Friday, 8 January 2016

शैक्षणिक ग्रुपचर्चा २३

[1/8, 7:24 PM] Mahesh Lokhande: 🔴 ग्रुपचर्चासत्र   २ ३ 🔴
🌍 चर्चेचा विषय🌍
🔶 कार्यानुभव =वस्तुनिर्मिती🔶
मुद्दे=विद्यार्थ्यांकडुन काय काय तयार करुन घेता येईल.
🔶चर्चेस वेळ  दि. ८/१/२०१६   रात्री ९.३० ते१०.३०पर्यंत.🔶 सर्वांनी चर्चेत सहभागी व्हावे.🔵 आपले योगदान आमच्यासाठी अनमोल आहे.🙏🙏🙏🙏🙏🙏
[1/8, 9:32 PM] समीरअॅ: कार्यानुभव -वस्तूनिर्मिती
१) कागदी आकाशकंदील
२)युरियाच्या गोण्यांपासून हँगिंग गार्डन निर्मिती
३)सुतळीपासून वॉलपीस
४)सुतळीपासून फोन मँट
५)काथ्याकाम पायपुसणी
६)काथ्यापासून शिंकाळे
७)प्लॅस्टिक बाटली पासून हँगिंग गार्डन
८) पेन्सिलीच्या shave पासून वेगवेगळ्या वस्तू बनविणे
९)आगपेटीपासून वॉलपीस , सोफा,कपाट
१०) मोकळ्या बॉक्सपासून वेगवेगळ्या गाड्या बनविणे
११)आईसकांड्यापासून बंगला,वेगवेगळ्या  वस्तू बनविणे
१२) ओरिगामी कागदापासून वेगवेगळ्या वस्तू बनविणे
१३)भेट कार्ड
१४)मातकाम विविध फळे,प्राणी ,आकार बनविणे
१५)कोलाजकाम
१६) काचकाम
१७)परिसरातील पानांपासून विविध प्रकारचे आकार
[1/8, 9:39 PM] सुनिता लोकरे: *रिकाम्या खोक्यापासून कपाट, मोबाईल स्टँड,बचतपेटी सोफासेट तयार करणे.
*कागदी भिरभिरे
*आकाशकंदील
*नारळाच्या करवंटीपासून तबला,वीना,पेन स्टँड बनवणे.
*आईस्क्रीम काड्यापासून घर,तोरण,जहाज,तुळस,वाँलपीस,झोपाळा, भौमितिक आकार बनवणे.
*शिवणकाम-कापडावर बटण लावणे,कापडापासून पिशवी शिवणे,रूमाल इ.
*स्ट्रा,मणी,चाँकलेटचे कागद यापासून हार बनवणे.
*प्लस्टिकच्या पेल्यापासून आकर्षक आकाशकंदील
*मातकामापासून पक्षी,प्राणी,फळे,भांडी
[1/8, 9:42 PM] सुनिता लोकरे: स्ट्राची बाहुली
कापसाची बाहुली
स्पंजची बाहुली
पायमोज्यापासून बाहुली
[1/8, 9:46 PM] उज्वला पाटील रेठरे: जुनी साडीपासुन पायपुसनी.
[1/8, 9:48 PM] हिलेमॅडम: *चहाच्या रिकाम्या ग्लास पासून मासा तयार करणे.
*माचिस व् वहिच्या पुठयपासून बदक गाड़ी बनवणे त्याचा उपयोग आपल्याला दशक गाड़ी बनवन्यासाठी होउ शकतो.
[1/8, 9:48 PM] Mahesh Lokhande: १) काडीपेटीपासुन बॅग,सोफा पालखी तयार करणे.
२)कागदापासुन विमान,टोपी,होडी तयार करणे.
३)कागद,वनस्पतींपासुन तोरण बनवणे.
४)पताका बनवणे.
५)कापसाची फुलवात बनवणे.
६) पुठ्ठ्यांचा आईस्क्रीम कपांचा तराजु बनवणे.
७)भेटकार्ड बनवणे.
८)प्लॅस्टीक पिशव्या तुकड्यांचा हार बनवणे.
