[1/10, 11:10 AM] Mahesh Lokhande: 🔴 ग्रुपचर्चासत्र २ ५ 🔴
🌍 चर्चेचा विषय🌍
🔶 भाषिक खेळ🔶
मुद्दे=१)भाषिक खेळ
२) भाषिक खेळाचे फायदे
🔶चर्चेस वेळ दि. १०/१/२०१६ रात्री ९.३० ते१०.३०पर्यंत.🔶 सर्वांनी चर्चेत सहभागी व्हावे.🔵 आपले योगदान आमच्यासाठी अनमोल आहे.🙏🙏🙏🙏🙏🙏
[1/10, 3:25 PM] आसिफ मौला शेखसर: भाषा व कला सहसंबंध
उपक्रम—:फरक ओळखा
वर्तमानपत्र मधील चित्रातील फरक ओळखून लिहण्यास सांगा.आनंददायी पद्धतीने मुले लिहतील. शब्द वाचन लेखन योग्यरित्या करतील व निरीक्षण करण्याची कौशल्य वा तंत्र आत्मसात करतील.
🌹आसिफ मौला शेख🌹
[1/10, 9:31 PM] बुरकुलेसर: भाषिक खेळ
१ शब्द अंताक्षरी
२शब्द कोडी
३नेम बॉल अँक्टीव्हीटी
४शब्दामध्ये दडलेला शब्द शोधणे
५आेळखा पाहू मी कोण
६एक अक्षर देवून त्यापासून १ अक्षरी ते सात अक्षरी शब्द तयार करणे
[1/10, 9:32 PM] दिपक निगडे अॅ: SCERT चे भाषिक खेळ हे पुस्तक फार उपयुक्त आहे यासाठी
[1/10, 9:40 PM] आसिफ मौला शेखसर: भाषिक खेळ
उत्तरे-:
१.सांजवेळ
२.किरकोळ
३.गदारोळ
४.काळवेळ
५.धुमाकूळ
६.उतावीळ
🌹आसिफ मौला शेख🌹
[1/10, 9:40 PM] आसिफ मौला शेखसर: भाषिक खेळ
खाली दोन रांगात अर्धे शब्द दिले आहेत.डावीकडच्या अर्घ्या शब्दाला शेवटी असा शब्द जोडायचा जो उजवीकडच्या अर्ध्या शब्दाचा सुरूवातीचा भाग असेल.....
उदाहरणार्थ,
महा.........पती
उत्तर—>राष्ट्र
१.नाग........ग्रस्त
२.जवाहर.....बहाद्दुर
३.तेंडूल......मरकर
४.राधा......कुमार
५.सिंह.....करी
६.सण......करी
७.सीता......लक्ष्मण
८.गौतम.......विहार
९.राष्ट्र........गायन
१०.क्रिया.......सिद्ध
🌹आसिफ मौला शेख🌹
[1/10, 9:40 PM] आसिफ मौला शेखसर: भाषिक खेळ
अर्थपूर्ण शब्द तयार करणे.
१.न,र,वा
२.ल,द,ज
३.ग,सा,र
४.व,ण,र,आ
५.न,ग,ट,म
६.द,ळ,वा
७.र,स,म
८.वा,ल,ज,र,ह,ला
९.मी,स,र
१०.त,न,र
आसिफ मौला शेख
[1/10, 9:40 PM] आसिफ मौला शेखसर: भाषिक खेळ-:
वरील आकृतीत शेवटी 'ळ' येणारे विविध अर्थाचे.शब्द दिले आहेत शोधा पाहू....
१.संध्याकाळ
२.फुटकळ
३.कल्लोळ
४.प्रसंग
५.धुडगुस
६.उत्सुक
🌹आसिफ मौला शेख🌹
[1/10, 9:40 PM] आसिफ मौला शेखसर: शब्दचक्र-:
खालील वर्तुळातील प्रत्येक पाकळीत एक एक अक्षर दिलेले आहे.त्यापासून शब्द बनवा.
१.राष्ट्रध्वजातील तीन रंगाची नावे.
२.अर्थपूर्ण शब्द बनवा.
🌹आसिफ मौला शेख🌹
[1/10, 9:40 PM] आसिफ मौला शेखसर: मिञहो आज माझ्या अजून एका छंदाची मी आपणांस ओळख करून देत आहे.
मुले आजकाल टीव्ही, मोबाईल, संगणकीय खेळ ह्या विद्युत यंञीय साधनांकडे आकर्षित होत असल्याचे आढळते.
गेल्या वर्षी मी टाकाऊतून टिकाऊ " खेळ प्रदर्शन " भरविले होते.
या प्रदर्शनास विद्यार्थांनी चांगला प्रतिसाद दिला.
मी मुलांसाठी काही खेळ तयार केले.
ज्या वेळेस बाहेर कडक ऊन असते वा पाऊस असतो, त्या वेळी मुलांना बाहेर खेळायला जाता येत नाही, अश्या वेळी मुलांचे गट तयार करून आपण त्यांचे खेळ घेऊ शकतो.
