Thursday, 21 January 2016

शैक्षणिक ग्रुपचर्चा ३६

[1/21, 6:18 PM] Mahesh Lokhande: 🔴 ग्रुपचर्चासत्र   ३६ 🔴
🌍 चर्चेचा विषय🌍
🔶विद्यार्थी शारीरिक व मानसिकदृष्ट्या निरोगी व सुदृढ बनण्यासाठी काय काय करता येईल?🔶
मुद्दे=१) शारीरिक आरोग्य
        २)मानसिक आरोग्य

🔶चर्चेस वेळ  दि. २१/१/२०१६   रात्री ९.३० ते१०.३०पर्यंत.🔶 सर्वांनी चर्चेत सहभागी व्हावे.🔵 आपले योगदान आमच्यासाठी अनमोल आहे.🙏🙏🙏🙏🙏🙏
[1/21, 9:36 PM] अरविंद गोळे: Aahar changla hava,tyahipeksha velevar hava
[1/21, 9:36 PM] सुलभा लाडमॅडम: Shririk Aarogya sathi chaqgla Aahar yogya Aarogya savai Mansik Aarogyasathi mulana dilyaJanarya sikshan var bandanghlne yogya thikani prlobhamancha vapor krne Mulanchya adiadchni saqjun ghene Tyanchya adchni smjun ghene
[1/21, 9:37 PM] अरविंद गोळे: Vatavaran changle have
[1/21, 9:44 PM] समीरअॅ: मनातील भिती घालविणे.आपुलकी निर्माण करणे.
[1/21, 9:45 PM] समीरअॅ: दप्तर ओझे कमी
शारीरिक शिक्षा बंद
आनंददायी शिक्षण
[1/21, 9:47 PM] Mahesh Lokhande: अरविंद गोळेसर अगदी बरोबर पण समतोल आहार असण्यासाठी आपण पालकांस काय सांगु शकतो.
[1/21, 9:47 PM] सुलभा लाडमॅडम: Salsala yekprkare ghr CATV As vatavran Asav
[1/21, 9:48 PM] Mahesh Lokhande: लाडमॅडम कोणत्या चांगल्या सवयी चांगल्या आरोग्यासाठी लाभदायक ठरतील.
[1/21, 9:49 PM] भालदारमॅडम ज्ञा: मुल शारीरिक दृष्ट्यानिरोगी असतील तरच बौद्धीक दृष्ट्या सक्षम असतात. मुलांना सुदृढ बनविण्या साठी  शाळापातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. यासाठी लहानसुट्टीत मुलांना शेंगदाणे गुळ असा छोटा डबाआणायला सांगावा. पूरक पोषण आहारात खजूर,राजगिरा लाडू,शेगदाणाचिक्की,काळे बेदाणे दिले तर मुलचा HBवाढण्यास मदत होते.मुलाच्या घरची परिस्थीती प्रथम जाणून घेण्यासाठी आई या विषया पासून सूरवात करणे गरजेचे आहे. मुलाला जवळ घेऊन विचारपूस केली असता मुल शिक्षकाशी जवळीकता साधते.
[1/21, 9:50 PM] सुलभा लाडमॅडम: Velevar zone velevar uthne yogya velijevan
[1/21, 9:50 PM] भालदार गोळेश्वर: Lahanpanapasun chhotya chhotya jababdarya sopawun balkanna  mansik drushtya saksham banwane...
[1/21, 9:52 PM] अरविंद गोळे: Mahesh sir samtol ahar ha tya tya mulachya gharchya paristitivar avlumbun asto pratekachi paristiti changli aselach ashi nahi pan saleya poshan ahar samtol asu sakto
[1/21, 9:52 PM] Mahesh Lokhande: सकस आहार स्वच्छता व प्रतिबंधक लसी मुलांचे तीन महत्वाचे शरीररक्षक आहेत.
[1/21, 9:52 PM] सुलभा लाडमॅडम: Chha n pine ghrat uplbdha Basel the khane Senga Gil etc
[1/21, 9:54 PM] अरविंद गोळे: School ne ek aharache velapatrak palkanna dyave jayala shakya asel te detil paristitinusar
[1/21, 9:55 PM] सुलभा लाडमॅडम: Mulachya Aarogyasathi ghrat svchata rakhne
[1/21, 9:56 PM] Mahesh Lokhande: दररोज अंघोळ
स्वच्छ कपडे
शौचविधीनंतर जेवणाआधी नंतर खेळल्यानंतर हात स्वच्छता
शौचालयाचा वापर
पायात पादत्राणे चप्पल बुट हवीत
दातांची स्वच्छता गोळ्या चाॅकलेट खाण्यावर प्रतिबंध
नखे वेळीच कापणे
[1/21, 9:57 PM] भालदार गोळेश्वर: Pratyek rutu madhe uplabdh honari fale(chinch,bore, fanas, ananas,Peru, draksh, kalingad, papai, etc) mulanna khanyas protsahit.karave.. Barech palak ajari padel ya bhitine hi fale  mulanna khau det nahi... Tyamule mothyapani ti fale khata yet nahit.. Nisargane bharbharun dile ahe tyacha aswad gheu de...tyamule mulanche arogy changlech rahil...pratikar shakti wadhel....
[1/21, 9:58 PM] Mahesh Lokhande: तोंडात अस्वच्छ वस्तु घालु न देणे
नखे कुरतडणे सवय घालवणे
पिण्यास स्वच्छ पाणी वापरणे
[1/21, 9:59 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: १)मनाने प्रसन्न असणारे विद्यार्थीच अध्ययनात मनापासून सहभागी होतात .२)यासाठी.भितीमूक्त,शिस्तप्रिय.मनोरंजक,अध्यापन फारच गरजेचे आहे..
[1/21, 10:00 PM] Mahesh Lokhande: नियमित वजन वाढणारे मूल नेहमीच सशक्त असते.मुलाचे वजन वाढत नसेल तर ते निरोगी नाही.
[1/21, 10:00 PM] सुलभा लाडमॅडम: Kahi mulana nkhe kurtdnyachi Savoy aste ti due karnyacha prayatn krne
[1/21, 10:00 PM] खोतसर ज्ञा: मुलांची आरोग्य तपासणी आठड्यातून करणे उदाहरण दात नखे गणवेश शारीरीक स्वच्छता इ पाहाणी करणे. दररोज हात स्वछ करणे. यागोष्टीतून आरोग्य तसेच मानसिक दृष्ट्या त्याला कमी पणा येईल असे बोलणे नसावे.
[1/21, 10:01 PM] उदय भंडारे: मानसिक आरोग्यासाठी रोज विपश्यना १० मिनिट तरी करावी.
[1/21, 10:02 PM] खोतसर ज्ञा: आनंददायी रहाणेसाठी योग शिक्षण घेणे.
[1/21, 10:02 PM] पळसेसाहेब: विद्यार्थ्यांच्या शारीरिक आरोग्य विकासासाठी सकस व दर्जेदार आहाराबरोबरच नियमित विविध प्रकारचे शारीरिक खेळ, हालचाली, कसरती व व्यायाम प्रकार घेणे गरजेचे आहे.
तसेच मानसिक आरोग्यासाठी योगासने, प्राणायाम, आनापान या सारख्या उपक्रमाबरोबर सकारात्मक विचार करणेची सवय लावणे तितकेच आवश्यक आहे.
