[1/12, 5:04 PM] Mahesh Lokhande: 🔴 ग्रुपचर्चासत्र २ ७🔴
🌍 चर्चेचा विषय🌍
🔶 गणितखेळ🔶
🔶चर्चेस वेळ दि. १२/१/२०१६ रात्री ९.३० ते१०.३०पर्यंत.🔶 सर्वांनी चर्चेत सहभागी व्हावे.🔵 आपले योगदान आमच्यासाठी अनमोल आहे.🙏🙏🙏🙏🙏🙏
[1/12, 7:02 PM] आसिफ मौला शेखसर: [11/12, 07:30] 🌹संतोष भोंबळे शेगाव Ⓜ🅰🅿🌞:
इयत्ता पहिली करिता गणिताताचे ज्ञानरचनावाद साहित्य
--- श्री.संतोष भोंबळे शेगाव
३ ) साहित्याचे नाव : - अंकाची गंमत
उद्देश : - खेळाातून गणिताची आवड निर्माण करणे व चित्रकलेतुन अंकाचे ज्ञान होण्यास मदत करणे.
साहित्य : - फरशीवर किंवा भिंतीवर एक रिकामा काळ्या ◼ रंगातील चौकडा व खडु इत्यादी .
साहित्य कृती : -
१) काळ्या रंगातील चौकड्यात पांढ-या रंगाची वेगवेगळ्या ठिकाणी एखादी आक्रुती तयार होईल असे ठिपके काढुन घ्यावेत.
२) मुले पांढऱ्या ठिपक्यांना त्यांचा कल्पकतेतुन अनुक्रमांक देतील
३) १ , २ याप्रमाणे कोणतेही अंक लिहतील
४) अंकातूनं तयार होणारे चित्र काढतील .
५) वरिल क्रंमाक देणे हे विद्यार्थींच करतील तसेच अंक कादून चित्र काढतील.
शिक्षकांना सुचना- इथे विद्याथर्याची चित्रकला चांगली" असणे अपेक्षित नाही .
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
४) साहित्याचे नाव : - अंकांचे घर
उद्देश : 'अंकाचे आकलन वाढविणे, सुसंगत विचार कौशल्य निरीक्षण वाढीस लागणे . बघणे व लिहिणे या कृतीतील समन्वय समजणे व हातावर नियंत्रण राहण्यास मदत करणे .
साहित्य : - फरशीवर किंवा भिंतीवर एक रिकामा काळ्या ◼ रंगातील चौकड्यात एकीकडे मुल व एकिकडे घर काढावे व खडु इत्यादी .
साहित्य कृती : -
१) काळ्या रंगातील चौकड्यात पांढ-या रंगाची वेगवेगळ्या ठिकाणी एखादी आक्रुती तयार होईल असे ठिपके काढुन घ्यावेत.
२) मुले पांढऱ्या ठिपक्यांना त्यांचा कल्पकतेतुन अनुक्रमांक देतील
३) १ , २ याप्रमाणे कोणतेही अंक लिहतील
४) रेषा एकमेकांना न छेदता हे अंक जोडायचे आहेत हे जोडतांना योग्य क्रमाने ते जोडून शेवटी तो रेषा घरापर्यत न्यायची आहे.
➖➖➖➖Ⓜ🅰🅿➖➖➖
[1/12, 8:18 PM] आसिफ मौला शेखसर: गणित
[29/06 8:00 PM] asif: दहाचा खेळ
दहाचा खेळ : दहा मुलांना गोलात उभे करा. शिक्षकांनी टाळी वाजवल्यावर उजव्या हाताचा पंजा प्रतेक मुलाने वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला करायचं आहे.
आता सगळ्या मुलांना वर केलेले हात मोजून लिहाण्यास सांगावे.खाली केलेले हात सुद्धा मोजून लिहयला सांगावे.
शाब्दिक उदाहरणे :
· मुलांना हातच्याची शाब्दिक उदाहरणे सोडवायला द्यावी.
· प्रश्नामध्येकाय माहिती दिली आहे? काय विचारले आहे?उत्तर काढण्यासाठी काय करावे लागेल या तीन प्रश्नावर चर्चा करावी.
· शाब्दिक उदाहरण,स्ट्रॉ इतर वस्तूंच्या साह्याने प्रत्यक्ष कृतिद्वारे सोडवावे.