मी फळ्यावर चौकट आखते, त्या चौकटीत इंग्रजी अक्षरे लिहून त्या अक्षरांना खालीलप्रमाणे गुण देते.
a,e,i,o,u या स्वरांना प्रत्येकी 2 गुण.
w y ,v la 5 गुण
x, z, Q ला 10 गुण.बाकी अक्षरांना 1 गुण.
आणि त्यातही सगळी अक्षरे घेतेच असे नाही.
प्रत्येक रांगेतील पहिल्या बसणाऱ्या मुला-मुलीला फळ्याजवळ बोलावून फळ्यावर त्यांच्या गटांत त्या अक्षरांपासून meaningful शब्द बनविण्यास सांगते.
असा शब्द की ज्याला काही अर्थ आहे.
उदाहरणार्थ : वर्गात 5 रांगांमध्ये मुले बसली आहेत.
गट १ गट२ गट३ गट ४ गट ५ हे गट तयार झाले.
चौकटीत स्वरांशिवाय b c d m p x r t w q f g n s h
ही अक्षरे आहेत.
मग ती मुले फळ्यावर अर्थपूर्ण शब्दाचे स्पेलिंग लिहिण्याचा प्रयत्न करतील.
उदा. गट १ fox मग त्या गटाला f चा १ o चे २ व x चे १० असे एकूण १३ गुण मिळतील.
गट २ ने लिहिला fish म्हणजे १+2+१+१ =५
या प्रमाणे त्यांच्यात चुरस निर्माण होते.अभ्यासही होतो.स्पेलिंग पाठ होतात & इंग्रजी विषयी वाटणारी भीती पण नाहिशी होण्यास मदत होते.
आपण घरातही हा खॆळ खेळू शकतो.
त्यासाठी जुन्या लग्नपच्रिका, जुने पत्ते यांचा वापर करून खेळ बनवु शकतो.
आपल्या मुलांना नवीन खेळ बनवण्याची प्रॆरणा मिळते व स्वतः बनवलेला खेळ खेळण्याचा एक वेगळा आनंद मिळतो.
यात आपण आपले नियम स्वतः ठरवावे.
मी एक अक्षर कितीही वेळा वापरले तरी चालेल पण एकदा तयार झालेला शब्द दुसऱ्याने तयार केल्यास त्या गटाला 0 गुण देते. एखाद्या गटाचे स्पेलिंग चुकले तर त्या शब्दास 0 गुण असा नियम ठेवला आहे.
🌹आसिफ मौला शेख🌹
[1/10, 9:42 PM] बुरकुलेसर: शब्दांचा डोंगर
[1/10, 9:43 PM] Mahesh Lokhande: भाषिक खेळ
१)-
समान अर्थ व जोडशब्दांची ओळख.
हा खेळ कितीही मुलांमध्ये खेळता येईल.
खाली काही शब्दांच्या जोडया दिलेल्या आहेत
यातील प्रत्येक शब्दाचा असा समान अर्थ शोधा
की त्या जोडीपासून नवीनच एक जोडशब्द तयार होईल .
उदा.-झोपडी+दरवाजा बरोबर घरदार होते.
झोपडी म्हणजे घर व
दरवाजा म्हणजे दार.
1.फायदा+नुकसान
2.वडील+मुलगा
3.विवाह+काम
4.दिनांक+दिवस
5.शरीर+शिक्षा
7.राहणे+घर
याप्रकारे शब्दांच्या जोडया देऊन खेळ घेता
येतो.
उत्तरे-1.नफातोटा
2.बापलोक
3.लग्नकार्य
4.तारीखवार
5.देहदंड
6.वसतिगृह.
२)
खाली विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे देणे, सगळी उत्तरे एका
शब्दात आणि मराठीमध्ये असावीत …. पण त्या
शब्दांमध्ये काना, मात्रा, उकार, वेलांटी असू
नये.. अवधि – 1तास
उदाहरणार्थ :
मुलाचे नाव – मदन
१) गावाच नाव
२) मुलीचं नाव
३) आडनाव
४) धातू
५) रंग
६) गोड पदार्थ
७) वस्तू
८) पूजा साहित्य
९) दागिना
१०) हत्यार
११) पक्षी
१२) प्राणी
[1/10, 9:43 PM] सुनिता लोकरे: शब्द उडी
अक्षर उडी
[1/10, 9:45 PM] बुरकुलेसर: कवितालेखन-यमक जूळणारे शब्द देवून त्यापासून कविता तयार करणे
[1/10, 9:46 PM] Mahesh Lokhande: भाषिक खेळ
तुम्हाला खालील भाषिक खेळांत नवीन प्रश्न सुचवायचे
असल्यास Saakava.Suggestion@gmail.com या पत्त्यावर
आपला प्रश्न पाठवा. तुमचा ऋणनिर्देश केला जाईल.
शब्दातील शब्द
यामध्ये एका शब्दात लपलेले शब्द शोधायचे आहेत
उदाहरण
'सातारा' या शब्दातले दोन शब्द शोधा?
उ: तारा, सारा
मुरजबंध
मुरजबंध म्हणजे जो शब्द किंवा शब्द समूह, जो उलटा वाचला तरी
तोच शब्द किंवा शब्द समूह मिळतो.