९)खत तयार करणे.
१०)कापसाच्या वस्तु बनवणे.
[1/8, 9:49 PM] सुनिता लोकरे: भाताच्या साळी खपली पासून अलंकार नेकलेस कानातले इ
[1/8, 9:49 PM] Mahesh Lokhande: ११)कागदी पिशव्या बनवणे.
१२)कागदी टोप्या बनवणे.
१३)चिंधीपासुन चेंडू बनवणे.
१४)नारळाच्या सोडणापासुन काथ्या तयार करणे.
१५)काथ्यापासुन वस्तु बनवणे.
१६)बांबुच्या वस्तु बनवणे.
१७) वेताच्या वस्तु बनवणे.
१८)फुलांपासुन हार,गजरे,गुच्छ बनवणे.
१९)कागदी घड्यांची चित्रे तयार करणे.
२०)मुर्ती तयार करणे.
[1/8, 9:50 PM] Mahesh Lokhande: २१)ज्वारीच्या धांडांपासुन बैलगाडी चश्मा बनवणे.
२२)कार्डशीटपासुन खोके बनवणे.
२३)कागदी फुले तयार करणे.
२४)काथ्यापासुन पायपुसणी बनवणे.
२५) नारळाच्या टाकाऊ वस्तुंपासुन झोपडी,घरे झाडे बनवणे.
२६)मातीचे घर तयार करणे.
२७)वेतापासुन चटई तयार करणे.
२८)कागदी फुलझाडांची रोपे तयार करणे.
२९)पालखी तयार करणे.
[1/8, 9:53 PM] Mahesh Lokhande: ३०)मोरपिसापासुन पंखा टोपी बनवणे.
३१)नारळाच्या करवंटीपासुन फुलदाणी बनवणे.
३२)घरे तयार करणे.
३३)फुले ठेवण्यास परडी तयार करणे.
३४)खोक्यापासुन शिल्प तयार करणे.
३५)पत्रावळी व द्रोण तयार करणे.
३६)आकाशकंदील तयार करणे.
३७)राख्या तयार करणे.
३८)मण्यांच्या माळा तयार करणे.
३९)शंख शिंल्यापासुन सौंदर्याकृती बनवणे.
४०)काथ्यापासुन डस्टर उशी बनवणे.
[1/8, 9:53 PM] अरविंद गोळे: Sorry me ajachya group charchet sabhag gheu sakat nahi my personal problem
[1/8, 9:53 PM] Ambawade Prashant: Kapsa pasun doll
[1/8, 9:53 PM] भालदारमॅडम ज्ञा: प्लास्टीक कागद गोणपाटाच्या पिशवीत घालून पायपुसनी करणे. शेंगांच्या टरफला पासून हार तयार करणे.
[1/8, 9:54 PM] Mahesh Lokhande: ४१)काथ्यापासुन शिंकाळे तयार करणे.
४२)शिंकाळे तयार करणे.
४३)पंखा तयार करणे.
४४)मातीपासुन प्राणी पक्षी तयार करणे.

४५)साबणाच्या खोक्यापासुन घर रॅक बनवणे.
४६)रद्दी चित्रापासुन भेटकार्ड बनवणे.
४७)नक्षीदार वाॅलपीस तयार करणे.
४८)गोणपाटापासुन पिशवी बनवणे.
४९)बदक पोपट जिराफ कोल्हा ओरिगामी वस्तु बनवणे.
५०)उशी तयार करणे.
[1/8, 9:55 PM] सुनिता लोकरे: अक्रोडच्या कवटापासून होडया
[1/8, 9:56 PM] भालदारमॅडम ज्ञा: चिखल दिवस साजरा करून मातकामा च्या वस्तू तयार करणे.