· सोडवलेले उदाहरण कोसटकमध्ये मांडावे व सोडवावे.आलेले उत्तर पूर्ण वाक्यात लिहावे.
· तोंडी बेरीज तक्त्याच्या मदतीने
· मुलांना बेरजेची तोंडी उदाहरणे विचारावी.
· तीन ते चार मुलांचे गुत करावे.प्रतेक गटामध्ये बेरजेचा चार्ट द्यावा. दोन मुलांना तक्त्यामधील उभ्या व आडव्या ओळीतील कोणत्याही एका संख्यावर बोट ठेवण्यास सांगावे व दोघांचेही बोट जेथे मिळेल ती संख्या म्हणजे निवडलेल्या आधीच्या दोन संख्यांची बेरीज असेल.
· संख्यारेषेच्या मदतीने बेरीज: जमिनीवर संख्यारेषा काढावी.संख्यारेषेच्या मदतीने अंकांची बेरीज मुलांना करून दाखवावी.
[1/12, 8:18 PM] आसिफ मौला शेखसर: गणित
[29/06 8:00 PM] asif: दहाचा खेळ
दहाचा खेळ : दहा मुलांना गोलात उभे करा. शिक्षकांनी टाळी वाजवल्यावर उजव्या हाताचा पंजा प्रतेक मुलाने वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला करायचं आहे.
आता सगळ्या मुलांना वर केलेले हात मोजून लिहाण्यास सांगावे.खाली केलेले हात सुद्धा मोजून लिहयला सांगावे.
शाब्दिक उदाहरणे :
· मुलांना हातच्याची शाब्दिक उदाहरणे सोडवायला द्यावी.
· प्रश्नामध्येकाय माहिती दिली आहे? काय विचारले आहे?उत्तर काढण्यासाठी काय करावे लागेल या तीन प्रश्नावर चर्चा करावी.
· शाब्दिक उदाहरण,स्ट्रॉ इतर वस्तूंच्या साह्याने प्रत्यक्ष कृतिद्वारे सोडवावे.
· सोडवलेले उदाहरण कोसटकमध्ये मांडावे व सोडवावे.आलेले उत्तर पूर्ण वाक्यात लिहावे.
· तोंडी बेरीज तक्त्याच्या मदतीने
· मुलांना बेरजेची तोंडी उदाहरणे विचारावी.
· तीन ते चार मुलांचे गुत करावे.प्रतेक गटामध्ये बेरजेचा चार्ट द्यावा. दोन मुलांना तक्त्यामधील उभ्या व आडव्या ओळीतील कोणत्याही एका संख्यावर बोट ठेवण्यास सांगावे व दोघांचेही बोट जेथे मिळेल ती संख्या म्हणजे निवडलेल्या आधीच्या दोन संख्यांची बेरीज असेल.
· संख्यारेषेच्या मदतीने बेरीज: जमिनीवर संख्यारेषा काढावी.संख्यारेषेच्या मदतीने अंकांची बेरीज मुलांना करून दाखवावी.
🌹आसिफ मौला शेख🌹
[1/12, 9:32 PM] समीरअॅ: गणितीय खेळ
१) चला पाढे शिकू या
२) चला मामाच्या गावाला जाऊ या
३) मैदानावरील घड्याळ
४) मैदानावरील वर्तुळ
५) अंकांची गमत
६) अंक कार्ड
७)मँट आणि बॉल
८)मणी तारा
९) परिसरातील वस्तू मुलभूत क्रियांसाठी
१०) तराजू ,माप
११) अपूर्णांकाची गंमत
१२) अध्ययन कार्ड
१३) ABL कार्ड
१४) शतक, दशक प्रतिके
[1/12, 9:37 PM] होनरावमॅम ज्ञा: शतक मणी माळेवर मणी मोजणे,सापशिडी,
.
[1/12, 9:38 PM] खोतसर ज्ञा: बेरीज व वजाबाकी करणेसाठी बिट्याचा खेळ ♦काचकवड्याचा खेळ
[1/12, 9:38 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: दूकानदार आणि ग्राहक....परीमाणे ..ओळखा..खेळ...
[1/12, 9:39 PM] होनरावमॅम ज्ञा: बाजार भरवणे
.