उदाहरण
प्रः अधिक चागंला
उः सरस
रूपांतर (Doublets)
या खेळा मध्ये एका शब्दातील एक-एक अक्षर बदलून आपल्याला
पाहिजे असलेला शब्द तयार करायचा. कृपया या फक्त
खेळासाठीच भाषेत नविन शब्द जोडू नका.
उदाहरण
प्रः 'वरण' वरुन 'फरशी' तयार करा.
उः
१. वरण
२. सरण
३. सरशी
४. फरशी
[1/10, 9:47 PM] Mahesh Lokhande: शोधाशोध ;-
हा खेळ कितीही मुलाना खेळता यईल खाली शब्दांच्या ५
जोड्या दिल्या आहेत. त्या फळ्यावर लिहा. प्र्त्येक
जोडीतील अक्षरांपासुन विद्यार्थीनी जास्तीत जास्त
अर्थपुर्ण शब्द तयार करायचे आहेत .मराठी, हिंदी , इग्रंजी
भाषेतील अर्थपुर्ण शब्द स्विकारावेत ., १५ मिनिटे वेळ
द्यावा.
उदा.- तूप - साखर
तूर ,पसा ,सार, सातू , खर, साप , खप , पसार ,परख इत्यादी.
१) आमटी- भात
२) सकाळ - दुपार
३) दिवस - रात्र
४) पोळी- भाकरी
५)चिमणी - कावळा
१५मिनीटात जास्तीत जास्त शब्द लिहीणा-या
विद्यार्थीचा कौतूक करावा.
खालिल प्रमाणे विद्यार्थीना दोन रांगात अर्धे शब्द द्यावे
. डावीकडीलच्या अर्ध्या शब्दाला शेवटी असा शब्द
जोडायचा जो उजवीकडच्या अर्ध्या शब्दाला सुरवातीचा
भाग असेल . उदा.-१)माहा--------------पती
उत्तर--- १) माहाराष्ट्र २)राष्ट्रपती
१) नाग----------------------------- ग्रस्त
२) जवाहर-----------------------बहादूर
३) तेंदूल---------------मरकर
४) राधा------------------कुमार
५) सण --------------------करी
६)गौतम---------------- विहर
७)क्रिया-----------------सिद्घ
८)सिता--------------------------लक्ष्मण
९) राष्ट्र-------------------------- गायन
** मराठी - व्याकरण **
** तुम्हांला माहीत असलेले शब्द शोधा ज्यात
शेवटी " क " असावे आणि त्यापूर्वी
वेलांटी असावी **
- - - - - - - - - - - ************- - - - - - - - - -
** शाळेतल्या विद्यार्थ्याकरिता हा एक उत्तम उपक्रम असून
यातून मराठी शब्द शुध्द लिहिण्याचा सराव होतो. हा एक
शाब्दिक खेळ आहे, ज्यात मुले स्वतःहून शब्द शोधण्यास प्रारंभ
करतात. त्यांना शब्द शोधण्यासाठी आपण फक्त
मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.
** या खेळाचा उपयोग काय होतो ? तर मुलांना शब्दाची
अचूक ओळख होते आणि मराठीत काही
मोजकीच शब्द वगळले तर सर्व शब्द ज्याच्या शेवटचे
अक्षर क आहे त्यापूर्वीच्या अक्षरांवर
पहिली वेलांटी येते हे मुलांना तात्काळ
समजण्यासाठी मदत होते.
** अश्याच छोट्या छोट्या उपक्रम व खेळातून मुलांना
मराठीच्या शब्दाची ओळख करून देता येईल.
** शब्दाची यादी तयार करण्याचे काम
अर्थातच विद्यार्थ्याना लावले तर अजून मजा येईल. यादी
तयार करीत असताना पाठ्यपुस्तक वापरणे बंधनकारक
करावे. शब्द अंदाजे लिहू नये. शुद्ध शब्द लिहिण्यासाठी
पाठ्यपुस्तक वापरण्याचा आग्रह धरल्यास मुले अचूक शब्द
लिहितिल अन्यथा पुन्हा चूका होण्याची शक्यता नाकारता
येत नाही.
** हा उपक्रम आपण तिसऱ्या वर्गपासून घेता येवू शकतो.
** हा उपक्रम खालील प्रकारात विभागणी
करून यादी तयार करावी.
* शब्दाच्या शेवटी " क " असावे आणि
त्यापूर्वी वेलांटी असावे असे तीन
अक्षरी शब्द शोधा -
* उदा. - आर्थिक
- - - - - - - - - - ************- - - - - - - - - -
* शब्दाच्या शेवटी " क " असावे आणि
त्यापूर्वी वेलांटी असावे असे चार
अक्षरी शब्द शोधा -
उदा. - सामाजिक
- - - - - - - - - - ************- - - - - - - - - -
* शब्दाच्या शेवटी " क " असावे आणि
त्यापूर्वी वेलांटी असावे असे पाच
अक्षरी शब्द शोधा -
उदा. - राजनैतिक
- - - - - - - - - - ************- - - - - - - - - -
* शब्दाच्या शेवटी " क " असावे आणि
त्यापूर्वी वेलांटी असावे असे सहा
अक्षरी शब्द शोधा -
उदा. - नियतकालिक
- - - - - - - - - - ************- - - - - - - - - -
प्रत्येक शब्द प्रकारात आपण भर टाकावी
चला तर मग . . . . . . . . .