[1/8, 9:57 PM] बुरकुलेसर: चिकटकामात विविध डाळींपासून सुंदर कलाक्रती बनविणे
[1/8, 9:58 PM] भालदारमॅडम ज्ञा: संक्रांतीच्या हंड्या पासूनप्लाॅवरपाॅट तयार करणे
[1/8, 9:59 PM] बुरकुलेसर: चॉकलेटच्या वेष्टणापासून हार तयार करणे
[1/8, 10:00 PM] सुनिता लोकरे: गेलेले बल यापासून मोर बदक
[1/8, 10:01 PM] सुनिता लोकरे: द्रोणापासून तराजू
[1/8, 10:01 PM] भालदारमॅडम ज्ञा: कागदा पासून कान हलवणारा ससा तयार करणे . उड्या मारणारा बेडूकतयार करणे. कूंकवाचाकरंडा तयार करणे.
[1/8, 10:02 PM] भालदारमॅडम ज्ञा: चहाच्या ग्लासा पासून तराजू
[1/8, 10:02 PM] भालदारमॅडम ज्ञा: बटणाचा वापर करून बदक करणे
[1/8, 10:03 PM] सुनिता लोकरे: १लीटर पाण्याच्या बाटल्यापासून कुंडया
[1/8, 10:04 PM] सुनिता लोकरे: क्रेप कागदापासून फुले
[1/8, 10:06 PM] बुरकुलेसर: कागदापासून लिफाफा तयार करणे
[1/8, 10:06 PM] Mahesh Lokhande: ५१)बाहुली तयार करणे.
५२)बटवा तयार करणे.
५३)मातीची खेळणी बनवणे.
५४)मातीचा नाग बैल बनवणे.
५५)टोपली तयार करणे.
५६)शंख शिंपल्यांच्या माळा तयार करणे.
५७)उटणे तयार करणे.
५८)रांगोळीचे साचे तयार करणे.
५९)फळे तयार करणे.
६०)पिशव्या पाकीटे तयार करणे.
[1/8, 10:07 PM] Mahesh Lokhande: ६१)दंतमंजन तयार करणे.
६२)मेणबत्ती तयार करणे.
६३)जाळी तयार करणे.
६४)झाडू तयार करणे.
६५)करवंटीपासुन शोभेच्या वस्तु बनवणे.
६६)जाड ब्राउन पेपरपासुन भौमितिक आकार बनवणे.
६७)फाईल तयार करणे.
६८)जुन्या कागदांपासुन वह्या तयार करणे.
६९)खळ तयार करणे.
७०)पतंग तयार करणे.
[1/8, 10:08 PM] भालदारमॅडम ज्ञा: मातीचा वापर करून उठावाचे नकाशे तयारकरणे.
[1/8, 10:09 PM] Mahesh Lokhande: ७१)पतंगाचा मांजा तयार करणे.
७२)बाहुलीचे कपडे तयार करणे.
७३)आगपेटीपासुन गाड्या सोफा तयार करणे.
७४)आईस्क्रीम चमचे वापरुन खुर्ची तयार करणे.
७५)जुन्या पोस्टकार्डपासुन नरसाळे तयार करणे.
७६)टेबललॅम्प तयार करणे.
७७)खडू तयार करणे.
७८)वाॅलहॅंगिंग तयार करणे.
७९)लोकरीपासुन गोंडे तयार करणे.
८०)कागदी मुखवटे तयार करणे.
[1/8, 10:10 PM] भालदारमॅडम ज्ञा: कापसा पासून ससा तयार करणे. बाहुली तयार करणे.
[1/8, 10:10 PM] बुरकुलेसर: नारळाच्या झावळ्यापासून खराटा बनविणे
[1/8, 10:11 PM] विकास माने: Plastic bottle pasun zumbr
[1/8, 10:11 PM] सुलभा लाडमॅडम: Kadeptya,gvtachyakdya ,bhusa  yaw pasun viviqd vstuu
[1/8, 10:13 PM] अरविंद गोळे: Dagad kagat
[1/8, 10:14 PM] बुरकुलेसर: पाण्याच्या बाटलीपासून फॉवरपॉट  पेनस्टँड
[1/8, 10:14 PM] सुलभा लाडमॅडम: Junya kpdyachya led. riklya puqqe vaprun vstu
[1/8, 10:14 PM] भालदारमॅडम ज्ञा: मण्यांचा वापर करून बांगड्या तयार करणे.
[1/8, 10:16 PM] भालदारमॅडम ज्ञा: पावडर रिकाम्या डब्यापासून टूथब्रश स्टॅड करणे.
