[1/11, 3:14 PM] Mahesh Lokhande: 🔴 ग्रुपचर्चासत्र २ ६ 🔴
🌍 चर्चेचा विषय🌍
🔶 बडबडगीते🔶
🔶चर्चेस वेळ दि. ११/१/२०१६ रात्री ९.३० ते१०.३०पर्यंत.🔶 सर्वांनी चर्चेत सहभागी व्हावे.🔵 आपले योगदान आमच्यासाठी अनमोल आहे.🙏🙏🙏🙏🙏🙏
[1/11, 9:36 PM] उज्वला पाटील रेठरे: एक होता खेकडा चालायचा वाकडा.गणिताशी त्याचा छतीस आकडा.
[1/11, 9:36 PM] उज्वला पाटील रेठरे: ससा ससा दिसतो कसा. कापूस पिंजून ठेवलाय जसा. लहान डोळे मोठे कान.गवत खाऊन फुगतो टुम .चाहुल लागताच पळतो धुम.
[1/11, 9:38 PM] प्रदिप कांबळे: मामाच्या गावाला जाऊया
[1/11, 9:38 PM] अरविंद गोळे: Chimna chimni che lagin*
*eka talyat hoti
*chandoba chandoba
*
[1/11, 9:39 PM] सुनिता लोकरे: गोड गोजिरी लाज लाजरी ताई तु होणार नवरी
[1/11, 9:40 PM] प्रदिप कांबळे: भोलानाथ भोलानाथ पाऊस पडेल काय
[1/11, 9:41 PM] Mahesh Lokhande: हम हाथी को गिनती सिखायेगे ॥ बोल हाथी बोल बोल हाथी एक तुझे मिलेगा केक, थोडा तुम खाओगे, छोडा हम खाएंगे ॥१।। बोल हाथी बोल
बोल हाथी दो
तुझे मिलेगा ढोल,
आधा तुम बजाओगे,
आधा हम बजायेगे ॥२।।
बोल हाथी बोल
बोल हाथी तीन,
तुझे मिलेगी बीन,
आधी हम बजाओगे,
आधी तुम बजायेँगे ॥३ ॥
बोल हाथी बोल
बोल हाथी चार
तुझे मिलेगी कार,
आधी तुम चलाओगे,
आधी हम चलायेंगे ॥४ । । बोल हाथी बोल
बोल हाथी पाँच
तुझे मिलेगी काँच
आधी तुम देखोगे आधी हम देखेंगे॥
[1/11, 9:41 PM] प्रदिप कांबळे: या बाळांनो या बाळांनो या बाळांनो या या या
आपण आगगाडी आगगाडी खेळू या
इंजिन कोण होतय् सांगा पाहू
डब्यांची ओळ आता लावा पाहू
शेवटला गार्ड आता कुणी व्हा तयार,
आपण मामाच्या गावाला जाऊ या
खंडाळ्याच्या घाटात अडली गाडी
लवकर आणा दुसरं इंजिन करा घाई
वाजवा शिट्टी विझवा लाल बत्ती,
आपण मामाच्या गावाला जाऊ या
.
[1/11, 9:42 PM] थोरात ond: शेजीबाईचा कोंबडा आला माझ्या दारी.
[1/11, 9:42 PM] आतार सोलापुर: दोन बोक्यांनी आणला हो आणला चोरुन लोण्याचा गोळा..!!
वाटयासाठी झाला हो झाला परंतु सारा घोटाळा...!!
😊😊😊😊😊
[1/11, 9:42 PM] रजपुतमॅडम कल्याणी: Machali JAL ki rani hai jivan uasaka pani hai
[1/11, 9:43 PM] प्रदिप कांबळे: ए आई मला पावसात जाउ दे
एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे
मेघ कसे बघ गडगड करिती
वीजा नभांतुन मला खुणविती
त्यांच्यासंगे अंगणात मज खूप खूप नाचु दे
बदकांचा बघ थवा नाचतो
बेडुकदादा हाक मारतो
पाण्यामधुनी त्यांचा मजला पाठलाग करु दे
धारेखाली उभा राहुनी
पायाने मी उडविन पाणी
ताप, खोकला, शिंका, सर्दी, वाट्टेल् ते होऊ दे
[1/11, 9:44 PM] घावटेसर किवळ: १. झपा झपा .. २.चिंगी नटली .. 3.दे मला आई खाऊची वाटी.... ४.रस्त्याच्या कडेने चालायचं...
[1/11, 9:44 PM] Mahesh Lokhande: इटुकला उंदीर
खेळू लागला क्रिकेट
तिकडून आला उंदीर
घेतली त्याची विकेट
[1/11, 9:44 PM] अरविंद गोळे: Ala ala paus
*ye aai mala pausat jau de
[1/11, 9:44 PM] घावटेसर किवळ: १. झपा झपा .. २.चिंगी नटली .. 3.दे मला आई खाऊची वाटी.... ४.रस्त्याच्या कडेने चालायचं...
