[1/1, 9:30 PM] Mahesh Lokhande: 🔴 ग्रुपचर्चासत्र १६ 🔴
🌍आजचा चर्चेचा विषय🌍
🔶 कला विषयासाठी कोणते उपक्रम घेता येतील ? 🔶
मुद्दे=१) कलाविषयक उपक्रम
२) पारंपारिक खेळ (मागील चर्चेत कमी वेळ मिळाल्याने पुन्हा)
🔶चर्चेस वेळ आज दि.१/१/२०१६ रात्री ९.३० ते १०.३०पर्यंत.🔶 सर्वांनी चर्चेत सहभागी व्हावे.🔵
[1/1, 9:30 PM] खोतसर ज्ञा: 1)कागदाच्या सोप्या वस्तू तयार करणे. 2)व्यंगचित्र संग्रह करणे 3)नृत्यातील हस्तमुद्र करणे
[1/1, 9:31 PM] सुलभा लाडमॅडम: Pripathat prarthna smuhgit suvichar kthakthn natikran sadrikran 2-lghuudyogana bheti karyanubhvatil vividh upkrm vrg sushobhikran
[1/1, 9:33 PM] Mahesh Lokhande: पारंपारिक खेळ
१) दगड का माती =राज्य घेणारास विचिरणे दगड की माती. तो माती म्हणाला.तर मातीशी स्पर्श होणारास शिवुन तो बाद करेल.इतर त्याला चकवत दगडावर कधी मातीवर उभे राहतील.बाद होणारावर राज्य.
२)सुरपारंब्या=रेषेवर मुले रेषेवर थांबतील एकजण दीडफुटी काठी (सुर)पायातुन लांब फेकेल.राज्य घेणारा सुर आणणेस जाईल.इतर झाडावर चढतील.सुर आणुन तो शिवण्यासाठी जाईल तेव्हा पारंब्यावरुन उतरुन सुर शिवेल मग पुन्हा त्याच्यावर राज्य पण सुर शिवण्यापुर्वी शिवल्यास त्याच्यावर राज्य येईल.
३)विटीदांडू=एकाने खाचेवरील विटी दांडूने कोलवल्यावर इतरांनी हवेत झेलल्यास कोलवणारा बाद.दुसरा कोलवण्यास तर पहिला क्षेत्ररक्षणास जाईल.विटी झेलली नाही तर तेथुन गलीवर विटी टाकावी एक दांडू अंतरात विटी गलीपासुन असल्यास कोलवणारा बाद.एक दांडूपेक्षा दूर विटी असल्यास विटीच्या टोकावर दांडू मारुन ती उडवुन टोलवावी.इतरांनी झेलल्यास टोलवणारा बाद.नाही तर टोलवलेल्या जागेपासुन दांडू गलीपर्यंत अंतर मोजावे.बाद होईपर्यंत तो कोलवणे व विटी टोलवणे करेल.
[1/1, 9:33 PM] सुलभा लाडमॅडम: Nkla sanvadanche vachn
[1/1, 9:34 PM] Mahesh Lokhande: ४)काठ्यापाणी=राज्य घेणारा पाठमोरा काठी हातात वर धरुन थांबेल इतरांनी मागुन काठीने काठी उडवुन काठीने काठी उडवत न्यावी काठी टोलवत असताना राज्य घेणाराने शिवावे.शिवल्यास टोलवणार्यावर राज्य.
५)काठ्यापाणी२=सर्वांनी रेषेवरुन काठ्या सरपटत सोडणे मागे काठी राहणारावर राज्य त्याची काठी सर्वजन उडवत नेतील व तो काठी उ
वणारास शिवेल.
६)टिकरीपाणी=(जिबली) २ओळीत ८ फरशीवर चौकोन आखुन १क्रमांकाने टिकरी(फरशीचा,दगडाचा चपटा तुकडा १घरात टाकुन १पायाने टिकरी बाहेर काढणे नंतर २,३,४...घरात टाकावी लंगडीने घरात जाऊन पायाने बाहेर काढणे पाय चौकोन रेषांस लागता कामा नये.टिकरी रेषेवर पडता कामा नये.लंगडउडीचा पाय टिकरीवर पडला पाहिजे.सर्व घरातुन टिकरी काढल्यानंतर मुकी बोली विचारुन डोक्यावर टिकरी ठेवुन सांगतील ते घर पार करणे.नंतर हाती पायी विचारुन हाती सांगता हाताने टिकरी बाहेर काढणे.डोक्यावरुन टिकरी घरात टाकणे.व घर जिंकुन घेणे.मालकीचे करणे.इतरांना घरात बंदी.
[1/1, 9:34 PM] सुलभा लाडमॅडम: Kagd kam later kam ptaka tyar krne
[1/1, 9:34 PM] खोतसर ज्ञा: टकाऊतून विविध आकारांची शिल्पनिर्मिती करणे.
