Thursday, 15 October 2015

क्लाऊड स्टोरेज व व्हाॅट्सअप

क्लाऊड स्टोरेज म्हणजे काय? हे जाणून घेण्यापूर्वी जर आपण डेटा सेंटर संदर्भात अधिक माहिती घेतली, तर आपणास क्लाऊड स्टोरेजबाबत चटकन कल्पना येईल. ज्याप्रमाणे स्मार्टफोनमधील माहिती ही मेमरीकार्डवर साठवली जाते, त्याचप्रमाणे इंटरनेटवरील माहिती ही प्रामुख्याने डेटा सेंटरमध्ये साठवली जाते. ‘क्लाऊड स्टोरेज’ एका अशा व्यवस्थेचे नाव आहे, ज्या व्यवस्थेच्या माध्यमातून आपण आपल्याजवळील फाईल्स या अशा डेटा सेंटरमध्ये सुरक्षित ठेवतो. एखाद्या उदाहरणाने ही गोष्ट अधिक चांगल्यारितीने स्पष्ट होईल.

समजा आपण सुट्टिच्या दिवशी बाहेर कुठेतरी फिरायला गेला आहात. आपल्या आयुष्यातील त्या सुरेख दिवसाच्या आठवणी आपण स्मार्टफोनवरील कॅमेरॅच्या सहाय्याने कैद केल्या आहेत. पण घरी परतत असताना आपला स्मार्टफोन हरवला. तर अशावेळी स्मार्टफोनसोबतच त्या दिवसाच्या आठवणीदेखील हरवून जातील. पण आपण जर ‘क्लाऊड स्टोरेज’ सेवेचा वापर करत असाल, तर मात्र आपल्याला आणखी एक संधी मिळू शकेल. कारण त्यातील ‘कॅमेरा बॅकअप’ हा पर्याय जर त्यावेळी सुरु असेल, तर स्मार्टफोनवरुन काढलेले छायाचित्र हे इंटरनेटच्या माध्यमातून तत्काळ अपलोड होऊन क्लाऊड स्टोरेज सेवेच्या डेटा सेंटरमध्ये सुरक्षित जमा झालेले असेल. अशाप्रकारे स्मार्टफोन हरवला तरी देखील छायाचित्रे हरवणार नाहीत.

आपल्या जवळील सर्व प्रकारच्या महत्त्वाच्या फाईल्स डेटा सेंटरमध्ये सुरक्षित ठेवण्याकरीता लागणारे जे माध्यम आहे त्यास ‘क्लाऊड स्टोरेज सर्व्हिस’ असे म्हणतात; आणि या एकंदरीत व्यवस्थेस सर्वसाधारणपणे ‘क्लाऊड स्टोरेज’ असे म्हटले जाते. गूगलची ‘गूगल ड्राईव्ह’ ही सेवा ‘क्लाऊड स्टोरेज’चे एक उत्तम उदाहरण आहे. गूगल ड्राईव्हवर आपण आपल्याजवळील डेटा फाईल्स अपलोड करुन सुरक्षित ठेवू शकतो आणि आवश्यक त्यावेळी त्या फाईल्सचा वापर करु शकतो. त्यामुळे आपल्या स्मार्टफोनवरील, संगणकावरील महत्त्वाच्या फाईल्स जरी हरवल्या, गहाळ झाल्या तरी चिंता करण्याचे काही कारण उरत नाही.स्थिती अद्यान्वित करतो, छायाचित्र अपलोड करतो; पण ही सर्व माहिती नक्की कुठे साठवली जात असेल? असा कधी आपल्याला प्रश्न पडला आहे का? अन्नधान्य हे जसे एखाद्या गोडाऊनमध्ये साठवले जाते, अगदी त्याचप्रमाणे आपण इंटरनेटच्या माध्यमातून अपलोड केलेला सर्व डेटा हा डेटा सेंटरमध्ये साठवला जातो. त्यानंतर मागणीप्रमाणे हा डेटा इतरांना पुरवण्यात येतो. स्मार्टफोनमधील डेटा ज्याप्रमाणे मेमरी कार्डवर साठवला जातो, संगणकावरील डेटा हा ज्याप्रमाणे हार्ड डिस्क ड्राईव्हवर साठवण्यात येतो, त्याचप्रमाणे इंटरनेटच्या माध्यमातून दिसणारा डेटा हा शक्यतो डेटा सेंटरमध्ये साठवलेला असतो.