[1/11, 9:44 PM] थोरात ond: बाहुली माझी छान.
दिन दिन दिवाळी गायी म्हशी ओवाळी.
[1/11, 9:44 PM] रजपुतमॅडम कल्याणी: Chiv chiv chimani gat hoti gani
[1/11, 9:45 PM] देसाई गो. गोळेश्वर: Bandu Ani Khandu Javayala basle Hat nahi dhuthle pai nahi dhutale
[1/11, 9:45 PM] चव्हाणसर ज्ञा: १)दिन दिन दिवाळी
२)माकडा माकडा हूप हूप
३)चांदोमामा चांदोमामा भागलास का ?
४)ससा ससा दिसतोस कसा?
५)टम टम फुगा
६)पाळण्यातले बाळ
७)मनीमाऊ एकदा आजारी पडली
८)चिमणुचं पिलू
९)बेडकदादा
१०)चिंचेचे झाड
[1/11, 9:46 PM] रजपुतमॅडम कल्याणी: Yere yere pavasa tula deto paisa
[1/11, 9:46 PM] प्रदिप कांबळे: झुक झुक झुक झुक अगीनगाडी
धुरांच्या रेघा हवेत काढी
पळती झाडे पाहूया
मामाच्या गावाला जाऊया
मामाचा गाव मोठा
सोन्याचांदीच्या पेठा
शोभा पाहुन घेऊया
मामाची बायको गोरटी
म्हणेल कुठली पोरटी
भाच्यांची नावे सांगूया
मामाची बायको सुगरण
रोज रोज पोळी शिकरण
गुलाबजामुन खाऊया
मामा मोठा तालेवार
रेशीम घेईल हजार वार
कोट विजारी लेऊया
Download : https://goo.gl/UVYMCG
[1/11, 9:47 PM] चव्हाणसर ज्ञा: येरे येरे पावसा
या बाई या
आला माझ्या घरी
[1/11, 9:47 PM] रजपुतमॅडम कल्याणी: Ubha yek aadave don gathiche tin
[1/11, 9:47 PM] थोरात ond: चुलीवरची खीर एकदा
पुरीला हसली.
पप्पा सांगा कुणाचे.
[1/11, 9:48 PM] आतार सोलापुर: मेरा छोटासा चंदु कहां गया था...!!!?!??
बाजार मे गया था लाने को चाकु...!!!-२
चाकु वाकु भुल गया पिछे है डाकु...-२
मेरा छोटासा...!!!
[1/11, 9:48 PM] वायदंडे मॅडम: चॉकलेट चा बंगला
लहान माझी बाहुली
[1/11, 9:49 PM] रजपुतमॅडम कल्याणी: Re mama re
[1/11, 9:49 PM] थोरात ond: एक आई मला पावसात जाऊ दे
[1/11, 9:49 PM] प्रदिप कांबळे: छम् छम् छम् ..... छम् छम् छम्
छडी लागे छमछम, विद्या येई घमघम
छम् छम् छम् ..... छम् छम् छम्
मोठ्या मोठ्या मिश्या, डोळे एवढे एवढे लाल
दंतोजींचा पत्ता नाही, खप्पड दोन्ही गाल
शाळेमधल्या पोरांना हा वाटे दुसरा यम
छम् छम् छम्
तंबाखूच्या पिचकार्यांनी भिंती झाल्या घाण
पचापचा शिव्या देई खाता खाता पान
"मोर्या मूर्खा !", "गोप्या गद्ध्या !", देती सर्वा दम
छम् छम् छम्
तोंडे फिरवा, पुसती गिरवा, बघु नका कोणी
हसू नका, रडू नका, बोलू नका कोणी
म्हणा सारे एकदम, ओ नमा सिद्धम्
छम् छम् छम्
[1/11, 9:49 PM] रजपुतमॅडम कल्याणी: Don rupayala ek naral ek rupayala de re baba
[1/11, 9:50 PM] रजपुतमॅडम कल्याणी: Barish aayi chmchm chmchm chata lekar nikale hum
[1/11, 9:50 PM] Mahesh Lokhande: कांदा रुसला
टोपलीत बसला
वांगे रुसलं
टोपलीत बसल.
तिकडून आली आजी
दोघांची केली भाजी
[1/11, 9:50 PM] प्रदिप कांबळे: आई माझ दप्तर दे शाळेत जायचय मला
[1/11, 9:51 PM] आतार सोलापुर: घंटी वाजली ...
शाळा भरली...!!!
[1/11, 9:51 PM] रजपुतमॅडम कल्याणी: Chanda mama dur ke chane khaye
[1/11, 9:52 PM] सुनिता लोकरे: *धोय धोय पाऊस पडतोय रे
*आंब्याच्या झाडाखाली जाऊ चला
*रविवार रविवार हवा रविवार
*माझ्या बोटात जादू आहे बघा बघा
*माकडे निघाली शिकारीला
[1/11, 9:53 PM] थोरात ond: बेडूक दादा, बेडूक दादा. .