[1/12, 9:40 PM] सुनिता लोकरे: १अंकगोलाचे खेळ
२संख्याचे गाणे
३टाळया वाजवून संख्या सांगणे
४चित्रावर बिया ठेवणे
५शिवाजी म्हणतो
६संख्या वाचा ठिपके काढा
[1/12, 9:41 PM] खोतसर ज्ञा: चिंचोक्याच्या किंवा मण्यांचा वापर करून लहान मोठी संख्या ओळखण्यांचा खेळ.
[1/12, 9:42 PM] सुनिता लोकरे: संख्या वाचा खडे ठेवा
धूळ पाटी
[1/12, 9:44 PM] आसिफ मौला शेखसर: आज गणित व परिसर अभ्यास सहसंबंध:
चढता व उतरता क्रम:
घरातील सदस्य यांची आपल्याशी म्हणजे मुलांशी नाते
उदा:आजी,आजोबा,आई,वडील, बहिण, लहान भाऊ वा मोठा भाऊ इत्यादी.
त्यांचा चढता वा उतरता क्रम लावणे....
२.त्यांचे वय लिहण्यास सांगणे.
चढता वा उतरता क्रम लिहण्यास सांगणे
३.दप्तरातील वस्तु पेन,वही,कंपास,पट्टी,खोडरबर इत्यादी साहित्यांचा आकारानूसार क्रम लावणे
....नंतर त्यांच्या किंमतीनुसार चढता वा उतरता क्रम लावणे
🌹आसिफ मौला शेख🌹
[1/12, 9:44 PM] सुनिता लोकरे: लहान मोठी संख्या सांगा
दशक गठ्ठे
मणी ओवणे
[1/12, 9:45 PM] आसिफ मौला शेखसर: गणित व शारीरिक शिक्षण सहसंबंध:
संख्याचा लहान मोठेपणा
तीन मुले घ्या.
एका डावीकडे व उजवीकडे संख्या कार्ड देउन उभे करा.
मध्यभागी एका मुलाला ऊभे करून जी संख्या मोठी तो हात कमरेवर ठेवा...
अशाप्रकारे लहान मोठेपणा मुलांना आनंददाय पद्वतीने घेता येईल.
🌹आसिफ मौला शेख🌹
[1/12, 9:46 PM] सुनिता लोकरे: चित्राद्वारे अंकांची ओळख संख्याचे वाचन लेखन तुलना
[1/12, 9:46 PM] आसिफ मौला शेखसर: गणित व इतिहास सहसंबंध:
१.भारत केंव्हा स्वतंत्र झाला?
२.शिवाजी महारांजाचा जन्म केंव्हा झाला?
अशाप्रकारे प्रश्न विचारून ती चार अंकी संख्या लिहता व ओळखता येते.तसेच शाब्दीक उदाहरणाची ओळख होईल.
भूगोल व नागरीकशास्र:
१.भारतातील घटकराज्ये?
२.कलमे कीती?
अशाप्रकारे ही प्रश्न विचारून अंकाची व भारताची ओळख देता येते.
🌹आसिफ मौला शेख🌹
[1/12, 9:48 PM] भालदारमॅडम ज्ञा: सापशिडी,अंकांची करामत,१ते५अंक कार्ड शिट कागदाचिटकवून ५मुलांच्या हातात एकएक कार्ड देवून गाडी बनवून अंकाची ओळख,१ते१॰॰अंक जमिनीवर लेखन करून मूळसंख्या वसंयुक्तसंख्या वेगवेगळ्या रंगाने रंगवूनत्यावरउड्या मारणे,अंकचक्र,संख्या जोडा संख्या तयार करा, चौकोना घरे तयार करून त्यात संख्या लेखन करणे चौकोनाच्या बाहेर वजा,अधिक,गूणाकार,भागाकार चिन्हासह संख्यालेखन करणे मुलांना चौकोनातील संख्या वचौकोनाबाहेरील संख्या घेऊन उदाहरण तयार करण्यास लावणे.
[1/12, 9:48 PM] आसिफ मौला शेखसर: गणित व कार्यानुभव यांचा सहसंबंध:
®रोमनसंख्या तयार करणे.
1⃣खराट्याच्या काड्यापासुन रोमन अंक तयार करण्यास सांगणे.
2⃣काडीपेटीच्या काड्यापासून रोमन अंकाचा सराव घेणे.
भौमितीक आकृत्यांची माहिती करून देणे व मापे मोजणे
1⃣काडीपेटी पासुन चौकोन व आयत सांगणे.मापे मोजण्यास सांगणे.