[1/21, 10:02 PM] Mahesh Lokhande: मूल सशक्त आहे व त्याची योग्य वाढ होत आहे कसे समजावे?
दर महिन्याला त्याचा दंडाचा घेर मोजावा.
वजन वयोगटानुसार वाढत आहे का पहाणे
[1/21, 10:03 PM] देसाई गो. गोळेश्वर: काही  मुलांचे  पालक  व्यसनाधीन  असतात  अशापालकांचे  प्रबोधन  अशामुलांना  मानसीक  आधार  देणे
[1/21, 10:04 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: शारीरिक स्वास्थ्यासाठी नियमित व्यायाम मुले करतीलच असे नाही...यासाठी सर्व स्नायू बळकट होतील...असे खेळ शाळेतच दररोज घेता येतील..
[1/21, 10:05 PM] भालदार गोळेश्वर: Maidani khel gheun sangh ,ekjut, sahkary bhawna wadhis lagte... Roj maidani khel ghyave...sharirik v mansik arogyasathi....
[1/21, 10:07 PM] Mahesh Lokhande: शाळेच्या डब्यात पोळी भाकरी भाजी लाडू गूळ तूप पालेभाजीयुक्त थालीपीठ
नाचणी+दूध+गूळ याची वडी
उकडलेले अंडे पाव
कडधान्याची उसळ
डाळ शेंगदाणाचिक्की
असे पदार्थ हवेत.
[1/21, 10:08 PM] भालदार गोळेश्वर: Kodi, humaan,(evdhas kart-ghar kas rakht ...... shabdik khel gheun vicharas chlna dene...
[1/21, 10:09 PM] थोरात ond: बहुतेक मुलांच्या डब्यात बिस्किटे, कुरकुरे आढळतात यासाठी पालकांचे उद्बोधन करणे आवश्यक आहे.
[1/21, 10:10 PM] Mahesh Lokhande: कृश अंगकाठी, वजन कमी ,पोटाचा नगारा,हातापायाच्या काड्या, उदास खिन्न चेहरा वजन घट चामडीवर काळे डाग फोड दिसत असल्यास कुपोषित मुले समजुन पालकप्रबोधन करणे गरजेचे ठरते.
[1/21, 10:10 PM] खोतसर ज्ञा: शालेय पोषण आहारातर भाजीपाला घालून सकस आहार देणे.
[1/21, 10:12 PM] देसाई गो. गोळेश्वर: काही  मुले  शाळेत  येताना  खोड्या  काढतात  अशा  मुलांना  मार खावा  लागतो  काही  पालक आई  वडिल  मोठे  भाऊ  बहीण   वर्गातील  मुले  एखाद्याचा  दुबळेपणा  पाहून  मारतात  पालकपण  मारतआणून  शाळेत  सोडतात  अशाबाबींना  प्रतिबंध  करणे  महत्वाचे आहे
[1/21, 10:12 PM] Mahesh Lokhande: निरोगी नसणारी अशक्त मुले
वारंवार आजारी पडतात ताप सारखी सर्दी जंत विविध आजार दिसतात.
[1/21, 10:13 PM] भालदार गोळेश्वर: .mulanni khauchya paishatun khare.shengdane,chikki, futane chane..etc ghenyas sangave. ... Kurkure sarkhe padarth plastikcha wapar kela jato...ekda tyala jalun bagha ,tyacha plastic jalalyacha vas yeto... He dakhwa mulanna...
[1/21, 10:14 PM] थोरात ond: फलाहार हा कुपोषणावरील बेस्ट उपाय
[1/21, 10:17 PM] भालदार गोळेश्वर: Ghar kamat mulanni aai la wadilanna madat karavi...
[1/21, 10:18 PM] थोरात ond: प्रत्येक ऋतूत उपलब्ध असणारी फळे मुलांच्या आहातच येणे गरजेचे आहे.
[1/21, 10:18 PM] Mahesh Lokhande: मुलांचे खाण्यातील लोहाचे प्रमाण वाढवल्यास अॅनिमिआ बरा होईल.आहारात पालेभाज्या पावटे डाळी खारीक खजूर गूळ शेंगदाणे मटणपाव अंडी असे लोह असणारे पदार्थ द्यायला हवेत.
[1/21, 10:18 PM] खोतसर ज्ञा: बेकरीचे पदार्थ न खाण्याचा सल्ला देणे.
[1/21, 10:19 PM] थोरात ond: फायबर युक्त पदार्थ.
[1/21, 10:21 PM] देसाई गो. गोळेश्वर: बहुतांश  मुले  शेतकरी  कुटुंबातील  असतात  चहा  ऐवजी   दररोज  दुध  आणी  तेही   साखर  न  घालता  पिणेस  सांगावे
[1/21, 10:22 PM] Mahesh Lokhande: वजन न वाढणे वाढ न होणे चालणे बोलणे विचारशक्ती मंदावणे केस गळणे उदास निरुत्साहीवृत्ती सुज चामडीवर डाग हे सगळे कुपोषणाचे परिणाम आहेत.
[1/21, 10:22 PM] खोतसर ज्ञा: पालकानी मोड आलेल्या कडधान्ये  यांची उसळ खाण्यास द्यावी.
[1/21, 10:23 PM] Mahesh Lokhande: सकस आहार व स्वच्छता चांगल्या तब्येतीसाठी आवश्यक आहेत.
[1/21, 10:24 PM] भालदार गोळेश्वर: Pack food,Maggi sarkhe padarth maidyapasun banlele astat.... Te arogyas changle nahi... Cold drink chya aivaji limbu pani,sarbat, naralache pani, usacha ras. Ghyava....arogyas ghatak asnarya, khotya jahirati pahun bhulu naye..
[1/21, 10:26 PM] लीना वैद्यमॅडम: सगळ्यांशी मिळून मिसळून  वागणे  प्रसंगी दुसऱ्यांना मान देणे त्याचबरोबर समजूतदारपणा येण्यासाठी  योग्य  वेळी मार्गदर्शन  ही होणे आवश्यक  आहे नाहीतर असे नसल्यास मोठेपणी मूलांच वर्तन  दुसऱ्यांना अन् त्यास स्वतः स त्रासदायकच ठरु शकत... 🙏🏼
[1/21, 10:27 PM] Mahesh Lokhande: मुलांची तब्येत सुधारावी म्हणुन आपल्याकडे पुरेसे पैसे नसले तरीही सरबते बाटलीतील पेये बाहेरचे कुरकुरेसारखे प्लास्टिक पिशव्यांतील पदार्थ गोळ्या चाॅकलेट मुलांस देत असतो त्याऐवजी दोन अंडी दिली तर मोठा लाभ होईल हे पालकांस सांगायला हवे.
[1/21, 10:29 PM] Mahesh Lokhande: कमी खर्चात सकस आहार कसा असावा सांगायला हवे शाकाहारी प्रथिने खाऊनही सुदृढ व निरोगी बनता येते.
[1/21, 10:30 PM] भालदार गोळेश्वर: Mulansobat Sahkutumbane jewan karave...gharatil chote mote nirnay ghetana mulanche mat ghene...mulanchya matancha aadar karne. Khup mahtwache...