माकडा माकडा हूप हूप
[1/11, 9:53 PM] थोरात ond: किलबिल किलबिल पक्षी बोलती
[1/11, 9:53 PM] Mahesh Lokhande: गरगर गिरकी
ताकाची फिरकी
ताक फिरवतो गरागरा
लोणी निघते भराभरा
मी खातो जराजरा
[1/11, 9:53 PM] प्रदिप कांबळे: मनी च्या कुशीत लपलय
[1/11, 9:54 PM] रजपुतमॅडम कल्याणी: Ghadyalat vajala ek aai ne kela ceck ceck khnyat ek tas gela me nahi abhyas kela
[1/11, 9:54 PM] Mote Gondi: देव बाप्पा देव बाप्पा---
चांदोमामा घर तुझे लांब --
हम हाथी गिनती ---
किती किती छान गोरा--
अाले अाजोबा ओटीत--
अाला फेरीवाला ---
असावा सुंदर चाॅकलेटचा-
एक दिवस अचानक पोटा
हंबा हंबा ए ग --
एककैल्हा बहु भुकेला --
शेपटी वाल्या प्राण्याची--
दोन होती अंडी --
एक होती ईडली --
चूली वरची खिर एकदा --
[1/11, 9:54 PM] रजपुतमॅडम कल्याणी: Chadi lage cham cham vidhya yei gham ghyam
[1/11, 9:55 PM] प्रदिप कांबळे: मनी च्या कुशीत लपलय कोण ईटुकली पिटूकली पिल्ले दोन
[1/11, 9:55 PM] वायदंडे मॅडम: दोन होती अंडी त्याना वाजली ठंडी
[1/11, 9:55 PM] सुनिता लोकरे: *म्हातारीची शेती होती...
*चिऊताई चिए माझ्या अंगणात ये
*चंदाराणी का ग दिसतेस थकल्यावानी
[1/11, 9:56 PM] प्रदिप कांबळे: असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
[1/11, 9:56 PM] वायदंडे मॅडम: ल्हा ल्हा चिरमुरा
[1/11, 9:56 PM] रजपुतमॅडम कल्याणी: Koloba kolobha bor pikali
[1/11, 9:57 PM] रजपुतमॅडम कल्याणी: Ek hoti kakadi tichi shandi vakadi
[1/11, 9:57 PM] प्रदिप कांबळे: एक होता काऊ, तो चिमणीला म्हणाला
"मला घाल न्हाऊ, घाल न्हाऊ, घाल न्हाऊ"
एक होता पोपट, तो चिमणीला म्हणाला
"तू मला थोपट, तू मला थोपट, तू मला थोपट"
एक होती घूस, ती चिमणीला म्हणाली
"तू माझे अंग पूस, तू माझे अंग पूस, तू माझे अंग पूस"
एक होती गाय, तिने चिमणीला विचारले
"तुझे नाव काय, तुझे नाव काय, तुझे नाव काय ?"
एक होते कासव, ते चिमणीला म्हणाले
"मला चड्डी नेसव, मला चड्डी नेसव, मला चड्डी नेसव"
[1/11, 9:57 PM] उज्वला पाटील रेठरे: चल रे भोपळया टुणुक टुणुक.
[1/11, 9:57 PM] Mahesh Lokhande: आपडी थापडी
गुळाची पापडी
धम्मकलाडू
तेल काढू
तेलंगीचे एकच पान
धरगं बेबी हाच कान
च्याऊ म्याऊ
पखालीचे पाणी पिऊ
किशीला जाऊ
खीर खाऊ
भुर्रर्रकिनी उडून जाऊ.
[1/11, 9:59 PM] प्रदिप कांबळे: गोरी गोरीपान, फुलासारखी छान
दादा, मला एक वहिनी आण
गोर्या गोर्या वहिनीची अंधाराची साडी
अंधाराच्या साडीवर चांदण्यांची खडी
चांदण्यांच्या पदराला बिजलीचा बाण !
वहिनीला आणायाला चांदोबाची गाडी
चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी
हरणांची गाडी तुडवी गुलाबाचे रान !
वहिनीशी गट्टि होता तुला दोन थापा
तुला दोन थापा, तिला साखरेचा पापा
बाहुल्यांच्यापरी होऊ दोघी आम्ही सान !
[1/11, 9:59 PM] सुनिता लोकरे: 1.Little jack horner
2.dog say bow wow
3.tooth brush
4.to little dicky birds
5.ringa ringa roses
6. Teddy bear teddy bear
[1/11, 10:00 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: म्हातारीची शेती होती,शेतामध्ये राहत होती....शेतामध्ये कुञा होता..भो..भो..भो..भो.करीत.होता...