आता प्रत्यक्ष या लेखाच्या उदाहरणाने ही माहिती समजावून घेऊ. सध्या मी हा लेख लिहित आहे. हा लेख लिहून झाल्यानंतर मी तो प्रकाशित करेन. प्रकाशित केलेला हा लेख अमेरिकेतील एखाद्या डेटा सेंटरमध्ये साठवला जाईल. त्यानंतर मी फेसबुकवर येऊन या लेखाबद्दल आपल्याला माहिती देईन. ती माहिती देखील फेसबुकच्या डेटा सेंटरमध्ये साठवली जाईल. या लेखाबद्दल माहिती मिळाल्यानंतर आपण हा लेख वाचण्याकरीता या लेखाच्या धाग्यावर क्लिक कराल. तेंव्हा आपण या लेखाची मागणी केली आहे हे लक्षात घेऊन डेटा सेंटरमधून हा लेख आपल्याला पाठवण्यात येईल. अशाप्रकारे डेटा सेंटरच्या माध्यमातून माहितीची देवाण-घेवाण होते.

वरील चित्रफितीत गूगलचे डेटा सेंटर दाखवलेले आहे. डेटा सेंटर हे जणू इंटरनेटचा मेंदू आहे. त्यात साठवलेले ज्ञान हे गरजेप्रमाणे वापरले जाते. आपल्या मेंदूप्रमाणेच डेटा सेंटरला देखील कार्यरत राहण्याकरीता प्रचंड उर्जा लागते. त्यामुळे डेटा सेंटर थंड रहावे याकरीता सुयोग्य व्यवस्था करण्यात आलेली असते. इथे जगभरातील महत्त्वाचा डेटा साठवलेला असल्याने त्याच्या सुरक्षेचासुद्धा चोख बंदोबस्त करण्यात येतो. डेटा सेंटरमुळे पर्यावरणाचा र्‍हास होऊ नये याची देखील विशेष काळजी घेण्यात येते. त्यामुळे अनेक कंपन्या त्याकरीता लागणारी वीज ही पवनउर्जा, सौरउर्जा अशा अपारंपारिक माध्यमातून मिळते 

मेमरीकार्ड


अनेकदा साध्या-सोप्या गोष्टी माहित नसल्याने मोठ्या समस्या उद्भवतात. यासंदर्भात आपल्याला ‘स्मार्टफोन मेमरी’चे उदाहरण घेता येईल. ‘स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड होणार्‍या चित्रफिती, ध्वनिफिती, छायाचित्रे किंवा इतर फाईल्स या आपोआप कुठे साठवल्या जाव्यात? मेमरी कार्डवर की इंटरनल मेमरीवर?’, आपला स्मार्टफोन आपल्याला हा पश्न विचारतो. पण अनेकांना त्याचा थांगपत्ताच नसल्याने या सार्‍या फाईल्स आपोआप इंटरनल मेमरीमध्ये साठू लागतात. अशाने स्मार्टफोनच्या इंटरनल मेमरीवरील ताण वाढून आपला फोन हँग होऊ लागतो. हीच गोष्ट मी आता अधिक स्पष्ट करुन सांगतो.

आपल्या स्मार्टफोनच्या Settings मध्ये जा. इथे Device विभागात Storage नावाचा पर्याय दिसेल, त्यावर स्पर्श करा. Default Write Disk मध्ये आपण कोणत्या पर्यायाची निवड केली आहे? ते पहा! आपण जर External SD Card म्हणजेच मेमरी कार्ड निवडले असेल, तर आपल्या सार्‍या फाईल्स या आपोआप मेमरी कार्डवर साठवल्या जात आहेत. पण आपण जर Internal SD Card निवडले असेल, तर याचा अर्थ असा की, सगळ्या फाईल्स आपल्या स्मार्टफोनच्या इंटरनल मेमरीमध्ये साठवल्या जात आहेत. तेंव्हा External SD Card या पर्यायाची निवड करणे.

अ‍ॅपवरुन प्राप्त होणारे संदेश हे आपोआप आपल्या मेमरी कार्डवर साठवले जावेत अशी जर आपली ईच्छा असेल, तर वर सांगितल्याप्रमाणे External SD Cardची निवड करावी. एव्हढासा बदल केल्याने आपल्या स्मार्टफोनची एक मोठ्या समस्या सुटेल आणि त्यामुळे स्मार्टफोन हँग होणार नाही.