[1/21, 10:30 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: मुलांना सजा करू नये..तरीही केलीच तर त्याच्या मनातून लवकरच ती सजा पूसली जावी असा प्रयत्न व्हावा
[1/21, 10:31 PM] Mahesh Lokhande: कढईतील जेवणात लोह अंश वाढतो.साखरेपेक्षा गुळात लोह अधिक असते.करवंदे बोरे या फळांतुन क जीवनसत्व भरपुर मिळते.भाज्या कमी पाण्यात शिजवायला हव्यात.
[1/21, 10:32 PM] लीना वैद्यमॅडम: शारीरिक  वाढ जितकी आवश्यक  तशीच मानसिक वाढ म्हणजेच  विकास  आवश्यक  आहे त्यांना पराभव स्विकारायला  शिकविल पाहिजे  त्याचबरोबर त्यातून खेळाडूवृत्ती जपायला शिकवल पाहिजे  नेहमु माझच खर, मलाच हव, मीच योग्य  अस न करता त्यांना योग्य  अयोग्य  शिकवायला च हव....
[1/21, 10:33 PM] लीना वैद्यमॅडम: शारीरिक  वाढ जितकी आवश्यक  तशीच मानसिक वाढ म्हणजेच  विकास  आवश्यक  आहे त्यांना पराभव स्विकारायला  शिकविल पाहिजे  त्याचबरोबर त्यातून खेळाडूवृत्ती जपायला शिकवल पाहिजे  नेहमी माझच खर, मलाच हव, मीच योग्य  अस न करता त्यांना योग्य  अयोग्य  शिकवायला च हव....🙏🏼
[1/21, 10:34 PM] Mahesh Lokhande: मुलांना रोज उन्हात खेळण्यास लावले पाहिजे सुर्यप्रकाशाचा फायदा होतो.रोज खूप घाम येईपर्यंत खेळले पाहिजे.व्यायाम व रोज आठ तास झोप मेंदूसाठी खूप फायदेशीर ठरते रोज आठ ग्लास पाणी पिणेही गरजेचे आहे.
[1/21, 10:34 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: वर्गात मूलांना विशिष्ट नावे पाडू नयेत..उदा.कच्ची मूले,अप्रगत मुले..ढ..मुले.....याचा मनावर गंभीर परीणाम होतो
[1/21, 10:35 PM] Mahesh Lokhande: मुलांना शांत समंजसपणासाठी रोज त्राटक प्राणायाम आणापान विपश्यना शवासन स्वयंसुचनातंत्र यांचा वापर व्हायला हवा.
[1/21, 10:37 PM] खोतसर ज्ञा: शेतात पिकलेल्या शाळवाचा हुरडा व हरभरे भाजून खाणे. गाजर बिट मूळा खाणेस सांगणे.
[1/21, 10:38 PM] Mahesh Lokhande: मुलांची भावनिक बुध्दिमत्ता वाढणेसाठी त्यांचे मित्र होणे गरजेचे त्यांचा भावनिक विकास खूपच महत्वाचा आहे ताणतणावाचे समायोजन व समस्यानिराकरण कौशल्ये विकसित होत असताना सर्वांना समजुन घेणारी सर्वांची काळजी घेणारी मुले तयार व्हायला हवीत.
[1/21, 10:40 PM] लीना वैद्यमॅडम: एखाद्याचा भावनिक   विकास किती झालाय हा त्याच्या वर्तनावरुन कळत ...  जर मुले रस्त्यावरील कुत्र्याला  , पक्षी, प्राणी , व्यक्ती  यांना त्रास देत असेल  अशावेळी त्यांना  योग्य  मार्गदर्शन  मिळायलाच हव... माणुसकी ,दया, किंवा  संवेदनाशीलता या तत्वाची रुजवणूक लहान वयातच होणे गरजेचे आहे.. 🙏🏼
[1/21, 10:40 PM] Mahesh Lokhande: प्राणायामाने नाडीशुध्दता ह्रदयक्षमतावाढ रक्ताभिसरण चांगले होते.सर्व पेशींना भरपुर आॅक्सीजनपुरवठा होतो.प्राणायामाने एकाग्रता वाढते.याचा सराव हवा.
[1/21, 10:41 PM] उदय भंडारे: मुलांना शाळेत रोज किमान अर्धा तास खेळु द्यावे .
[1/21, 10:42 PM] Mahesh Lokhande: बुध्दीच्या निर्मळतेसाठी विपश्यना हवी आहे मनशुध्दीची साधना त्याचे पहिले पाऊल आनापान श्वासलक्षकेंद्रिकरण व मनस्थिरता एकाग्रतावाढीसाठी लाभदायक आहे.
[1/21, 10:43 PM] लीना वैद्यमॅडम: बोधपर कथा , गोष्टी , सुविचार यातून भावनिक विकास  करण्यास मदत करतात.. 🙏🏼
[1/21, 10:43 PM] हिलेमॅडम: आठवड्यातुन एकदा आरोग्य तपासणी  वर्गातील आरोग्य  मंत्री याच्यामार्फत नखे,डोळेे,केस युनिफॉम चेक करुण त्या आठवड्यातील राजकुमारी व् राजकुमार नेमावा मुले छान राहण्याचा प्रयत्न करतात.
[1/21, 10:43 PM] Mahesh Lokhande: त्राटकामुळे डोळेशुध्दी व एकाग्रतावाढ होते.
[1/21, 10:45 PM] हिलेमॅडम: किशोरविन् मुले व् मुलांसाठी आरोग्य विषयक शिबिरांचे आयोजन आवश्यक करावे
[1/21, 10:53 PM] Mahesh Lokhande: अरविंद गोळेसर,सुलभा लाडमॅडम,समीरसर,भालदारमॅडम,भालदारसर,रशीद तांबोळीसर,खोतसर,उदय भंडारेसर,आदरणीय पळसेसाहेब,शंकर देसाईसर,थोरातसर,लीना वैद्यमॅडम,हिलेमॅडम सर्वांचे आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
[1/21, 10:53 PM] थोरात ond: मुल्यसंवर्धनासाठिचे उपक्रम नियमित राबविल्यास भावनिक विकास निश्चित साधता येईल.

Wednesday, 20 January 2016

शैक्षणिक ग्रुपचर्चा ३५

[1/20, 10:11 AM] Mahesh Lokhande: 🔴 ग्रुपचर्चासत्र   ३५🔴
🌍 चर्चेचा विषय🌍
🔶मोबाईलचा शैक्षणिक कार्यात कसा उपयोग करता येईल?🔶
मुद्दे=१) मोबाईलचा शैक्षणिक उपयोग
        २) शिक्षक विद्यार्थी उपयोगी अॅप्स

🔶चर्चेस वेळ  दि. २०/१/२०१६   रात्री ९.३० ते१०.३०पर्यंत.🔶 सर्वांनी चर्चेत सहभागी व्हावे.🔵 आपले योगदान आमच्यासाठी अनमोल आहे.🙏🙏🙏🙏🙏🙏
[1/20, 9:23 PM] दिपक निगडे अॅ: बाराखडी app useful आहे.
[1/20, 9:24 PM] खोतसर ज्ञा: शैक्षणिक व्हिडीओ दाखविण्यासाठी उपयोगी योतो. शब्दाचा संग्रह म्हणी. कवितांच्या  चाली ऐकविता येतात.
[1/20, 9:24 PM] दिपक निगडे अॅ: Abc flash card for kids
[1/20, 9:25 PM] दिपक निगडे अॅ: Playschool toodler
[1/20, 9:26 PM] दिपक निगडे अॅ: मराठी पुस्तकालय
[1/20, 9:26 PM] खोतसर ज्ञा: इंग्रजी विषयासाठी प्रभावी साधन म्हणून उपयोगी आहे.