[1/11, 10:01 PM] सुनिता लोकरे: रस्त्याच्या कडनं चालायचं डिंग डाँग
[1/11, 10:02 PM] प्रदिप कांबळे: नाच रे मोरा, अंब्याच्या वनात
नाच रे मोरा नाच !
ढगांशि वारा झुंजला रे
काळाकाळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी, वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच !
झरझर धार झरली रे
झाडांचि भिजली इरली रे
पावसात न्हाऊ, काहितरि गाऊ
करुन पुकारा नाच !
थेंबथेंब तळ्यात नाचती रे
टपटप पानांत वाजती रे
पावसाच्या रेघांत, खेळ खेळु दोघांत
निळ्या सौंगड्या नाच !
पावसाचि रिमझिम थांबली रे
तुझिमाझि जोडी जमली रे
आभाळात छान छान, सातरंगी कमान
कमानीखाली त्या येशील का.
[1/11, 10:02 PM] थोरात ond: गलगुल्या रे गुलगुल्या
[1/11, 10:02 PM] Mahesh Lokhande: १,२,१,२ पोलीसदादा होणार कोण ?
३,४,३,४ रस्त्यावरती गर्दी फार
५,६,५,६ मागेपुढे नीट पहा
७,८,७,८चालताना मान ताठ
९,१०,९,१०पोलीसदादांची ऐट पहा
[1/11, 10:03 PM] रजपुतमॅडम कल्याणी: Adgul madgul soynach kadgul
[1/11, 10:03 PM] रजपुतमॅडम कल्याणी: Atak matak chavli chatak
[1/11, 10:03 PM] प्रदिप कांबळे: "तुझ्या गळा, माझ्या गळा
गुंफू मोत्यांच्या माळा "
"ताई, आणखी कोणाला ?"
"चल रे दादा चहाटळा !"
"तुज कंठी, मज अंगठी !"
"आणखी गोफ कोणाला ?"
"वेड लागले दादाला !"
"मला कुणाचे ? ताईला !"
"तुज पगडी, मज चिरडी !"
"आणखी शेला कोणाला ?"
"दादा, सांगू बाबांला ?"
"सांग तिकडच्या स्वारीला !"
"खुसू खुसू, गालि हसू"
"वरवर अपुले रुसू रुसू "
"चल निघ, येथे नको बसू"
"घर तर माझे तसू तसू."
"कशी कशी, आज अशी"
"गंमत ताईची खाशी !"
"अता कट्टी फू दादाशी"
"तर मग गट्टी कोणाशी ?"
[1/11, 10:04 PM] Mahesh Lokhande: १,२,३,४पाऊस पडतो मुसळधार
५,६,७,८तळे भरले काठोकाठ
९,१०,९,१०रान हिरवे झाले पहा
[1/11, 10:04 PM] रजपुतमॅडम कल्याणी: Ek hot zural chalat navat saral
[1/11, 10:04 PM] बुरकुलेसर: चल ले किसना तुझ्या संगे मी गोकूल सोडून येतो ले बा
[1/11, 10:04 PM] सुनिता लोकरे: अ अ अ मी आहे आकार
भाऊ माझा काना
मारीत असतो ताना....
बहिण माझी वेलांटी
सर्वाच्या डोक्यावर चालते टोपी
[1/11, 10:05 PM] रजपुतमॅडम कल्याणी: Evadha motha bopala aakarane vatala
[1/11, 10:05 PM] हिलेमॅडम: *ओ माय चेचे
*ल्हा ल्हा चिरमुरा
*चाय चाय कॉफी कॉफी
[1/11, 10:06 PM] प्रदिप कांबळे: लाल टांगा घेऊनी आला, लाला टांगेवाला
ऐका लाला गातो गाणे लल्लल लल्लल ला
कुडता लालेलाल त्याची तुमान लालेलाल
टोपी लालेलाल त्याचा गोंडा लालेलाल
लालेलाल गोंडा उडवित आला टांगेवाला
ऐका लाला गातो गाणे लल्लल लल्लल ला
टांगा लालेलाल त्याचा घोडा लालेलाल
चाबुक लालेलाल त्याचा लगाम लालेलाल
लालेलाल चाबूक उडवित आला टांगेवाला
ऐका लाला गातो गाणे लल्लल लल्लल ला
लाल परकर नेसून आली लीला बोले त्याला
"चल रे लाला, ने रे मला, माझ्या गावाला"
लीला बसली टांग्यामध्ये टांगा सुरू झाला
ऐका लाला गातो गाणे लल्लल लल्लल ला
झाडे लालेलाल त्यांची फुले लालेलाल
रस्ता लालेलाल त्याचा धुरळा लालेलाल
लालेलाल धुरळा उडवित गेला टांगेवाला
ऐका लाला गातो गाणे लल्लल लल्लल ला
[1/11, 10:07 PM] बुरकुलेसर: झाडाखाली चिमण्यांची भरली होती शाळा
[1/11, 10:07 PM] हिलेमॅडम: भटजी निघाले नारळ आनायला
[1/11, 10:07 PM] सुनिता लोकरे: एक होते झुरळ
चालत नव्हते सरळ
बसमध्ये चढले
तिकीट नाही काढले
हळूच घर गाठले
[1/11, 10:08 PM] सुनिता लोकरे: लाल टांगा घेवून आला लाला टांगेवाला
[1/11, 10:08 PM] Mahesh Lokhande: १म्हणा १चला खाऊया केक
२म्हणा२बाबांचा आला फोन
३म्हणा३ताईची हरवली पीन
४म्हणा४दादाने आणली कार
५म्हणा५चला करुया नाच
६म्हणा६ आमचा नाच पहा
७म्हणा७चला करुया भात
८म्हणा ८गाणे करुया पाठ
९म्हणा९बाबांनी आणले गहू
१०म्हणा १० चला पिऊया चहा
[1/11, 10:08 PM] बुरकुलेसर: रस्त्याच्या कडेने चालायचं....