आपण शब्द शोधू या आणि आपली व आपल्या
विद्यार्थ्यांची मराठी शब्दसंपत्ती
वाढवू या.
- - - - - - - - - - ************- - - - - - - - - -
नोट : -
** हा खेळ तुम्हांला कसा वाटला . . ?
** विद्यार्थ्यांनी कसा प्रतिसाद दिला . . . . ?
** या उपक्रमाचा काही फायदा आपणास झाला काय . . . ?
किंवा
** या उपक्रमात काही त्रुटी, कमतरता, चुका
असल्यास, वा काही बदल करावा असे आपणास वाटत
असेल तर . . . . . . .
[1/10, 9:48 PM] सुनिता लोकरे: *पाहुणा शब्द ओळ खा
*माझा रंग सांगा
*समान अक्षराने सुरुवात होणारे शब्द सांगा
*समान अक्षराने शेवट होणारे शब्द सांगा
[1/10, 9:50 PM] सुनिता लोकरे: १० मिनिटात जास्तीत-जास्त शब्द लिहा
[1/10, 9:51 PM] Mote Gondi: अक्षरखजिना-
शब्देश्वर कोण?-
पुढे चला-
टोपी बदला-
जुन्याचे नवे -
[1/10, 9:52 PM] Mahesh Lokhande: शब्द सम्राट कोण
मुळाक्षरा पासुन कानामात्रासहित शब्द तयार करणे .
मुलांचे आपल्या सोयीनुसार गट तयार करुन प्रत्येक गटाला काही
मुळाक्षर द्यायचे . प्रत्येक मुळाक्षराने सुरुवात करुन त्याचेच जास्तीत
जास्त शब्द मुलांना तयार करायला सांगणे . आपण स्वतः गटात गोलाकार फिरणे .
उदा . गुलाब गट
अ , क , च , ट , त , प, य , ष
अक्षर -अ :-अट , अक्षर , अमर अटक , अनल , अननस , अजगर , अवचित ,
अमीर अमुक , अंगण
क :-कल, कळ , कस , कलह , कपाट , कणखर कमर , करवत
याप्रमाणे आपण फक्त काना असणारे , फक्त मात्रा असणारे , वेलांटी ,
ऊकार यासारखे विविध प्रकारचे शब्द तयार करुन मुलांचा खुप मोठा शब्दसंग्रह तयार
करु शकतो .
ज्या गटातून जो जास्तीत जास्त शब्द तयार करेल तो आपल्या
खेळाचा शब्दसम्राट असेल .
हा खेळ खेळत असताना शिक्षकांनी मुलांना प्रोत्साहन देणे फार गरजेचे
आहे .बक्षीस म्हणुन अश्या प्रकारचा एक मुकुट आपण त्याना देऊ
शकतो . मुले खुप खुष होतात . शिवाय हा खेळ आपण लेखी व
तोंडी अशा दोन प्रकारे घेऊ शकतो .
[1/10, 9:54 PM] सुनिता लोकरे: दिलेल्या शब्दाला` दार 'जोडून लिहा-कस-कसदार
[1/10, 9:55 PM] Pratiksha: स्मरणशक्तीचा खेळ
[1/10, 9:55 PM] बुरकुलेसर: दिलेल्या अक्षरापासून संपूर्ण वाक्य तयार करणे
[1/10, 9:55 PM] Mote Gondi: साद- प्रतिसाद -
खाते वाटप -
जोडसाखळी -
कडी कोयंडा-
भिंगरी फिरवा-
[1/10, 9:58 PM] सुनिता लोकरे: शब्दावरून वाक्य लिहा
[1/10, 9:58 PM] Mote Gondi: मित्र शोधा -
जोड पत्ता-
नवे कोण ?-
ज्याचे त्याला द्या -
शब्दांचे मत्स्यालय -
[1/10, 10:00 PM] Pratiksha: सहसंबंध असणारे शब्द फूल-पान काटा देठ लाल
[1/10, 10:02 PM] Pratiksha: प्रसंगाचे नाट्यीकरण
[1/10, 10:03 PM] सुनिता लोकरे: चित्रनिरीक्षणावरून ५वाक्य सांगा
[1/10, 10:05 PM] Mote Gondi: परका ओळखा -
रहस्यभेद-
वाक्य चटई-
बोलती चित्रे-
चटपटीत बोला -
[1/10, 10:05 PM] Mahesh Lokhande: 🌷स्वलेखन🌷 मुलांना परिचित,त्यांच्या भावविश्वातील एक शब्द देऊन त्यावर
मुक्तलेखन करण्यास सांगणे.