[1/20, 9:29 PM] सोमनाथ वाळके पारगाव: मित्रांनो आज आपण पाहुयात एक भन्नाट मोबाईल ॲप Anatomy4D
ऑगमेंटेड रिॲलिटी वर आधारीत हे ॲप मानवी शरीरातील विविध संस्था शिकवण्यासाठी अतिशय उपयुक्त व मनोरंजक आहे. आता ऑगमेंटेड रिॲलिटी हा शब्द ऐकला तर हे तंत्रज्ञान खूप खर्चिक असेल किंवा किचकट तरी असेल असे वाटेल पण या साठी आपल्याला आपल्या अँड्रॉईड फोन वर फक्त हे ॲप इन्स्टॉल करा. आणि वेबसाईट वर दिलेल्या मार्कर इमेज प्रिंट करुन घ्या. या इमेजेस आपल्याला ॲप मधूनही डाऊनलोड करता येतील.
आता कागद टेबल वर ठेवून ॲप सुरु करा त्यात कॅमेरा सुरु होईल. कॅमेऱ्या मधून मार्कर इमेज वर फोकस केले की लगेच आपल्याला फोन मध्ये मानवी शरीर 3 डी स्वरुवात दिसू लागेल. यात वेगवेगळया संस्था जसे, रक्ताभिसरण संस्था, चेता संस्था, इ. आपल्याला पाहता येतील. त्याचबरोबर हार्ट च्या मार्कर वर फोकसे केले तर मानवी हृदय अगदी धडकताना 3डी रुपात दिसेत . यातही हृदयाचे वेगवेगळे भाग पाहता येतील.
तेव्हा नक्की डाऊनलोड करुन पहाच
Anatomy4D या नावाने गुगल प्ले स्टोअर वर सर्च करा ...
Happy Learning.....

   अनिल सोनूने,
       जालना
MIE Expert
[1/20, 9:29 PM] दिपक निगडे अॅ: विविध Offline educational apps चा वापर
[1/20, 9:30 PM] Mahesh Lokhande: आॅफलाईन अॅप्सचा पालकांना मुलांचे अभ्यास घेण्यासाठी उपयोग होईल.
[1/20, 9:34 PM] समीरअॅ: मोबाईल चा वापर अध्ययन अध्यापनात फार करता येतो. मुलांना या साधनांची फार आवड असतो.कविता ,ABC,गणित,गोष्टी ,गाणी इ.वापर
तसेच आम्ही पालकांचा whatsapp ग्रुप तयार केला आहे त्याच्या मदतीने आम्ही मुलांना सूचना ,पाढे ,वाचन कार्ड,गोष्टी इ.पाठवून देतो.पालक आपला मोबाइल मुलांना देतात.
[1/20, 9:35 PM] खोतसर ज्ञा: मराठी म्हणी आधुनिक म्हणी. गणिती संकल्पना भूमितीय संकल्पना समजून घेणेसाठी पालक शिक्षक यांना उपयोगी येतो.
[1/20, 9:35 PM] Mahesh Lokhande: ATM हे अॅप Active Teacher Maharashtra group मधील सुनिल आलुरकर सरांनी बनवले.त्यामधुन इयत्यानिहाय उपक्रम विषयनिहाय उपक्रम वाचु शकता व तुमचे उपक्रम अपलोडही करु शकता.महाराष्ट्रातुन उपक्रमाचे संग्रह करणारे मराठीतील महाराष्ट्रातील पहिले डेटाबेस अॅप्स आहे.ATM टीमला अभिवादन.
[1/20, 9:38 PM] महाडीकमॅडम: English word meaning .spelling. And game.
[1/20, 9:41 PM] Mahesh Lokhande: बाराखडी २.० अॅप्स
बाराखडी अक्षरे बाराखडी शब्द शब्दांचा खजिना प्राणी पक्षी फुले फळे भाज्या वहाने रंग आकडे अक्षरे ओळखा चित्रे ओळखा शब्द ओळखा अशा गोष्टीनी भरलेले आहे.
[1/20, 9:41 PM] महाडीकमॅडम: badbadgit with dance.
[1/20, 9:42 PM] अमोल पैठणे बुलढाणा: बालाजी जाधव सरांचे शैक्षणिक अॅप
[1/20, 9:43 PM] Mahesh Lokhande: Animated Paint
पेन्टींगसाठी लहान मोठे अक्षरे शब्दलेखन व रंगाच्या पेन्सिल ब्रश विविध गोष्टींनी उपयुक्त आहे.
[1/20, 9:44 PM] सुनिता लोकरे: पाढे ऐकवणे
[1/20, 9:45 PM] खोतसर ज्ञा: 50फेमस बालगीते ऐकविता येतात.
[1/20, 9:45 PM] सुनिता लोकरे: कविता विविध विषयावरील भाषणे
[1/20, 9:46 PM] Mahesh Lokhande: बालाजी जाधवसरांनी १ तारखेस २०१६ सुरु होताच १६आॅफलाईन अॅप्सची  नववर्षाची  भेट दिली खुपच छान अॅप्स आहेत.मुलांचा सहभाग चित्रांचा वापर प्रश्नोत्तरे खुप छान अॅप्स आहेत बालाजी जाधव सरांसारखा हिरा सातारा जिल्ह्यात आहे.त्यांना अभिवादन.
[1/20, 9:50 PM] Mahesh Lokhande: मराठी किड्स अॅप
मराठी वर्णमाला मराठी बाराखडी मराठी महिने आठवड्याचे वार पक्षी रंग दिशा इंग्रजी वर्णमाला अंकओळख इंग्रजी महिने आकार प्राणी ॠतु  खेळ अशा गोष्टींचा सराव छान आहे.
[1/20, 9:50 PM] सुनिता लोकरे: फळे फुले भाज्या पक्षी प्राणी यांच्या व्हीडीओ नेट वरुन डाऊनलोड करुन दाखलता येतील
[1/20, 9:50 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: आपल्या मोबाईलवर टेलीव्हीजनचे उत्कृष्ट कार्यक्रम रेकाॅर्ड करून पून्हा शाळेत मुलांना दाखवता येतील!
[1/20, 9:51 PM] Mahesh Lokhande: मराठी Editor  tinkutara
रंगीत अक्षरांत लेखन करण्यासाठी अॅप्स आहे.
[1/20, 9:51 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: कॅल्क्यूलेटरचा वापर गणितासाठी..,संख्यावाचनासाठी होईल..
[1/20, 9:53 PM] Mahesh Lokhande: English app  culture alley
चे अॅप्स सहाय्याने इंग्रजी शिकण्यासाठी लेसन आहेत खूपच छान आहे.
[1/20, 9:57 PM] Mahesh Lokhande: eschool4u
खूप छान आहे.शैक्षणिक विडिओ ४थी ७ वी सर्व विषय आहेत शैक्षणिक घटक विडिओ रुपात पाहु शकतो.
[1/20, 9:57 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: मराठी.इंग्रजी.मराठी....अशी मोबाईल डिक्शनरी फारच उपयुक्त आहे..
[1/20, 9:58 PM] ‪+91 97620 24079‬: Crossword
[1/20, 9:58 PM] Mahesh Lokhande: Photo math
उदाहरणाचा फोटो काढला तरी उत्तर काढते.
