Friday, 1 January 2016

शैक्षणिक ग्रुपचर्चा १६

[1/1, 9:30 PM] Mahesh Lokhande: 🔴 ग्रुपचर्चासत्र   १६  🔴
🌍आजचा चर्चेचा विषय🌍
🔶 कला विषयासाठी कोणते उपक्रम घेता येतील ? 🔶
मुद्दे=१) कलाविषयक उपक्रम
          २) पारंपारिक खेळ (मागील चर्चेत कमी वेळ मिळाल्याने पुन्हा)
🔶चर्चेस वेळ आज दि.१/१/२०१६  रात्री ९.३०  ते १०.३०पर्यंत.🔶 सर्वांनी चर्चेत सहभागी व्हावे.🔵
[1/1, 9:30 PM] खोतसर ज्ञा: 1)कागदाच्या सोप्या वस्तू तयार करणे. 2)व्यंगचित्र संग्रह करणे 3)नृत्यातील हस्तमुद्र करणे
[1/1, 9:31 PM] सुलभा लाडमॅडम: Pripathat prarthna smuhgit suvichar kthakthn  natikran sadrikran   2-lghuudyogana bheti  karyanubhvatil vividh upkrm vrg sushobhikran
[1/1, 9:33 PM] Mahesh Lokhande: पारंपारिक खेळ
१) दगड का माती =राज्य घेणारास विचिरणे दगड की माती. तो माती म्हणाला.तर मातीशी स्पर्श होणारास शिवुन तो बाद करेल.इतर त्याला चकवत दगडावर कधी मातीवर उभे राहतील.बाद होणारावर राज्य.
२)सुरपारंब्या=रेषेवर मुले रेषेवर थांबतील एकजण दीडफुटी काठी (सुर)पायातुन लांब फेकेल.राज्य घेणारा सुर आणणेस जाईल.इतर झाडावर चढतील.सुर आणुन तो शिवण्यासाठी जाईल तेव्हा पारंब्यावरुन उतरुन सुर शिवेल मग पुन्हा त्याच्यावर राज्य पण सुर शिवण्यापुर्वी शिवल्यास त्याच्यावर राज्य येईल.
३)विटीदांडू=एकाने खाचेवरील विटी दांडूने कोलवल्यावर इतरांनी हवेत झेलल्यास कोलवणारा बाद.दुसरा कोलवण्यास तर पहिला क्षेत्ररक्षणास जाईल.विटी झेलली नाही तर तेथुन गलीवर विटी टाकावी एक दांडू अंतरात विटी गलीपासुन असल्यास कोलवणारा बाद.एक दांडूपेक्षा दूर विटी असल्यास विटीच्या टोकावर दांडू मारुन ती उडवुन टोलवावी.इतरांनी झेलल्यास टोलवणारा बाद.नाही तर टोलवलेल्या जागेपासुन दांडू गलीपर्यंत अंतर मोजावे.बाद होईपर्यंत तो कोलवणे व विटी टोलवणे करेल.
[1/1, 9:33 PM] सुलभा लाडमॅडम: Nkla sanvadanche vachn
[1/1, 9:34 PM] Mahesh Lokhande: ४)काठ्यापाणी=राज्य घेणारा पाठमोरा काठी हातात वर धरुन थांबेल इतरांनी मागुन काठीने काठी उडवुन काठीने काठी उडवत न्यावी काठी टोलवत असताना राज्य घेणाराने शिवावे.शिवल्यास टोलवणार्‍यावर राज्य.
५)काठ्यापाणी२=सर्वांनी रेषेवरुन काठ्या सरपटत सोडणे मागे काठी राहणारावर राज्य त्याची काठी सर्वजन उडवत नेतील व तो काठी उ
वणारास शिवेल.
६)टिकरीपाणी=(जिबली) २ओळीत ८ फरशीवर चौकोन आखुन १क्रमांकाने टिकरी(फरशीचा,दगडाचा चपटा तुकडा १घरात टाकुन १पायाने टिकरी बाहेर काढणे नंतर २,३,४...घरात टाकावी लंगडीने घरात जाऊन पायाने बाहेर काढणे पाय चौकोन रेषांस लागता कामा नये.टिकरी रेषेवर पडता कामा नये.लंगडउडीचा पाय टिकरीवर पडला पाहिजे.सर्व घरातुन टिकरी काढल्यानंतर मुकी बोली विचारुन डोक्यावर टिकरी ठेवुन सांगतील ते घर पार करणे.नंतर हाती पायी विचारुन हाती सांगता हाताने टिकरी बाहेर काढणे.डोक्यावरुन टिकरी घरात टाकणे.व घर जिंकुन घेणे.मालकीचे करणे.इतरांना घरात बंदी.
[1/1, 9:34 PM] सुलभा लाडमॅडम: Kagd kam later kam ptaka tyar krne
[1/1, 9:34 PM] खोतसर ज्ञा: टकाऊतून विविध आकारांची शिल्पनिर्मिती करणे.
[1/1, 9:35 PM] Mahesh Lokhande: ७)चिरघोडी(कुरघोडी)=१संघ घोडा होईल पहिला सरळ उभा इतर कमरेला धरुन साखळी करतील.२संघाने उडी मारुन पाठीवर बसावे.घोडा बनलेल्यांनी कमर हलवुन घोडेस्वार पाडणे घोडेस्वाराचा पाय जमीनीस लागता संघ बाद.नंतर स्वार घोडे होतील.