[1/11, 10:08 PM] हिलेमॅडम: दहा चिमण्या शाळेमध्ये निवडत होत्या गहु
[1/11, 10:09 PM] सुनिता लोकरे: गुलगुल्या रे गुलगुल्या
[1/11, 10:09 PM] प्रदिप कांबळे: एक नाही दोन नाही, बेरीज-वजाबाकी नाही
तीन नाही चार नाही, भुमितीची सजा नाही
दिवस उद्याचा सवडीचा, रविवार माझ्या आवडीचा
सोमवारचा असतो गणिताचा तास
गणिताच्या तासाला मी नापास
गणित विषय माझ्या नावडीचा
भलताच कठीण तो मंगळवार
डोक्यावर असतो भूगोलाचा भार
भूगोल विषय माझ्या नावडीचा
घेऊन तोफा आणि तलवारी
इतिहास येतो बुधवारी
इतिहास माझा नावडीचा
[1/11, 10:11 PM] सुनिता लोकरे: १ बाई चिमणी बारी चिव चिव ती गेलि उडून राहील्या ९
९बाई चिमण्या भारि चिवचिव ती गेली उडून राहिल्या ८
[1/11, 10:12 PM] उज्वला पाटील रेठरे: अ अ आई
[1/11, 10:13 PM] प्रदिप कांबळे: चल शाळेला चल चल तारा नको राहू तू घरच्या घरा
[1/11, 10:13 PM] हिलेमॅडम: मैने बनाई एक किस्ती
[1/11, 10:14 PM] सुनिता लोकरे: माकडाने काढले कापडाचे दुकान
नाव दिले फँशन मकान
दार उघडताच आला हत्ती
म्हणाला दाखवा पँट सस्ती
[1/11, 10:14 PM] प्रदिप कांबळे: या बाळांनो, या रे या !
लवकर भरभर सारे या !
मजा करा रे मजा करा !
आज दिवस तुमचा समजा
स्वस्थ बसे तोचि फसे
नवभूमी दाविन मी
या नगराला लागुनिया
सुंदर ती दुसरी दुनिया !
खळखळ मंजुळ गाति झरे
गीत मधुर चहुबाजु भरे
जिकडे तिकडे फुले फळे
सुवास पसरे, रसहि गळे
पर ज्यांचे सोन्याचे
ते रावे, हेरावे
तर मग कामे टाकुनिया
नवी बघा या ही दुनिया !
पंख पाचुचे मोरांना
टिपति पाखरे मोत्यांना
पंख फडकती घोड्यांना
मौज दिसे ही थोड्यांना
चपलगती हरिण किती !
देखावे, देखावे
तर मग लवकर धावुनिया
नवी बघा या ही दुनिया !
[1/11, 10:14 PM] बुरकुलेसर: मऊ मऊ मेंढी दूलईची..
[1/11, 10:15 PM] उज्वला पाटील रेठरे: चार ससे पिटुकले
[1/11, 10:16 PM] सुनिता लोकरे: आभाळ वाजलं धडामधुडूम
वारा सुटला सुसुसु
[1/11, 10:16 PM] प्रदिप कांबळे: या बाइ या,
बघा बघा कशि माझि बसलि बया.
ऐकु न येते,
हळुहळु अशि माझि छबि बोलते.
डोळे फिर्वीते,
टुलु टुलु कशि माझि सोनि बघते.
बघा बघा ते,
गुलुगुलु गालातच कशि हसते.
मला वाटते,
इला बाइ सारे काहि सारे कळते.
सदा खेळते,
कधि हट्ट धरुनि न मागे भलते.
शहाणि कशी,
साडिचोळि नवि ठेवि जशिच्या तशी.
