अ.नं | शिक्षकाचे नाव | शाळा | केंद्र |
---|---|---|---|
1 | नांगरे किरण रमेश | किवळ | चिखली |
2 | वाघ कृष्णा चंद्रकांत | कवठे | हेळगाव |
3 | तांबोळी रशीद दस्तगीर | टेंभू | गोळेश्वर |
4 | शिरतोड आबा राजाराम | रेठरे खुर्द | वाठार |
5 | पाटील विजय राजाराम | बाबरमाची | बनवडी |
6 | हिले जमुना पांडुरंग | वारुंजी | सुपने |
7 | वायदंडे सुरेखा प्रभाकर | नारायणवाडी | काले |
8 | कुंभार सुजाता प्रदीप | शास्त्रीनगर | मलकापूर |
9 | यादव माधुरी बा. | यशवंतनगर नं.२ | मलकापूर |
10 | लोकरे सुनिता शंकर | आगाशिवनगर नं.२ | मलकापूर |
11 | पांढरपट्टे रुपाली राजेंद्र | केंद्रशाळा विंग | विंग |
12 | उमाटे रामचंद्र ज्ञानदेव | केंद्रशाळा मलकापूर | मलकापूर |
13 | बसागरे जोतीराम बसागर | कोपर्डे हवेली | कोपर्डेहवेली |
14 | शेंडे संजय महादेव | विठोबाचीवाडी | ओंड |
15 | फल्ले अमित चंद्रकांत | लटकेवाडी | ओंड |
16 | कुत्ते आनंद वसंतराव | आणे | विंग |
17 | नागे सुनील तातोबा | कोरीवळे | इंदोली |
18 | शिंदे संतोष विलास | माध्य.विद्यालय बेलवडे हवेली | वहागाव |
19 | चव्हाण दिपक रणजीत | वाघेरी | बनवडी |
20 | देवकर नकुशी पांडुरंग | वाघेश्वर | मसूर |
21 | राऊत सीमा सदाशिव | शहापूर | मसूर |
22 | गवळी सतीश खाशाबा | मनु | उंडाळे |
23 | शेख अनिस हैदर | यादवमळा कासारशिरंबे | वाठार |
24 | जंगम उमाकांत राजाराम | मोरेमळा विंग | विंग |
25 | रासाटे शशिकांत नानासो | बेलवडे बु | वाठार |
26 | नायकवडी निलम कासम | शिबेवाडी | कोळे |
27 | भंडारे विशाल संभाजी | काटेकरवाडी | येवती |
२८ | महेश शहाजी लोखंडे | शिंदेमळा शरदनगर | गोळेश्वर |
गुणवत्तेचे ध्येय गाठण्या करी जीवाचे रान त्या गुरूजनांना माझे कोटी कोटी प्रणाम.
Pages
- Home
- शैक्षणिक ग्रुपचर्चा १ ते ७
- गणित धडे
- प्रश्नपेढी
- शैक्षणिक विडीओ
- शाळा
- फोटो
- शैक्षणिक बेबसाईड
- माहित आहे का?