८)वांगटांग(कांदाफोड)=एकाने १पाय पसरुन बसणे.इतरांनी ५मीटरवरुन येऊन पायास स्पर्श न होता ओलांडणे.बसलेल्याने पायावर दुसरा पाय,१हाताची वीत ठेवणे,दुसर्‍या हाताची वीत ठेवणे,जमीनीवर घोडा होणे,नंतर गुडघ्यावर हात ठेवुन ओलांडणी घेणे.शेवटी उभे राहणाराचे पाठीवर २हात ठेवुन उडी मारुन पाय पसरवुन पाय न लागता जाणे.पाय लागला तर त्याच्यावर राज्य.
९)चुन चुन खडा=वर्तुळाकार मुले मांडीस मांडी लावुन बसवावी राज्य घेणारा मध्ये बसेल.खडा बसलेल्यांनी पाठीमागुन पुढे पास करणे शिटी वाजता थांबवावे मग सर्वांनी हात पुढे जमीनीवर पालथे मुठी बंद असेल असे ठेवणे राज्य असणाराने कोणाच्या मुठीत खडा आहे सांगणे.तीन संधीत न ओळखल्यास पुन्हा राज्य ओळखल्यास त्याच्यावर राज्य.
[1/1, 9:36 PM] सुलभा लाडमॅडम: Zadana Aakar dene gvtala vivid Aakarat kapne
[1/1, 9:36 PM] Mahesh Lokhande: १०)खांब खांब खांबोळ्या=सहलीवेळी प्रत्येकाने झाड पकडावे व झाडांची अदलाबदल करावी राज्य घेणाराने झाड मिळवण्याचा प्रयत्न करणे.झाड न मिळणारावर राज्य.झाडांऐवजी दगड,विटा,पायरी वापरणे.
११)गोट्या=रेषेवरुन १०फुटावरुन गोट्या खडड्याजवळ टाकणे खड्ड्यात गोटी जाईल तो जिंकेल.कोणाचीही खड्ड्यात गेली नसल्यास खड्ड्याजवळ असणारा मालक प्रथम संधी घेईल इतर सांगतील ती गोटी उडवल्यास तो गोटी जिंकेल.
१२)काचापाणी=चौकोन जमीनीवर खडुने आखुन बांगड्याचे तुकडे ओंजळीने चौकोनात अलगत टाकावे नंतर एक एक तुकडा दुसर्‍या तुकड्यास धक्का न लावता एका बोटाने एका झटक्यात काढावे.तुकड्यास धक्का लागल्यास बाद.दुसर्‍यास संधी.चौकोनाऐवजी दुसरे आकार व काचाऐवजी चिंचोके बिट्ट्या इतर वस्तु वापरता येतील.
[1/1, 9:43 PM] खोतसर ज्ञा: 1)पुतळे 2)वाघोबा किती वाजले 3)माझ्या मागून या4)आबाधाबी 5)गोष्टीरूपखेळ कोल्हा आणि द्रक्षे, तहानलेला कावळा
[1/1, 9:52 PM] Mahesh Lokhande: १३)पट
१४)भोवरा
१५)साधी फुगडी
१६)एक हाताची फुगडी
१७)दंडफुगडी
१८)बसफुगडी
१९)फुगडीच जात
२०)कासवफुगडी
२१)पाठफुगडी
२२)नखुल्या
२३)कोंबडा
२४)किकीच पान बाई कि की
२५)लाट्या बाई लाट्या
२६)सुपारी
२७)आगोटा पागोटा
२८)लोळण फुगडी गाठोडे
२९)अडवळ घुम पडवळ घुम
३०)किस बाई किस
३१)गोफ
३२)पिंगा
३३)सूपनृत्य नाच ग घुमा
३४)खुर्ची का मिरची
३५)सालम सालकी
३६)लाडू झिम्मा
३७)खांदी झिम्मा
३८)फेराचा झिम्मा
३९)भोंडला
४०)हाटुश्श
[1/1, 10:08 PM] Mahesh Lokhande: कला विषयासाठी उपक्रम
१)चित्रकला कार्यशाळा
२)चित्रकला प्रदर्शन व विक्री
३)शिल्पकला कार्यशाळा
४)रंगभरण स्पर्धा=मूल्यमापन निकष=रंगांचा वापर,प्रमाणबध्दता,सौंदर्य
५)समुहनृत्य स्पर्धा=मूल्यमापन निकष=गाण्याची निवड,वेशभुषा,हालचालीतील अचुकता,रंगमंचाचा वापर,परस्पर तारतम्य,अभिनय,प्रेक्षकप्रतिसाद
[1/1, 10:10 PM] Mote Gondi: 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🐊
कला विषयक उपक्रम -
अ) चित्र - शिल्प —
१)  बारीक रेषा ,छेदक रेषा,उभ्या रेषा ,अाडव्या रेषा,भौमितीक अाकार व त्यातुन कलाकृती ,फळे फुले पाने यांचे रेखाटन.
२) स्मरण चित्र—
विवीध सना नुसार चित्र .
३) नक्षीकाम —
  पाने फुले ,फुलपाखरे ,मासे इत्यादी कैलाज काम ,मुद्राचित्रे ,ठसे काम ,( भेंडी ,बटाटा,कांदा इ.)