2⃣सीडी डीस्क वर्तुळाची ओळख व मोजणे अशा प्रकारे आपण शिकवू शकतो.
अशाप्रकारे आनंददायी पद्भतीने आपण मुलांना शिकवू शकतो.
🌹आसिफ मौला शेख🌹
pvdnyan.blogspot.in
[1/12, 9:49 PM] Mahesh Lokhande: खेळातून गणित
साहित्य=खेळाचा पट ,फासे,चकत्या ,उदाहरणकार्ड
कृती=विद्यार्थी फासा टाकेल,दानानुसार पटावर चकती पुढे नेईल.कार्डावरील उदाहरण त्या घरातले सोडवणे,बरोबर आल्यास कार्ड जवळ ठेवेल.
खेळ संपेपर्यंत जो अधिक कार्ड जिंकेल तो विजेता.
[1/12, 9:49 PM] सुनिता लोकरे: मँचिंग सेट
अंकराशी
शून्याचा खेळ
[1/12, 9:49 PM] आसिफ मौला शेखसर: गणित व कार्यानुभव यांचा सहसंबंध:
१.छोटे चार बाॅक्स करा.(सापशिडीच्या खेळताना वापरतो तसे पण थोडे मोठे)
२.त्यावर अंक लिहा.
३.चारीही बाॅक्स टाकायचे व ते अंक लिहा.
४.परत तीच क्रिया करा व अंक खाली लिहा.
५.बेरीज वजाबाकी या क्रिया करण्यास सांगावे.
🌹आसिफ मौला शेख🌹
[1/12, 9:50 PM] आसिफ मौला शेखसर: इंग्रजी व गणिताचा सहसंबंध:
A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U
V W X Y Z
उदा: ANT= 1+14+20
=35
अशाप्रकारे आपण मूलभूतक्रिया घेऊ शकतो.
🌹आसिफ मौला शेख🌹
[1/12, 9:50 PM] Mote Gondi: भूमिती अाकृत्या काड्या चिंचोके ,बिया पासून तयार करा.
एकास एक संगती.
टाळ्यांचा खेळ .
बेरीज ,वजाबाकी अागगाडी.
गठ्ठे सुट्टे करूया .
शिवाजी म्हणतो २
अंक शिडी .
गणिती शब्दांचा खेळ .
[1/12, 9:53 PM] आसिफ मौला शेखसर: चोर पोलीस असे चिट्यापाणी आपली मूले खेळतात ते खेळ आवश्य घ्या मित्रानो पण त्यावर आपण चार अंकी संख्या आपण कोणतेही लिहा व खेळा म्हणायचे त्या मांडण्यास सांगून वजाबाकी बेरीज अशा क्रिया करून घ्या...
🌹आसिफ मौला शेख🌹
[1/12, 9:54 PM] हिलेमॅडम: टप्प्याने संख्या ओळख
[1/12, 9:54 PM] Mahesh Lokhande: समान उत्तरांची उदाहरणे शोधू
साहित्य=स्वाध्यायकार्ड ,संख्याकार्ड,टिकल्या
कृती=४उदाहरणांचे कार्ड घेतील समान उत्तर असणारांखाली टिकल्या ठेवतील.गटनायक बरोबर असणारास १गुण देईल.१५ मिनिटात अधिक कार्ड अचुक सोडवणारा विजेता
[1/12, 9:55 PM] Mahesh Lokhande: १)लांब आखूड सांगा
२)एकेकाने यावे फलकावर रेघ मारुन जावे.
३)जवळ दूर ठेवुया
४)जड हलके सांगा
५)कोणाचा वार कोणता
६)टाळी द्या वार सांगा
७)वार सांगु क्रम लावू
८)लहान की मोठा
९)मोजा पाहू
१०)चित्रे मोजूया
११)कोण जिंकले?
१२)किती टोल पडले?
१३)ऐकूया मोजूया
१४)गटात तुम्ही किती जण ?
१५)चित्रे काढूया चित्रे मोजूया
१६)वस्तु मोजूया
१७)संख्यासाखळी
१८)टाळी द्या टाळी घ्या
१९)जोड्या लावा
२०)म्हातारीचे घर
२१)संख्यालेखनस्पर्धा
२२)वर्तुळातील खेळ
२३)कितीने कमी कितीने जास्त
२४)चित्रे मोजू बेरीज करु
२५)सांगा सांगा उरले किती?
