Saturday, 2 January 2016

शैक्षणिक ग्रुपचर्चा १७

[1/2, 6:24 PM] Mahesh Lokhande: 🔴 ग्रुपचर्चासत्र   १७  🔴
🌍आजचा चर्चेचा विषय🌍
🔶 मूल्यशिक्षणासाठी (जीवनमूल्ये रुजविण्यासाठी) कोणते उपक्रम घेता येतील ? 🔶
मुद्दे=१)मूल्यशिक्षण गरज
          २) मूल्यशिक्षणासाठी उपक्रम
🔶चर्चेस वेळ आज दि.२/१/२०१६  रात्री ९.३०  ते १०.३०पर्यंत.🔶 सर्वांनी चर्चेत सहभागी व्हावे.🔵
[1/2, 9:23 PM] बागुलसर: 🌏मूल्यशिक्षणासाठी उपक्रम🌍
1⃣परिपाठात बोधकथा सांगणे.
2⃣दिनविशेष बद्दल अधिक माहिती देणे.
३.अध्यापनात पाठातून मूल्य सांगणे.
४.प्रसोंगोपात उपक्रमात मूल्यांची रूजवणूक.(उदा. जयंती, पुण्यतिथी.)
५.सामाजिक, शैक्षणिक,क्रीडा क्षेत्रात विशेष कामगीरी करणारया व्यक्तींची माहिती देणे.
............. . . .  .  .   .
[1/2, 9:26 PM] संदेमँडम शरद. गोळेश्वर: बालकाचे वाढदिवस साजरे करणे
शाळेत आजी आजोबा याचा मेळावा भरवणे
मुलगा मुलगी समान  वागणूक देणे
दोघाना समान कामाची वाटणी
[1/2, 9:27 PM] खोतसर ज्ञा: 1)शिबिर मेळावे 2)मुलाखती 3)गीतमंच 4)गटस्पर्धा 5)अभ्यासक्रम सहली 5)शालेय परि पाठ 6)प्रर्थना7)प्रतिज्ञा 8)चिंतन 9)मौन 10)अभ्यासपूरक कार्यक्रम                     ♦निसर्ग कविता, स्पूर्तिगीते यांचा संग्रह करणे. ♦कथाकथनातून परदुःखाची, येणार्य अडचणींची जाणिव करून घेणे. ♦थोर संत, समाजसेवक, क्रातिकारक यांच्या जीवनातील प्रेरक प्रसंग सांगणे. ♦नाट्यछटा♦प्रसंगनाट्य♦मूकनाट्य♦संवाद♦अभिनय गीते🌓अपंगशाळा♦अनाथाश्रम♦राष्टीय स्मारके♦प्रदर्शन♦वृदाश्रम♦सेवाभावी संस्था यांना भेटी देणे. ♦वर्तमानपत्रातील कात्रणे कापून वहीत चिटकवणे. ♦शेजारच्यांसंबधी माहिती गोळा करणे. ♦परिसरातील वृक्षाची ओळख करून घेणे.
[1/2, 9:30 PM] Mahesh Lokhande: प्रथम मूल्यशिक्षणाची गरज का आहे?
मूल्यशिक्षणाने काय होईल यावर चर्चा करुया.
[1/2, 9:31 PM] खोतसर ज्ञा: थोर व्यक्तीच्या जयंती वपुण्यथतिथी शाळेत साजरी करणे.
[1/2, 9:34 PM] खोतसर ज्ञा: संवेदनशिलता कमी झालेली आहे म्हणून.
[1/2, 9:36 PM] विकास माने: Sarv dharmiyanchya prthana ghene
[1/2, 9:37 PM] Mahesh Lokhande: महापुरुषांच्या जीवनातुन प्रेरणा मिळते.त्यांची आदर्श जीवनमूल्ये नवीन आयुष्याला दिशा देतात.
[1/2, 9:39 PM] अमोल पैठणे बुलढाणा: विवेकाने वागणारा सुजाण नागरिक होण्यासाठी, समाजातील दु:खी कष्टी लोकांचे दु:ख समजून घेऊन झटण्यासाठी, सर्व धर्माविषयी आदरभाव निर्माण करणे, स्त्रियांचा सम्मान करणे इ. साठी मूल्यशिक्षण आवश्यक आहे.
[1/2, 9:40 PM] हिलेमॅडम: किशोरवयिन मुलींचे मेळावे घेणे.विविध संस्कार शिबिरांचे आयोजन क्रय येईल.
[1/2, 9:46 PM] हिलेमॅडम: मूल्यशिक्षणाची गरज-मुलांमध्ये चागल्या संस्काराचि रुजवणुक व् मुलांमधील संवेदनशीलता जागृत करने काळाची गरज आहे.
[1/2, 9:49 PM] Mahesh Lokhande: मूल्यशिक्षणाची गरज
१)निरोगी व निरामय जीवन जगण्यासाठी मूल्यशिक्षण गरजेचे आहे
२)कुटुंबातील सर्वांशी आदरयुक्त जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित होण्यासाठी मूल्यशिक्षण गरजेचे आहे.
३)परिसराबद्दल प्रेम वाढण्यासाठी मूल्यशिक्षण गरजेचे आहे.
४) निसर्ग प्राणीमात्र व कलाकृती संरक्षण व जोपासना करण्याची भावना वाढण्यासाठी मूल्यशिक्षण गरजेचे आहे.
५)बंधुभावाची वाढ होणेसाठी मूल्यशिक्षण गरजेचे आहे.
६)सामाजिक बांधिलकी वाढण्यासाठी मूल्यशिक्षण गरजेचे आहे.
७)सर्वधर्मसहिष्णुता वाढीस लागणेसाठी मूल्यशिक्षण गरजेचे आहे.
८)सामाजिक एकता वाढण्यासाठी मूल्यशिक्षण गरजेचे आहे.
९)स्वतंत्र राष्ट्राचा नागरिक म्हणुन लोकशाही ,राष्ट्रीय एकात्मता वाढणेसाठी मूल्यशिक्षण गरजेचे आहे.
१०) राष्ट्रीय विकासासाठी मुल्यशिक्षण गरजेचे आहे.
[1/2, 9:50 PM] खोतसर ज्ञा: व्यक्तगत व सामाजिक जीवनाची जबाबदारी पेलू शकणारे नागरिक निर्माण करणेसाठी.
[1/2, 9:50 PM] खोतसर ज्ञा: वेगवेगळ्या धर्माचे सण, उत्सव साजरे करणे.
[1/2, 9:51 PM] Mahesh Lokhande: ११)चंगळवादी संस्कृती वाढत असताना मुल्यशिक्षणाची गरज आहे.
[1/2, 9:52 PM] Mahesh Lokhande: १२)प्रसारमाध्यमाच्या वाईट प्रभावापासुन व दुष्परिणामातुन पिढी वाचवण्यासाठी मूल्यशिक्षण गरजेचे आहे.
[1/2, 9:55 PM] जोशीसर: मूल्यशिक्षणाने लहान पणीच मूल्य रुजवाली जातात मूल्य नसलेले बालक वाईट मार्गला लागतात
[1/2, 10:03 PM] Mahesh Lokhande: १३)विश्वबंधुत्वाची भावना वाढीस लागावी म्हणुन मूल्यशिक्षण गरजेचे आहे.
१४)मानवी जीवनाला कल्याणकारी बनविण्यासाठी मूल्यशिक्षण गरजेचे आहे.
१५)वैयक्तिक व्यक्तीमत्वाच्या विकासासाठी मूल्यशिक्षण गरजेचे आहे.
१६)सामाजिक मूल्यांचे संस्कार होऊन सामाजिक विकासासाठी मूल्यशिक्षण गरजेचे आहे.
१७)राष्ट्रीय विकासास उपकारक गुणांच्या विकासासाठी मूल्यशिक्षण गरजेचे आहे.
१८)संवेदनशीलता वाढणेसाठी मूल्यशिक्षण
१९)नीटनेटकेपणा वाढणेसाठी मूल्यशिक्षण
२०)सौजन्यशीलता वाढण्यासाठी मूल्यशिक्षण
२१)वक्तशीरपणा वाढणेसाठी मूल्यशिक्षण
२२)श्रमप्रतिष्ठा  वाढणेसाठी मूल्यशिक्षण
२३)वैज्ञानिक दृष्टिकोन वाढणेसाठी मूल्यशिक्षण
२४)स्त्री पुरुष समानता वाढणेसाठी मूल्यशिक्षण
२५)सर्वधर्मसहिष्णुता वाढणेसाठी मूल्यशिक्षण
२६)राष्ट्रीय एकात्मता वाढणेसाठी मूल्यशिक्षण
२७)राष्ट्रभक्ती वाढीसाठी मूक्षल्यशिक्षण
२८)स्वावलंबन वाढीसाठी
२९)खिलाडुवृत्ती वाढीसाठी
३०)मानवतेच्या रक्षणासाठी मूल्यशिक्षण गरजेचे आहे.
[1/2, 10:04 PM] Mote Gondi: 🙏?