व्हाॅट्सअप

जे लोक व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून एखादा ग्रुप चालवतात किंवा जे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये सहभागी आहेत, त्यांच्यासाठी आज मी ही माहिती देत आहे. कारण सहसा ग्रुपच्या माध्यमातूनच संदेशांची मोठ्या प्रमाणात देवाण-घेवाण चालते आणि त्यामुळे मग कालांतराने आपला स्मार्टफोन हँग होऊ लागतो.

व्हॉट्सअ‍ॅपवरुन आलेल्या चित्रफिती, ध्वनिफिती किंवा छायाचित्रे जर स्मार्टफोनच्या इंटरनल मेमरीमध्ये साठवली जात असतील, तर आपल्या स्मार्टफोनवरील ताण वाढतो. कारण आपल्या स्मार्टफोनची इंटरनल मेमरी ही मर्यादीत असते. म्हणूनच व्हॉट्सअ‍ॅपवरुन येणारे संदेश हे मेमरी कार्डवर साठवणे गरजेचे बनते.

व्हॉट्सअ‍ॅप संदेश मेमरी कार्डवर हलवणे

मजकूराच्या (Text) माध्यमातून जे संदेश प्राप्त होतात ते मेमरी कार्डवर हलवण्याची गरज नाही. मुख्यतः चित्रफीत (Video), छायाचित्र (Image) प्रकारातील जे संदेश आहेत, त्यांस अधिकची मेमरी लागते. त्यामुळे आपण केवळ या प्रकारचे संदेश हे मेमरी कार्डवर हलवणार आहोत.

अशाप्रकारचे संदेश हे आपल्या स्मार्टफोनवरील एका स्वतंत्र फोल्डरमध्ये साठवले जातात. इंटरनल मेमरी मधील हे व्हॉट्सअ‍ॅप फोल्डर एक्सटरनल मेमरी, म्हणजेच मेमरी कार्डवर हलवल्यास इंटरनल मेमरीमधील जागा मोकळी होईल, आणि त्यानंतर आपला स्मार्टफोन हँग होणार नाही.

नोंद –

व्हॉट्सअ‍ॅपमार्फत आलेल्या चित्रफिती, छायाचित्रे हे मेमरी कार्डवर घेतल्यानंतर ते आपल्या मेमरी कार्डवर सुरक्षित राहतील व ते आपणास फोटो गॅलरीमध्ये देखील दिसतील; पण ते आपणास व्हॉट्सअ‍ॅपवर दिसणार नाहीत. जिथे पूर्वी चित्रफीत, छायाचित्र होते, तिथे केवळ अस्पष्ट चौकट दिसेल.सगळ्यांचेच व्हॉट्सअ‍ॅप संदेश हे आपोआप इंटरनल मेमरीवर साठवले जातात असे नाही. तेंव्हा आपल्या स्मार्टफोनवर जर भरपूर व्हॉट्सअ‍ॅप संदेश असतील आणि त्यामुळेच आपला स्मार्टफोन हँग होत आहे, असं आपल्याला वाटत असेल, तरच या पद्धतीचा अवलंब करावा. आपला फोन हँग होत नसल्यास या पद्धतीचा तसा अवलंब करण्याची आवश्यकता नाही.व्हॉट्सअ‍ॅपवरुन आलेल्या चित्रफितींचा, ध्वनिफितींचा आणि छायाचित्रांचा जर संगणकावर बॅकअप घ्यायचा असेल, तर अशावेळी देखील ही पद्धत उपयोगी पडेल.

File Manager मधून Internal Memoryचा विभाग उघडा. यात Whatsapp नावाचे फोल्डर असेल, त्यावर स्पर्श करा. त्यात पुन्हा Media नावाचे फोल्डर असेल, त्यावर स्पर्श करा. इथे आपणास Whatsapp Audio, Whatsapp Images,  Whatsapp Video, अशा निरनिराळ्या फोल्डर्सची यादी दिसेल. त्यापैकी Whatsapp Video हे फोल्डर प्रथम उघडा व तिथे दिसणारे सर्व संदेश कॉपी करुन मेमरी कार्डवरील एखाद्या फोल्डर मध्ये घ्या. त्यानंतर पुन्हा Whatsapp Video या फोल्डरमध्ये येऊन तेथिल चलचित्रे डिलीट करा. आपणास हे सारे जर व्यवस्थित जमत असेल, तर कॉपी-पेस्ट-डिलीट करण्याऐवजी थेट कट-पेस्ट केले तरी चालेल.