[1/20, 9:59 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: शालेय उपक्रमांचे व कार्यक्रमाचे फोटो काढण्यासाठी मोबाईल वापरता येईल!!
[1/20, 9:59 PM] Mahesh Lokhande: yhomework
math solver आहे उदा लिहा मुलगा अॅपमधील उदा सोडवतो सर्व पायर्‍यानिशी असते.
[1/20, 10:01 PM] Mahesh Lokhande: Adarsh Raja
लक्ष्मण वाठोरे सरांनी केलेले आॅफलाईन अॅप शिवचरित्र असलेले खूपच छान व उपयुक्त आहे.
[1/20, 10:03 PM] Mahesh Lokhande: BookWriter
अॅप वापरुन पुस्तकलेखन व आॅनलाईन प्रकाशित करता येते.
[1/20, 10:05 PM] Mahesh Lokhande: Hindi Alphabets Reading &writing
letters uiz words writing and memorygame साठी छान पहिलीसाठी उपयुक्त आहे.
[1/20, 10:06 PM] सुनिता लोकरे: ग्रामपंचायत सार्वजनिक ठिकाणे यांचे व्हीडीओ तयार करून प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठीअध्यापनामध्ये उपयोग होवू शकतो
[1/20, 10:09 PM] बुरकुलेसर: Wikipedia warun mahiti milawata yeil
[1/20, 10:10 PM] Mahesh Lokhande: Hooked on phonics
khan academy easyaccess
kids word pronounce
know abacus
learn abc
learn marathi
marathi
make your own test
m1marathi
learn marathi for kids
learning kids abc phonics
Marathi
Marathi shbdkode
Marathi Balwadi
Math Animations
Math for children
[1/20, 10:10 PM] सुनिता लोकरे: वर्गातील चांगले आवाज असणाया मुलांच्या आवाजातील कविता रेकाँडींग करु शकतो
[1/20, 10:13 PM] सुनिता लोकरे: Video maker या अँप्समध्ये वर्गातील उपक्रमाची  p.p.t अथवा video तयार करु शकतो
[1/20, 10:15 PM] बुरकुलेसर: Correct pronouncietion che namune dhakhawta yeil
[1/20, 10:15 PM] Mahesh Lokhande: Math practice Test
Math Tilt
Math Tricks
MDM Calci
Mental Maths
My Childs Alphabet
panchatantra in Marathi
phonics spelling and sight words
picsart
preschool Alphabet ABC Flashcards and Puzzels
quizzer
slideshow Maker
std 1sopevachan
swar pahili
tantrasnehi
Teach Each
Teacher Gradebook
Teacher Plan lite
Teacher planner
varnamala Lite
[1/20, 10:18 PM] Mahesh Lokhande: varnmala
VivaVideo
wordGames
Words Challenge
अंक अक्षरांची बालदुनिया
जादुई शब्द
मनाचे श्लोक
[1/20, 10:21 PM] सुनिता लोकरे: एखादा पाठातील संवाद मुलांना ऐकवता येईल यामुळे संवादातील चढ उतार आरोह अवरो ह  व बरकावे  मुलांना चटकन समजतील
[1/20, 10:22 PM] Mahesh Lokhande: imath math practice
homework planner
know Abacus
Moviemaker
[1/20, 10:23 PM] उदय भंडारे: english to marathi
marathi to english
डिक्शनरीचा वापर करता येतो.
[1/20, 10:23 PM] सुनिता लोकरे: समुहगीत
प्रार्थना गीत
बालगीते
राष्ट्र गीत
प्रतिज्ञा ऐकवता येतील
[1/20, 10:23 PM] Pratiksha: छोट्या गोष्टी  मुलांना दाखवण्यात याव्यात बोधकथा मोबाईलवरून दाखवण्यात याव्यात
[1/20, 10:25 PM] उदय भंडारे: कविताच्या चाली ऐकवत येतात .
[1/20, 10:26 PM] खंदारेसाहेब: Chote chote video mobile warun mulana dhakhwanysathi Magnifing glass cha wapar karu shakato.
Tyamule screen mothi disate ani sarwana pahata yethe.
[1/20, 10:28 PM] Mahesh Lokhande: मॅग्नीफाईन ग्लास ३५० रु पर्यंत स्वस्त आणि मस्त आहे फक्त गटात वापरणेस खूप उपयुक्त.
[1/20, 10:29 PM] खंदारेसाहेब: Apalya shalanmadhe chote chote group ahet.
[1/20, 10:31 PM] खंदारेसाहेब: Flash cards cha video tayar karun words sentences wachnacha saraw karun gheta yeto.
[1/20, 10:32 PM] उदय भंडारे: मुलांच्या activities चा video करुन परत मुलांना दाखवावा .
मुलांना आनंद मिळतो.
चुका सुधारता येतात .
[1/20, 10:32 PM] Mahesh Lokhande: मोबाईल imo skype वापरुन व्हिडिओ काॅलिंग करुन आपण वेगवेगळ्या शाळाभेटी आपल्या मुलांस वर्गात बसुन घडवुन आणु शकतो.
[1/20, 10:35 PM] Mahesh Lokhande: 🙏खंदारेसाहेब अगदी ✔ आपणास ppt तुन विडिओनिर्मिती फोटोपासुन विडिओनिर्मिती सर्वांची कार्यशाळा व्हायला हवी सर्वजण शैक्षणिक विडिओ सहज करु शकतील🙏🙏
[1/20, 10:44 PM] Mahesh Lokhande: edudroid
shivaji&maratha Empaire
गडवाट
ABC handwriting Free
म्हणी
Kids and biology
Fun with dots
35pictures story for kids
my class shedule timetable
sky
olympiad
nassa app
indian currency game
math challenge
science game for kids
kelvin
kids gk test
science experiment with water
abacus
match and spell
animl planet
brain trainer special
chhota bhim
practice of conversation
planet space facts
fun easy learn english
first word
the four seasen
evo memo
1 std marathi
cursive lite
fun to science
colourful vitamins
hindi writing
junior science master
creative kids
marathi mulakshre
kids craft idea
Kidzoo
kids expriment
Sage kids
kids encyclopedia
forts of maharashtra
tricks maths
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
[1/20, 10:45 PM] उदय भंडारे: मोबाईलवरुन आपण ही शैक्षणिक ग्रुपचर्चा करीत आहे .
यात सहभागी होणार्‍यांना   यातुन अध्यापनातील समस्या मांडता येतात .
खुप चांगले मार्गदर्शन मिळते .
[1/20, 10:45 PM] उदय भंडारे: English speaking course ,  hallow English यासारखी apps मोबाईलवर घेऊ शकतो .
[1/20, 10:45 PM] उदय भंडारे: शैक्षणिक blogs वरुन कविता , ईशस्तवन , स्वागतगीत , वेगवेगळी  गीते download करुन घेऊ शकतो .