मूल्यशिक्षणाची गरज-
  १) तंत्र विज्ञृनाच्या विकासामुळे  नैतिक मूल्याचा ह्रास .
२) भौतीक सुधारनांचा सुयोग्य व संतुलीत वापर न झाल्यामुळे.
३)  बालमन हे संवेदनशील असते  म्हणुन 
४) मूल्यांचं  शिक्षण  अभ्यासक्रमाच्या माध्यमातुन  व्हावे म्हणुन.
५) अादर्श  नागरीक बनविणेसाठी.

६)  समाज  सुव्यवस्थीत चालणे साठी.
७) समाजातील अनिष्ट  चालीरितींना प्रतिकारासाठी.
८) संस्कृती  संवर्धनासाठी.
९) काळाची  गरज.
१०)  निरोगी  व्यक्तीमत्व राकारण्यासाठी.

      नितीन  मोटे  🙏?
[1/2, 10:05 PM] खोतसर ज्ञा: सुसंस्कृत विद्यार्थी घडविणेसाठी.
[1/2, 10:06 PM] Mahesh Lokhande: चला आता मूल्यांच्या रुजवणुकीसाठी कोणते उपक्रम घ्यावेत यावर चर्चा करुया.
[1/2, 10:07 PM] Mahesh Lokhande: संवेदनशीलता कशी रुजवता येईल?
[1/2, 10:08 PM] Mahesh Lokhande: आपण जे बोलतो वागतो त्याचा इतरांवर काय परिणाम होतो हे कळण्यासाठी,इतरांचे दुःख लक्षात येण्यासाठी काय करावे?
[1/2, 10:10 PM] Mote Gondi: वृद्धाश्रम,अपंगाच्या कार्यशाळा,अनाथाल येपुनर्वसन केंद्र,अशासेवाभावि संस्थांना भेटी देणेतूथील कार्यपद्धती समजावून घेणे -  संवेदनशीलता
[1/2, 10:10 PM] Mahesh Lokhande: आजुबाजुचा प्रसंग त्यातील बरे वाईट ओळखुन सकारात्मक प्रतिक्रिया देणारी व्यक्ती संवेदनशील असते.
[1/2, 10:12 PM] Mote Gondi: झोपडपट्या अदीवाशी दुर्गम  भागांना भेटी देणे.
[1/2, 10:12 PM] Mahesh Lokhande: मुले कधी आनंदात कधी उदास असतात समजुन घ्यायला हवे गप्पा मारुन मनमोकळे करायला हवे.
[1/2, 10:13 PM] Mahesh Lokhande: आजारी मित्रास पहायला जाणे
मित्राच्या वाढदिवसास जाणे
हे सुखदुःखात सहभागी होणेच आहे.
[1/2, 10:13 PM] Mote Gondi: वृक्षतोड ,जंगलतोड थबविण्याचे अावाहान करणे.
[1/2, 10:14 PM] Mahesh Lokhande: संवेदनशीलता विकासासाठी श्यामची आई पुस्तकाचे वाचन घ्यायला हवे.
[1/2, 10:15 PM] Mote Gondi: रूग्नांना भेटणे त्यांना गोष्टी वाचुन दाखविणे.
[1/2, 10:16 PM] Mote Gondi: अंधश्रृद्धा निर्मूलनाचे कार्यक्रम घेणे.
[1/2, 10:16 PM] Mahesh Lokhande: अंधअपंगास मदत,घरात मोठ्यांना मदत,मित्रांस मदत,आजी आजोबांस मदत.
[1/2, 10:17 PM] Mahesh Lokhande: वक्तशीरपणा वाढणेसाठी काय उपक्रम घ्यावेत?
[1/2, 10:17 PM] Mote Gondi: प्राणी  मात्रावर दया.
[1/2, 10:18 PM] Mahesh Lokhande: वेळापत्रकानुसार कामकाज
वेळच्यावेळी कामे करण्याची सवय लावणे .
[1/2, 10:19 PM] विकास माने: Manvatavad
Samata
Vastavad
Vaidnyanik drushtikon
Ya sankalpana spasht karne
Garjeche ahe
[1/2, 10:19 PM] Mote Gondi: वक्तशुरपणा वाढणेसाठी वेळेवर उपस्थीत राहण्याचा प्रयत्न करणे.
[1/2, 10:19 PM] Mahesh Lokhande: नीटनीटकेपणा वाढीसाठी कोणते उपक्रम घेता येतील?
[1/2, 10:21 PM] Mahesh Lokhande: स्वतःची राहणी,घरातील वस्तुंची मांडणी,कामाची पदधत,सर्व वस्तु जागच्या जागी ठेवण्याची सवय लावणे.स्वच्छता टापटीप सवय.
[1/2, 10:22 PM] Mote Gondi: फलकावर वक्तशीरपणाचे महत्व सांगणारे विचार ,काव्यक्ती लीिहण उदा.
एक टाका वेळेवर घालाल तर नऊ टाके वाचतील .
[1/2, 10:22 PM] Mahesh Lokhande: वैज्ञानिक दृष्टीकोन विकासासाठी उपक्रम सुचवा.
[1/2, 10:22 PM] विकास माने: Smart & shrap work
[1/2, 10:23 PM] Mahesh Lokhande: आजुबाजुच्या घडणार्‍या घटनांचा कार्यकारणभाव अचुक समजुन घेऊन योग्य कृती करणे.
[1/2, 10:23 PM] Mahesh Lokhande: अंधश्रदधा,गैरसमजुती काढुन टाकणे.
[1/2, 10:24 PM] विकास माने: Nirkshan nodvane
[1/2, 10:24 PM] Mahesh Lokhande: सौजन्यशीलता वाढणेसाठी कोणते उपक्रम घ्यावेत
[1/2, 10:25 PM] Mahesh Lokhande: स्वार्थी व इतरांविषयी बेफिकीरवृत्ती घालवणेसाठी काय करावे
[1/2, 10:25 PM] Mote Gondi: पर्यावरण दिन,वृक्षदिंडी ,व्यसनमुक्ती,अाकाशमंडल निरीक्षण,पक्षी निरीक्षण,विज्ञानजट्रा ,उद्दोगधंद्यांना भेटी ,औषधी वनस्पती ,हभानान अंदाज इत्यदी
[1/2, 10:25 PM] थोरात ond: प्रत्येक गोष्टीमागची कारणे  प्रयोगातून दाखवणे.
[1/2, 10:27 PM] थोरात ond: संस्कार कथा प्रोजेक्टरवर दाखवणे.
[1/2, 10:27 PM] Mote Gondi: सातत्याने जाणिव करून देणे व परिवर्तनाचा प्रयत्न करणे.
[1/2, 10:27 PM] Mahesh Lokhande: एकमेकापासुन दुरावा न वाढता मने जोडली जावीत स्नेह आनंद वाढणेसाठी खुप मित्र मिळणेसाठी आचार विचार कृती प्रतीसादातुन इतरांबददल सदभाव,न दुखवण्याचा व्यवहार घडायला हवा.
[1/2, 10:28 PM] Mahesh Lokhande: स्त्री पुरुष समानतेसाठी उपक्रम सुचवा
[1/2, 10:29 PM] Mote Gondi: 🙏?

मूल्यशिक्षणासाठी उपक्रम

१) दैनंदिन परिपाठ -
२) शालेय सफाई-
३) दैनंदिन माहिती फलकाचे लेखन-
४) शिक्षक  विद्यार्थी बेठक व्यवस्था-
५) सामूहिक राष्र्टगीत -
६) शालेय प्रार्थनेतील दहा मुद्दे-
७) वैयक्तीक  स्वच्छता पाहणी.-
८)वाढदिवस शुभचिंतन-
९)प्रश्नावली-
१०)  अभिप्राय -
———————————
१०— नीती मूल्ये शाॅर्टफाॅर्म अाठवनीत ठेवने साठी -
श्र-व -सौ -रा -रा -स्रि- वै- नी- स -सं  )

वरिल मूल्यांसाठी प्रत्येकी एक उपक्रम पुढील प्रमाने 

१) श्रमसंस्कार शिबीर घेणे.
२) बालवीर - वीरबाला पथके स्थापन करणे.
३) स्री -पुरूषांचे( मुला-मुलींचे) जनजागर मेळावे घेणे.
४) प्रत्येक  जाती धर्माच्या विशिष्ट संस्कृतीची ओळख करूण देणे .
५) राज्यवार वेशभूषा करूण बाहूली नाट्य ,संवाद सादर करणे.
६)  दैनंदिन विज्ञानाची सजीव निर्जिव निंसर्ग ओळख अनुभव देणे.
७) वन्यजीव सप्ताह साजरा करणे.संस्कार शिबिरे घेणे.
८) पत्र -मैत्री प्रकल्प राबविणे.
९) स्व - दिनचर्या वेळापत्रक करूण  तंतोतंत  कार्य करणे .
१०) नीटनेटकेपणामुळे सौंदर्यदृष्टी येते यासाठी नियमात जानीवपूर्वक  दक्ष राहणे

