[1/3, 11:30 PM] Mahesh Lokhande: 🔴 ग्रुपचर्चासत्र १९ 🔴
🌍 चर्चेचा विषय🌍
🔶 बहुस्तर अध्यापनात येणार्या अडचणी व उपाययोजना🔶
मुद्दे=१)बहुस्तर अध्यापनातील अडचणी
२) बहुस्तर अध्यापनाचा दर्जा वाढीसाठी उपाययोजना.
🔶चर्चेस वेळ दि.४/१/२०१६ सकाळी ६ ते रात्री १०पर्यंत.🔶 सर्वांनी चर्चेत सहभागी व्हावे.🔵 कागदावर लिहुन फोटो पोस्ट केला तरी चालेल.आपले योगदान आमच्यासाठी अनमोल आहे.🙏🙏🙏🙏🙏🙏
[1/4, 9:39 PM] Mahesh Lokhande: या विषयाला सुरुवात करावी दिवसभर वेळ देवुनही कोणीही मत मांडले नाही.बहुस्तर अध्यापन म्हणजे काय ?
बहुस्तर अध्यापनातील अडचणी कोणत्या? बहुस्तर अध्यापन करणेसाठी कोणते नियोजन हवे?बहुस्तर अध्यापनाची पध्दती कोणती असावी?
[1/4, 9:48 PM] Mahesh Lokhande: वर्गात विद्यार्थी वेगवेगळ्या स्तराचे असतात.
१) कुशाग्र बुध्दीचे =जे पटकन समजुन झटपट कौशल्य प्राप्त करतात.
२)मध्यम बुध्दीचे=ज्यांना समजणेस वेळ लागतो सरावाने कौशल्य प्राप्त करता येते.
३)मंद बुध्दीचे=मंद बुध्दीच्या विद्यार्थ्यास लवकर काही समजत नाही.कौशल्यप्राप्तीमध्ये खूप अडचणी असतात .चंचलवृत्तीने कशात लक्ष नसते सरावही करत नाहीत आत्मविश्वास नसतो.पुनराध्यापनाने प्रत्याभरणाने खुप खूप सरावाने शेवटी कसेतरी अल्प कौशल्य प्राप्त होते.
[1/4, 9:49 PM] Mahesh Lokhande: १)प्रगत
२)साधारण
३)अप्रगत
[1/4, 9:49 PM] Mote Gondi: बहुस्तर म्हणजे एकाच वर्गातील काठीण्य पातळी भिन्न असलेले विद्यार्थी निवडून त्यातील एकसारख्या काठीण्य पातळीचे विद्यार्थांचे गट तयार करून अशा एकाच वर्गातील विद्यार्थ्यांना घटक निहाय स्वतंत्र त्याच्या अध्ययनस्तरानुसार अध्यापन करणे म्हणजे बहूस्तर अध्यापन होय.
नितीन मोटे
[1/4, 9:50 PM] Mahesh Lokhande: आता प्रगत मुलांसाठी काय करावे?
साधारण मुलांसाठी काय करावे?
अप्रगत मुलांसाठी काय करावे?
या तीन प्रश्नांची उत्तरे आजच्या चर्चेत शोधायची आहेत.
[1/4, 9:53 PM] Mahesh Lokhande: अप्रगत प्रगत मिश्र गट करणे योग्य की अप्रगतांचा,प्रगतांचा,साधारण असे वेगवेगळे ग्रुप करणे योग्य होईल आपले मत काय?
[1/4, 9:55 PM] Mahesh Lokhande: कारण प्रगत मुलांना अप्रगत मुलांत बसणे व जे येते तेच करत राहणे पसंत नसते व त्यांचाही विकास रोखुन धरल्यासारखे होईल.
[1/4, 9:55 PM] थोरात ond: माझ्या मते मिश्र गट करणे योग्य
[1/4, 9:56 PM] भालदार गोळेश्वर: Mishra gat ch yogya
[1/4, 9:58 PM] Mahesh Lokhande: मिश्र गटात अप्रगत मुलांना फायदा होईल पण प्रगत मुले आपल्या गतीने आणखी पुढे कशी राहणार त्यांना येते तेच करत राहण्याने त्यांचा अकारण वेळ वाया जाणार नाही का?
[1/4, 9:58 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: अप्रगत मुलांना...कधी मधी..प्रगत मुलांसोबत.बसवावे...,कारण न्यूनगंड...कमी होईल.,आणि प्रगतांचा अहंकारही..,कमी होईल...
[1/4, 9:59 PM] भालदार गोळेश्वर: Pragt mulancha sahyane aprgat mulanna adhyapnat madat gheta yete...mi yacha shalet upyog Karun pahile ahe... It's working...