[1/11, 10:17 PM] Mote Gondi: यो यो यो मैना पिंजरा--
चिऊ ताई माझ्या अंगणात
एक म्हणुणी खाली बसू -
१२३४ रान झाले हिरवेगार
बदका बदका नाच रे
अरंगळी करंगळी -
यमुनेच्या काठी काती बूलबुल असतील
मछली जलकी राणी है।
[1/11, 10:17 PM] प्रदिप कांबळे: माझ्या मामाची रंगीत गाडी हो
तिला खिल्लार्या बैलांची जोडी हो
कशी दौडत दौडत येई हो
मला आजोळी घेऊन जाई हो
नाही बिकट घाट,
सारी सपाट वाट,
मऊ गालीचे ठायीठायी हो
शीळ घालून मंजूळवाणी हो
पाजी बैलांना ओहोळ पाणी हो
गळा खुळखुळ घुंगुर माळा हो
गाई किलबील विहंग मेळा हो
बाजरीच्या शेतात,
करी सळसळ वात,
कशी घुमली अंबेराई हो
कोण कानोसा घेऊन पाही हो
कोण लगबग धावून येई हो
गहिवरून धरून पोटी हो
माझे आजोबा चुंबन घेती हो
लेक एकुलती,
नातू एकुलता,
किती कौतुक कौतुक होई हो
[1/11, 10:17 PM] बुरकुलेसर: एका माणसाची दाढी केवढी मोठी सांगू काय...
[1/11, 10:18 PM] उज्वला पाटील रेठरे: १घंटा शाळेला .२चाके गाडीला.३ पाती पंखाला
[1/11, 10:18 PM] थोरात ond: रुसू बाई रुसू
चल शाळेला चल तारा
[1/11, 10:18 PM] प्रदिप कांबळे: बदका बदका नाच रे तुझी पिल्लू पाच रे
[1/11, 10:19 PM] उज्वला पाटील रेठरे: झुकझुक झुकझुक आगीन गाडी
[1/11, 10:20 PM] Mahesh Lokhande: हा बघा हत्ती
लठ्ठम भारती
सोंड कशी हलवितो
वरती नि खालती.
कान त्याचे केवढे?
मोठाले सुपाएवढे
[1/11, 10:21 PM] थोरात ond: शाळा आमची आहे किती छान. .
[1/11, 10:21 PM] उज्वला पाटील रेठरे: टप टप टाकीत टापा चाले माझा घोडा
[1/11, 10:22 PM] Mahesh Lokhande: एक होत्या आजी
चिरीत होत्या भाजी
[1/11, 10:22 PM] Mote Gondi: चल रे भोपळ्या टणुक --
घड्याळात वाजला १ --
राम नारायन बाजा बजाता
चला वनामध्य जाऊया --
संध्या काळी काळी का--
काळी कळी साडी चांदण्यांची खडी ---
मुंबईसे अाया रामदास -
हा माझा उजवा हात --
[1/11, 10:22 PM] सुनिता लोकरे: बारीकराव होते बारीक
त्यांनाआवडे भारी खारीक
खाता खारीक कडमकडम
बाना मारी गरम गरम
एकदा म्हणाले मारीन कुस्ती
वाघ सिंहाची जिरवीन मस्ती
हत्तीचा पकडीन सुपाएवढा कान
पकडीन चोर देईन मार
बंदूक उडवीन ठो ठो
रस्ता सोडा चला हटो
बारीकराव उठले भराभरा
फिरू लागले गरागरा
फिरून फिरून घेरी आली
बारीकरावांची बोबडी वळली
[1/11, 10:23 PM] प्रकाश कदम दुत: अ आ आई, म म मका
मी तुझा मामा दे मला मुका
प प पतंग आभाळात उडे
ढ ढ ढगांत चांदोमामा दडे
घ घ घड्याळ, थ थ थवा
बाळ जरि खट्याळ, तरि मला हवा
ह ह हम्मा गोड दूध देते
च च चिऊ अंगणात येते
भ भ भटजी, स स ससा
मांडिवर बसा नि खुदकन हसा
क क कमळ पाण्यावर डुले
ब ब बदक तुरुतुरु चाले
ग ग गाडी झुक झुक जाई
बाळ माझे कसे गोड गाणे गाई
[1/11, 10:23 PM] Mahesh Lokhande: ससेभाऊ ससेभाऊ चार उड्या मारा पाहू
कशा कशा कशा?
अशा अशा अशा!