कागद काम —
घड्या घालने , कव्हर घालने , मुखवटे तयार करणे ,इत्यादी
४)  कल्पना चित्र —
पाठ्य पुस्तकातील कथाचित्र काढणे ,प्रासंगिक कथा ,गोष्ट इत्यादी ,
५) मातीकाम —
फळांची प्रतीकृती ,वेगवेगळे घन ,अाकार ,मनी माळा ,भांडी ,चुल तयार करणे ,विटा तयार करणे इत्यादी.
६)  वस्तुचित्र —
मांडणी करूण रेखाटणे .
ब)  संगीत ( गायन - वादन)—
बडबड गीते,समूह बाल गीते,इत्यादी .
१) वादन - तबला ,टाळ, खंजिरी ,हार्मोनिअम ,ढोल, ताशा वाजविण.
क)  नृत्य —
शेतकरी  ,कोळी, लोक इत्यादी नृत्य प्रकार घेणे.
ड)  नाट्य —
नकला ,अावाज,(प्राणी -पक्षी ) मुक अभिनय काल्पनिक कथा, स्व- अनुभव ,पाठ्यपुस्तकातील नाट्यीकरण ,प्राणी -पक्षी ,फेरी वालावेगवेगळ्या व्यक्ती ,सहकारी मित्र यांच्या नकला करणे .

वरील प्रकारचे उपक्राव्यतीरीक्त अाणखी भरपूर उपक्रम इयत्तानिहाय वेगवेळे घेता येतील ,माझ्या परीने उपक्रम मांडण्याचा प्रयत्न केला अाहे .
मिलद सर अापल्या शाळेतील उपक्रम व फोटो खूपच उत्कृष्ट अाहेत व मार्गदर्शक सुद्धा अाहेत .
चर्चेतील प्रतीसादाबद्दल अाभारी अाहे
धन्यवाद !
चूक भूल माफ असावी.
नवीन वर्षात खूप विषयावर  चर्चा फोटो शेअर करूया  खूप ज्ञान मिळत अाहे सर्वांना धन्यवाद !

🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
[1/1, 10:11 PM] Mahesh Lokhande: ६)वैयक्तिक नृत्य=निकषवरीलप्रमाणे
७)रांगोळी स्पर्धा=मूल्यमापन निकष=आकार,डिझाईन,रंगभरण,रेखाटन,सौंदर्य,वेगळेपण
८)मुकाभिनय स्पर्धा=मूल्यमापन निकष=विषयाची निवड,वेशभुषा,सुयोग्य हावभाव,साहित्याचा वापर,परिणामकारकता,प्रेक्षक प्रतिसाद
९)गायनस्पर्धा=मूल्यमापन निकष=गीताची निवड,आवाज,ताल व लय,हावभाव,वाद्यांशी सुसूत्रता,प्रेक्षक प्रतिसाद
१०)वक्तृत्व स्पर्धा=मूल्यमापन निकष=विषयाची निवड,विषयाची मांडणी,आवाजातील चढउतार,हावभाव व अभिनय,प्रेक्षक प्रतिसाद
[1/1, 10:19 PM] Mahesh Lokhande: ११)वादविवाद स्पर्धा=मूल्यमापन निकष=विषयाची मांडणी,आवाजातील चढउतार,प्रभावीपणा,आत्मविश्वास,हावभाव व अभिनय
१२)फॅन्सी ड्रेस स्पर्धा=मूल्यमापन निकष=पोशाख निवड,वेगळेपणा,पेहरावातील सौंदर्य,आत्मविश्वास,प्रभावीपणा,प्रेक्षकप्रभाव
१३)कथाकथस्पर्धा=मूल्यमापन निकष=कथेची निवड,कथेची मांडणी,ओघ,संवाद,प्रेक्षक प्रतिसाद,आत्मविश्वास,प्रभावीपणा,भाषाशैली
१४)पथनाट्य
१५)आवाज ओळखा
१६)टिचकीचोर
[1/1, 10:32 PM] खोतसर ज्ञा: बालआनंद मेळाव्यात सहभागी होऊन कला सादर करणे.
[1/1, 10:42 PM] होनरावमॅम ज्ञा: डाळी बिया लावून चित्र सजवणे

.
[1/1, 10:46 PM] खोतसर ज्ञा: खपलीच्या बिया चिटकवून वेगवेगळे आकार तयार करणे. उदा हार बांगडीचा आकार इ. खोतसर,लाडमॅडम,मिलिंदसर,जोशीसर,चव्हाणसर,जोशीसर,घनश्याम सोनवणेसर,मोटेसर,ज्ञानदेव नवसरेसर,होनरावमॅडम सर्वांचे आभार🙏🙏🙏🙏🙏

Thursday, 31 December 2015

शैक्षणिक ग्रुपचर्चा १५

[12/31, 7:47 PM] Mahesh Lokhande: 🔴 ग्रुपचर्चासत्र   १५  🔴
🌍आजचा चर्चेचा विषय🌍
🔶 शिक्षकांसाठी चर्चासत्राची गरज🔶
मुद्दे=१) चर्चासत्राची गरज
          २) झालेल्या १५चर्चावर अभिप्राय.