उदा. खिडकी, अंगण, टेबल, वही
🌷 मुलांना खिडकी हा शब्द दिला होता.इयत्ता दुसरी,
तिसरी, चौथी च्या मुलांनी दहा मिनीटात यावर
लिहले.
🌷 मुले खिडकी या शब्दावर छान लिहती झाली
.
एका दुसरीच्या मुलाने लिहलं होतं खिडकीला
कोणीही डकलतं,आदळतं
त्यामुळे तिला दु:ख होते.
🌷 काही मुलांनी खिडकीचे चौकोनी,
आयताकृती असे आकार सांगितले होते.म्हणजेच यातुन गणित,परिसर
अभ्यास या विषयाचाही सहसंबंध साधला गेला होता.
मुले आनंददायी वातावरणात लिहीत
होती.त्याच्यातील सृजनशीलता फुलत
होती.
[1/10, 10:07 PM] ज्ञानदेव नवसरे: भाषीक खेळ 👇🏻
http://www.dnyanvahak.blogspot.in/p/blog-page_40.html
[1/10, 10:07 PM] आसिफ मौला शेखसर: शब्दांची गटबाजी ! (एक शब्दखेळ )
खेळ सोप्पा आहे ! याची सुरवात मी एक गट व त्यात बसणारे पाच शब्द देउन करणार आहे. पुढच्याने त्यातला किमान एक शब्द घेउन नवा गट बनवायचा आहे ! या गटात सगळे मिळून पाचच शब्द हवेत ! गटाचे नाव आधी देउन मग मागच्या गटातला घेतलेला शब्द आधी देउन बाकी शब्द मग द्यायचे आहेत.
उदा. खडू, फळा, बाक, वाचनालय, प्रयोगशाळा -- या शब्दांचा गट आहे 'शाळेचे घटक' .
आता यातला 'खडू' शब्द घेउन मी खडू, पेन, पेन्सिल, बोरू, बॉलपेन हे शब्द घेउन 'लिहीण्याची साधने' असा गट केला आहे.
आता तुम्ही हा गट घेउन खेळ पुढे चालू ठेवा !
🌹आसिफ मौला शेख🌹
[1/10, 10:08 PM] उज्वला पाटील रेठरे: शब्द संग्रह वाचायला देणे .त्यातील शब्द आठवणे.व जास्त शब्द लिहिलेल्या विद्यार्थी विजयी .अशी स्पर्धा घेणे .
[1/10, 10:09 PM] आसिफ मौला शेखसर: विषय:मराठी
उपक्रम:चढता क्रम अक्षरांचा साज सुंदर शब्दांचा
हा खेळ कितीही मुले खेळू शकतील.मुलांना गोलाकार बसवावे.शिक्षकांनी कोणत्याही मुलाला एक अक्षर द्यावे.त्या मुलाने त्या अक्षरापासुन तयार होणारा अर्थपूर्ण एकाक्षरी शब्द सांगावा.पुढच्या मुलांने दोन अक्षरी शब्द,नंतरच्या मुलांने तीन अक्षरी शब्द याप्रमाणे पाच ते सहा अक्षरी पर्यंत जावे.त्यानंतर दूसरे अक्षर द्यावे.इयत्तेप्रमाणे शब्दातील अक्षरांची संख्या कमी जास्त करावी.जो जास्तीत जास्त शब्द सांगेल तो जिंकेल.शब्द कोणत्याही भाषेतील चालतील.
ब—बी,बारा,बदक,बलराम,बदलापूर,बनवाबनवी
क—का,काल,कशाला,करपणे,कळवळणे
सौजन्य:जीवन शिक्षण{मीना महाशब्दे}
🌹संकलन:आसिफ मौला शेख🌹
[1/10, 10:10 PM] आसिफ मौला शेखसर: [10/01 8:02 AM] आसिफ मौला शेख: सापशिडीचा खेळ आपण खेळतो त्यामध्ये आपण गणितीय संख्याज्ञान व मूलभूतक्रिया या शिकवू शकतो.....पण आपण त्याचा वापर मराठी व इंग्रजी साठी केला तर.....
अंकाच्या जागी आपण मोठी अक्षरे लिहिली व त्या अक्षराखालीच बारीक अंक लिहावे व सोंगट्या तीन वा दोन तयार करावे.जसे सोपं वाटेल तशा प्रकारे एक ही सोंगटी घेतली तरी चालेल....
क ख ग .......ज्ञ क्ष अशी सापशिडी सारखी तयार करा व क च्या खाली अंक लिहा.
आता मी एक सोंगटी घेतली ती टाकली.व दोन अंक पडला तर मग " ख " अक्षर मग अजून दोन दा सोंगट्या टाकणार आणी अक्षर जे मिळेल ते लिहणार..,
उदा...ख ज र
अशी मला अक्षरे मिळाली तर मी त्या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करणार....स्वरांचा वापर करून..
खजूर अशाप्रकारे....
किंवा आपण पहिल्यांदा एक फासा घेतला व टाकला .....५ हा अंक मिळाला मग क पासून पाचवा अक्षर कोणता आहे.