🙏?
  नितीन मोटे
[1/2, 10:29 PM] उदय भंडारे: एकत्र बैठक व्यवस्था
[1/2, 10:29 PM] Mahesh Lokhande: समान काम
समान संधी
समान दर्जा
समान आहार
मुलामुलीत भेदभाव नको.
समान हक्क अधिकार
[1/2, 10:29 PM] थोरात ond: परिपाठ. .मुलामुलींना समान संधी देणे.
[1/2, 10:30 PM] उदय भंडारे: सर्व कामाची समान विभागणी
[1/2, 10:30 PM] Mahesh Lokhande: श्रमप्रतिष्ठा वाढीसाठी उपक्रम सुचवा
[1/2, 10:30 PM] विकास माने: Shramdan
[1/2, 10:31 PM] उदय भंडारे: हे काम मुलाचे , हे मुलीचे असा भेदाभेद नको .
[1/2, 10:31 PM] Mahesh Lokhande: कोणत्याही कामाची लाज वाटु नये शारीरिक काम हलके समजु नये सर्व कामे उत्साहाने करावी
[1/2, 10:31 PM] थोरात ond: ओढ्यावर विद्यार्थ्यांचे सहकार्याने छोटे बंधारे बांधणे
[1/2, 10:31 PM] उदय भंडारे: बागकाम
[1/2, 10:32 PM] उदय भंडारे: शालेय स्वच्छता
[1/2, 10:32 PM] Mahesh Lokhande: श्रमिकांबददल आदर वाढावा.त्यांचा मान राखावा.
[1/2, 10:32 PM] Mahesh Lokhande: सर्वधर्मसहिष्णुतेसाठी उपक्रम सुचवा.
[1/2, 10:32 PM] उदय भंडारे: स्चावलंबन
[1/2, 10:32 PM] खोतसर ज्ञा: मोठ्याचा मान राखणे
[1/2, 10:33 PM] Mote Gondi: मुलींसाठी मुलांच्या

मुलांसाठी मुलींच्या
कामाच्या स्पर्धाअायोजित करणे .
स्री-पुरूष समानते साठी  त्यानुळे कामाचे महत्त्व कळेल व एकमेकाचा अादर राखला जाईल.
[1/2, 10:34 PM] Mahesh Lokhande: सर्व धर्मशिकवणुकींचा आदर,
शिकवणुकींचा संग्रह
सणसाजरे करणे
[1/2, 10:34 PM] Mahesh Lokhande: राष्ट्रभक्तीसाठी उपक्रम सुचवा
[1/2, 10:34 PM] उदय भंडारे: सर्व धर्मातील सण साजरे करणे .
सणाचे महत्च सांगणे
[1/2, 10:35 PM] खोतसर ज्ञा: वेगवेगळ्या सणाच्या वेळी भेटी देणे.
[1/2, 10:35 PM] उदय भंडारे: सर्व धर्मातील समान तत्व सांगणे .
[1/2, 10:35 PM] Mote Gondi: राष्र्टभक्ती वरील चित्रपट
[1/2, 10:36 PM] खोतसर ज्ञा: भेदभाव न ठेवणे
[1/2, 10:36 PM] उदय भंडारे: माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म हे समजावुन देणे
[1/2, 10:36 PM] Mahesh Lokhande: देश,समाज,संस्कृती,चालीरीती,परंपरा,इतिहास,भाषा,राष्ट्रीय प्रतिके,सण,उत्सव,दूशबांधव,निसर्ग यांचा अभिमान प्रेम.
[1/2, 10:36 PM] थोरात ond: सांस्कृतिक कार्यक्रमातून देशभक्तीपर गितांचे सादरीकरण
[1/2, 10:36 PM] Mote Gondi: वस्तु ,वास्तू ,शिल्य चित्र प्रदर्शण भरविणे.
[1/2, 10:36 PM] Mahesh Lokhande: समुहगीते स्फुर्तीगीते देशभक्तीपरगीते
[1/2, 10:37 PM] Mahesh Lokhande: राष्ट्रीय एकात्मता विकासासाठी उपक्रम सुचवा.
[1/2, 10:37 PM] उदय भंडारे: माजी सैनिकांची मुलाखत घेणे .
[1/2, 10:37 PM] Mote Gondi: देशभावना निर्मान करनार्या नाटीका घेणे.
[1/2, 10:38 PM] खोतसर ज्ञा: ग्रथ प्रदर्शन भरवणे
[1/2, 10:38 PM] उदय भंडारे: देशभक्तीपर गाणी
[1/2, 10:39 PM] Mote Gondi: राष्र्टमहिमा सांगणारे पोवडे ,गाणी,सनरगीते ध्वनिक्षेपकावा ऐकविणे.
[1/2, 10:39 PM] उदय भंडारे: विविध धर्मीय वेशभुषा करणे
[1/2, 10:39 PM] थोरात ond: सैनिक कवायत, विजयदिवस समारोह भेट.
[1/2, 10:39 PM] खोतसर ज्ञा: देशभक्तीपर चित्रपट दाखविणे.
[1/2, 10:40 PM] Mote Gondi: कांतिकारकची कात्रणे संग्रह .
[1/2, 10:40 PM] Mahesh Lokhande: धर्मवंश,चालीरीती,आहारविहार,कला,संस्कृती,क्रीडा,सण उत्सव,भौगोलिक परिस्थिती वेगळेपणा व अस्मिता राष्ट्रीय मानचिन्ह आदर,भावनिक एकसंघ कृतीशील धागा राष्ट्रीय एकात्मता.
[1/2, 10:40 PM] उदय भंडारे: थोर पुरुषांच्या चरित्राचा परिचय
[1/2, 10:42 PM] थोरात ond: मिलिट्री व्हिडिओ चित्रीकरण . देशभक्तीपर चित्रपट दाखवणे
[1/2, 10:42 PM] Mote Gondi: भारताच्या प्राचीण परंपरा ,संस्कृती,वाडमय,साहित्य कला विज्ञान इ.क्षेत्रातील प्रगतीविषयी माहिती जमा करणे त्याचे सामूहिक प्रकट वाचन घेणे.
[1/2, 10:44 PM] खोतसर ज्ञा: कबबुलबुल व स्काउट गाईड यामाध्यमातून प्रेरणा देणे
[1/2, 10:50 PM] थोरात ond: किल्ले, ऐतिहासिक वास्तू भेटी किंवा माहिती सांगणे, चित्रफित दाखवणे
[1/2, 10:56 PM] Mahesh Lokhande: 🔵उपक्रम🔵
🌸श्रमप्रतिष्ठा🌸
१)वृक्षारोपण
२)वर्ग परिसर स्वच्छता
३)सफाई ही देवपुजा
४)सफाईपत्रक
५)स्वच्छतादूत

🔶राष्ट्रभक्ती🔶
१)संविधान
२)प्रतिज्ञा
३)राष्ट्रीय सण
४)राष्ट्रपुरुष जयंत्या
५)राष्ट्रभक्ती कथा
६)देशभक्तांच्या कथा

🔶स्त्री पुरुष समानता🔶
१)वर्ग व शालेय मंत्रीमंडळ
२)कर्तबगार स्त्रिया परिचय
३)नेतृत्व संधी
४)सर्वांना समान संधी मत्रीमंडळात ५०% मुली,परिपाठ सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धात सर्वत्र समान संधी.