- नवीन काय
- शिक्षकांसाठी
- उपक्रमशील शाळा
- कविता डाऊनलोड
- डाउनलोड
- ई-वाचनालय
- ई-लर्निंग
- २ डी गेम डाऊनलोड
- विडिओ शिक्षकांसाठी
- शैक्षणिक ग्रुपचर्चा ८ ते १४
- my apps
- वाक्यपेढी व शब्दपेढी
- चौथी ऑनलाईन चाचणी
- प्रश्नपत्रिका डाउनलोड
Saturday, 22 August 2015
तंत्रस्नेही सहविचारसभेस केंद्रनिहाय तंत्रस्नेही दि.२२/८/२०१५
Friday, 21 August 2015
मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.सातारा मिटिंग दि. १९/८/२०१५ अहवाल
मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.सातारा मिटिंग दि. १९/८/२०१५ अहवाल
*क्रीडाप्रबोधिनी आढावा -बरकडे सर क्रीडा समन्वयक फलटण यांनी २००९-०१० साली भुजबळ सरांनी ३ मुले क्रीडाप्रबोधीनीस निवड बालेवाडीस कशी झाली२०१०-०११ तालुक्यातून १८ मुले लागली राज्याच्या ७२ मध्ये २५%पुढे २०११-०१२ साली जिल्ह्यातून १६२ राज्याशी प्रमाण होते ६७%२०१२-०१३ साली स्पर्धा झाली नाही निकष कडक झाले २०१३-०१४ साली राज्यात ४८ निवडली त्यात सातारा जिल्ह्याची ४१ म्हणजे राज्यात ८३%प्रमाण होते.पुढे विकास भुजबळ सरांनी १० वर्ष कसे प्रयत्न केले घरी मुलांचा केलाला सांभाळ मित्रांची मदत जिल्हा विभाग राज्य मेडिकल लोकांचे सहकार्य ,झालेला त्रास १६२ विद्यार्थी निवड होऊनही निकष बदलांनी मंत्रालयात लक्षवेधी प्रश्न बनवण्यास झालेला ध्येयवादी लढा व विजय राज्यास दिलेले धक्के व राज्यभर निर्माण केलेला सातारा जिल्ह्याचा गुणगौरव अशी विजयगाथा ऐकवली. मुलांची निवड पद्धत विविध स्पर्धा व नियोजन याची माहिती दिली . आदरणीय पाटीलसाहेब यांनी याची रोजगारनिर्मितीशी जोड देऊया पोलिसभरती व मिलिट्री भरती मध्ये या मुलांस काय करता येईल का याचा विचार मांडला.स्वावलंबन हेच खरे शिक्षण. मुले स्वताच्या पायावर उभी राहायला शिकावीत.स्वता समस्या सोडवायला शिकावीत.आजारांचा आहाराशी संबध आहे. * योगा आढावा -योगशिक्षक जावळी यांनी सूर्यनमस्कार १०० स्पर्धेत सुवर्ण अक्षराने नाव लिहिलेले प्रमाणपत्र दिले. पाच पांढरी विषे -साखर,मैदा,दुध,मीठ,तांदूळ यांची माहिती दिली म्याडमनी मटकी,मुग,मोड ,शेंगदाणे ,लाडू कुट उकडलेले पदार्थ भाजलेला बटाटा ,फळे १५० रुपयांत सकस आहार कसा बनवतात सांगितले.कच्चे पदार्थ सर्वात उत्तम, .,भाजलेले चांगले.उकडलेले ठीक ,शिजवलेले बरे व तळलेले सर्वात वाईट असे मत मांडले.एका सरांनी सोयाबीन तेल वाईट चायनीज वाईट आहार प्रमाण सांगितले.भात कधी खावा सांगितले.एका सरांनी कुरकुरे शाळा जवळील दुकानातील खाण्याचा परिणाम सांगितला.एका सरांनी दुध पदार्थ सकाळी दही,दुपारी ताक,रात्री दुध योग्य उशः पान पाणी पिण्याची पद्धत्ती व प्रमाण सांगितले.एका शिक्षकांनी बॉबी जाळण्याचा प्रयोग सांगितला.एका सरांनी दीर्घ श्वसनाचे फायदे सांगितले.मुद्रा फायदा सांगितला.कराडच्या म्याडमनी प्राणायामाचे फायदे सांगितले तृण रसाचे फायदे सांगितले एका सरांनी आर्ट ऑफ लिविंग कसे उपक्रम घेते ते सांगितले आदरणीय पाटील साहेबांनी आयुष्यभर उपयोगी ठरेल हे असे शिक्षण द्या गेल्या आठवड्यात विपश्यना करणारे बोलावले तसे आर्ट ऑफ लिविंग चे बोलवा तालुकानिहाय योग समन्वयक नेमायचे आहेत . *तंत्रस्नेही आढावा -महेश लोखंडे सरांनी नंदकुमार साहेबांनी पुणे येथे तंत्रस्नेही कार्यशाळा घेतल्यानंतर पंचायत समिती ब्लॉग तयार करून गुगल फॉर्म द्वारे तंत्रस्नेही निवड केली व आता पंचसूत्री कार्यक्रम सुरु आहे . १) ब्लॉग शाळांचे तयार करणे ब्लॉग तयार करायला शिकविणे २ )शाळांचे apps बनविणे