च अक्षर असेल तर त्या पासून अर्थपूर्ण समानार्थी वा विरूध्दार्थी शब्द वा च ने सूरू होणारे अर्थपूर्ण शब्द किंवा च ने सूरू होणारे वाक्य लिहण्यास सांगावे...
अशाप्रकारे भाषेमध्ये त्याचा वापर करू शकतो...
🌹आसिफ मौला शेख🌹
[10/01 9:17 AM] आसिफ मौला शेख: मुलांना चिञकला हा विषय आवडतो.पण काही मुले अशी असतात की ज्यांना चिञ काढणे जमत नाही अथवा चिञकलेची आवड नसते.
शाळेत हा खेळ खेळवतांना मी रांगांनुसार विद्यार्थांना फळ्याजवळ चिञ काढण्यास बोलवते.
खेळाचे नाव आहे अक्षरांनुसार चिञ काढणे...
समजा 5 रांगा आहेत.प्रत्येक गटाला नाव दिले व त्या रांगांमधील मुलांना पुढे बोलावून अक्षर दिले " प "
१ पतंग २ पाकीट ३ पट्टी ४ पाटी ५ पक्षी मुलांनी ही चिञे काढली.
चिञे बरोबर असल्यास १० गुण.चिञ ओळखू येत असेल पण अपूर्ण असेल तर ५ गुण आणि चिञ काढता आलेच नाही तर ० गुण.
हाच खेळ इंग्रजी अक्षरे घेऊन ही खेळवु शकतो.
उदाहरणार्थ .......b for bat
ball book butterfly boy etc.
या खेळामुळे मुले नवनवीन शब्द शोधतात.
नवनवीन क्लृप्त्या शिकतात.
एका जागी बसून काम करण्याची गोडी लागते.
अभ्यासाची व कलेची गोडी लागते.
व मुले सांघिक काम शिकतात.
🌹आसिफ मौला शेख🌹
[1/10, 10:11 PM] आसिफ मौला शेखसर: [19/12 10:23 PM] आसिफ मौला शेख: मी असा उपक्रम घेतला
.....ळा
काळा
निळा
सावळा
पिवळा
कावळा
सावळा
लळा
कळा
विळा
कळा
मळा
शिळा
ढवळा
वळा
असे शब्द लिहण्यास द्या व कविता करा मुले कविता करतात.
एक होती शाळा
तिचा रंग निळा
वर्गात आहे फळा
तिचा रंग काळा
वर्गात आहे माळा
त्यावर बसला कावळा
रस्ता रस्ता आहे वळा वळा
शाळेसमोर मळा
मज आवडे शाळा
तिचा आहे लळा
🌹आसिफ मौला शेख🌹
[20/12 9:25 AM] आसिफ मौला शेख: पत्र म्हणजे काय?
मुलांना माहित नाय
घेतो आपण पत्रलेखन
देतो आपण पत्रलेखन
अनुभव द्या त्याना
पत्र लिहण्याचा
पत्रे द्या त्यांना
चार ओळी लिहण्यासाठी
पाठवा ती पत्रे
आजी आजोबांना ती पत्रे
लिहण्याला पर्याय नाही
दिसाभर काय तर लिहित जा
पत्रात आहे माया
तंत्रज्ञानात नाही छाया
बोलतो लगे मोबाईलवर
पण पत्रात असते प्रेमळ शब्द ह्वद्याला भिडणारे
पत्राची वाट पाहे आम्ही चातकासारखी
पण आता वाट पाहतोय महेश सर नंदकिशोर सर दसगुडे गुरूजी आपल्या कवितांची
वाट पाहण्यात मजा येई
वाट पाहण्यात सजा होई
पत्रे देती आठवणी
ती ठेवतोय जपूनी
🌹आसिफ मौला शेख🌹
[20/12 10:00 AM] आसिफ मौला शेख: आईचे पत्र हरविले
किती मजा यायची
पण आता मूले हरवले
गेमच्या नादापायी
पळत होतो शोधत होतो
पत्र मिळेल का
पण आता शोधत हाय
पुढची लेवल काय
🌹आसिफ मौला शेख🌹
[20/12 11:06 AM] आसिफ मौला शेख: रा:राज्यात आणली स्वच्छतेची लाट
ष्ट्र:ष्ट्रात असे संत होणार नाही पुढे
सं:संत तुकारामांना गुरू माणे
त:तन मन धन वाहिले स्वच्छतेसाठी
गा:गावात दिसभरी करी स्वच्छ रात्री सांगे किर्तन
ड:डगरात देव नसून माणसात आहे तो
गे:गेले आयुष्य त्यांचे अज्ञान दूर करण्यासाठी
बा:बाबांचे उपदेश साधे सुधे असे समजे जनाना
बा:बाबा आमचे असे हे होते
म:महान असे कार्य महान असे त्यांचे विचार
हा:हात देई अस्पुश्यांना साथ देई दिनदुबळ्यांना
रा:राहुन ही स्वत: सक्रिय अंधश्रध्दा निर्मुलनाचे तत्त्व सांगे
ज:जनमानसाना म्हणत मी कुणाचा गुरू नाही मला कोणी शिष्य नाही
🌹आसिफ मौला शेख🌹