🔶चर्चेस वेळ आज दि.३१/१२/२०१५  रात्री ९.३०  ते १०.३०पर्यंत.🔶 सर्वांनी चर्चेत सहभागी व्हावे.🔵
[12/31, 8:55 PM] खोतसर ज्ञा: 1)चर्चा सत्रामुळे आपल्या ज्ञानात भरपूर भर पडली. 2)माहिती नसणार्या गोष्टीची माहिती मिळाली. 3)सर्वाना चर्चा सत्राचा सर्वाना फायदा झाला. 4)आध्यापनात चर्चा सत्राचा फार उपयोग झाला. 5)चर्चा सत्र अतिशय सुंदर व उत्कृष्ठ झाली त्या
[12/31, 9:01 PM] सुलभा लाडमॅडम: Aaplya vicharanche Aadanprdan
[12/31, 9:07 PM] वायदंडे कल्पतरु गोळेश्वर: विविध उपक्रमाची माहिती मिलाली
[12/31, 9:10 PM] संदेमँडम शरद. गोळेश्वर: chrchastra mule swatamadhye confidance wadhto, shalet a
Aadhyapnachi godi watale, teacher staff sobat chrchastra madhil upkramavishyi sambhashan karata yete, Asa exep Alla , Most imp swatamadhe energy produce ase watte,
[12/31, 9:24 PM] सुलभा लाडमॅडम: Vishyschya.sarv bagachya kangoryana  sprsh
[12/31, 9:27 PM] सुलभा लाडमॅडम: Khi kahi shikshkani kiti sundarkam aapaplya shlanvar kel the smjle
[12/31, 9:36 PM] थोरात ond: चर्चासत्र म्हणजे नाविन्यपूर्ण माहितीचा खजिना आहे. चर्चासत्राममुळे ज्ञानदानाला योग्य दिशा मिळण्यास मदत होईल. नाविन्यपूर्ण खेळ, उपक्रम, समस्या व त्यावरील उपाय माहीत झाले. शैक्षणिक कार्याला,क्षेत्राला  नवसंजीवनी देणारे वैचारिक व्यासपीठ म्हणजे हे चर्चासत्र असे वाटते.
[12/31, 9:38 PM] खोतसर ज्ञा: 1)चर्चा सत्रामुळे आपल्या ज्ञानात भरपूर भर पडली. 2)माहिती नसणार्या गोष्टीची माहिती मिळाली. 3)सर्वाना चर्चा सत्राचा सर्वाना फायदा झाला. 4)आध्यापनात चर्चा सत्राचा फार उपयोग झाला. 5)चर्चा सत्र अतिशय सुंदर व उत्कृष्ठ झाली आहे. 6)चर्चा आनंददायी आणि प्रेरणादायी झाली. 7)चर्चासत्रात सर्वानी सहभाग घेतल्याने सर्वाचे विचार अनुभव  मिळाले. अनुभवातून विचाराना प्ररणा मिळाली. 8)चर्चा सत्रामुळे विचार शक्ती वाढण्यास मदत मिळाली. ♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦चर्चा सत्राची सुरवात करणारे आणि विषय देवून त्याची विस्ताने चर्चा करणारे लोखंडे सरांचे प्रथम आभार व नविन वर्षाच्या शुभेच्छा.
[12/31, 9:48 PM] रजपुतमॅडम कल्याणी: khup jast mahiti milali viachar karyala lavnare charch satra
[12/31, 9:58 PM] Mote Gondi: दैनंदिन शैक्षणिक चर्चासत्रामुळे प्रत्यक्ष अध्यापनांती येणारे विविध अनुभव ,वीचार,साधने,साहीत्य या सर्वांचा शै.प्रवाहात असनार्या शिक्षक विद्दार्थी व प्रगत महाराष्र्ट होण्याच्या वाटचालीस प्रेरणा मिळते.
   चांगल्या विचारांची देवान घेवान होते.
जुण्या अाठवनिंना उजाळा मिळतो.
सृजन विकासास चालना मिळते
नवीन ज्ञानाची प्राप्ती होते  
?
[12/31, 10:08 PM] Mote Gondi: खरच अतिशय सुंदर अभ्यासपूर्वक विचार चर्चासत्रातून मांडले अाहेत.
?🙏?चर्चासत्र आपल्यामुळे यशस्वी होत आहे.आपला सहभाग हीच नवसंजीवनी आहे.शैक्षणिक ग्रुपचर्चासत्रामुळे रोज नवीन वाचन चिंतन मनन होत आहे अनेक संदिग्ध गोष्टी सोप्या होत आहेत.आपली व्यावसायिक कौशल्य विकसित होत आहेत.या वर्षात जसा सहभाग घेऊन आपण साथ दिली तशीच साथ पुढील वर्षात राहु द्या.आपले सर्वांचे पुढील वर्ष सुखाचे समाधानाचे आनंदाचे भरभराटीचे यशदायी निरोगी व व्यक्तीमत्त्वास विकसित करणारे होवो.नवीन झेप घेऊन आयुष्य गंजुन जाण्यासाठी नाही झिजुन जाण्यासाठी आहे.व आयुष्याचा प्रत्येक दिवस एक आयुष्याचे पान आहे नुसतीच पाने उलटण्यापेक्षा प्रत्येक पानावर चला एक इतिहास घडवुया.प्रत्येक क्षण आनंदाने उत्साहाने व बुध्दीवादाने बंधुभावाने नैतिकतेने जावो ही शुभेच्छा .नवीन वर्षाच्या ग्रुपमधील सर्व तार्‍यांस प्रकाशमान लक्ष लक्ष शुभेच्छा.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Wednesday, 30 December 2015

शैक्षणिक ग्रुपचर्चा १४

[12/30, 6:42 PM] Mahesh Lokhande: 🔴 ग्रुपचर्चासत्र   १४  🔴
🌍आजचा चर्चेचा विषय🌍
🔶 शारीरिक शिक्षण विषयासाठी क्रीडाकौशल्य विकासासाठी कोणते  मनोरंजनत्मक खेळ व पारंपारिक खेळ घेता येतील.🔶
मुद्दे=१) मनोरंजनात्मक खेळ
          २) पारंपारिक खेळ
🔶चर्चेस वेळ आज दि.३०/१२/२०१५  रात्री ९.३०  ते १०.३०पर्यंत.🔶 सर्वांनी चर्चेत सहभागी व्हावे.🔵
[12/30, 9:35 PM] खोतसर ज्ञा: 1)मलखांब लठी हे पारंपारीक खेळ आहेत. 2)लेझिम टिपरी कवायत प्रकार इ.