[1/8, 10:17 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: वर्तमानपञांचा..लगदा करून..पाहीजे त्या आकारावर...थर बसवावे...वाळल्यानंतर....आतील मूळ आकार अलगत काढावा...उदा.फुगा फुगवून त्यावर लगदा..लावावा..,वाळल्यानंतर फुगा.फोडा....
[1/8, 10:18 PM] बुरकुलेसर: सलाईनच्या बाटल्यापासून झूंबर
[1/8, 10:18 PM] भालदारमॅडम ज्ञा: कापसाच्या वाती बणविणे.कागदाचच्या लगद्यापासून विविध वस्तू तयार करणे.
[1/8, 10:19 PM] बुरकुलेसर: शीतपेयांच्या झाकणांपासून तोरण
[1/8, 10:19 PM] सुलभा लाडमॅडम: Ghratil vivid phtancha vaparrrun utnii tyar krne  tandlala vivid rang laun akshda tyar krne
[1/8, 10:20 PM] सुनिता लोकरे: काडेपेटीपासून वाँलपीस,ट्रक,खुर्ची आगगाडी
[1/8, 10:20 PM] Mahesh Lokhande: ८१)अंड्याच्या कवचापासुन पिल्लु तयार करणे.
८२)कागदी लगद्यापासुन भांडी तयार करणे.
८३)नीळ तयार करणे.
८४)द्रवरुप साबण तयार करणे.
८५)वायरपासुन पिशवी,फुलदाणी तयार करणे.
८६)लोकरी फुले तयार करणे.
८७)सुतळीपासुन शिंकाळे फोनमॅट तयार करणे.

८८)फोटोफ्रेम तयार करणे.
८९)पेनस्टॅड तयार करणे.
९०)अॅबॅकस तयार करणे.
[1/8, 10:21 PM] सुनिता लोकरे: ज्वारीच्या सरकाळीपासून घर बैलगाडी
[1/8, 10:21 PM] वायदंडे मॅडम: कार्डसिट दोरा या पासून आकाशकन्दील बनवने
[1/8, 10:22 PM] सुनिता लोकरे: थर्माकोलपासून विविध वस्तू
[1/8, 10:22 PM] बुरकुलेसर: रिबीनपासून गुलाबाचे फुल
[1/8, 10:23 PM] उदय भंडारे: जि.प.शाळा सदाशिवगड शाळेतील कलाकृती
[1/8, 10:24 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: कृपया थर्माकाॅलचा वापर आपणच टाळू या....प्लीज...पर्यावरण जपू या....अन्यथा पुढची पिढी आपणास माफ करणार नाही...🙏🙏
[1/8, 10:24 PM] वायदंडे मॅडम: बांगडीच्या फुटलेल्या काचा पासून माला विविध डीज़ाइन बनवने
[1/8, 10:25 PM] बुरकुलेसर: सॉक्सपासून बाहूली
[1/8, 10:27 PM] सुनिता लोकरे: Ragoli pasun kolajkam
[1/8, 10:28 PM] Mote Gondi: कार्यानुभव वस्तू काम -
१) भेट वस्तू बाॅक्स -
२)फोटो फ्रेम -
३) मुखवटे ( मास्क)-
४) पंखा -
५) भेटकार्ड -
६) दिनदर्शिका स्टॅन्ड-
७) कोलाज फ्रेम  (वाॅलपेंटिंग)
८) पुठ्ठा घर -
९) डोलणारा कोंबडा -
१०) अंडी कवचाचे पेंगविन -
[1/8, 10:28 PM] वायदंडे मॅडम: इको फ्रेंडली गणपती बनवने

दिवाळीत पणत्या रंगविने
[1/8, 10:29 PM] Mahesh Lokhande: ९१)खोबरेलतेलबाटलीपासुन फुलदाणी तयार करणे.
९२)अक्षता तयार करणे.
९३)हॅंगर तयार करणे.
९४)बॅच बिल्ले तयार करणे.
९५)सुगंधी फिनेल तयार करणे.