[1/1, 9:35 PM] Mahesh Lokhande: ७)चिरघोडी(कुरघोडी)=१संघ घोडा होईल पहिला सरळ उभा इतर कमरेला धरुन साखळी करतील.२संघाने उडी मारुन पाठीवर बसावे.घोडा बनलेल्यांनी कमर हलवुन घोडेस्वार पाडणे घोडेस्वाराचा पाय जमीनीस लागता संघ बाद.नंतर स्वार घोडे होतील.
८)वांगटांग(कांदाफोड)=एकाने १पाय पसरुन बसणे.इतरांनी ५मीटरवरुन येऊन पायास स्पर्श न होता ओलांडणे.बसलेल्याने पायावर दुसरा पाय,१हाताची वीत ठेवणे,दुसर्या हाताची वीत ठेवणे,जमीनीवर घोडा होणे,नंतर गुडघ्यावर हात ठेवुन ओलांडणी घेणे.शेवटी उभे राहणाराचे पाठीवर २हात ठेवुन उडी मारुन पाय पसरवुन पाय न लागता जाणे.पाय लागला तर त्याच्यावर राज्य.
९)चुन चुन खडा=वर्तुळाकार मुले मांडीस मांडी लावुन बसवावी राज्य घेणारा मध्ये बसेल.खडा बसलेल्यांनी पाठीमागुन पुढे पास करणे शिटी वाजता थांबवावे मग सर्वांनी हात पुढे जमीनीवर पालथे मुठी बंद असेल असे ठेवणे राज्य असणाराने कोणाच्या मुठीत खडा आहे सांगणे.तीन संधीत न ओळखल्यास पुन्हा राज्य ओळखल्यास त्याच्यावर राज्य.
[1/1, 9:36 PM] सुलभा लाडमॅडम: Zadana Aakar dene gvtala vivid Aakarat kapne
[1/1, 9:36 PM] Mahesh Lokhande: १०)खांब खांब खांबोळ्या=सहलीवेळी प्रत्येकाने झाड पकडावे व झाडांची अदलाबदल करावी राज्य घेणाराने झाड मिळवण्याचा प्रयत्न करणे.झाड न मिळणारावर राज्य.झाडांऐवजी दगड,विटा,पायरी वापरणे.
११)गोट्या=रेषेवरुन १०फुटावरुन गोट्या खडड्याजवळ टाकणे खड्ड्यात गोटी जाईल तो जिंकेल.कोणाचीही खड्ड्यात गेली नसल्यास खड्ड्याजवळ असणारा मालक प्रथम संधी घेईल इतर सांगतील ती गोटी उडवल्यास तो गोटी जिंकेल.
१२)काचापाणी=चौकोन जमीनीवर खडुने आखुन बांगड्याचे तुकडे ओंजळीने चौकोनात अलगत टाकावे नंतर एक एक तुकडा दुसर्या तुकड्यास धक्का न लावता एका बोटाने एका झटक्यात काढावे.तुकड्यास धक्का लागल्यास बाद.दुसर्यास संधी.चौकोनाऐवजी दुसरे आकार व काचाऐवजी चिंचोके बिट्ट्या इतर वस्तु वापरता येतील.
[1/1, 9:43 PM] खोतसर ज्ञा: 1)पुतळे 2)वाघोबा किती वाजले 3)माझ्या मागून या4)आबाधाबी 5)गोष्टीरूपखेळ कोल्हा आणि द्रक्षे, तहानलेला कावळा
[1/1, 9:52 PM] Mahesh Lokhande: १३)पट
१४)भोवरा
१५)साधी फुगडी
१६)एक हाताची फुगडी
१७)दंडफुगडी
१८)बसफुगडी
१९)फुगडीच जात
२०)कासवफुगडी
२१)पाठफुगडी
२२)नखुल्या
२३)कोंबडा
२४)किकीच पान बाई कि की
२५)लाट्या बाई लाट्या
२६)सुपारी
२७)आगोटा पागोटा
२८)लोळण फुगडी गाठोडे
२९)अडवळ घुम पडवळ घुम
३०)किस बाई किस
३१)गोफ
३२)पिंगा
३३)सूपनृत्य नाच ग घुमा
३४)खुर्ची का मिरची
३५)सालम सालकी
३६)लाडू झिम्मा
३७)खांदी झिम्मा
३८)फेराचा झिम्मा
३९)भोंडला
४०)हाटुश्श
[1/1, 10:08 PM] Mahesh Lokhande: कला विषयासाठी उपक्रम
१)चित्रकला कार्यशाळा
२)चित्रकला प्रदर्शन व विक्री
३)शिल्पकला कार्यशाळा
४)रंगभरण स्पर्धा=मूल्यमापन निकष=रंगांचा वापर,प्रमाणबध्दता,सौंदर्य
५)समुहनृत्य स्पर्धा=मूल्यमापन निकष=गाण्याची निवड,वेशभुषा,हालचालीतील अचुकता,रंगमंचाचा वापर,परस्पर तारतम्य,अभिनय,प्रेक्षकप्रतिसाद
[1/1, 10:10 PM] Mote Gondi: 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🐊
कला विषयक उपक्रम -
अ) चित्र - शिल्प —
१) बारीक रेषा ,छेदक रेषा,उभ्या रेषा ,अाडव्या रेषा,भौमितीक अाकार व त्यातुन कलाकृती ,फळे फुले पाने यांचे रेखाटन.