२६)अंकाची गाणे गाऊया
२७)बेरजेची गंमत
२८)दहा शेपटीवाला उंदीर
२९)पेटीत वस्तू किती?
३०)किती उरले ?
३१)पेरु तोडू पेरु मिळवू
३२)क्रमस्पर्धा
३३)चेंडू घ्या पुढे द्या.
३४) डाॅमिनो पाहू बेरिज करु
३५)दशक सुट्टे मांडूया
३६)सांगा सांगा दशक किती?
३७)पान काढा संख्या वाचा
३८)किती झाले सांगा
३९)पट्ट्या जोडा बेरिज करा
४०)ऐकूया करुया
४१)सारीपाट खेळूया
४२)खेळता खेळता गणित सोडवू
४३)फुले घ्या फुले
४४)दुकान दुकान
४५) सांगि सांगा लवकर सांगा
४६)सवाल जबाब
४७)चिठ्ठी उचला उदाहरण सोडवा
४८)पाहुणा शोधा
४९)भाऊ भाऊ
५०)खेळातून गणित
[1/12, 9:55 PM] सुनिता लोकरे: बिया मांडा-फरशीवर संख्या लिहणे मुलांना ती मोठ्याने वाचण्यास सांगणे त्यावर बिया योग्य वळणानुसार ठेवण्यास सांगणे अंकाच्या आकारानुसार रचना करण्यास सांगणे
[1/12, 9:57 PM] खोतसर ज्ञा: वर्तूळाकार उभे रहाणे. समोर एकेक संख्याकार्ड ठेवणे. टाळ्या वाजवत वर्तूळाकार फिरणे. इशारा मिळताच जवळच्या संख्याकार्डाजवळ थांबणे आणि आपल्या समोरचे संख्याकार्ड मोठ्याने वाचणे.
[1/12, 9:57 PM] Mote Gondi: अंकचक्र
संख्या ओळखा .
चला स्थानावर बसूया .
ज्याचे त्याला द्या.
[1/12, 9:58 PM] Mahesh Lokhande: १००संख्यांचा चौरस
प्रत्येकाने प्रश्नचिठ्ठी वाचून उत्तर संख्याचौरसानुसार सांगणे.अचुक सांगणारास १ गुण ३०मिनिटात अधिक गुण मिळविणारा विजेता.
[1/12, 9:58 PM] खोतसर ज्ञा: तुम्ही सांगा मी ओळखतो
[1/12, 9:59 PM] हिलेमॅडम: अंककार्ड देऊन त्यावरून शाब्दिक उदाहरणे बनवन्यास दिल्यास गटांमध्ये स्पर्धा निर्माण होते त्यासाठी ठरविक वेळ द्यावा म्हणजे मुले जास्तीत जास्त उदाहरणे एकमेकांच्या सहायाने पटकन करतात
[1/12, 9:59 PM] आसिफ मौला शेखसर: आपण लहान पणी क्रिकेटचा खेळ खेळत असू पुस्तकामधून पान उलगड्याचो.....ते धावा आपण वहीत लिहायचो...किंवा आपण चित्रे पाहून टाळ्या मारत...
तो क्रिकेटचा खेळ आपण घेतला तर
पहिला पुस्तकातील पान उलगडला समजा तो २४ पान नंबर आला एकक स्थानी ४ अंक आहे ४फळ्या वर लिहा अशाच प्रकारे सहा वेळा उलगड्यानास द्या.व दुसर्या मुलाला सहा वेळा उलगड्यानास द्या ....बेरीज वजाबाकि या क्रिया घेता येतील...
🌹आसिफ मौला शेख🌹
[1/12, 10:02 PM] Mahesh Lokhande: चढता उतरता क्रम
२ गट विरुध्द गटास ३ संख्या देतील तो गट चढता उतरत्या क्रमाने मांडेल अचुक असल्या १ गुण.जो गट ३० मिनिटात अधिक गुण मिळवेल तो गट विजेता.