[1/11, 10:23 PM] प्रदिप कांबळे: शाळा सुटली, पाटी फुटली
आई, मला भूक लागली
शाळा सुटता धावत सुटले
ठेच लागुनी मी धडपडले
आई मजला नंतर कळले
नवीन कोरी पाटी फुटली
धम्मक लाडू चापट पोळी
नको देउ मज हवीच गोळी
किंवा दे ग, खमंग चकली
दे ना लवकर, भूक लागली
सायंकाळी जाउ दे मला
पटांगणावर खेळायाला
तिथे सोबती वाट पाहती
दे ना खाऊ, भूक लागली
[1/11, 10:23 PM] प्रकाश कदम दुत: अग्गोबाई ढग्गोबाई लागली कळ
ढगाला उन्हाची केवढी झळ
थोडी न् थोडकी लागली फार
डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार
वारा वारा गरागरा सो सो सूम्
ढोल्या ढोल्या ढगात ढुम ढुम ढुम
वीजबाई अशी काही तोर्यामधे खडी
आकाशाच्या पाठीवर चमचम छडी
खोलखोल जमिनीचे उघडून दार
बुडबुड बेडकाची बडबड फार
डुंबायला डबक्याचा करूया तलाव
साबु-बिबु नको थोडा चिखल लगाव
[1/11, 10:24 PM] प्रकाश कदम दुत: ए आई मला पावसात जाउ दे
एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे
मेघ कसे बघ गडगड करिती
वीजा नभांतुन मला खुणविती
त्यांच्यासंगे अंगणात मज खूप खूप नाचु दे
बदकांचा बघ थवा नाचतो
बेडुकदादा हाक मारतो
पाण्यामधुनी त्यांचा मजला पाठलाग करु दे
धारेखाली उभा राहुनी
पायाने मी उडविन पाणी
ताप, खोकला, शिंका, सर्दी, वाट्टेल् ते होऊ दे
[1/11, 10:24 PM] Mahesh Lokhande: अहो अहो हत्ती
डुलताय किती?
कसे कसे कसे?
असे असे असे!
[1/11, 10:24 PM] प्रकाश कदम दुत: कोणास ठाऊक कसा ? पण सिनेमात गेला ससा !
सशाने हलविले कान, घेतली सुंदर तान,
सा नि ध प म ग रे सा रे ग म प
दिग्दर्शक म्हणाला, "वाहवा !", ससा म्हणाला, "चहा हवा !"
कोणास ठाऊक कसा पण सर्कशीत गेला ससा !
सशाने मारली उडी, भरभर चढला शिडी
विदुषक म्हणाला, "छान छान !", ससा म्हणाला, "काढ पान !"
कोणास ठाऊक कसा पण शाळेत गेला ससा !
सशाने म्हंटले पाढे
बे एकं बे, बे दुणे चार, बे त्रीक सहा, बे चोक आठ आणि घडघड वाचले धडे
गुरुजी म्हणाले, "शाब्बास !", ससा म्हणाला, "करा पास !"
[1/11, 10:24 PM] प्रदिप कांबळे: तुझी नि माझी जंमत वहिनी ऐक सांगते कानात
आपण दोघी बांधू या ग दादाचं घर बाई उन्हात
उगाच करतो खोडी ग, मलाच म्हणतो वेडी ग
तुला चिडवितो, मला रडवितो आणिक हसतो गालात
खेळ मला ग आणी ना, साडी तुजला देईना
ऐट दाखवी वरती आणिक सदा तो अपुल्या तोर्यात
वहिनी का ग हिरमुसली ? नकोच का शिक्षा असली ?
फितूर होशिल दादाला ही शंका येते मनात
[1/11, 10:24 PM] सुनिता लोकरे: बाहुलीचं नाव आई घालू या का शाळेत
[1/11, 10:25 PM] Mahesh Lokhande: मुंगीताई मुंगीताई
तुरुतुरु तुमची घाई
कशी कशी कशी?
अशी अशी अशी!
[1/11, 10:25 PM] प्रकाश कदम दुत: ये रे ये रे पावसा, रुसलास का ?
माझ्याशी गट्टी फू केलिस का ?
झर झर झर तू येणार कधी ?
अंगणात पाण्याची होईल नदी
ढगांच्या मागे असा लपलास का ?
गार गार वार्यांत नाचेन मी
खूप खूप पाण्यात भिजेन मी
विजेचि टाळि मला देतोस का ?
धुमधार पाण्यात रस्ता बुडेल
मग माझ्या शाळेला सुट्टी मिळेल
गड गड गड आतां हसतोस का ?
[1/11, 10:25 PM] प्रकाश कदम दुत: एक नाही दोन नाही, बेरीज-वजाबाकी नाही
तीन नाही चार नाही, भुमितीची सजा नाही
दिवस उद्याचा सवडीचा, रविवार माझ्या आवडीचा
सोमवारचा असतो गणिताचा तास
गणिताच्या तासाला मी नापास
गणित विषय माझ्या नावडीचा
भलताच कठीण तो मंगळवार
डोक्यावर असतो भूगोलाचा भार
भूगोल विषय माझ्या नावडीचा
घेऊन तोफा आणि तलवारी
इतिहास येतो बुधवारी
इतिहास माझा नावडीचा
[1/11, 10:25 PM] Mahesh Lokhande: अहो अहो गाढवदादा
जरा तुमचा सूर काढा
कसा कसा कसा
असा असा असा
[1/11, 10:26 PM] हिलेमॅडम: वॉटर मेलन वॉटर मेलन
पपया,चीकू चीकू चीकू
चीकू चीकू चीकू
फ्रूट्स आयलँड
[1/11, 10:27 PM] उज्वला पाटील रेठरे: गर गर गिरकी.ताकाची फिरकी.ताक फिरवतो गरगरा.लोणी निघते भराभर मी खातो जराजरा
[1/11, 10:27 PM] Mahesh Lokhande: चांदोमामा घर तुझं लांब लांब
पाय दुखतील चालून जरा
थांब थांब थांब
[1/11, 10:28 PM] Mote Gondi: मुंबईला गाडी बघा चालली
एक कोल्हा बहू भुकेला -
[1/11, 10:28 PM] उज्वला पाटील रेठरे: ससेभाऊ ससेभाऊ चार उडया मारा पाहू.
