Wednesday, 8 April 2015

स्मार्ट softwares

http://www.techgurumarathi.blogspot.in/p/software.html?m=1 softwaresया ब्लाॅगवरील हा मजकुर शैक्षणिक क्रांती हितास्तव  व शिक्षकांना विविध साॅफ्टवेअर्सची ओळख व्हावी म्हणुन घेतलाआहे.
तारांगण सॉफ्टवेअरर्स
        भुगोल विषयाच्या अध्यापनासाठी अत्यंत उपयुक्‍त ठरतील अशी, कोणत्याही इ-लर्नींग पॅकेजपेक्षा प्रभावी ठरणारी अनेक ओपन सोर्स व फ्रीवेअर सॉफ्टवेअर्स इंटरनेटवर मिळतात.  फक्त विद्यार्थी-शिक्षकच नाही तर हौशी आणि व्यावसायिक आकाशनिरीक्षकांसाठीही ही सॉफ्टवेअर्स मार्गदर्शक ठरतात. विविध नक्षत्रे,राशी, तारे, गृह, त्यांचे उपगृह, आकाशगंगा, तेजोमेघ इ. सर्वाची सखोल माहिती एका आभासी तारांगणाच्या स्वरूपात आपल्यासमोर सादर करतात. आपल्या संगणकाच्या पडद्यावर दिसणा-या या आभासी आकाशातील कोणत्याही खगोलीय वस्तूचे आपण सखोल निरीक्षण करू शकतो, यातील आभासी दूर्बिनीद्वारे गृह , तारे, नक्षत्र अगदी कोणत्याही गृहाचे उपगृह झुम करून पाहू शकतो/ विद्यार्थ्यांना दाखवू शकतो, सूर्यग्रहण , चंद्रग्रहण, सूर्यमालेतील विविध गृहांचा प्रवासही आपण या आभासी तारांगणाद्वारे करू शकतो, यातीलच दोन सर्वोत्तम सॉफ्टवेअर्सची माहिती मी या पोस्टद्वारे आपणास देत आहे.
        1. Stellarium -  नेहरू तारांगण सारख्या सुप्रसिद्ध तारांगणांच्या प्रोजेक्टरमध्ये वापरण्यात येणारे हे सॉफ्टवेअर NASA सारख्या अवकाश संशोधन संस्था व व्यावसायिक अवकाश निरीक्षकांनी जमवलेले फोटो ताऱ्यांचे अंतरराष्ट्रीय डेटाबेस या सॉफ्टवेअर्समध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.
            वैशिष्टये -
         १. माउस ड्रॅग करून आपण आकाशाचा कोणताही भाग प्रत्यक्ष दाखवू शकतो.
             २. लोकेशन विंडोमधून आपले सध्याचे लोकेशन व टाइम डेट विंडो मधून सध्याची वेळ सेट करून आकाशातील गृह ताऱ्यांचे आपण रिअल टाइम निरीक्षण करू शकतो.
             ३. माउसचा स्क्रॉल व्हील वापरून आकाशाचा कोणताही तारा, नक्षत्र, गृह, उपगृह झुम करून दाखवू  शकतो.
             ४. या सॉफ्टवेअरमध्ये २३ प्रकारच्या वेगवेगळ्या संस्कृतीतील नक्षत्र - ताऱ्यांची नावे, माहिती, नक्षत्र कल्पना चित्रे एका क्लिकवर आभासी आकाशावरच दिसतात.
              कसे वापरावे ?

              हे सॉफ्टवेअर सुरू केल्यानंतर खालील डाव्या बाजुला माउसचा कर्सर  नेल्यानंतर उभा व आडवा असे   दोन  अर्धपारदर्शक कंट्रोल बार दिसतील.
             यातील आडव्या बारवरील बटनांची माहिती क्रमाणे डावीकडून उजवीकडे खालील प्रमाणे.....
             १.  constellation lines- तारे रेषांनी जोडून नक्षत्रे दाणवते
             २.  constellation lables - नक्षत्रांची नावे,
             ३.  constellation Art - नक्षत्रांची कल्पना चित्रे
             ४.  Equatorial grid - अक्षांश रेखांश जाळी
             ५. Azimuth- Altitude - आकाशनिरीक्षकांसाठीचे स्थानदशर्क ( अझिमथ- उत्तर दिशेपासून  डोक्यावरील सर्वोच्च बिंदू (Zenith) ला जोडणारी रेषा 0 अंश मानून त्याचप्रकारे पूर्व-९० अंश, दक्षिण - १८० अंश, पश्चिम - २७० अंश व पुढे उत्तरेपर्यंत ३६० अंश. अल्टिट्युड-   क्षितीजापासून आकाशातील सर्वोच्च बिंदूपर्यंत ० ते ९० अंश अनुक्रमे)
             ६. Disable ground,  ७. Crdinal points(दिशा), ८. वातावरण(दिवसा बंद / चालू करण्यासाठी)  ९. Deep sky objects १०. गृहांची नावे , ११. दुर्बीण आडवी/ उभी फिरवण्यासाठी १२. Centre on selected object, १३. Night Mode , १४. कृत्रिम उपगृह , १५. / १६/१७/१८ - वेळेनुसार आकाश फिरण्यााची गती कमी जास्त करण्यासाठी १९. CLOSE- सॉफ्टवेअर बंद करण्यासाठी.
          
           उभ्या बारवरील बटने सेटींगशी संबंधित आहेत., ती अवश्य वापरून पहा ,अधिक  माहिती मिळेल. (    काही अडचण आल्यास Close वापरून सॉफ्टवेअर बंद करा व परत चालू करा पूर्ववत होइल.)
        डाउनलोड कसे करावे ?
        www.stellarium.org  या वेबसाइटवर जा.

        सुरूवातीला विविध ऑपरेटिंग सिस्टमची चिन्हे दिसतील (माहितीसाठी विंडोजची चिन्हे लाल वर्तुळाने    गोल केली आहेत) त्यातील तुमच्या ऑपरेटींग सिस्टीमवर क्लिक करा , डाउनलोड सुरू होइल 
हे सॉफ्टवेअर OFFLINE काम करते
साइज  १३२ एम. बी.
डाउनलोड झालेली फाइल Install करा.

       

        २. मायक्रोसॉफ्टचे  World Wide Telescope -

मायक्रोसॉफ्ट ने तयार केलेल्या या सॉफ्टवेअरचा यूझर इंटफेस Stellarium  पेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. यामध्ये सूर्यमालेची सफरच चांगल्या प्रकारे घडवता येते. यातील इमेजेसही उच्च प्रतिच्या व पहिल्या सॉफ्टवेअरपेक्षा जास्त्‍ा आहेत. यासोबत WWT Mars हे सॉफ्टवेअरही मोफत येते . गुगल अर्थ प्रमाणे मंगळ ग्रहाची संपर्ण सफर याद्वारे करता येते.
            १०५ एम. बी. चे हे सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी  http://www.worldwidetelescope.org/Download/ येथे क्लिक करा.
   
हे सॉफ्टवेअर ONLINE चालते.
     

No comments:

Post a Comment

आपली प्रतिक्रिया द्या .