[22/12 9:29 PM] आसिफ मौला शेख: वाट पाहताना
वाट पाहे मी सुट्टीची
गाठ पडे पुस्तकाशी
वाट पाहे मंजूळ आवजाची
तो आवाज रामप्रहार कूहुकुहची
वाट पाहे मीळणार्या वस्तुची
ती मिळाली सार्थक होई वाट पाहाणे
वाटे पाहे संदेशांची
आपल्या गटातील कवितांची
वाट पाहण्यात आनंद येई
वाट पाहण्यात मज्जा येई
🌹आसिफ मौला शेख🌹
[23/12 9:47 PM] आसिफ मौला शेख: माझं गाव भीमानदीकाठी
त्यात भरपूर पाणी
सकाळी नदीत पोहे
दुपारी भूक लागे
नदीत होती मासे खेकडी
ती पकडी तोंडात घाली
भूक जेव्हा लागे
अंडी घेऊन येये
अंडी वर शेण लावे
तिला भाजे काट्यावरी
असे करी लहानपणी
खूप आनंद बालपणी
खूप मजा येई बालपणी
आठवणी घेऊन आता जगी
🌹आसिफ मौला शेख🌹
[1/10, 10:12 PM] चव्हाणसर ज्ञा: शब्दांच्या भेंडया हा खेळ घेणे
[1/10, 10:12 PM] सुनिता लोकरे: एकाच वस्तूसाठी/व्यक्ति साठी प्रत्येका च्याघरी/भाषेत कोणते शब्द वापरले जातात यांची चर्चा करा अशा शब्दांचा संग्रह करा
[1/10, 10:13 PM] सुनिता लोकरे: संवाद सादर करणे
[1/10, 10:13 PM] Mote Gondi: लपाक्षरी -
मुकुट घाला -
शब्द लपवा-
रंगाने रंगवा-
शिडी चढा-
[1/10, 10:16 PM] सुनिता लोकरे: शब्दांना जोडून येणारे शब्द सांगा जसे गमतीजमती बारीकसारीक
[1/10, 10:18 PM] सुनिता लोकरे: एकच अक्षर दोनवेळा असलेली जोडाक्षरे सांगा-अन्न गप्पा लठ्ठ
[1/10, 10:18 PM] चव्हाणसर ज्ञा: यमक साधणारया शब्दाचा खेळ घेणे
उदा-कावळा - सावळा
[1/10, 10:19 PM] सुनिता लोकरे: र ची जोडाक्षरे-ट्रक चक्र मित्र
[1/10, 10:19 PM] आसिफ मौला शेखसर: [10/01 8:02 AM] आसिफ मौला शेख: सापशिडीचा खेळ आपण खेळतो त्यामध्ये आपण गणितीय संख्याज्ञान व मूलभूतक्रिया या शिकवू शकतो.....पण आपण त्याचा वापर मराठी व इंग्रजी साठी केला तर.....
अंकाच्या जागी आपण मोठी अक्षरे लिहिली व त्या अक्षराखालीच बारीक अंक लिहावे व सोंगट्या तीन वा दोन तयार करावे.जसे सोपं वाटेल तशा प्रकारे एक ही सोंगटी घेतली तरी चालेल....
क ख ग .......ज्ञ क्ष अशी सापशिडी सारखी तयार करा व क च्या खाली अंक लिहा.
आता मी एक सोंगटी घेतली ती टाकली.व दोन अंक पडला तर मग " ख " अक्षर मग अजून दोन दा सोंगट्या टाकणार आणी अक्षर जे मिळेल ते लिहणार..,
उदा...ख ज र
अशी मला अक्षरे मिळाली तर मी त्या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करणार....स्वरांचा वापर करून..
खजूर अशाप्रकारे....
किंवा आपण पहिल्यांदा एक फासा घेतला व टाकला .....५ हा अंक मिळाला मग क पासून पाचवा अक्षर कोणता आहे.
च अक्षर असेल तर त्या पासून अर्थपूर्ण समानार्थी वा विरूध्दार्थी शब्द वा च ने सूरू होणारे अर्थपूर्ण शब्द किंवा च ने सूरू होणारे वाक्य लिहण्यास सांगावे...
अशाप्रकारे भाषेमध्ये त्याचा वापर करू शकतो...
🌹आसिफ मौला शेख🌹
[10/01 9:17 AM] आसिफ मौला शेख: मुलांना चिञकला हा विषय आवडतो.पण काही मुले अशी असतात की ज्यांना चिञ काढणे जमत नाही अथवा चिञकलेची आवड नसते.
शाळेत हा खेळ खेळवतांना मी रांगांनुसार विद्यार्थांना फळ्याजवळ चिञ काढण्यास बोलवते.
खेळाचे नाव आहे अक्षरांनुसार चिञ काढणे...
समजा 5 रांगा आहेत.प्रत्येक गटाला नाव दिले व त्या रांगांमधील मुलांना पुढे बोलावून अक्षर दिले " प "
१ पतंग २ पाकीट ३ पट्टी ४ पाटी ५ पक्षी मुलांनी ही चिञे काढली.