apps बनवायला शिकविणे ३)शैक्षणिक विडीओ तयार करणे तयार करायला शिकविणे ४)software तयार करणे उपलब्ध व वापर करणे ५)whatsapp ग्रुप करून ई लर्निंग देवाण घेवाण करणे tech savvy teachers karad ५०० शिक्षकांचा ग्रुप सुरु आहे बालाजी जाधव यांनी तिसरी व शिष्यवृत्तीचा ऑफलाईन apps तयार केले राज्याच्या टीममध्ये काम करत आहोत आपणास युजर ण बनवता क्रियेटर बनवायचे आहेत असे मत मांडले. राम सालगुडे सरांनी मार्डी केंद्र कसे पेपरलेस केले त्यावरून सरल डाटाबेस संकल्पना माण तालुक्याने महाराष्ट्राला दिलेली आहे राज्याच्या टीममध्ये रिपोर्टवर काम सुरु आहे सांगितले . कराडचे नांगरे सरांनी एकविसाव्या शतकाचा ताणताणाव शाप तर संगणक तंत्रज्ञान वरदान आहे पाटीलसाहेबांचे मायक्रोप्लानिंग आहे क्रीडाशिक्षकांचे ८० दिवस क्रीडाप्रबोधिनी स्पर्धात जातात शाळांचे नुकसान झाले कि मानसिकता राहत नाही तरी त्या काळात बदली शिक्षक मिळावा ही मागणी केली पाटीलसाहेबांनी अहंकार ण ठेवता काम करा मी केले म्हणू नका . आदरणीय शिक्षणाधिकारी गुरव madam यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले आदरणीय मा.श्री नरळेसाहेबांनी संगणक शिक्षकांना शाळांना पुरविण्याची मागणी केली . मा.श्री थाडेसाहेब प्रकल्पसंचालक जि.ग्रा.वी.यं.सातारा जि प,. यांनी जे चांगले आनंददायी ते द्या ३ लाख महिला १५ हजार बचतगट अंगणवाडी सेविका मदतनीस यांना घेऊन आपण आरोग्य शिक्षण स्किल devlopment रोजगार शिष्यवृत्ती असे काम करूया तुम्ही एक्स्पर्ट हिरे आहात . शेवटी आभार मानले व ही जवळ जवळ तीन तास चाललेली मिटिंग संपली
Wednesday, 8 April 2015
स्मार्ट blogs
http://www.techgurumarathi.blogspot.in/p/software.html?m=1 blogs वरील हा मजकुर आहे विविधशैक्षणिकब्लाॅगप्रसाराने शैक्षणिकहित व्हावे म्हणुन घेतला आहे.
शैक्षणिक ब्लॉग
ब्लॉगचा पत्ता ब्लॉगर
1. http://www.shikshakmitramaharashtra.blogspot.in/?m=1 श्री. राजू खाडे
2. elearningzp.blogspot.in श्री. सचिन कडलग
3. mahazpteacher.blogspot.in श्री. संतोष भोंबळे
4. www.shikshakkatta.blogspot.in श्री. सोमनाथ वाळके
5. crcvardhangad.blogspot.in श्री. संजय गोरे
6. www.shikshanmitra.blogspot.in श्री. प्रशांत क-हाडे
स्मार्ट softwares
http://www.techgurumarathi.blogspot.in/p/software.html?m=1 softwaresया ब्लाॅगवरील हा मजकुर शैक्षणिक क्रांती हितास्तव व शिक्षकांना विविध साॅफ्टवेअर्सची ओळख व्हावी म्हणुन घेतलाआहे.
तारांगण सॉफ्टवेअरर्स
भुगोल विषयाच्या अध्यापनासाठी अत्यंत उपयुक्त ठरतील अशी, कोणत्याही इ-लर्नींग पॅकेजपेक्षा प्रभावी ठरणारी अनेक ओपन सोर्स व फ्रीवेअर सॉफ्टवेअर्स इंटरनेटवर मिळतात. फक्त विद्यार्थी-शिक्षकच नाही तर हौशी आणि व्यावसायिक आकाशनिरीक्षकांसाठीही ही सॉफ्टवेअर्स मार्गदर्शक ठरतात. विविध नक्षत्रे,राशी, तारे, गृह, त्यांचे उपगृह, आकाशगंगा, तेजोमेघ इ. सर्वाची सखोल माहिती एका आभासी तारांगणाच्या स्वरूपात आपल्यासमोर सादर करतात. आपल्या संगणकाच्या पडद्यावर दिसणा-या या आभासी आकाशातील कोणत्याही खगोलीय वस्तूचे आपण सखोल निरीक्षण करू शकतो, यातील आभासी दूर्बिनीद्वारे गृह , तारे, नक्षत्र अगदी कोणत्याही गृहाचे उपगृह झुम करून पाहू शकतो/ विद्यार्थ्यांना दाखवू शकतो, सूर्यग्रहण , चंद्रग्रहण, सूर्यमालेतील विविध गृहांचा प्रवासही आपण या आभासी तारांगणाद्वारे करू शकतो, यातीलच दोन सर्वोत्तम सॉफ्टवेअर्सची माहिती मी या पोस्टद्वारे आपणास देत आहे.
