ
तिरका
6. 'Pen' शी संबंधित क्रियादर्शक शब्द कोणता ?
read
smile
talk
write
7. Doctor च्या व्यवसायाशी संबंधित नसलेला शब्द कोणता ?
Hospital
Injection
Medicine
Chalk
8. खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा उपयोग प्रवासाकरता होत नाही ?
Jeep
Railway
Dustbin
Tractor
9. Old या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.
Strong
Weak
Young
Woman
10. How many minutes in one hour ?
40
60
50
90
11. भीमाशंकर येथे आढळणारा ..... हा आपला राज्यप्राणी आहे ?
तरस
लांडगा
कोल्हा
शेकरु खार
12. सार्वजनिक मालमत्ता या .....
वैयक्तिक मालकीच्या असतात
सर्वांच्याच मालकीच्या असतात
विशिष्ट संस्थेच्या मालकीच्या असतात
सरकारी मालकीच्या असतात
13. संपर्काच्या आधुनिक साधनात न येणारे साधन कोणते ?
मोबाईल
इ-मेल
इंटरनेट
तारायंत्र
14. साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी लसीकरण मोहिमा राबविण्याचे काम ..... पार पाडतात.
सरकारी दवाखाने
खाजगी दवाखाने
मोठी इस्पित्तळे
खाजगी डॉक्टर
15. स्टेनलेस स्टील तयार करताना ..... याचा वापर करतात ?
क्रोमाईट
बेसाल्ट
मॅंगनीज
डोलोमाईट
16. जिजाबाईंच्या वडीलांचे गाव कोणते होते ?
वेरुळ
फलटण
पुणे
सिंदखेड
17. प्रेम, आपुलकी व जिव्हाळा या गोष्टी आपल्याला कोठे मिळतात ?
कुटुंबात
शेजारी
गावात
मित्रांत
18. चुकीच्या जोडीचा पर्याय निवडा ?
संत एकनाथ - पैठण
संत नामदेव - नरसी
संत तुकाराम - आळंदी
संत ज्ञानेश्वर - आपेगाव
19. जावळीच्या विजयामुळे कोणता किल्ला स्वराज्यात आला ?
तोरणा
रायरीचा
राजगड
पुरंदर
20. शके ...... मध्ये शिवरायांचा जन्म झाला.
१६३०
१५६१
१५५१
१५८०