[1/11, 10:29 PM] प्रकाश कदम दुत: संच्या पाला ठंडगार वारा
उभी कला दाला 2
हूप 3
माझे माकड़ पला लय
कोन्या झाडावर चढ़लय
असे विविध प्राणी आवाज आणि घर
[1/11, 10:30 PM] प्रकाश कदम दुत: छोटीशी बाहुली natapata करते
[1/11, 10:33 PM] प्रकाश कदम दुत: 1 होता खेकड़ा
चालायचा वाकड़ा
बस मधे बसला
ticket नाही काढल
हा बाळ कोणाचा
पहिलीच्या मुलाचा
नाद नाही करायचा
[1/11, 10:34 PM] सुनिता लोकरे: मुंगीने एकदा केला नाच
तिला मिळालेपैसे पाच
एका पैशाचे आणले पीठ
एका पैशाचे आणले मीठ
[1/11, 10:37 PM] सुनिता लोकरे: थुईथुई नाच माझ्या अंगणात मोरा
निळया निळया पिसाचा फुलवं फुलैरा
[1/11, 10:37 PM] सोमनाथ वाळके पारगाव: बड्बडगीते मस्तच. खरे तर मुलांना शाळेची गोडी लावण्यासाठी बड्बडगीते खूप उपयुक्त ठरतात. ती त्यांच्या भावविश्वाशी निगडित असल्यामुळे त्यांना आवडतात आणि बड्बडगीते गाताना शिक्षक त्यांना आपल्यातील वाटतो त्यामुळे बड्बडगीतांचे महत्व शिक्षण पद्धतीत अनन्यसाधारण आहे
[1/11, 10:38 PM] मुलाणी: माझी आवडती बडबड गीते
1. एक होती परी, तिला सापडली दोरी
2.वांग रूसलं टोपलीत बसलं
3.कैरी, कोथिंबीर,मिरची,आलं
या चौघांचं भांडण झालं
4.बरं का ग मंदा, काय झालं एकदा
5 माकड झाले डॉक्टर , मांजर झाली नर्स
[1/11, 10:40 PM] Mahesh Lokhande: सोमनाथसर अगदी बरोबर
बडबडगीते शिक्षकांबद्दल विद्यार्थ्यांच्या मन आपुलकी निर्माण करतात.
[1/11, 10:41 PM] सुनिता लोकरे: छुमछुम झनझन झाँझर बाजे
ताले वाले हिल मिलनाचे
हि री री री ही री री री सारंगी बाजे
[1/11, 10:43 PM] देसाई गो. गोळेश्वर: Sat varaani gadi keli sarvat phudhe somvar ala........
[1/11, 10:44 PM] Mahesh Lokhande: बडबडगीतांतुन सहज आनंददायी शिक्षण घडते.
[1/11, 10:47 PM] umakant ving: चिमणी चिमणी पानी दे
[1/11, 10:48 PM] थोरात ond: बडबडगीतांतून मुलांच्यात चैतन्य निर्माण होते. मुले फ्रेश होतात.
[1/11, 10:50 PM] दिपक निगडे अॅ: अतिशय सुंदर चर्चा होतेय.त्यामुळे हा गृप फारच उत्कृष्ट वाटतोय मला.सर्वांना धन्यवाद..👏👏👏
[1/11, 10:56 PM] Mahesh Lokhande: उज्वला पाटीलमॅडम,प्रदिप कांबळे,अरविंद गोळे,सुनिता लोकरे,थोरातसर,आतारसर,रजपुतमॅडम,घावटेसर,शंकर देसाईसर,चव्हाणसर,बागुलसर,वायदंडेमॅडम,लोकरेमॅडम,मोटेसर,तांबोळीसर,बुरकुलेसर,हिलेमॅडम,प्रकाश कदमसर,सोमनाथ वाळकेसर,मुलाणीमॅडम,भालदारमॅडम,उमाकांतसर,दिपक निगडेसर सर्वांचे आभार🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
[1/11, 10:57 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: शिक्षकांनी तेवढ्या उत्साहाने....म्हणणे आणी स्वताला विसरुन..गाणी म्हणणे फार..गरजेचे वाटते
[1/11, 10:58 PM] सोमनाथ वाळके पारगाव: आज छान संग्रह झाला या गीतांचा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