1. Stellarium - नेहरू तारांगण सारख्या सुप्रसिद्ध तारांगणांच्या प्रोजेक्टरमध्ये वापरण्यात येणारे हे सॉफ्टवेअर NASA सारख्या अवकाश संशोधन संस्था व व्यावसायिक अवकाश निरीक्षकांनी जमवलेले फोटो ताऱ्यांचे अंतरराष्ट्रीय डेटाबेस या सॉफ्टवेअर्समध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.
वैशिष्टये -
१. माउस ड्रॅग करून आपण आकाशाचा कोणताही भाग प्रत्यक्ष दाखवू शकतो.
२. लोकेशन विंडोमधून आपले सध्याचे लोकेशन व टाइम डेट विंडो मधून सध्याची वेळ सेट करून आकाशातील गृह ताऱ्यांचे आपण रिअल टाइम निरीक्षण करू शकतो.
३. माउसचा स्क्रॉल व्हील वापरून आकाशाचा कोणताही तारा, नक्षत्र, गृह, उपगृह झुम करून दाखवू शकतो.
४. या सॉफ्टवेअरमध्ये २३ प्रकारच्या वेगवेगळ्या संस्कृतीतील नक्षत्र - ताऱ्यांची नावे, माहिती, नक्षत्र कल्पना चित्रे एका क्लिकवर आभासी आकाशावरच दिसतात.
कसे वापरावे ?
हे सॉफ्टवेअर सुरू केल्यानंतर खालील डाव्या बाजुला माउसचा कर्सर नेल्यानंतर उभा व आडवा असे दोन अर्धपारदर्शक कंट्रोल बार दिसतील.
यातील आडव्या बारवरील बटनांची माहिती क्रमाणे डावीकडून उजवीकडे खालील प्रमाणे.....
१. constellation lines- तारे रेषांनी जोडून नक्षत्रे दाणवते
२. constellation lables - नक्षत्रांची नावे,
३. constellation Art - नक्षत्रांची कल्पना चित्रे
४. Equatorial grid - अक्षांश रेखांश जाळी
५. Azimuth- Altitude - आकाशनिरीक्षकांसाठीचे स्थानदशर्क ( अझिमथ- उत्तर दिशेपासून डोक्यावरील सर्वोच्च बिंदू (Zenith) ला जोडणारी रेषा 0 अंश मानून त्याचप्रकारे पूर्व-९० अंश, दक्षिण - १८० अंश, पश्चिम - २७० अंश व पुढे उत्तरेपर्यंत ३६० अंश. अल्टिट्युड- क्षितीजापासून आकाशातील सर्वोच्च बिंदूपर्यंत ० ते ९० अंश अनुक्रमे)
६. Disable ground, ७. Crdinal points(दिशा), ८. वातावरण(दिवसा बंद / चालू करण्यासाठी) ९. Deep sky objects १०. गृहांची नावे , ११. दुर्बीण आडवी/ उभी फिरवण्यासाठी १२. Centre on selected object, १३. Night Mode , १४. कृत्रिम उपगृह , १५. / १६/१७/१८ - वेळेनुसार आकाश फिरण्यााची गती कमी जास्त करण्यासाठी १९. CLOSE- सॉफ्टवेअर बंद करण्यासाठी.
उभ्या बारवरील बटने सेटींगशी संबंधित आहेत., ती अवश्य वापरून पहा ,अधिक माहिती मिळेल. ( काही अडचण आल्यास Close वापरून सॉफ्टवेअर बंद करा व परत चालू करा पूर्ववत होइल.)
डाउनलोड कसे करावे ?
www.stellarium.org या वेबसाइटवर जा.