[1/12, 10:05 PM] उज्वला पाटील रेठरे: व्यास हा ञिज्येच्या दुप्पट असतो .हे मैदानावर वतुळाच्या साह्याने दाखवून देणे
[1/12, 10:05 PM] Mahesh Lokhande: भाऊ भाऊ
विद्यार्थी गळ्यात चित्रकार्ड घालुन गोलावर फिरतील ताल थांबताच सारखे आकाराचे जोडी करतील पुन्हा जोडी न मिळणारा बाद कार्ड बदलुन संगीतखुर्चीसारखा खेळ घेणे शेवटची जोडी विजेती.
[1/12, 10:05 PM] होनरावमॅम ज्ञा: 1 ते 100 संख्या फरशीवर लेखन करून त्यावर प्रश्न निर्माण करणे उत्तर शोधणे
.
[1/12, 10:07 PM] आसिफ मौला शेखसर: विविध खेळ
उद्देश : 0 ते 99 संख्यांची समज व लेखन
साहित्य : आईस्र्म्चे चमचे,रबर बॅंड,संख्यामाळ,बांगडी,लहान-मोठ्या ठिपकयांचा कागद
कृती : प्रत्येक मुलाला 10 आईस्र्म्चया काड्याना रबर बॅंड लाऊन 10-10 चे गठ्ठे तयार सांगणे.दोन मुलांच्या गटात असे 10-10 चे गठ्ठे व सुटे चमचे ठेवावेत.विशिष्ट समूह घेऊन तो किती आहे ते दुसर्याने ओळखावे व त्याची नोंद करावी .
10चे गठ्ठे सुटे एकूण
उदा. 2 5 25
[1/12, 10:07 PM] आसिफ मौला शेखसर: : बाकांच्या ओळीप्रमाणे गट करून ह.श.द.ए.याप्रमाणे गटांना नावे द्यावीत.फळ्यावर गटानुरूप भाग पाडून गटांची नावे लिहावीत.मुलांना ०ते९ अंक द्यावेत.एखादी संख्या पुकारून प्रत्येक ओळीतील एकाएका मुलाला पुढे बोलवावे.फळ्यावर दाखवलेल्या स्थानानुरूप त्यांना उभे करावे.मुले आपल्याजवळील अंकाचे कार्ड दाखवून संख्या-स्थान,विस्तार,स्थानिक किंमत इ.सांगतील.अंकाची अदलाबदल करुन स्थानिक किंमतीतील फरकही घेता येईल.
[1/12, 10:09 PM] हिलेमॅडम: गोलाकार वर्तुल काढून त्यामद्ये चार रंगाचे पेन वापरून चार प्रकारे लहान मोठे ठिपके काढावेत ते वर्तुळाकार साधन मुलाना देऊन त्यावर एक रिंग टाकन्यास सांगावे रिंगमध्ये येणारे टिपके विद्यार्थ्याना एकक दशक शतक हजार या प्रमाणात लिहन्यास सांगवी रिंग टाकन्याच्या खेलमुळे मुले एकक दशक शतक हजार संख्या लिहन्यास व् ओळखण्यास चटकन शिकतात.
[1/12, 10:09 PM] आसिफ मौला शेखसर: अलिकडेच सुचलेला एक नवा खेळ. यात मुलांना साध्या बेरजा आणि तुलना करता येईल.
साहित्यः
वेगवेगळ्या रंगाचे ओरिगामी कागद पाच, एक मोठा लांब कागद, आणि नोंद करायला वही , पेन्सिल
कृती:
सर्वात आधी अशा प्रकारच्या कृतीने उड्या मारणारे बेडुक तयार करुन घ्या. इंटर्नेटवर सर्च केल्यास बर्याच कॄती मिळतात, त्यातली हि अगदी सोप्पी वाटते.
http://familyfun.go.com/printables/printable-origami-jumpin-frog-703288/
जर मुल मोठं असेल तर त्यालाच ते बेडुक बनवायला शिकवा , नाहीतर स्वतः करुन द्या. हे बेडुक बोटाने दाबले की पुढे उड्या मारतात.
आता बेडकांवर ए बी सी डी इ अशी किंवा इतर कोणतीहि नावे घाला, आकडे नको.
मग त्या मोठ्या कागदावर समान अंतरावर चार आडव्या रेषा काढा.
रेषांना गुण ठरवा. सुरुवातीला १ ते ४ असे साधेच गुण ठेवा.
आता वहीमधे एक तक्ता करुन पाच उभे कॉलम आखा. त्यांना बेडकांच्या नावाचे हेडींग द्या. आपल्याला प्रत्येक बेडकाचे गुण लिहायचे आहेत.