२) स्मरण चित्र—
विवीध सना नुसार चित्र .
३) नक्षीकाम —
पाने फुले ,फुलपाखरे ,मासे इत्यादी कैलाज काम ,मुद्राचित्रे ,ठसे काम ,( भेंडी ,बटाटा,कांदा इ.)
कागद काम —
घड्या घालने , कव्हर घालने , मुखवटे तयार करणे ,इत्यादी
४) कल्पना चित्र —
पाठ्य पुस्तकातील कथाचित्र काढणे ,प्रासंगिक कथा ,गोष्ट इत्यादी ,
५) मातीकाम —
फळांची प्रतीकृती ,वेगवेगळे घन ,अाकार ,मनी माळा ,भांडी ,चुल तयार करणे ,विटा तयार करणे इत्यादी.
६) वस्तुचित्र —
मांडणी करूण रेखाटणे .
ब) संगीत ( गायन - वादन)—
बडबड गीते,समूह बाल गीते,इत्यादी .
१) वादन - तबला ,टाळ, खंजिरी ,हार्मोनिअम ,ढोल, ताशा वाजविण.
क) नृत्य —
शेतकरी ,कोळी, लोक इत्यादी नृत्य प्रकार घेणे.
ड) नाट्य —
नकला ,अावाज,(प्राणी -पक्षी ) मुक अभिनय काल्पनिक कथा, स्व- अनुभव ,पाठ्यपुस्तकातील नाट्यीकरण ,प्राणी -पक्षी ,फेरी वालावेगवेगळ्या व्यक्ती ,सहकारी मित्र यांच्या नकला करणे .
वरील प्रकारचे उपक्राव्यतीरीक्त अाणखी भरपूर उपक्रम इयत्तानिहाय वेगवेळे घेता येतील ,माझ्या परीने उपक्रम मांडण्याचा प्रयत्न केला अाहे .
मिलद सर अापल्या शाळेतील उपक्रम व फोटो खूपच उत्कृष्ट अाहेत व मार्गदर्शक सुद्धा अाहेत .
चर्चेतील प्रतीसादाबद्दल अाभारी अाहे
धन्यवाद !
चूक भूल माफ असावी.
नवीन वर्षात खूप विषयावर चर्चा फोटो शेअर करूया खूप ज्ञान मिळत अाहे सर्वांना धन्यवाद !
🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
[1/1, 10:11 PM] Mahesh Lokhande: ६)वैयक्तिक नृत्य=निकषवरीलप्रमाणे
७)रांगोळी स्पर्धा=मूल्यमापन निकष=आकार,डिझाईन,रंगभरण,रेखाटन,सौंदर्य,वेगळेपण
८)मुकाभिनय स्पर्धा=मूल्यमापन निकष=विषयाची निवड,वेशभुषा,सुयोग्य हावभाव,साहित्याचा वापर,परिणामकारकता,प्रेक्षक प्रतिसाद
९)गायनस्पर्धा=मूल्यमापन निकष=गीताची निवड,आवाज,ताल व लय,हावभाव,वाद्यांशी सुसूत्रता,प्रेक्षक प्रतिसाद
१०)वक्तृत्व स्पर्धा=मूल्यमापन निकष=विषयाची निवड,विषयाची मांडणी,आवाजातील चढउतार,हावभाव व अभिनय,प्रेक्षक प्रतिसाद
[1/1, 10:19 PM] Mahesh Lokhande: ११)वादविवाद स्पर्धा=मूल्यमापन निकष=विषयाची मांडणी,आवाजातील चढउतार,प्रभावीपणा,आत्मविश्वास,हावभाव व अभिनय
१२)फॅन्सी ड्रेस स्पर्धा=मूल्यमापन निकष=पोशाख निवड,वेगळेपणा,पेहरावातील सौंदर्य,आत्मविश्वास,प्रभावीपणा,प्रेक्षकप्रभाव
१३)कथाकथस्पर्धा=मूल्यमापन निकष=कथेची निवड,कथेची मांडणी,ओघ,संवाद,प्रेक्षक प्रतिसाद,आत्मविश्वास,प्रभावीपणा,भाषाशैली
१४)पथनाट्य
१५)आवाज ओळखा
१६)टिचकीचोर
[1/1, 10:32 PM] खोतसर ज्ञा: बालआनंद मेळाव्यात सहभागी होऊन कला सादर करणे.
[1/1, 10:42 PM] होनरावमॅम ज्ञा: डाळी बिया लावून चित्र सजवणे
.
[1/1, 10:46 PM] खोतसर ज्ञा: खपलीच्या बिया चिटकवून वेगवेगळे आकार तयार करणे. उदा हार बांगडीचा आकार इ. खोतसर,लाडमॅडम,मिलिंदसर,जोशीसर,चव्हाणसर,जोशीसर,घनश्याम सोनवणेसर,मोटेसर,ज्ञानदेव नवसरेसर,होनरावमॅडम सर्वांचे आभार🙏🙏🙏🙏🙏
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया द्या .