[1/20, 10:47 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: केवळ मोबाईल किंवा काॅम्प्युटरनेच शैक्षणिक सुधारणा होईल असे नाही...तर ही केवळ आधूनिक साधने आहेत याचे भान माञ सर्वच शिक्षकांना असायला हवे🙏
[1/20, 10:50 PM] Mahesh Lokhande: समीरसर,दिपक निगडेसर,खोतसर,सोमनाथ वाळकेसर,महाडीकमॅडम,अमोल पैठणेसर,सुनिता लोकरेमॅडम,सतीश कोळीसर,रशीद तांबोळीसर,प्रशांत अंबवडेसर,बुरकुलेसर,अरविंद गोळेसर,उदय भंडारेसर,प्रतिक्षा गायकवाडमॅडम,आदरणीय खंदारेसाहेब आपण ग्रुपचर्चेत सहभागी झालेबद्दल सर्वांचे आभार🙏🙏🙏🙏🙏

Tuesday, 19 January 2016

शैक्षणिक ग्रुपचर्चा ३४

[1/18, 11:19 PM] Mahesh Lokhande: 🔴 ग्रुपचर्चासत्र   ३४ 🔴
🌍 चर्चेचा विषय🌍
🔶विद्यार्थी शाळेत रमावेत म्हणुन शैक्षणिक आनंददायी वातावरण निर्मितीसाठी काय करता येईल?🔶
मुद्दे=१) वर्ग शालेय सजावट
        २) शालेय परिसर व आनंददायी शैक्षणिक वातावरण निर्मिती

🔶चर्चेस वेळ  दि. १९/१/२०१६   रात्री ९.३० ते१०.३०पर्यंत.🔶 सर्वांनी चर्चेत सहभागी व्हावे.🔵 आपले योगदान आमच्यासाठी अनमोल आहे.🙏🙏🙏🙏🙏🙏
[1/19, 9:36 PM] Pratiksha: वर्गाचा रंग मनाला प्रसन्न वाटणारा असावा.
[1/19, 9:37 PM] मानेmadamविजयनगर: वर्ग शाळेच्या बोलक्या भिंती
[1/19, 9:37 PM] Mahesh Lokhande: शाळेच्या पुढे खेळणी झोका,घसरगुंडी,सीसाॅ जंगलजीम यासारखी साधने मुलांस शाळेत येण्यास व दुपारी व शाळा सुटल्यावरही खेळण्यासाठी त्यांच्या आनंदासाठी लाभदायक ठरतात.
[1/19, 9:38 PM] उज्वला पाटील रेठरे: शाळेत जास्तीत जास्त शैक्षणिक साधने असावेत .
[1/19, 9:39 PM] चव्हाणसर ज्ञा: शाळेत सुंदर बाग असावी बागेमधे खेळणी असावित
[1/19, 9:39 PM] वायदंडे मॅडम: मुलां च स्वागत औक्षण गाणी गप्पा ... ऎसे उपक्रम घेवून त्याचं शालेंत मन रमवन
[1/19, 9:39 PM] मानेmadamविजयनगर: शालेय परिसरात भरपूर झाडे असावीत
[1/19, 9:40 PM] Mahesh Lokhande: शाळेवर छोटा भीम व  इतर कार्टुनची चित्रे असतील तर मुलांस आनंद होणार तेच त्यांचे त्यांना सध्या मित्र वाटतात.
[1/19, 9:40 PM] Pratiksha: वर्गातील साहित्य विद्यार्थी सहज हाताळतिल असे असावे.
[1/19, 9:40 PM] मानेmadamविजयनगर: खेळांची मैदाने आखलेली असावीत
[1/19, 9:41 PM] चव्हाणसर ज्ञा: शाळेत मुलांचे वाढदिवस साजरे करावे
[1/19, 9:43 PM] Mahesh Lokhande: शाळेपुढे बाग छोटे मंदिर व फुलांची फळांची झाडे मुलांस बागेत काम करायला मातीत खेळायला आवडते.बागेत वाहणारे पाटाचे पाणी खेळण्यास छान वाटते.
[1/19, 9:44 PM] चव्हाणसर ज्ञा: Vedio साधनांचा जास्तीतजास्त वापर  करावा
[1/19, 9:44 PM] उज्वला पाटील रेठरे: विद्यार्थ्यांना ज्या गोष्टीची आवड आहे.त्या गोष्टींना प्रथम स्थान द्यावे .
[1/19, 9:44 PM] Mahesh Lokhande: शाळेच्या भिंती सुंदर रंगानी रंगवलेल्या शाळेस छान कमान असेल तर मन प्रसन्न राहते.
[1/19, 9:44 PM] Pratiksha: शाळेच्या परिसरात विवीध चिञ काढलेली असावीत.
[1/19, 9:45 PM] देसाई गो. गोळेश्वर: खेळ  खेळण्यासाठी  साहित्य  लगोर हॅडबाॅल  रिंग  दोरऊड्या  कॅरम   बुध्दिबळ   असे  साहित्य  असावे
[1/19, 9:45 PM] मानेmadamविजयनगर: कागदकाम
[1/19, 9:45 PM] घनश्याम सोनवणे: साहित्य  निर्मितीवर  भर  द्यावा
[1/19, 9:46 PM] वायदंडे मॅडम: शालेतील वातावरण विद्यार्थी सोबत जिव्हाळ्या चे आपुलकीचे असावे
[1/19, 9:46 PM] उज्वला पाटील रेठरे: संगणकाची आवड असते .रोज संगणकावर बसणेची संधी द्या
[1/19, 9:46 PM] Mahesh Lokhande: शाळेतही शैक्षणिक खेळणी असावीत व सर्वांना वापरणेस खुली असावीत.
[1/19, 9:46 PM] सोमनाथ वाळके पारगाव: आमच्या शाळेत आम्ही तयार केलेली परसबाग आणि शालेय उद्यान तसेच पुस्तकबाग ही मुलांसाठी विरंगुळ्याची ठिकाणे ठरली आहेत. तसेच मुलांना खेळण्यासाठी भरपूर साहित्य आहे, व्हॉलीबॉल कबड्डी खोखो बॅडमिंटन कुस्ती जम्पिंग ट्रॅक अशी मैदाने सदैव तयार असतात. त्यामुळे मुले दिवसभर फ्रेश राहतात, आणि गैरहजेरीचे प्रमाण सुद्धा नगण्य आहे. या अनेक गोष्टीतून शैक्षणिक वातावरण तयार करता येते
[1/19, 9:47 PM] घनश्याम सोनवणे: वर्गात  जास्त  तक्ते  न लावता  मोजकेच  लावावे  असं  मला  वाटतं
[1/19, 9:47 PM] Mahesh Lokhande: शाळेत पट आखलेले वर्गरचना गटात शिक्षक ताई दादा वाटावेत स्नेही वाटावेत असे वातावरण हवे.
[1/19, 9:47 PM] मानेmadamविजयनगर: कागदकाम , मातकाम यासंबंधीचे उपक्रम घ्यावेत
[1/19, 9:47 PM] घावटेसर किवळ: दुपार नंतर रोज एक छान  गोष्ट  सांगावी.
[1/19, 9:48 PM] उज्वला पाटील रेठरे: साप शिडी.कँरम.बुद्धीबळ सारखे बेठे खेळ घेणे
[1/19, 9:48 PM] Pratiksha: वर्गाबाहेर वर्हाण्डात एखादा खेळ आखावा.
[1/19, 9:48 PM] सुनिता लोकरे: साहीत्यनिर्मिती करताना विद्यार्थीचा सहभाग घेतल्याने त्या वस्तू हाताळ ताना त्यांना वेळाचं आनंद मिळतो
[1/19, 9:50 PM] उज्वला पाटील रेठरे: बैठक व्यवस्था बदलत रहा.आकर्षक बैठक व्यवस्था करा.