[12/30, 9:35 PM] समीरअॅ: १.सर्वांनी सर्वांशी खेळावयाचे खेळ : उदा.,
शर्यत, मोकाट-दौड इत्यादी. यांत प्रत्येकजण दुसऱ्याचा प्रतिस्पर्धी असतो. प्रत्येकालाच पहिले येण्याची इच्छा असते. मोकाट-दौडीत पळणे,चालणे, रांगणे, लंगडणे, उड्या मारणे या निरनिराळ्या हालचालींचा अंतर्भाव होतो.
संगीतखुर्ची, चमचा-लिंबयांसारख्या रंजनपर
खेळांच्या सामुदायिक स्पर्धा होतात. तद्वतच मुली दोरीवरच्या उड्यांसारख्या खेळांत रस घेतात.
२.एकाने अनेकांबरोबर खेळावयाचे खेळ : यांत शिवाशिवी,लपंडाव ,आंधळी कोशिंबीर , छप्पापाणी, तोबा, वाघ-शेळी, धबाधबी इ. खेळांचा समावेश होतो.यातूनच पुढे लहान गट मोठ्या गटांशी खेळतात. उदा.,साखळीची शिवाशिवी.
३.एकट्याने एकठ्याशी खेळावयाचे खेळ:द्वंद्वयुद्ध,कुस्ती, मुष्टियुद्ध, जंबिया,
कमरओढ,रेटारेटी अशा अनेक प्रकारच्या
लढती या गटात मोडतात. तद्वतच बुद्धिबळासारखे बौद्धिक कौशल्यावर आधारित खेळही यात येतात.
४.लहान संघाने दुसऱ्या लहान संघाशी खेळणे : यात निरनिराळ्या टप्प्यांच्या शर्यतींचा समावेश होतो.तीन पायांच्या शर्यती, उदा., पळण्याच्या गट-शर्यती(रिले-रेस), तसेच लंगडी,कबड्डी ,खोखो हे नियमबद्ध सांघिक खेळ.
५.मिश्र खेळ : यात दोन किंवा अधिक खेळांचा मिलाफ झालेला असतो.वाकड्यातिकड्या उड्या, छूटचे खेळ तसेच विनोदी हालचालींचे खेळ, गोष्टीरूप खेळ असे रंजनाबरोबरच मानसिक व बौद्धिक शिक्षण देणारेही खेळ यात येतात. ‘जागा बदला!’ या खेळातून स्मरणशक्ती,‘राम-रावण’ या खेळातून एखादी गोष्ट लक्षपूर्वक करण्याची पात्रता,‘किल्लाफोड’ या खेळामधून चढाईचे गुण व चातुर्य अशा गुणांची जोपासना होते.
६.टप्प्यांचे खेळ व शर्यती : लहान संघांच्या गटां टप्प्यांचे खेळ हा एक रूढ प्रकार आहे. त्यात प्रामुख्याने टप्प्यांच्या शर्यतीचा समावेश होतो. या शर्यतीत अंतर काटण्याच्या विविध पद्धती वापरून रंगत आणता येते.या शर्यती वेगवेगळी साधने वापरून व अंतर काटण्याच्या वेगवेगळ्या पद्धती वापरून विविध प्रकारे खेळता येतात.
७.खास मुलींचे खेळ : व्यायाम व
करमुणकीबरोबरच भावी आयुष्यात उपयुक्त
ठरतील, अशा गुणांची जोपासना या खेळांमुळे
होऊ शकते.फुगडी, झिम्मा, कोंबडा, पिंगा,‘किकीचे पान बाई किकी’, ‘किसबाई किस’ हे मुलींचे काही खेळ होत.
८.साभिनय खेळ : या खेळात एखादी मनोरंजक गोष्टी सांगायची असते आणि ती
सांगताना मुलांनी प्रसंगानुसार हावभाव करायचे असतात किंवा अभिनयासह गीत गायचे असते.
९.पूरक खेळ : या खेळातील हालचाली
सांधिक मैदानी खेळांना पोषक व पूरक ठरतात. उदा.,आट्यापाट्या, लगोऱ्या, लंगडी.
१०.सांघिक मैदानी खेळ : हे खेळ नियमबद्ध
असतात. कबड्डी, खोखो,विटीदांडू,
रस्सीखेच, चेंडूचे खेळ इत्यादी.