🔶सर्व धर्मसहिष्णुता🔶
१)सर्व धर्मीयांचे सण
२)सर्व धर्मपरिचय
३)नीतीवचनांचा संग्रह
४)सर्वधर्मवही
५)सर्वधर्ममित्र

🔶राष्ट्रीय एकात्मता🔶
१)बोलीभाषा
२)भौगोलिक विविधता
३)लोकजीवन संस्कृती
४)एकात्मतेची गीते
५)समुहगायननृत्य
६)गीतमंच वाद्यवृंद

🔶वैज्ञानिक दृष्टीकोन🔶
१)अंधश्रदधा
२)निसर्गरक्षणसंवर्धन
३)विज्ञानतंत्रज्ञान
४)विज्ञानकथा
५)विज्ञानगमती
६)प्रयोग
७)विज्ञानखेळ
८)विज्ञानखेळणी
९)टाकाऊतुन टिकाऊ
१०)परसबाग
११)खतखडडा

🔶संवेदनशीलता🔶
१)कुटुंबातील घटना
२)शेजारील घटना
३)समाजातील घटना
४)शाळेतील घटना
५)पर्यावरणविषयक

🔶संवेदनशीलता🔶
६)वर्गमित्र
सौजन्यशीलता
१)कुटुंबातील वर्तन
२)वडिलधार्‍यांशी वर्तन
३)शिक्षकांसोबत वर्तन
४)समाजाशी वर्तन
५)तंटामुक्त शाळा
६)शिवीमुक्त शाळा
७)ताई दादा
८)तंटामुक्त वर्ग
९)शाळा तंटामुक्त समिती
१०)शालेय तक्रार निवारण मंच

🔶वक्तशीरपणा🔶
१)कामाचे नियोजन
२)उपस्थिती
३)अभ्यासवेळ
४)हाजीर तो वजीर
५)उपस्थिती ध्वज

🔶नीटनेटकेपणा🔶
१)पोशाख
२)स्वच्छता
३)गणवेश स्वच्छता
४)गृहकार्य
५)सुंदर वर्ग
[1/2, 11:00 PM] Mahesh Lokhande: बागुलसर,संदेमॅडम,खोतसर,विकास मानेसर,अमोलसर,हिलेमॅडम,जोशीसर,मोटेसर,थोरातसर,भंडारेसर,सोनवणेसर सर्वांचे खुप खुप आभार🙏🙏🙏🙏🙏🙏