चिञे बरोबर असल्यास १० गुण.चिञ ओळखू येत असेल पण अपूर्ण असेल तर ५ गुण आणि चिञ काढता आलेच नाही तर ० गुण.
हाच खेळ इंग्रजी अक्षरे घेऊन ही खेळवु शकतो.
उदाहरणार्थ .......b for bat
ball book butterfly boy etc.
या खेळामुळे मुले नवनवीन शब्द शोधतात.
नवनवीन क्लृप्त्या शिकतात.
एका जागी बसून काम करण्याची गोडी लागते.
अभ्यासाची व कलेची गोडी लागते.
व मुले सांघिक काम शिकतात.
🌹आसिफ मौला शेख🌹
[1/10, 10:20 PM] आसिफ मौला शेखसर: 🌹क-का-कि-की-- बाराखडीचा शब्दखेळ !🌹
क-का-कि-की-- बाराखडीचा शब्दखेळ !कोणतेही एक मूळाक्षर (क,ख,ग,घ---) घ्या, असे शब्द बनवा कि ज्यात त्या अक्षराची किमान दोन वेगवेगळी बाराखडीतली रूपे आली पाहीजेत. उदा. क वरून काकडी (क+आ, क+अ ), सासूरवास (यात स ची स+आ, स+ऊ, स+अ अशी तीन रूपे आली आहेत) पण करमरकर हा शब्द चालणार नाही कारण यात क दोनदा आणि र तीनदा आहे पण एकाच रूपात ! तसेच मामा, काका पण नाही चालणार पण काकू चालेल ! समजले ? मी सुरवात करतो कारकून या शब्दाने, यात क्+आ आणि क्+ऊ आला आहे.
🌹आसिफ मौला शेख🌹
[1/10, 10:21 PM] सुनिता लोकरे: शब्दाला कु सु जोडून शब्द सांगा-सुप्रसिध्द
[1/10, 10:22 PM] अमोल पैठणे बुलढाणा: भाषिक खेळ- अंर्तवर्तुळ व बाह्यवर्तुळात अक्षरकार्ड, शब्दकार्ड देणे. सारख्या अक्षरांच्या व शब्दांच्या जोड्या जुळविणे. विद्यार्थ्याने आपला जोडीदार शोधणे.
[1/10, 10:22 PM] सुनिता लोकरे: शब्द शोधा
[1/10, 10:23 PM] सुनिता लोकरे: दिलेले शब्द बाराखडीच्या क्रमाने लावा
[1/10, 10:24 PM] Mote Gondi: ॥भाषिक खेळ॥
अक्षरपाकळ्या व शब्द फुले -
शब्दांची लपाछपी-
फुलबाग-
शब्दकोडे-
शोधा म्हणजे सापडेल -
अलीबाबाचा खजिना लुटा
कोलांटी उडी-
अडथळ्याची शर्यत-
न संपणारी गोष्ट-
अडथळ्यांची शर्यत-
बारा चमूचा कॅप्टन-
[1/10, 10:24 PM] घावटेसर किवळ: १.कच्चा पापड पक्का पापड २.लहान नाणे मोठे नाणे या सारखे वाक्ये एका दमात म्हणायला लावणे .
[1/10, 10:25 PM] अमोल पैठणे बुलढाणा: भाषिक खेळ- वर्णाक्रमानुसार शब्दरेल्वे तयार करणे. दोन गटात अक्षरकार्ड, शब्द कार्ड देणे. वर्णाक्रमानुसार रांग तयार करणे.
[1/10, 10:25 PM] सुनिता लोकरे: चौकटीत अक्षरे लिहून तो शब्द पूर्ण करून कोडे सोडवा
[1/10, 10:27 PM] सुनिता लोकरे: शब्दातील अक्षरापासून शब्द तयार करा जसे-भारत-भार भात तर
[1/10, 10:35 PM] अमोल पैठणे बुलढाणा: खजिना लुटो- विद्यार्थ्याचे दोन गट करुन प्रत्येक बरोबर उत्तराला खजिन्याची एक हिंट देणे. शाळेच्या आवारात, वर्गात, कार्यालयात, खजिन्याच्या हिंट लपवून ठेवणे. हिंट म्हणून म्हणी, सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न, समानार्थी-विरुद्धार्थी शब्द इ. ठेवणे. विजेत्या गटास खजिना म्हणून काहीतरी बक्षिस देणे.
[1/10, 10:39 PM] उज्वला पाटील रेठरे: सोपे शब्द कोडे तयार करणे.ती विद्यार्थीकडून सोडवून घेणे .त्यामुळे शब्द संग्रह वाढ
[1/10, 10:54 PM] Mahesh Lokhande: आसिफ मौला शेखसर,प्रशांत अंबवडेसर,बुरकुलेसर,दिपक निगडेसर,सुनिता लोकरेमॅडम,विकास मानेसर,मोटेसर,ज्ञानदेव नवसरेसर,उज्वला पाटीलमॅडम,चव्हाणसर,प्रतिक्षा गायकवाडमॅडम,घावटेसर,अमोल पैठणेसर सर्वांचे आभार🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया द्या .