११.वैयक्तिक मैदानी खेळ : या खेळांतून मुलांचे वैयक्तिक कौशल्य वाढीस लागते. मेहनतीचे महत्त्व कळते आणि जीवनाला आवश्यक असणाराआत्मविश्वास बळावतो.
१२.विदेशी खेळ : लहान मुले क्रिकेट,रिंग टेनिस, टेबल-टेनिस इ. व मुली नेटबॉलसारख्या खेळांचा सराव करू शकतात. पाश्चात्त्य देशांत हे खेळ तसेच व्यायामी खेळ बालवयातच शिकविले जातात.भारतातही अलीकडे नवव्या-दहाव्या वर्षांपासून मुलांना ह्या खेळांची ओळख करून देण्यात
येते.
१३.बैठे खेळ : यात पत्ते व पत्त्यांचे खेळ,कॅरम,पटावरील खेळ , व्यापार, बुद्धिबळ इ. खेळ मुले फावल्या वेळात व सुटीत खेळतात.
१४.कवायतीचे खेळ : यातून मुलांना शिस्त व स्वच्छता यांचे महत्त्व पटते. कवायत व खेळ यांची हल्ली सांगड घालण्यात आलेली आहे.
१५.मनोरंजनात्मक खेळ : शिवाजी म्हणतो,गाढवाला शेपटी लावणे,भेंड्या, संगीतखुर्ची,तळ्यात-मळ्यात' सुईदोऱ्याची शर्यत इ.
[12/30, 9:40 PM] Mahesh Lokhande: मनोरंजनात्मक खेळ
१) खुंटीवर फेक=जमीनीवर अर्धा मीटर वर राहील अशी खुंटी रोवावी.५ मीटर अंतरावरुन एकेकाने तीन रिंगा खुंटीवर फेकाव्या एक अडकली एक गुण द्यावा.
२)स्मृती चाचणी=टेबलावर ३० वस्तु बटण,कंगवा,सुई, दोरा,पेन,पेन्सिल......अशा ठेवाव्या सर्वांना ठराविक वेळ पहाण्यास सांगावे.नंतर त्या झाकुन ठेवाव्यात व कागद द्यावे सर्वांनी यादी बनवावी.सर्वात जास्त वस्तुंची नावे लिहिणारा जिंकेल.
३) जोडी खाली पाडणे=दीड मीटर वर्तुळातील करेल किंवा १५ वस्तु उभ्या कराव्यात ८मीटरवरुन टेनिसचेंडूने पाडणे तीन संधी द्याव्यात जास्त पाडणारा विजेता.
४)चेंडूटोपली=टप्प्याने चेंडू टोपलीत घालवणे तीन संधी जो जास्तवेळा घालवेल तो विजेता.
५)पत्तेफेक=खुर्चीवर बसुन डाव्या हाताने उजव्या हाताचे कोपर पकडून उजव्या अंगठा व तर्जनीने १०पत्ते २ मीटरवरील हॅटमध्ये टाकावेत.फक्त मनगटातुन हालचाल करावी.जास्त टाकणारा विजेता.
[12/30, 9:42 PM] Mote Gondi: दिनांक- ३०/१२/२०१५
मनोरंजनात्मक पारंपरीक खेळ -
१)अांबा कोय खेळ-
२)चिंचोके खेळ -
३)सळीची गाडी-
४)चाकोरी फिरवणे-
५)चिखलात सळी मारणे-
६)गारगोट्यांचा खेळ -
७)सागर गोट्या -
८)जिबल्यांचा खेळ-
९)सूर-पारंब्या-
१०)काचा कवड्या-
११)लगोर चेंडू-
१२)विटि-दांडू-
१३)भोवरा फिरवणे-
१४)काटवट कणा-
१५)स्टॅच्यू करणे -
१६)पैज लावणे-
१७)दोर उडी-
१८)लंगडी-
१९)अांधळी कोशिंबीर-
२०)पोहणे-
२१)झिंमा-फुगडी-
२२)कांदा फोडणी-
२३)फुलपाखरू पकडणे -
२४)पत्यांचा बंगला-
२५)दोरी मल्लखांब -
२६) खांब मल्लखांब -
२७)मनोरे-
२८)डबलबार-
२९)सिंगलबार-
३०)करेल फिरविणे-
३१)रिंगण कुस्ती-
३२)मातीतील कुस्ती -
३३)लपाछपी-
३४)चोर-पोलीस-
३५)भातूकलीचा खेळ-
       नितीन मोटे  🙏🀊?
[12/30, 9:43 PM] Mahesh Lokhande: ६)कागद पदन्यास=दीडफुटाचे पुठ्याचे तुकडे घेवुन त्यावरुन १०मीटर अंतरापर्यंत जाणे.पाय जमीनीला लागुन देवु नयेत.जो प्रथम जाईल तो विजेता.हा खेळ जोडीनेही घेता येईल एकाने पुठ्ठे ठेवणे एकाने चालणे.असा खेळ वीटा वापरुन कागद वापरुनही घेता येईल.
७)पोत्यात पाय घालुन चालणे(पोत्याची शर्यत)=२०मीटर अंतरावर पोत्यासह उड्या मारत धावत जाणे.जो प्रथम जाईल तो विजेता.