[1/4, 10:00 PM] हिलेमॅडम: पण मिश्र गट तयार करताना अप्रगत विद्यार्थी व् प्रगत विद्यार्थी यांच्या जोडीत् बदल असला पाहिजे
[1/4, 10:00 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: अप्रगत मुलांना....त्याच गटातील.थोडासा प्रगत विद्यार्थी खूपच छान अभ्यास शिकवू शकतो..
[1/4, 10:02 PM] Mahesh Lokhande: पण अप्रगत मुलांसाठी साधारण (मध्यम)गटाचा विद्यार्थी फायदेशीर होणार नाही का? आणि मध्यम विद्यार्थ्याचा सरावाने परिपक्व पण तो होईल.दोघांनाही फायदा होईल.
[1/4, 10:03 PM] थोरात ond: अप्रगत मुलांना. ..मार्गदर्शन करताना प्रगत मुलाचा निश्चित फायदा होईल
[1/4, 10:04 PM] हिलेमॅडम: मिश्र गट करताना प्रगत विद्यार्थ्यांचे नुसकाण होणार नाही याकडेही आपल्याला लक्ष्य दिले पाहिजे
[1/4, 10:05 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: माझ्या वर्गातील एक उपक्रम.....१)प्रगत मुलांनी.रोज किमान एका अप्रगत मुलाचे वाचन..घ्यायचेच२)त्याबद्दल. वाचन घेणार्या प्रगत मुलास.,एका खाजगी.नोंदवहीत..गुण द्यावे..३)याचा परीणाम म्हणजे..रोज.वाचन घेणारे..चढाओढीने वाचन घेतात...आवडीने
[1/4, 10:05 PM] Mahesh Lokhande: १)प्रगत व मध्यम
२)मध्यम व प्रगत
असे गट अधिक फायदेशीर ठरतील.
[1/4, 10:08 PM] Mahesh Lokhande: मध्यममुले अप्रगतांस शब्दलेखन देतील व ते पाहुन अप्रगत मुले अनुलेखन करतील .दोघांचाही लेखन सराव होतो.
[1/4, 10:08 PM] हिलेमॅडम: प्रगत+मध्यम व मध्यम +प्रगत असा गट केला खरच फायदा होईल.
[1/4, 10:09 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: प्रगत मुलांसाठी..१)रोज एक विषय..आदल्यादीवशी सांगतो..उदा. माझी शाळा,माझी आई...२).मग,.त्या विषयावर जास्त वाक्य सांगणाराचे विशेष कौतूक..करतो
[1/4, 10:10 PM] थोरात ond: अप्रगत मुलांचे वाचन, लेखन पाहताना प्रगत मुलांचे शुद्धलेखन सुधारणा होते.
[1/4, 10:10 PM] Mote Gondi: प्रगत विद्यार्थ्यांन साठी-
स्वतंत्र अभ्यास ,स्वाध्यय कार्ड ,गटचर्चा,स्वयंअध्ययन ,व प्रश्नावली ,संदर्भ साहित्याचे वाचन सराव घेणे ,व भरपूर सराव .
२)साधारण विद्यार्थ्यांसाठी - ज्ञानरचनावाद पद्धतीने अध्यापन करावे .
३) अप्रगत विद्यार्थ्यानसाठी- रचनावाद पद्धतीने वैयक्तीक मार्गदर्शन करावे
सर्वानसाठी शो.साहित्यांची घटक व काठीण्य पातळीनुसार तयार व रेडीमेड साहित्य अावश्यक अाहे व त्याला तंत्रज्ञानाची जोड (V.V.I.)
नितीन मोटे
🙏🏿
[1/4, 10:12 PM] Mote Gondi: बहुस्तर अध्यापनात बहुवर्गामुळे समस्या येतात.
[1/4, 10:14 PM] Mahesh Lokhande: प्रगत विद्यार्थ्यांसाठी आव्हानात्मक अभ्यास द्यावा.
साधारण विद्यार्थ्यांसाठी सरावाचा अभ्यास हवा.
अप्रगत विद्यार्थ्यांसाठी वैयक्तीक मार्गदर्शन हवे.वेगवेगळे साहित्य व कृती आनंददायी पध्दतीने करणे व समज पक्की होणे गरजेचे ठरते.
[1/4, 10:14 PM] हिलेमॅडम: अप्रगत विद्यार्थयासाठी खेळातून जर एखादा घटक शिकवला तर छान फरक पडतो.
[1/4, 10:16 PM] Mahesh Lokhande: प्रगत विद्यार्थ्यांस चॅलेंज हवे असते.