सुरूवातीला विविध ऑपरेटिंग सिस्टमची चिन्हे दिसतील (माहितीसाठी विंडोजची चिन्हे लाल वर्तुळाने गोल केली आहेत) त्यातील तुमच्या ऑपरेटींग सिस्टीमवर क्लिक करा , डाउनलोड सुरू होइल
हे सॉफ्टवेअर OFFLINE काम करते
साइज १३२ एम. बी.
डाउनलोड झालेली फाइल Install करा.
२. मायक्रोसॉफ्टचे World Wide Telescope -
मायक्रोसॉफ्ट ने तयार केलेल्या या सॉफ्टवेअरचा यूझर इंटफेस Stellarium पेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. यामध्ये सूर्यमालेची सफरच चांगल्या प्रकारे घडवता येते. यातील इमेजेसही उच्च प्रतिच्या व पहिल्या सॉफ्टवेअरपेक्षा जास्त्ा आहेत. यासोबत WWT Mars हे सॉफ्टवेअरही मोफत येते . गुगल अर्थ प्रमाणे मंगळ ग्रहाची संपर्ण सफर याद्वारे करता येते.
१०५ एम. बी. चे हे सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी http://www.worldwidetelescope.org/Download/ येथे क्लिक करा.
हे सॉफ्टवेअर ONLINE चालते.
ब्लाॅग कसा बनवावा?
ब्लॉग कसा बनवावा ?
http://shikshakmitramaharashtra.blogspot.in/?m=1वरुन सदर पोस्ट शैक्षणिक क्रांतीहितास्तव घेतली आहे अधिक शिक्षकांस लाभ व्हावा.
ब्लॉग तयार करणे
ब्लॉग तयार करण्यासाठी स्वतःचा gmail id व password असणे आवश्यक आहे.
सर्वप्रथम www.blogger.com या वेबसाइट वर जा व तेथे gmail चा username व password टाकून sign in करा .
यानंतर new blog ला क्लिक करा व ब्लॉगचे title [शीर्षक ] व तुम्हाला ठेवायचा blog address टाका .
e.g. [www.shikshak.blogspot.com]
त्या खालील हवे ते template निवडा व create blog ला क्लिक करा. [निवडलेल्या template वर ब्लॉगची रचना अवलंबून असते ]
आता new post ला क्लिक करा ,तेथे ms-word सारखे page open होते .तेथे आपली पोस्ट तयार करा .व publish करा .व view blog करा
नंतर layout वर जा तेथे header मध्ये ब्लॉगचा मुखपृष्ठासाठी photo add करा व त्याखाली add gadget क्लिक करा .त्यात अगोदर तयार केलेली पेजेस select करून save करा. हे पेजेस तुम्हाला ब्लॉगच्या मुखपृष्ठावर आडवी दिसतील.
पेजेस tab टाकने - new page ला क्लिक करा व त्याचे title टाकून तयार करा [माहिती तयार असल्यास pages वर माहिती भरा ,फोटो टाका ]
त्यानंतर खाली add gadget वर क्लिक करून हवी ती gadgets add करू शकता.
आता layout पेजच्या डाव्या बाजूला template designer वर क्लिक करा [येथे ब्लॉगची design करता येते ]तेथे layout वर sidebar कसे हवे ते select करा व apply to blog करा.
शेवटी सर्वात महत्वाच्या advanced menu वर जा ,येथे ब्लॉगची सर्व रंगसंगती ठरवा. खाली तुम्हाला live blog दिसेल ,सर्व रचना झाल्यावर apply to blog करायला विसरु नका.
आपण google drive ,dropbox यावर आपल्या फाइल्स save करून त्यांची link तेथून copy करून ब्लॉगवर हवी तेथे paste करू शकतो. इतर website च्या लिंक याप्रकारे देता येतात.
Saturday, 4 April 2015
Plickers -एक भन्नाट ई-क्लास प्रणाली
मला शाळेत आज चाचणी घ्यायची, पट आहे 60 विद्यार्थी , काय काय करावं लागेल ?
अगोदर प्रश्नपत्रिका काढली वेळ 30 मिनिटे
मी माझ्या शाळेच्या प्रिंटरवर प्रिंट केल्या. वेळ 1.00 तास
चाचणी साठी वेळ ठरवला. दिलेल्या वेळेत चाचणी घेतली वेळ 30 मिनिटे
चाचणी घेतल्यावर माझ्याकडे पेपर तपासणे निकाल तयार करणे ही कामं होती.