८)गोळी शोधणे=हात मागे बांधुन गुडघ्यावर बसावे समोर बशीत गव्हाच्या पीठात तळाशी लिमलेटची गोळी
असेल ती बशीवर फुंकर मारुन गोळी तोंडाने उचलुन खावी जो प्रथम खाईल तो विजेता.
९)बाटलीत वाटाणे टाकणे=उंच पाठीच्या खुर्चीवर असलेल्या लहान तोंडाच्या बाटलीत खुर्चीमागे उभे राहुन खुर्चीला धक्का न लावता हात सरळ करुन ५ वाटाणे टाकणे ज्याचे जास्त बाटलीत पडतील तो विजेता.
१०)बाटली भरण्याची स्पर्धा=बादलीतील पाणी ओंजळीने बाटलीत टाकुन बाटली भरणे व ३० मीटरवरील प्रारंभ रेषेवर भरलेली बाटली घेवुन पळत येणे.प्रथम येणारा विजेता.हीच स्पर्धा ६ मीटरवरील बादलीतील ओंजळीने पाणी आणून बाटली भरणे अशी ही घेता येईल.
[12/30, 9:44 PM] भालदारमॅडम ज्ञा: 🙏🏻🙏🏻भांडीकुंडी, बिट्या, दुकानदुकान,भातुकली,लपाछपी,
[12/30, 9:46 PM] खोतसर ज्ञा: ठराविक अंतर ठेवून गोल मारून एक खुंटी रोवून खंटीत रिंगा टाकणे व त्यामधे अडकवणे. जास्त अडकवतील तो जिंकले. असाही खेळ घेता येईल.
[12/30, 9:49 PM] Mahesh Lokhande: ११)पाठीवरील फुगा फोडणे=प्रत्येकाच्या कमरेस फुगा बांधणे प्रत्येकाने आपला फुगा वाचवुन दुसर्‍याचा फुगा फोडणे.वर्तुळाबाहेर जावु नये.शेवटी फुगा टिकुन राहील तो विजेता.
१२)फुगायुद्ध=डाव्या पायाच्या पोटरीस फुगे बांधावेत.प्रत्येकाने आपला फुगा वाचवुन दुसर्‍याचि फुगा हाताने फोडणे.शेवटी राहणारा फुगेवाला विजेता.
१३)हातातला फुगा फोडणे=१५मीटरवर पळत जावुन हातातल्या फुग्यास फुगवुन दोरा बांधुन फोडावा.आधी फोडणारा विजेता.
१४)बसुन फुगा फोडणे=१५ मीटर अंतरावर पळत जावुन फुगा फुगवुन बांधुन खाली ठेवुन त्यावर बसुन फोडणे.प्रथम फोडणारा विजेता.
१५)पदार्थ परिचय=डोळे बांधुन पाकीटाचा वास घेवुन पदार्थ ओळखणे.कांदा लसुन कापुर डांबर गोळी फुले अत्तर ठेवावे.
[12/30, 9:52 PM] भालदारमॅडम ज्ञा: रेन फाॅल हाखेळ घेता येईल शिक्षकांनी आपला हात वर वर केला की टाळ्यांचा आवाजवाढवावा.हात खाली येईल तसा आवाज कमी कमी करावा.पाऊस पडल्याचा भास होतौ.
[12/30, 9:53 PM] Mahesh Lokhande: १६)वस्तुपारख=सर्वांच्या चपला बुट मोजे पेन एकत्र करुन ढिगातुन आपल्या वस्तु प्रथम काढणारा विजेता.
१७)फुगेफोड=भितींवर बांधलेले फुगे चेंडूने फोडणे ३संधी.जास्त फोडणारा विजेता.
१८)मेणबत्या विझवणे=टेबलावरील २डझन मेणबत्या उशीवर हनुवटी ठेवुन जोरात फुंकर मारुन ६इंच अंतरावरुन विझवणे.जास्त मेणबत्त्या विझवणारा विजेता.
१९)चेंडूफेकस्पर्धा=चेंडु फेकुन पहिला टप्पा पडेल तिथे उभे राहावे.दुसर्‍याचा मागे पडला तर तो बाद जर पुढे गेला तर पहिला बाद.सर्वात लांब टप्पा पडणारा विजेता.
२०)गुंडाळीतुन शरीर काढणे=५ फुट दोरीची टोके जोडुन केलेल्या गुंडाळीतुन शरीर काढणे गटाने करणे एकाचे नंतर दुसर्‍याचे असे जो गट करेल तो जिंकेल.
[12/30, 9:56 PM] भालदारमॅडम ज्ञा: सर👌🏻👌🏻रेनफाॅल हा खेळ आपण एका बोटाने टाळी दोन बोटाने टाळी तिन बोटाने नंतर चार बोटाने नंतरपाच बोटाने असा देखील खेळता येतो.
[12/30, 10:00 PM] Mote Gondi: बालअानंद  मेळाव्यात वरिल पेकी निवडक पारंपारीक स्मृतीअाड खेळाला  स्पर्धात्मक उजाळा मिळावा .✔🙏?
[12/30, 10:01 PM] Mahesh Lokhande: २१)कलिंगड खाणे=५ पावलावरील पानावरील कलिंगड खाप हात मागे बांधुन तोंडाने खाणे संपुर्ण लाल भाग प्रथम खाणारा विजेता.
२२)खजिनाशोध=सहलीवेळी पिशवीत वस्ती ठेवुन लपवुन ठेवणे दुसर्‍या गटाने खजिना शोधुन काढणे.