[1/19, 9:50 PM] चव्हाणसर ज्ञा: ज्ञानरचनावादी पद्धतीचा वापर करावा
[1/19, 9:50 PM] Mahesh Lokhande: शाळेत घुंगुरकाठ्या ढोल फुटबाॅल पडघम साहित्य वादनासाठी शाळेत ठराविक वेळेत वाजविण्यासाठी खुले हवे.
[1/19, 9:51 PM] सुनिता लोकरे: स्मरणशक्तीवरील खेळ घ्यावेत यामुळे त्याचा शिकण्यातील आनंद वाढतो
[1/19, 9:51 PM] मानेmadamविजयनगर: गाणी कृतीयुक्त म्हणण्याची संधी देणे
[1/19, 9:51 PM] सोमनाथ वाळके पारगाव: वर्गाचे वातावरण सुद्धा आम्ही अतिशय प्रसन्न ठेवले आहे, वर्गात शैक्षणिक साहित्य नीटनेटके ठेवलेले असते त्यामुळे मुलांना दिवसभर प्रसन्न वाटते, वर्गात सकाळी सुगंधी अगरबत्ती वगैरे लावल्यास सुद्धा वातावरण मस्त आणि प्रसन्न राहते
[1/19, 9:51 PM] सुनिता लोकरे: संगीतप्रकारावर  पाढे
[1/19, 9:52 PM] घावटेसर किवळ: सापशिडी खेळ
[1/19, 9:52 PM] खोतसर ज्ञा: छोटीछोटी गोष्टीची पुस्तके भरपूर व वाचनिय असावित.
[1/19, 9:52 PM] मानेmadamविजयनगर: परिसरात घडलेल्या घटनांवर चर्चा करणे
[1/19, 9:52 PM] प्रदिप कांबळे लातुर: मूल स्वतः बोलक्या भिंती चा उपयोग करून घेतील  अशी रचना असावी
[1/19, 9:53 PM] Mahesh Lokhande: अगरबत्ती रांगोळी फलकलेखन मुलांस करण्यास खुले हवे.
[1/19, 9:53 PM] देसाई गो. गोळेश्वर: वार्ताफलकावर  आज  आपण  कोणताखेळ  खेळणार  कोणती  गोष्ट   सांगायची   वाढदिवस   कोणाचा  आजचा  कलाकार  असे लेखन सदर  असावे
[1/19, 9:54 PM] उज्वला पाटील रेठरे: विद्यार्थ्यांशीं घरातील गोष्टी बाबतीत चर्चा केली.तर शिक्षकांबददल आपले पणा वाढतो
[1/19, 9:54 PM] वायदंडे मॅडम: मुलां ना फळयावर गणित सोडविन्यास देने
[1/19, 9:54 PM] Mahesh Lokhande: शालेय सजावट कशाकशाने करतात. कशी करावी?
[1/19, 9:55 PM] मानेmadamविजयनगर: विविध फलक असावेत उदा. प्रदर्शन फलक
[1/19, 9:56 PM] ‪+91 97620 24079‬: Vegvegle 3d image kinva bhetcard
[1/19, 9:56 PM] खोतसर ज्ञा: शाळेत परिसरातील माहिती मिळविण्यासाठी व्यवसायीकांच्या भेटी घ्याव्यात.
[1/19, 9:56 PM] सुनिता लोकरे: एखादया दिवशी आपला वर्ग रिकाम्या परिसरात भरवावा म्हणजे क्रिडांगणात झाडाखाली यामुळे त्याचे मन प्रसंन्न राहते
[1/19, 9:56 PM] वायदंडे मॅडम: बोलक्या पताका ,असाव्यात
[1/19, 9:57 PM] प्रदिप कांबळे लातुर: बोलक्या भिंती मध्ये ज्ञानरचनावाद जास्तीत जास्त असावा जेणेकरून मूल स्वतः शिकतील
[1/19, 9:57 PM] Mahesh Lokhande: मुलांचे कार्य प्रदर्शित करणेस प्रदर्शित फलक व वाचण्यास प्रत्येकी २० पुस्तके एवढी गोष्टीची पुस्तके हवीत.
[1/19, 9:57 PM] सुनिता लोकरे: तरंगचित्रे
[1/19, 9:57 PM] उज्वला पाटील रेठरे: तरंग चित्र  .
[1/19, 9:58 PM] मानेmadamविजयनगर: शाळेत सर्व प्रकारच्या खेळांचे साहित्य असावे
[1/19, 9:58 PM] उज्वला पाटील रेठरे: विविध कोपरे उदा.कला .वाचन .शै.साधने इ.
[1/19, 9:59 PM] Mahesh Lokhande: लोकरेमॅडम झाडाखाली वर्ग बसवण्याची कल्पना छान👍👍
[1/19, 9:59 PM] ‪+91 97620 24079‬: 3d image sathi fakt newspaper madhil images chya sahyane pn banawu shakato...
[1/19, 10:00 PM] मानेmadamविजयनगर: झांज पथक लेझिम पथक असावे
[1/19, 10:00 PM] ‪+91 97620 24079‬: Ani mule pb interest in new kalpana mhanun swat enthusiastically participate hotat
[1/19, 10:00 PM] प्रदिप कांबळे लातुर: अध्ययन कोपरा वाचन कोपरा गणित कोपरा विज्ञान कोपरा
[1/19, 10:01 PM] Mahesh Lokhande: मानेमॅडम झांझपथक लेझीमपथक मल्लखांब 👌👌👌
[1/19, 10:01 PM] खोतसर ज्ञा: सर्वात महत्वाचे म्हणजे मुलांना मनमोकळेपणाने वावरण्यास मुभा द्यावी
[1/19, 10:03 PM] देसाई गो. गोळेश्वर: शालेय  सजावट  पताकांऐवजी  प्रत्येक  ओळीला  विद्यार्थी  नावे  प्राणी   पक्षी  समान  अर्थी   विरूध्दार्थी  शब्द  वारांची  मराठी  महिने ईग्रजी  महीने  नावे  लेखन  कार्डशिटवर  लिहून  असावी
[1/19, 10:04 PM] Mahesh Lokhande: वर्गात असणारे तक्तेही ज्ञानरचनावादाशी समर्पक नसतात व शाळेत प्रकाश कमी होतो असे वाटते.
[1/19, 10:07 PM] मानेmadamविजयनगर: आपल्या शाळांमधून विविध संगित वाद्यांचे आवडीनुसार शिक्षण मिळावे
[1/19, 10:10 PM] सुनिता लोकरे: एखादा दिवस असा घ्यावा कि दप्तराविना शाळा त्या दिवशी विद्यार्थ्याना गाणी गोष्ठी खेळ विविध कला नकला  उपक्रम घ्यावेत यामुळे त्याच्यातील सुप्त कलागुणांचा विकास होईल
[1/19, 10:10 PM] खोतसर ज्ञा: मुलाच्याबरोबर शिक्षकापेक्षा  आईचे प्रेम देवून बैठक व्यवस्था बद्दल करून त्याच्यात मिळूनमिसळन राहून त्याना आनंदी पाहिजे.