पेपर तपासले, सर्व प्रश्न हे ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळे मला तपासायला ही तसा कमी वेळच लागला . साधारण 1.00 तास
आता निकाल तयार झाला पण मला कोणत्या मुलाने कोणता प्रश्न सोडविला, कोणता घटक कुठल्या विद्यार्थ्याला आकलन झाला नाही यासाठी प्रश्नवार निकाल पाहिजे होता म्हणजे मला पुढच्या तासाला शिकवताना परत कोणता घटक पुन्हा समजावून सांगावा लागेल हे कळेल. थोडक्यात मला माझ्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या निकालाचे तपशीलवार वर्गीकरण करायचे होते. हे थोडे किचकट काम होते. वेळ लागला साधारण 3.00 तास .
थोडक्यात एका विषयाच्या चाचणी व निकालासाठी मला वेळ लागला 6.00 तास
6 तासाच्या मेहनती नंतर माझ्याकडे माझ्या वर्गाच्या एका विषयाच्या एका घटकासाठी घेतलेल्या चाचणीचा संपूर्ण डेटा होता.
आता बघूया स्मार्ट पध्दत
मला चाचणी घ्यायची आहे प्रश्नपत्रिाका तयाल केली वेळ 30 मिनिटे
चाचणी साठी 30 मिनिटे
.
.
.
.
.
निकाल माझ्या मोबाईल वर तयार होता अगदी प्रश्नानुसार , तेही ग्राफीकल स्वरुपात , एका दृष्टीक्षेपात मी माझ्या वर्गाबददल सर्व माहिती कळते.
हो अगदी मोफत ....
चला मग स्मार्ट फोन आहे ना तुमच्या कडे Play Store ला जाऊन Plickers हे मोफत ॲप डाऊनलोड करा. सोबतच plickers.com ला जाऊन कार्डस ची पीडीएफ फाईल डाऊनलोड करा. हे कार्डस प्रिंट करुन घ्या आणि कार्डशीट वर चिकटवून घ्या.ॲप सुरू करुन रजिस्ट्रेशन करुन घ्या. तुमची तयारी पुर्ण झाली. आता वर्गात परीक्षा घ्यायच्या वेळी बहुपर्यायी प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी ॲप मध्ये प्रश्न टाका. बरोबर उत्तर कुठले ते असाईन करा. प्रत्येक विद्यार्थ्याला एक कार्ड क्रमाने जेवढी मुले असतील तेवढी द्या.
प्रश्न विद्यार्थ्याना तोंडी विचारा किंवा प्रोजेक्टत वर डीस्प्ले करा.
कार्ड च्या चारही कडांना छोटया टाईप मध्ये A, B, C व D हे पर्याय छापलेले आहेत. बरोबर पर्याय हा वरच्या बाजूस यावा असे कार्ड विद्यार्थ्यांनी दाखवावेत. त्याच वेळी ॲप मध्ये असलेल्या कॅमेरा आयकॉन वर क्लिक करा. कॅमेरा सुरु होईल. व विद्यार्थ्यांची उत्तरे आपोआप रेकॉर्ड होवू लागतील उजवया बाजूला किती विद्यार्थ्यांनी उत्तर दिले ते दिसेल. 1 ते 2 सेकंदात सर्व वर्गाचे रीस्पॉन्य रेकॉर्ड होतात. ok म्हणा. व दुसरा प्रश्न घ्या.
अशा पध्दतीने परीक्षा सुरू असतातनाच निकाल तयार होत राहील.
हा निकाल ऑनलाईन आपल्या अकाउंटला ही आपोआप सेव्ह होईल .
इंटरॲक्टीव्ह क्लासरुम रेडी झाली की मित्रांनो
आणि हो प्रत्येक हजेरी पण आपल्याला या ॲप मध्ये घेता येईल .
कशी ते स्वत: प्रयत्न करुन पहा .
पुन्हा भेटुया अशाच काही भन्नाट ॲपविषयी जाणून घेण्यासाठी
फोटोसहीत लेख वाचण्यासाठी अवश्य भेट द्या
www.atfmaha.com
अनिल सोनुने
9960650807