९६)थर्माकोलची(पुठ्याची) अक्षरे तयार करणे.
९७)करवंटीस लेस, आरसे ,प्लॅस्टिक फुले ,टिकल्या लावुन नक्षी तयार करणे.
९८)बाळासाठी दुपटे तयार करणे.
९९)कीचैन तयार करणे.
१००)टि व्ही,संगणक,मोबाईल प्रतिकृती तयार करणे.
[1/8, 10:31 PM] सुनिता लोकरे: सुपारीपासून भटजी तयार करणे
[1/8, 10:54 PM] Mahesh Lokhande: समीरसर,लोकरेसर,उज्वला पाटीलमॅडम,हिलेमॅडम,अंबवडे प्रशांतसर,अरविंद गोळेसर,भालदारमॅडम,बुरकुलेसर,दिगंबर यादवसर,लाडमॅडम,विकास मानेसर,वायदंडेमॅडम,उदय भंडारेसर,मोटेसर,रशीद तांबोळीसर सर्वांचे खूप खूप आभार🙏🙏🙏🙏🙏🙏

Thursday, 7 January 2016

शैक्षणिक ग्रुपचर्चा २२

[1/7, 5:48 PM] Mahesh Lokhande: 🔴 ग्रुपचर्चासत्र   २२ 🔴
🌍 चर्चेचा विषय🌍
🔶 नवोपक्रम🔶
मुद्दे=१)नवोपक्रम लेखन टप्पे
          २) शाळेतील नवोपक्रम
🔶चर्चेस वेळ  दि.७/१/२०१६   रात्री ९.३० ते१०.३०पर्यंत.🔶 सर्वांनी चर्चेत सहभागी व्हावे.🔵 कागदावर लिहुन फोटो पोस्ट केला तरी चालेल.आपले योगदान आमच्यासाठी अनमोल आहे.🙏🙏🙏🙏🙏🙏
[1/7, 9:31 PM] समीरअॅ: शाळेतील नवोपक्रम
शाळा-जमदाडेवस्ती ता.माळशिरस जि.सोलापूर
१)चला पाढे शिकू या
२) राज्य ,जिल्हे चुंबकीय नकाशा वाचन
३)शितपेय टोपणापासून विविध भौमितिक आकार ,चित्रे
४) शाळेत लहान गट व मोठे  वर्ग भरविणे
५) मुलांना अध्ययनात टँबचा वापर
६) परिसरातील टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ वस्तू बनविणे
७)संख्याज्ञानासाठी मणी तारा वापर
८)विविध भौमितिक आकृती साठी मँट आणि बॉल
९)अध्ययन अध्यापनात ABL वापर
१०) शाळा अंतरंग व बाह्यांग आकर्षित करणे
११)व्यवसायिक शिक्षण कार्यानुभव अंतर्गत युरियाच्या गोणी पासून हँगिंग गार्डन
१२) औषधी वनस्पती ओळख
[1/7, 9:36 PM] Mahesh Lokhande: 🍁नव + उपक्रम= नवोपक्रम
(वेगळा उपक्रम)
🍀उददिष्टप्राप्तीसाठी शोधलेला वेगळा मार्ग म्हणजे नवोपक्रम.
🔵नवीन असा कोणताही उपक्रम नवोपक्रम असतो.
🌲नाविण्य वेगळेपण असलेला उपक्रम.
🌷नवोपक्रमास इंग्रजीत Innovation  म्हणतात.
☀to innovate  means to make changes.
[1/7, 9:40 PM] Mahesh Lokhande: नवोपक्रम
व्यक्तीगत नवोपक्रम
गट नवोपक्रम
व्यक्तीगत व गट नवोपक्रमामध्ये समस्यानिराकरण नवोपक्रम
,निर्मितीप्रधान नवोपक्रम,
कृतीप्रधान नवोपक्रम,
आस्वादप्रधान नवोपक्रम,
संशोधनप्रधान नवोपक्रम  असे नव उपक्रम असतात.
[1/7, 9:40 PM] Mote Gondi: नवोपक्रम म्हणजे नवीन उपक्रम.