[1/19, 10:11 PM] लीना वैद्यमॅडम: एक/दोन वर्षापूर्वी  शाळेत बँच असणे ही अभिमानाची गोष्ट  असायची पण आता बँचची अडचण  होत आहे कारण वर्गात मुलांना  मोकळेपणानं  कृती करता येत नाही त्यासाठी वर्गात बँचची अशी रचना करावी [भिंतीला लागून] जेणेकरुन मुलांना  थोडीतरी मोकळी  जागा मिळावी..🙏🏼
[1/19, 10:15 PM] सुनिता लोकरे: माझ्या वर्गातील सजावट
[1/19, 10:15 PM] Mahesh Lokhande: मुलांना खेळ आवडतात मुलांस खेळ खेळायला मोठे क्रीडांगण हवे.
[1/19, 10:16 PM] मानेmadamविजयनगर: Christmas tree सारखे वर्गाबाहेरील मध्यम उंचीच्या झाडांना अक्षरकार्ड शब्दकार्ड चित्रकार्ड Faces इ. अडकवून ठेवणे
[1/19, 10:18 PM] सुनिता लोकरे: बोलका व्हारांडा
[1/19, 10:18 PM] मानेmadamविजयनगर: एरोबिक्स music वर घेणे.
[1/19, 10:20 PM] मानेmadamविजयनगर: नृत्य नाट्य स्पर्धा आयोजन
[1/19, 10:21 PM] सुनिता लोकरे: वादविवाद स्पर्धा
[1/19, 10:21 PM] Mahesh Lokhande: मुलांना शाळेत आनंद देणार्‍या बाबी कोणत्या ज्या अधिक करायला मुलांना सारख्या पुन्हा पुन्हा करायला आवडतात.
[1/19, 10:22 PM] वायदंडे मॅडम: स्नेहसमेलन आयोजन
[1/19, 10:23 PM] वायदंडे मॅडम: परिसर भेट ,सहली
[1/19, 10:23 PM] मानेmadamविजयनगर: मुलांना प्रश्नमंजुषा हा कार्यक्रम फार आवडतो
[1/19, 10:24 PM] सुनिता लोकरे: शालेय परिसरात वृक्षारोपन
[1/19, 10:24 PM] Mahesh Lokhande: परिसरभेटी
सहल
खेळ
स्पर्धा
रांगोळी
मातकाम
कागदकाम
प्रयोग
कृती
प्रात्यक्षिक
नाट्यीकरण
नृत्यसराव
गाणी
गोष्टी
नकला
[1/19, 10:25 PM] हिलेमॅडम: 1)विविध शैक्षणिक साधनाचा वापर
2)खेळातून उपक्रमातुन शिक्षण
3)स्वयंम अध्ययनातून रमणे
4) विद्यार्थयाच्या आवडीची बड़बड़गिताचा संग्रह
[1/19, 10:26 PM] खोतसर ज्ञा: गप्पागोष्टी कविता गायन करायला आवडतात.
[1/19, 10:27 PM] सुनिता लोकरे: संवाद सादरीकरण
[1/19, 10:28 PM] मानेmadamविजयनगर: मुलांनी केलेल्या कोणत्याही चांगल्या बाबीसाठी दाद म्हणून खाऊ देणे.उदा. फुटाणे,शेंगदाणे,खारीक,चिक्की इ.
[1/19, 10:29 PM] भालदारमॅडम ज्ञा: मुलांनां विचारून खाऊ निश्चीत केला तर मु
लांना जास्त आवडत
[1/19, 10:30 PM] सुनिता लोकरे: मनोरंजनात्मक खेळ
संगीत खुर्ची
लिंबू चमचा
[1/19, 10:31 PM] हिलेमॅडम: शाळेत प्रत्येक सण समारभ साजरे करावेत
[1/19, 10:32 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: १)शिक्षकाचे व्यक्तीमत्त्व उत्साही असावं२)कौटूंबीक घटनांचा पडसाद चेहर्‍यावर नसावे ३)मुलांना शिक्षक आवडले पाहीजेत..असे शिक्षकाचे स्वभाव विश्व असावे..४)कल्पकतेने दररोज खेळ..गाणी घेणारे शिक्षक असावेत.,५)वर्ग हा शाळा न वाटता..विद्या मंदीर वाटावे अशी सजावट असावी..,
[1/19, 10:33 PM] भालदारमॅडम ज्ञा: मु
लांना सहज सोपे पडेल अशा ठिकाणी साहत्याची मांडणी केली तर मुल आनंदा ने शिकतात.यासाठी मुलांच्या समोर फळ्याच्या खालच्या बाजूला साहिंॅॅत्य असावे.
[1/19, 10:36 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: शाळेतील फक्त तूमच्या वर्गालाच नाही तर संपूर्ण शाळेतील सर्वच वर्गातील..सर्व मूलांना व शिक्षकांना तूमचं व्यक्तीमत्व हव हवसं वाटाव..,.,
[1/19, 10:36 PM] भालदारमॅडम ज्ञा: 📈विविध गुण दर्शन कार्यक्रम
[1/19, 10:37 PM] हिलेमॅडम: 100%उपस्थिति व् दिवसभर वर्ग स्वच्छ ठेवणाऱ्या वर्गाला ध्वज प्रदान करणे हा उपक्रम घेता येईल
[1/19, 10:38 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: सर्व शाळेसाठी गाणे.खेळ,कवायत,लेझीम,व्यायाम,मनोरंजक खेळ.डान्स..असे उपक्रम सातत्याने घेतल्यास मूलांना शाळा फार आवडतेच आवडते
[1/19, 10:38 PM] भालदारमॅडम ज्ञा: शिक्षकांचा पोशाख हा साजेसा असावा
[1/19, 10:39 PM] भालदारमॅडम ज्ञा: स्वच्छ राजकुमार वराजकुमारी मुलांमधून निवडावी.
[1/19, 10:41 PM] भालदारमॅडम ज्ञा: मुलांनाकोणत्याही कामाची जबरदस्ती करू नये.
[1/19, 10:46 PM] समीरअॅ: वर्गसजावटीमुळे मुलांना शाळेची गोडी लागते .पारंपारिक  पध्दती पेक्षा रंगरंगोटी नसावी.
क्षमस्व उशीरा सहभाग
[1/19, 10:46 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: प्रत्येक शिक्षकाविषयी मुलांच्या मनात आदरयुक्त भिती..आणि मैञी असावीच
[1/19, 10:47 PM] समीरअॅ: शिक्षकांनी शाळा म्हणजे आपले घर माणले पाहिजे .मग बघा शाळा कशा बदलतात.
[1/19, 10:48 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: दररोज एखादी गोष्ट पूर्ण सांगायची.,,आणि दूसरी गोष्ट रोमांचक स्थितीत आणून ठेवायची.,राहीलेली कथा उद्या सांगतो असे केल्यासही मुले दूसर्‍यादिवशी गोष्टीची वाट नक्किच पाहतात!
[1/19, 10:50 PM] Mahesh Lokhande: प्रतीक्षा गायकवाडमॅडम,मानेमॅडम,घनश्याम सोनवणे,उज्वला पाटील,चव्हाणसर,वायदंडेमॅडम,शंकर देसाईसर,सोमनाथ वाळकेसर,वायदंडेमॅडम,घावटेसर,सुनिता लोकरेमॅडम,खोतसर,प्रदिप कांबळेसर,रशीद तांबोळीसर,प्रशांत अंबवडेसर,लीना वैद्यमॅडम,हिलेमॅडम,अरविंद गोळेसर,भालदारमॅडम,समीरसर
सर्वांचे आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