२३)पादत्राणशोध=चपला बुट ढिग एकत्र करुन त्यातुन आपले पादत्राण शोधणारा विजेता.
२४)सुईदोरा=डोळे बांधुन सुईत प्रथम दोरा ओवणारा विजेता.
२५)पुष्पगुच्छ तयार करणे=२०मिनिटात आसपासची पाने फुले गवत फांद्या वापरुन पुष्पगुच्छ बनविणे उत्कृष्ट बनवणारा विजेता.
[12/30, 10:05 PM] उदय भंडारे: या चर्चेतुन आपले बालपण डोळ्यासमोर आले . याच खेळातुन खरा आनंद मिळायचा .
[12/30, 10:08 PM] उदय भंडारे: यातील कितीतरी खेळ आपण सहज शाळेत घेऊ शकतो .
[12/30, 10:08 PM] Mote Gondi: रोज एक वेगळा खेळ शाळेत मुलांसमवेत घेऊया
[12/30, 10:11 PM] Mahesh Lokhande: २६)स्ट्राॅने वाटाणे उचलणे=स्ट्राॅ तोंडात धरुन १ मिनिटात एका बशीतील वाटाण स्ट्राॅने उचलुन दुसर्‍या बशीत टाकणे जास्त वाटाणे टाकणारा विजेता.
२७)चेंडू सरळ रेषेत नेणे=कॅरमसारख्या बोर्डवर खिळे ठोकुन ओळी तयार कराव्या ओळीतुन चेंडू १मिनिटात फुंकर मारीन अंतिम टोकाकडे नेणे.
२८)डोळे बांधुन खाऊ भरवणे=दोघांस २०पावलावर डोळे बांधुन हातात बिस्किट द्यावे तिथुन चालत येवुन एकमेकास भरवणे.
२९)खेचाखेच=२संघांनी समोरासमोर कंबरेस पकडुन थांबावे रेषेवर पहिल्या खेळाडूंनी हात धरुन खेचावे इतरांनी कंबरेस पकडून खेचणे.
३०)टिकली लावणे=स्त्री चित्रावर डोळे बांधुन टिकली लावणे.
[12/30, 10:21 PM] Mahesh Lokhande: ३१)पासिंग द पार्सल=वर्तुळाकार वस्तु पास करणे संगीत थांबता ज्याजवळ पार्सल (पेन रुमाल टोपी)असेल त्याने चिठ्ठी वाचुन कृती (गमतीदार शिक्षा)करावी.(रडणे,नाचणे,नक्कल,आवाज काढणे)
३२)ठो म्हणा=वर्तुळाकार बसुन १,२,३....म्हणणे ५येणाराने ठो म्हणावे ५पटीच्या संख्या आली की ठो म्हणावे.चुकेल तो बाद शेवटी राहणारा विजेता.
३३)पत्त्यांचा खेळ=चौकोनावर पळणे चार कोपर्‍यांस चार रंग नावे.कोपर्‍यावर गोल.मध्येच पत्ते रंगीत त्यातुन जो रंग पत्ता निघेल त्या गोलात असणारे बाद.
३४)चेंडूचा वर्षाव=२ गटांनी एकमेकांचे अंगणात चेंडू वर्षाव करतील चेंडु पडला की १गुण पण चेंडु झेलला तर झेलणार्‍या संघास गुण.ज्यांचे प्रथम १० गुण होतील तो संघ विजेता.
३५)नेमबाजी=भिंतीवर टार्गेटबोर्डवर बाण मारणे तीन संधी बोर्डवर ज्या वर्तुळात बाण लागेल तेवढे गुण द्यावेत जास्त गुण तो विजेता.
[12/30, 10:35 PM] Mahesh Lokhande: ३६)कडीचेंडू=४मीटरवर भिंतीवर कडी लावणे त्यात ३संधीत चेंडू कडीत टाकणे.
३७)काॅल बाॅल=चेंडु वर उडवावा दोन गटातील जे झेलतील त्यांस एक गुण.जो गट १०झेल प्रथम घेईल तो संघ विजेता.
३८)दात व ब्रश=लहान गट करावेत एकास टुथब्रश बाकींच्यापैकी काही दात व जास्त किटाणु होतील.दातवाले ओळीत थांबतील.किटाणु दातांभोवती पळतील टुथब्रशने किटाणु पकडणे.पकडल्यावर किटाणु बाद होतील.ज्या गटातील सर्व किटाणुबाद होतील तो गट विजेता.
३९)काड्यापेटी पाडणे=जोडीने उवा हात पकडावा एक हात मागे ठेवावा.पालथ्या हातावर काडीपेटी ठेवावी.आपली काडीपेटी पडू न देता दुसर्‍याची पाडणे ज्याची शेवटी राहील तो विजेता.
४०)दोरीफेक=५ मीटर अंतरावरच्या तीन वर्तुळात दोरी टाकणे मधल्या वर्तुळात पडल्यास १गुण.५संधी जो अधिक गुण घेईल तो विजेता.
[12/30, 10:39 PM] Mahesh Lokhande: खोतसर,समीरसर,मोटेसर,भालदारमॅडम,सुनिता लोकरेमॅडम,भंडारेसर,वाघमॅडम, होनरावमॅडम सर्वांचे आभार🙏🙏🙏🙏🙏🙏🙏