आता बेडुक मोठ्या कागदाच्या एका बाजुला ठेवुन त्याला मुल बोटाने दाबेल. बेडकाची उडी कोणत्या रेषे पर्यंत पोचते ते बघुन त्या रेषेप्रमाणे गुण लिहा. मुल मोठं असेल तर गुण सुद्धा त्यानेच लिहिले तरी चालतील. नाहीतर तुम्ही लिहा.
अस करत सगळ्या पाचही बेडकांचे पहील्या फेरीमधले गुण लिहा.
अशा अजुन तीन किंवा पाच फेर्या करता येतील. त्यांचे गुण तसेच एका खाली एक लिहायचे.
आता मुलांना विचारुन एक एक बेरजा करता येतील एका वेळी केवळ दोन आकड्यांची बेरीज करु द्यायची. हव तर बोटांवर किंवा मण्यांवर मोजायला दिलं तरी चालेल.
कुठला बेडुक जिंकला ते माहिती करुन द्यायला मुलं बेरजा करतील जमत नसल्यास करुन दाखवावे पुढच्या वेळि तरी नक्की जमेल.
सगळ्या बेरजा झाल्या की कुठला आकडा मोठा कुठला लहान यांची तुलना सुद्धा करता येईल.
मोठ्या मुलांसाठी गुणाचे आकडे मोठे घेता येतील. म्हणजे १५, ३०, ४५ असे वगरे. उडी पहिल्या रेषे पर्यंत पोचलीच नाही तर गुण वजा करण्याचा नियम पण करता येईल.
मुलांना तक्ता कसा करायचा ते ही शिकवले जाईल.
[1/12, 10:10 PM] Mahesh Lokhande: पाहुणा शोधा
साहित्य=बांगडी,खण,रुमाल,नाणे,कागद काटकोनी,गुण्या,पुस्तक,ताट इ.
गटनायकाने ४ वस्तु देणे
वेगळ्या आकाराची गटात न बसणारी वस्तु शोधणारास १ गुण.जो २० मिनिटात अधिक गुण घेणारा विजेता.
[1/12, 10:10 PM] आसिफ मौला शेखसर: हा खेळ तुम्ही समोर बसलेले असतानाच खेळायचा. नाहीतर चुकून मुलं तोंडात/नाकात टाकू शकतात. जर तुमचा मुलगा/ मुलगी सगळ्या गोष्टी अजूनही तोंडात घालून बघत असेल तर हा खेळ इतक्यात खेळू नका.
साहित्य:
मोठे आणि मोठ्या भोकाचे मणी.
खूप जाड दोरा. खूप मोठा नको. नाहीतर मुलं गळ्याभोवती गुंडाळून घेतात.
कृती:
- दोऱ्याच्या एका बाजूला एक मणी बांधून टाका म्हणजे ओवलेले मणी पडणार नाहीत.
- आणि मुलांना ओवायाला द्या.
- ओवता येत नसेल नीट, तर दोऱ्याच्या एका बाजूला फेव्हीकोल लावून जरा कडक करा.
[1/12, 10:11 PM] आसिफ मौला शेखसर: दशक-एकक ही संकल्पना शिकवण्यासाठी मी काड्यांचे गठ्ठे व सुट्या काड्या वापरतो.
११ ते २० मध्ये असणार्या सर्व संख्या मुले गठ्ठे व काड्या या स्वरूपात ओळखतात.
१४ म्हणजे एक गठ्ठा आणि चार काड्या,
१७ म्हणजे एक गठ्ठा आणि सात काड्या असे मुले सांगू शकतात.
मग त्यांना गठ्ठ्याचे नाव दशक आणि काड्यांचे नाव एकक असे सांगून दशकाची सहज ओळख करून देता येते
यामुळे हातच्याची बेरीज करताना सहजता येते
[1/12, 10:11 PM] Pratiksha: एका अंकावर उडी मारणे
[1/12, 10:14 PM] Mahesh Lokhande: सांगा सांगा लवकर सांगा
वर्तुळाका फिरणे नायक सांगा सांगा लवकर सांगा म्हणतील
विद्यार्थी टाळ्यांच्या तालात काय सांगा म्हणणे नायक चार अधिक दोन किती सांगा असे उदा. विचारेल इतर चार अधिक दोन सहा म्हणतील तालात म्हणत फिरणे.