Friday, 1 January 2016

शैक्षणिक ग्रुपचर्चा १६

[1/1, 9:30 PM] Mahesh Lokhande: 🔴 ग्रुपचर्चासत्र   १६  🔴
🌍आजचा चर्चेचा विषय🌍
🔶 कला विषयासाठी कोणते उपक्रम घेता येतील ? 🔶
मुद्दे=१) कलाविषयक उपक्रम
          २) पारंपारिक खेळ (मागील चर्चेत कमी वेळ मिळाल्याने पुन्हा)
🔶चर्चेस वेळ आज दि.१/१/२०१६  रात्री ९.३०  ते १०.३०पर्यंत.🔶 सर्वांनी चर्चेत सहभागी व्हावे.🔵
[1/1, 9:30 PM] खोतसर ज्ञा: 1)कागदाच्या सोप्या वस्तू तयार करणे. 2)व्यंगचित्र संग्रह करणे 3)नृत्यातील हस्तमुद्र करणे
[1/1, 9:31 PM] सुलभा लाडमॅडम: Pripathat prarthna smuhgit suvichar kthakthn  natikran sadrikran   2-lghuudyogana bheti  karyanubhvatil vividh upkrm vrg sushobhikran
[1/1, 9:33 PM] Mahesh Lokhande: पारंपारिक खेळ
१) दगड का माती =राज्य घेणारास विचिरणे दगड की माती. तो माती म्हणाला.तर मातीशी स्पर्श होणारास शिवुन तो बाद करेल.इतर त्याला चकवत दगडावर कधी मातीवर उभे राहतील.बाद होणारावर राज्य.
२)सुरपारंब्या=रेषेवर मुले रेषेवर थांबतील एकजण दीडफुटी काठी (सुर)पायातुन लांब फेकेल.राज्य घेणारा सुर आणणेस जाईल.इतर झाडावर चढतील.सुर आणुन तो शिवण्यासाठी जाईल तेव्हा पारंब्यावरुन उतरुन सुर शिवेल मग पुन्हा त्याच्यावर राज्य पण सुर शिवण्यापुर्वी शिवल्यास त्याच्यावर राज्य येईल.
३)विटीदांडू=एकाने खाचेवरील विटी दांडूने कोलवल्यावर इतरांनी हवेत झेलल्यास कोलवणारा बाद.दुसरा कोलवण्यास तर पहिला क्षेत्ररक्षणास जाईल.विटी झेलली नाही तर तेथुन गलीवर विटी टाकावी एक दांडू अंतरात विटी गलीपासुन असल्यास कोलवणारा बाद.एक दांडूपेक्षा दूर विटी असल्यास विटीच्या टोकावर दांडू मारुन ती उडवुन टोलवावी.इतरांनी झेलल्यास टोलवणारा बाद.नाही तर टोलवलेल्या जागेपासुन दांडू गलीपर्यंत अंतर मोजावे.बाद होईपर्यंत तो कोलवणे व विटी टोलवणे करेल.
[1/1, 9:33 PM] सुलभा लाडमॅडम: Nkla sanvadanche vachn
[1/1, 9:34 PM] Mahesh Lokhande: ४)काठ्यापाणी=राज्य घेणारा पाठमोरा काठी हातात वर धरुन थांबेल इतरांनी मागुन काठीने काठी उडवुन काठीने काठी उडवत न्यावी काठी टोलवत असताना राज्य घेणाराने शिवावे.शिवल्यास टोलवणार्‍यावर राज्य.
५)काठ्यापाणी२=सर्वांनी रेषेवरुन काठ्या सरपटत सोडणे मागे काठी राहणारावर राज्य त्याची काठी सर्वजन उडवत नेतील व तो काठी उ
वणारास शिवेल.
६)टिकरीपाणी=(जिबली) २ओळीत ८ फरशीवर चौकोन आखुन १क्रमांकाने टिकरी(फरशीचा,दगडाचा चपटा तुकडा १घरात टाकुन १पायाने टिकरी बाहेर काढणे नंतर २,३,४...घरात टाकावी लंगडीने घरात जाऊन पायाने बाहेर काढणे पाय चौकोन रेषांस लागता कामा नये.टिकरी रेषेवर पडता कामा नये.लंगडउडीचा पाय टिकरीवर पडला पाहिजे.सर्व घरातुन टिकरी काढल्यानंतर मुकी बोली विचारुन डोक्यावर टिकरी ठेवुन सांगतील ते घर पार करणे.नंतर हाती पायी विचारुन हाती सांगता हाताने टिकरी बाहेर काढणे.डोक्यावरुन टिकरी घरात टाकणे.व घर जिंकुन घेणे.मालकीचे करणे.इतरांना घरात बंदी.
[1/1, 9:34 PM] सुलभा लाडमॅडम: Kagd kam later kam ptaka tyar krne
[1/1, 9:34 PM] खोतसर ज्ञा: टकाऊतून विविध आकारांची शिल्पनिर्मिती करणे.
[1/1, 9:35 PM] Mahesh Lokhande: ७)चिरघोडी(कुरघोडी)=१संघ घोडा होईल पहिला सरळ उभा इतर कमरेला धरुन साखळी करतील.२संघाने उडी मारुन पाठीवर बसावे.घोडा बनलेल्यांनी कमर हलवुन घोडेस्वार पाडणे घोडेस्वाराचा पाय जमीनीस लागता संघ बाद.नंतर स्वार घोडे होतील.
८)वांगटांग(कांदाफोड)=एकाने १पाय पसरुन बसणे.इतरांनी ५मीटरवरुन येऊन पायास स्पर्श न होता ओलांडणे.बसलेल्याने पायावर दुसरा पाय,१हाताची वीत ठेवणे,दुसर्‍या हाताची वीत ठेवणे,जमीनीवर घोडा होणे,नंतर गुडघ्यावर हात ठेवुन ओलांडणी घेणे.शेवटी उभे राहणाराचे पाठीवर २हात ठेवुन उडी मारुन पाय पसरवुन पाय न लागता जाणे.पाय लागला तर त्याच्यावर राज्य.