[1/4, 10:17 PM] Mahesh Lokhande: साधारण विद्यार्थ्यांस समजलेले असते पण सराव केल्याने प्रभुत्वपातळीवर जातात.
[1/4, 10:18 PM] Mahesh Lokhande: अप्रगत विद्यार्थ्यांस मार्गदर्शन कृती खेळातुन समजणेच महत्वाचे असते.
[1/4, 10:20 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: .प्रगत विद्यार्थ्यांस तूलना करावयास फार आवडते....त्याचा फायदा आपण अध्यापनात घेवु शकतो..उदा..गणेशला बाजूला घेवून सांगायचे..की सचिन तुझ्यापेक्षा जास्त सुधारायला लागलाय....मग..गणेश अधिक अभ्यासाचा प्रयत्न नक्किच करेल
[1/4, 10:21 PM] Mahesh Lokhande: प्रगत गटास उच्चपातळीवरील वैचारिक प्रक्रियांची आवश्यकता असलेला आव्हानात्मक स्वाध्याय हवा.
[1/4, 10:23 PM] Mahesh Lokhande: साधारण विद्यार्थ्यांस सोप्या क्रियांचा सराव द्यावा.
[1/4, 10:24 PM] Mahesh Lokhande: अप्रगत मुलांसाठी खुपच सोपा भाग व पायरीपायरीने भरपुर साहित्य कृतीमार्फत आपल्या देखरेखीखाली करुन घेणे अधिक फायदेशीर ठरेल.
[1/4, 10:28 PM] Mahesh Lokhande: प्रगत
साधारण
अप्रगत
स्तरानुसार स्वयंअध्ययनकार्ड देणे किंवा काय घ्यायचे याचे नियोजन करता येईल.पण गट कायम स्तरानुसार ठेवणेही योग्य नव्हे.व कायम मिश्र गट ठेवणेही योग्य वाटत नाही.
[1/4, 10:34 PM] Mote Gondi: अप्रगत विद्यार्थ्थांचे निकष वर्ग स्तरानुसार बदलतात प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक विषयात निश्चित काठीण्यपातळी गाठेलच असे नाही ,एखाद्या विषयात तो अप्रगत असू शकतो ऊदा. भाषेत य्रगत गणितात अप्रगत अशामुलांना १००% वैयक्तीक मार्गदर्शन अावश्यक अाहे.प्रगत कीती या पेक्षा अभ्यासात मागेअसलेले म्हणजे अप्रगत किती व का याचा जाणिवपूर्वक शोध घेवून १००% प्रगत करण्याचाच प्रयत्न व्हावा.
नितीन मोटे
[1/4, 10:34 PM] Mote Gondi: अप्रगत विद्यार्थ्थांचे निकष वर्ग स्तरानुसार बदलतात प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक विषयात निश्चित काठीण्यपातळी गाठेलच असे नाही ,एखाद्या विषयात तो अप्रगत असू शकतो ऊदा. भाषेत य्रगत गणितात अप्रगत अशामुलांना १००% वैयक्तीक मार्गदर्शन अावश्यक अाहे.प्रगत कीती या पेक्षा अभ्यासात मागेअसलेले म्हणजे अप्रगत किती व का याचा जाणिवपूर्वक शोध घेवून १००% प्रगत करण्याचाच प्रयत्न व्हावा.
नितीन मोटे
मोटेसर,थोरातसर,भालदारसर,तांबोळीसर,हिलेमॅडम,भुसारीसर सर्वांचे आभार
गुणवत्तेचे ध्येय गाठण्या करी जीवाचे रान त्या गुरूजनांना माझे कोटी कोटी प्रणाम.
Pages
- Home
- शैक्षणिक ग्रुपचर्चा १ ते ७
- गणित धडे
- प्रश्नपेढी
- शैक्षणिक विडीओ
- शाळा
- फोटो
- शैक्षणिक बेबसाईड
- माहित आहे का?
- नवीन काय
- शिक्षकांसाठी
- उपक्रमशील शाळा
- कविता डाऊनलोड
- डाउनलोड
- ई-वाचनालय
- ई-लर्निंग
- २ डी गेम डाऊनलोड
- विडिओ शिक्षकांसाठी
- शैक्षणिक ग्रुपचर्चा ८ ते १४
- my apps
- वाक्यपेढी व शब्दपेढी
- चौथी ऑनलाईन चाचणी
- प्रश्नपत्रिका डाउनलोड
Monday, 4 January 2016
शैक्षणिक ग्रुपचर्चा १९
Subscribe to:
Posts (Atom)