[1/12, 10:19 PM] Mahesh Lokhande: वर्तुळावर गोलाकार उदाहरण कार्ड मांडावीत वर्तुळात मुले बसतील एकएक जण उदा घेवुन उत्तर सांगेल बरोबर असल्यास पुन्हा आत चुकल्यास बाद वर्तुळाबाहेर जाईल शेवटी जो वर्तुळात राहील तो विजेता.
[1/12, 10:20 PM] उज्वला पाटील रेठरे: छोटी छोटी अंकाची कोडी तयार करुन घेणे .उभी आडवी बेरीज येणेसाठी रिकाम्या जागी अंक घालावेत
[1/12, 10:20 PM] आसिफ मौला शेखसर: गणिताचे पझलस आपण वर्गातील फरशीवर तसाप्रकारे आखणी करा व अंक लिहा मुले उत्तरे लिहतील....प्रिन्ट काढायची गरज नाही...
[1/12, 10:20 PM] आसिफ मौला शेखसर: maths puzzle...plz visit more puzzle zpschoolkandalgaon.blogspot.in
[1/12, 10:22 PM] Mote Gondi: दिनदर्शिका तारीख वाचन अंक कोडी.
चैतन्य अंक पाटी.
अंक पाट्या खेळ .
अंक चित्रे १ ते १० अंकांत
[1/12, 10:23 PM] आसिफ मौला शेखसर: दिनदर्शिका
घटक -:सरासरी
दिनदर्शिकाचा वापर करून आपण मुलांना दिलेल्या संख्याची सरासरी कशी काढतात हे आपण कृतीद्वारे शिकवू शकतो.
उदाहरणार्थ मी दिलेल्या दिनदर्शकेतील पहिल्या उभ्या रांगेतील तारखेची सरासरी काढताना..
१ २ ३ ४ ५ ६ ७ अशी तारीख आहे.
आता आपण तोंडी सरासरी काढताना काही सेंकदात उत्तर काढता येतो..
बघा ते अशा प्रकारे १+७=८/२=४
१+२+३+४+५+६+७=२८/७=४
ते आपण दिनदर्शिकेचा वापर करून अशा अनेक उदिहरणांचा सराव घेऊ शकतो.
तिरपी तारीख घ्या...
४ १२ २० २८ अशी तिरपी तारीख
४+२८=३२/२=१६
चौकोणी तारीख घ्या....
१, २ ,८ ,९.
१+९=१०/२=५
१+२+८+९=२०/४=५
अशापद्भतीने आपण दिनदर्शिकाचा वापर करूण सरासरी हा घटक आनंदादायी व सहज सोप्या भाषेत शिकवू शकतो....
🌹आसिफ मौला शेख🌹
[1/12, 10:23 PM] होनरावमॅम ज्ञा: दहा मुलांना पुढे उभे करून बोटांवर संख्या दाखवण्यास सांगणे.
[1/12, 10:24 PM] Mahesh Lokhande: बाॅक्समध्ये उदाहरणकार्ड ठेवावीत जो क्रमाने बाॅक्समधील उदाहरणकार्ड जोअधिक सोडवतील तो विजेता.
[1/12, 10:27 PM] आसिफ मौला शेखसर: पझलसाठी भेट द्या इंग्रजी अॅक्टीविटीसाठी व नवीन माहिती व आपल्या कमेन्ट पण आपण लिहा zpschoolkandalgaon.blogspot.in
[1/12, 10:27 PM] Mahesh Lokhande: दुकान दुकान
टोपल्यात वस्तु व संख्याकार्ड असेल.एक दुकानदार व गिर्हाईक इतर होतील व खोट्या नोटांनी वस्तु खरेदी विक्री करणे.
[1/12, 10:28 PM] आसिफ मौला शेखसर: आनंदमेळावा बाजारहाट उपक्रम
[1/12, 10:34 PM] Mahesh Lokhande: आसिफ मौला शेखसर,बुरकुलेसर,समीरसर,होनरावमॅडम,खोतसर,रशीद तांबोळीसर,सुनिता लोकरेमॅडम,भालदारमॅडम,मोटेसर,हिलेमॅडम,उज्वला पाटीलमॅडम,प्रतिक्षा गायकवाडमॅडम,दिपक निगडेसर सर्वांचे आभार🙏🙏🙏🙏🙏
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया द्या .