९)चुन चुन खडा=वर्तुळाकार मुले मांडीस मांडी लावुन बसवावी राज्य घेणारा मध्ये बसेल.खडा बसलेल्यांनी पाठीमागुन पुढे पास करणे शिटी वाजता थांबवावे मग सर्वांनी हात पुढे जमीनीवर पालथे मुठी बंद असेल असे ठेवणे राज्य असणाराने कोणाच्या मुठीत खडा आहे सांगणे.तीन संधीत न ओळखल्यास पुन्हा राज्य ओळखल्यास त्याच्यावर राज्य.
[1/1, 9:36 PM] सुलभा लाडमॅडम: Zadana Aakar dene gvtala vivid Aakarat kapne
[1/1, 9:36 PM] Mahesh Lokhande: १०)खांब खांब खांबोळ्या=सहलीवेळी प्रत्येकाने झाड पकडावे व झाडांची अदलाबदल करावी राज्य घेणाराने झाड मिळवण्याचा प्रयत्न करणे.झाड न मिळणारावर राज्य.झाडांऐवजी दगड,विटा,पायरी वापरणे.
११)गोट्या=रेषेवरुन १०फुटावरुन गोट्या खडड्याजवळ टाकणे खड्ड्यात गोटी जाईल तो जिंकेल.कोणाचीही खड्ड्यात गेली नसल्यास खड्ड्याजवळ असणारा मालक प्रथम संधी घेईल इतर सांगतील ती गोटी उडवल्यास तो गोटी जिंकेल.
१२)काचापाणी=चौकोन जमीनीवर खडुने आखुन बांगड्याचे तुकडे ओंजळीने चौकोनात अलगत टाकावे नंतर एक एक तुकडा दुसर्‍या तुकड्यास धक्का न लावता एका बोटाने एका झटक्यात काढावे.तुकड्यास धक्का लागल्यास बाद.दुसर्‍यास संधी.चौकोनाऐवजी दुसरे आकार व काचाऐवजी चिंचोके बिट्ट्या इतर वस्तु वापरता येतील.
[1/1, 9:43 PM] खोतसर ज्ञा: 1)पुतळे 2)वाघोबा किती वाजले 3)माझ्या मागून या4)आबाधाबी 5)गोष्टीरूपखेळ कोल्हा आणि द्रक्षे, तहानलेला कावळा
[1/1, 9:52 PM] Mahesh Lokhande: १३)पट
१४)भोवरा
१५)साधी फुगडी
१६)एक हाताची फुगडी
१७)दंडफुगडी
१८)बसफुगडी
१९)फुगडीच जात
२०)कासवफुगडी
२१)पाठफुगडी
२२)नखुल्या
२३)कोंबडा
२४)किकीच पान बाई कि की
२५)लाट्या बाई लाट्या
२६)सुपारी
२७)आगोटा पागोटा
२८)लोळण फुगडी गाठोडे
२९)अडवळ घुम पडवळ घुम
३०)किस बाई किस
३१)गोफ
३२)पिंगा
३३)सूपनृत्य नाच ग घुमा
३४)खुर्ची का मिरची
३५)सालम सालकी
३६)लाडू झिम्मा
३७)खांदी झिम्मा
३८)फेराचा झिम्मा
३९)भोंडला
४०)हाटुश्श
[1/1, 10:08 PM] Mahesh Lokhande: कला विषयासाठी उपक्रम
१)चित्रकला कार्यशाळा
२)चित्रकला प्रदर्शन व विक्री
३)शिल्पकला कार्यशाळा
४)रंगभरण स्पर्धा=मूल्यमापन निकष=रंगांचा वापर,प्रमाणबध्दता,सौंदर्य
५)समुहनृत्य स्पर्धा=मूल्यमापन निकष=गाण्याची निवड,वेशभुषा,हालचालीतील अचुकता,रंगमंचाचा वापर,परस्पर तारतम्य,अभिनय,प्रेक्षकप्रतिसाद
[1/1, 10:10 PM] Mote Gondi: 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🐊
कला विषयक उपक्रम -
अ) चित्र - शिल्प —
१)  बारीक रेषा ,छेदक रेषा,उभ्या रेषा ,अाडव्या रेषा,भौमितीक अाकार व त्यातुन कलाकृती ,फळे फुले पाने यांचे रेखाटन.
२) स्मरण चित्र—
विवीध सना नुसार चित्र .
३) नक्षीकाम —
  पाने फुले ,फुलपाखरे ,मासे इत्यादी कैलाज काम ,मुद्राचित्रे ,ठसे काम ,( भेंडी ,बटाटा,कांदा इ.)
कागद काम —
घड्या घालने , कव्हर घालने , मुखवटे तयार करणे ,इत्यादी
४)  कल्पना चित्र —
पाठ्य पुस्तकातील कथाचित्र काढणे ,प्रासंगिक कथा ,गोष्ट इत्यादी ,
५) मातीकाम —
फळांची प्रतीकृती ,वेगवेगळे घन ,अाकार ,मनी माळा ,भांडी ,चुल तयार करणे ,विटा तयार करणे इत्यादी.
६)  वस्तुचित्र —
मांडणी करूण रेखाटणे .
ब)  संगीत ( गायन - वादन)—
बडबड गीते,समूह बाल गीते,इत्यादी .
१) वादन - तबला ,टाळ, खंजिरी ,हार्मोनिअम ,ढोल, ताशा वाजविण.
क)  नृत्य —
शेतकरी  ,कोळी, लोक इत्यादी नृत्य प्रकार घेणे.
ड)  नाट्य —
नकला ,अावाज,(प्राणी -पक्षी ) मुक अभिनय काल्पनिक कथा, स्व- अनुभव ,पाठ्यपुस्तकातील नाट्यीकरण ,प्राणी -पक्षी ,फेरी वालावेगवेगळ्या व्यक्ती ,सहकारी मित्र यांच्या नकला करणे .