युट्यूबवर मराठी चित्रपटांकरीता एक स्वतंत्र विभाग असल्याचं मी यापूर्वीच आपल्याला सांगितलं आहे. पण त्यावर मराठी कार्यक्रमांसाठी देखील एक वेगळा विभाग असल्याचं आपल्याला माहित आहे का? युट्यूबवर मराठी कार्यक्रमांसाठी एक खास विभाग असून आपण या विभागास सब्स्क्राईब (Subscribe) देखील करु शकतो.

मराठी कार्यक्रमांचा विभाग

युट्यूबवर (YouTube) प्रत्येक मराठी कार्यक्रमाचे स्वतःचे असे एक चॅनल आहे. मराठी कार्यक्रमांच्या विभागात या सर्व चॅनल्सची म्हणजेच कार्यक्रमांची योग्य तर्‍हेने मांडणी करण्यात आलेली आहे. यात टिव्हीवर सध्या सुरु असलेल्या आणि नसलेल्या अशा अनेकानेक कार्यक्रमांचा समावेश आहे. ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘उंच माझा झोका’, असे पूर्वप्रसारित जुने लोकप्रिय कार्यक्रम पुन्हा पहायचे असल्यास या ऑनलाईन विभागास आवर्जून भेट द्यावी.

युट्यूबवर कार्यक्रम पाहण्याचे ५ फायदे!

टिव्हीवरील आपल्या आवडीचे पूर्वप्रसारित जुने कार्यक्रम पुन्हा पाहता येतात.सध्या रोज प्रसारित होणारे कार्यक्रम आपल्या सवडीने बघता येतात.इथे अत्यंत तुरळक जाहिराती असल्याने ३० मिनिटांचा कार्यक्रम अगदी २० मिनिटांत संपतो.युट्यूवरील कार्यक्रम आपण आपल्या स्मार्टफोनवर किंवा स्मार्टटिव्हीवर देखील पाहू शकतो.कार्यक्रमातील नको असलेला भाग पुढे ढकलता येतो, किंवा आवडलेला भाग पुन्हा पाहता येते.

पाॅडकास्ट


‘ध्वनिफीत’ (Audio) अथवा ‘चित्रफीत’ (Video) या माध्यमांतून इटंरनेटवरुन जे कार्यक्रम प्रसारित केले जातात, त्यास ‘पॉडकास्ट’ असे म्हणतात. अ‍ॅपलच्या iPod (आयपॉड) वरुन ‘पॉडकास्ट’ या नावाचा उगम झाला आहे. परदेशात ‘पॉडकास्ट’ हा प्रकार लोकप्रिय असून अनेक हौशी तसेच व्यावसायिक लोक हे स्वतःचे कार्यक्रम तयार करुन अशाप्रकारे इंटरनेटवरुन प्रसारित करतात.

पॉडकास्ट हा देखील ब्लॉगसारखाच एक प्रकार असून याचे वैशिष्ट असे की, यात मजकूरचा (Text) प्रामुख्याने वापर न कराता त्याऐवजी ध्वनिफीत, चित्रफीत यांचा वापर केला जातो. एका पॉडकास्टच्या माध्यमातून प्रसारित केले जाणारे कार्यक्रम हे सहसा एकाच ‘फाईल फॉरमॅट’ मध्ये असतात. उदाहरणार्थ, mp3 फाईल फॉरमॅट.

पॉडकास्ट ऐकण्याकरीता अँड्रॉईड अ‍ॅप स्टोअरवर अनेकानेक अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. त्या अ‍ॅप्सच्या माध्यमातून आपण आपल्या आवडीचे पॉडकास्ट्स ‘सब्स्क्राईब’ करु शकतो. पॉडकास्ट मार्फत प्रसारित होणारे कार्यक्रम हे सहसा डाऊनलोड करता येतात. त्यामुळे आपणास ते आपल्या सोयीने ऐकता येतात.




No comments:

Post a Comment

आपली प्रतिक्रिया द्या .