वरील प्रकारचे उपक्राव्यतीरीक्त अाणखी भरपूर उपक्रम इयत्तानिहाय वेगवेळे घेता येतील ,माझ्या परीने उपक्रम मांडण्याचा प्रयत्न केला अाहे .
मिलद सर अापल्या शाळेतील उपक्रम व फोटो खूपच उत्कृष्ट अाहेत व मार्गदर्शक सुद्धा अाहेत .
चर्चेतील प्रतीसादाबद्दल अाभारी अाहे
धन्यवाद !
चूक भूल माफ असावी.
नवीन वर्षात खूप विषयावर  चर्चा फोटो शेअर करूया  खूप ज्ञान मिळत अाहे सर्वांना धन्यवाद !

🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
[1/1, 10:11 PM] Mahesh Lokhande: ६)वैयक्तिक नृत्य=निकषवरीलप्रमाणे
७)रांगोळी स्पर्धा=मूल्यमापन निकष=आकार,डिझाईन,रंगभरण,रेखाटन,सौंदर्य,वेगळेपण
८)मुकाभिनय स्पर्धा=मूल्यमापन निकष=विषयाची निवड,वेशभुषा,सुयोग्य हावभाव,साहित्याचा वापर,परिणामकारकता,प्रेक्षक प्रतिसाद
९)गायनस्पर्धा=मूल्यमापन निकष=गीताची निवड,आवाज,ताल व लय,हावभाव,वाद्यांशी सुसूत्रता,प्रेक्षक प्रतिसाद
१०)वक्तृत्व स्पर्धा=मूल्यमापन निकष=विषयाची निवड,विषयाची मांडणी,आवाजातील चढउतार,हावभाव व अभिनय,प्रेक्षक प्रतिसाद
[1/1, 10:19 PM] Mahesh Lokhande: ११)वादविवाद स्पर्धा=मूल्यमापन निकष=विषयाची मांडणी,आवाजातील चढउतार,प्रभावीपणा,आत्मविश्वास,हावभाव व अभिनय
१२)फॅन्सी ड्रेस स्पर्धा=मूल्यमापन निकष=पोशाख निवड,वेगळेपणा,पेहरावातील सौंदर्य,आत्मविश्वास,प्रभावीपणा,प्रेक्षकप्रभाव
१३)कथाकथस्पर्धा=मूल्यमापन निकष=कथेची निवड,कथेची मांडणी,ओघ,संवाद,प्रेक्षक प्रतिसाद,आत्मविश्वास,प्रभावीपणा,भाषाशैली
१४)पथनाट्य
१५)आवाज ओळखा
१६)टिचकीचोर
[1/1, 10:32 PM] खोतसर ज्ञा: बालआनंद मेळाव्यात सहभागी होऊन कला सादर करणे.
[1/1, 10:42 PM] होनरावमॅम ज्ञा: डाळी बिया लावून चित्र सजवणे

.
[1/1, 10:46 PM] खोतसर ज्ञा: खपलीच्या बिया चिटकवून वेगवेगळे आकार तयार करणे. उदा हार बांगडीचा आकार इ. खोतसर,लाडमॅडम,मिलिंदसर,जोशीसर,चव्हाणसर,जोशीसर,घनश्याम सोनवणेसर,मोटेसर,ज्ञानदेव नवसरेसर,होनरावमॅडम सर्वांचे आभार🙏🙏🙏🙏🙏

Thursday, 31 December 2015

शैक्षणिक ग्रुपचर्चा १५

[12/31, 7:47 PM] Mahesh Lokhande: 🔴 ग्रुपचर्चासत्र   १५  🔴
🌍आजचा चर्चेचा विषय🌍
🔶 शिक्षकांसाठी चर्चासत्राची गरज🔶
मुद्दे=१) चर्चासत्राची गरज
          २) झालेल्या १५चर्चावर अभिप्राय.
🔶चर्चेस वेळ आज दि.३१/१२/२०१५  रात्री ९.३०  ते १०.३०पर्यंत.🔶 सर्वांनी चर्चेत सहभागी व्हावे.🔵
[12/31, 8:55 PM] खोतसर ज्ञा: 1)चर्चा सत्रामुळे आपल्या ज्ञानात भरपूर भर पडली. 2)माहिती नसणार्या गोष्टीची माहिती मिळाली. 3)सर्वाना चर्चा सत्राचा सर्वाना फायदा झाला. 4)आध्यापनात चर्चा सत्राचा फार उपयोग झाला. 5)चर्चा सत्र अतिशय सुंदर व उत्कृष्ठ झाली त्या
[12/31, 9:01 PM] सुलभा लाडमॅडम: Aaplya vicharanche Aadanprdan
[12/31, 9:07 PM] वायदंडे कल्पतरु गोळेश्वर: विविध उपक्रमाची माहिती मिलाली
[12/31, 9:10 PM] संदेमँडम शरद. गोळेश्वर: chrchastra mule swatamadhye confidance wadhto, shalet a
Aadhyapnachi godi watale, teacher staff sobat chrchastra madhil upkramavishyi sambhashan karata yete, Asa exep Alla , Most imp swatamadhe energy produce ase watte,
[12/31, 9:24 PM] सुलभा लाडमॅडम: Vishyschya.sarv bagachya kangoryana  sprsh
[12/31, 9:27 PM] सुलभा लाडमॅडम: Khi kahi shikshkani kiti sundarkam aapaplya shlanvar kel the smjle
[12/31, 9:36 PM] थोरात ond: चर्चासत्र म्हणजे नाविन्यपूर्ण माहितीचा खजिना आहे. चर्चासत्राममुळे ज्ञानदानाला योग्य दिशा मिळण्यास मदत होईल. नाविन्यपूर्ण खेळ, उपक्रम, समस्या व त्यावरील उपाय माहीत झाले. शैक्षणिक कार्याला,क्षेत्राला  नवसंजीवनी देणारे वैचारिक व्यासपीठ म्हणजे हे चर्चासत्र असे वाटते.
[12/31, 9:38 PM] खोतसर ज्ञा: 1)चर्चा सत्रामुळे आपल्या ज्ञानात भरपूर भर पडली. 2)माहिती नसणार्या गोष्टीची माहिती मिळाली. 3)सर्वाना चर्चा सत्राचा सर्वाना फायदा झाला. 4)आध्यापनात चर्चा सत्राचा फार उपयोग झाला. 5)चर्चा सत्र अतिशय सुंदर व उत्कृष्ठ झाली आहे. 6)चर्चा आनंददायी आणि प्रेरणादायी झाली. 7)चर्चासत्रात सर्वानी सहभाग घेतल्याने सर्वाचे विचार अनुभव  मिळाले. अनुभवातून विचाराना प्ररणा मिळाली. 8)चर्चा सत्रामुळे विचार शक्ती वाढण्यास मदत मिळाली. ♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦चर्चा सत्राची सुरवात करणारे आणि विषय देवून त्याची विस्ताने चर्चा करणारे लोखंडे सरांचे प्रथम आभार व नविन वर्षाच्या शुभेच्छा.
[12/31, 9:48 PM] रजपुतमॅडम कल्याणी: khup jast mahiti milali viachar karyala lavnare charch satra
[12/31, 9:58 PM] Mote Gondi: दैनंदिन शैक्षणिक चर्चासत्रामुळे प्रत्यक्ष अध्यापनांती येणारे विविध अनुभव ,वीचार,साधने,साहीत्य या सर्वांचा शै.प्रवाहात असनार्या शिक्षक विद्दार्थी व प्रगत महाराष्र्ट होण्याच्या वाटचालीस प्रेरणा मिळते.
   चांगल्या विचारांची देवान घेवान होते.
जुण्या अाठवनिंना उजाळा मिळतो.
सृजन विकासास चालना मिळते
नवीन ज्ञानाची प्राप्ती होते  
?
[12/31, 10:08 PM] Mote Gondi: खरच अतिशय सुंदर अभ्यासपूर्वक विचार चर्चासत्रातून मांडले अाहेत.
?🙏?चर्चासत्र आपल्यामुळे यशस्वी होत आहे.आपला सहभाग हीच नवसंजीवनी आहे.शैक्षणिक ग्रुपचर्चासत्रामुळे रोज नवीन वाचन चिंतन मनन होत आहे अनेक संदिग्ध गोष्टी सोप्या होत आहेत.आपली व्यावसायिक कौशल्य विकसित होत आहेत.या वर्षात जसा सहभाग घेऊन आपण साथ दिली तशीच साथ पुढील वर्षात राहु द्या.आपले सर्वांचे पुढील वर्ष सुखाचे समाधानाचे आनंदाचे भरभराटीचे यशदायी निरोगी व व्यक्तीमत्त्वास विकसित करणारे होवो.नवीन झेप घेऊन आयुष्य गंजुन जाण्यासाठी नाही झिजुन जाण्यासाठी आहे.व आयुष्याचा प्रत्येक दिवस एक आयुष्याचे पान आहे नुसतीच पाने उलटण्यापेक्षा प्रत्येक पानावर चला एक इतिहास घडवुया.प्रत्येक क्षण आनंदाने उत्साहाने व बुध्दीवादाने बंधुभावाने नैतिकतेने जावो ही शुभेच्छा .नवीन वर्षाच्या ग्रुपमधील सर्व तार्‍यांस प्रकाशमान लक्ष लक्ष शुभेच्छा.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