[1/7, 9:43 PM] Mahesh Lokhande: 🍁नवोपक्रमाची उदिदष्टे 🍁
💎तोचतोचपणा घालवणे
💎परिवर्तन घडवुन आणणे
💎सर्जनशीलता
💎नवेविचार नवपध्दती
💎समस्यानिराकरण
💎आस्वादयोजना
💎कृतीप्रधानता
💎वैविध्यपुर्णता
[1/7, 9:45 PM] Mahesh Lokhande: नवोपक्रम का व कशासाठी करायचे?
[1/7, 9:45 PM] Mote Gondi: नवोपक्रमाचे लेखन टप्पे-
१)शीर्षक-
२)गरज-
३) सृजन विचार -
४)उद्दिष्टे-
५)नियोजन-
६)कार्यवाही-
७)यशस्वीता-
८) कालावधी-
९)समारोप-
१०)संदर्भ साहीत्य-
११) परिशिष्टे-
१२) अभिप्राय -
[1/7, 9:48 PM] Mahesh Lokhande: 🌷नवोपक्रमाचे फायदे🌷
⛄अध्यापनात सुलभता येते.
⛄प्रयोग मनोवृत्ती बनते.
⛄आत्मविश्वास वाढतो.
⛄सर्जनशीलता वाढते.
⛄कृतीशीलता वाढते.
⛄सहभाग वाढतो.
⛄कार्यपध्दती सुधारणा होते.
[1/7, 9:50 PM] Mahesh Lokhande: नावीन्याच्या अभावी येणारी मरगळ दूर करुन उत्साहाने नव्याने कार्यप्रेरित होण्यासाठी नवोपक्रम.
[1/7, 9:51 PM] Mahesh Lokhande: धडपडणार्‍या व उत्कृष्टतेचा ध्यास असणार्‍या शिक्षकाने सातत्याने स्वप्रेरणा मिळवित राहणेसाठी नवोपक्रम.
[1/7, 9:52 PM] Mahesh Lokhande: वेगळ्या वाटेने जाऊन गुणवत्ता वाढवणेसाठी नवोपक्रम.
[1/7, 9:52 PM] Mote Gondi: वेगळ्या वाटा निवडून अापले विचार प्रत्यक्ष कृतीतुन दाखविण्या साठी व समस्येवर स्वत: मार्ग शोधन्यासाठी, गुणवत्तावाढीसाठी, स्व - प्रेरणा मिळविन्यासाठी अाणि सृजन विचाररूजवून स्वत:बरोबर इतरांना कार्य प्रेरीत करण्या साठी नवीन उपक्रमाची अावश्यकता अाहे.
[1/7, 9:53 PM] Mahesh Lokhande: स्वप्रयत्नाने समस्या सोडविण्यासाठी नवोपक्रम.
[1/7, 9:54 PM] Mahesh Lokhande: आगळा वेगळा विचार करणार्‍या शिक्षकांना आपला विचार कृतीत उतरविण्यास संधी मिळण्यासाठी नवोपक्रम.
[1/7, 9:56 PM] सुलभा लाडमॅडम: Aapan shikvat asto tya sathi khup pryatn hi krat asto pan kdikadi kutha Kay chukt the klat nani asha veli nvin khahi krave late tyatun Norman photo Nvopkram
[1/7, 9:56 PM] Mahesh Lokhande: कल्पक,सर्जनशील स्वयंप्रेरित ,नवनिर्मितीचा ध्यास घेणारांसाठी नवोपक्रम.
[1/7, 9:59 PM] Mahesh Lokhande: नवीनता ३ प्रकार
कालसापेक्ष नवीनता =कधीही न झालेला
स्थलसापेक्ष नवीनता=इतरत्र झालेला  पण कार्यक्षेत्रात नवीन
व्यक्तीसापेक्ष नवीनता= शिक्षकांच्या दृष्टीने नवीन
[1/7, 10:00 PM] अरविंद गोळे: Navopkramane anek prakarchya samsya sodavta yetat
[1/7, 10:02 PM] सुलभा लाडमॅडम: Mulana kary prvan ban vine navinya Norman krne
[1/7, 10:02 PM] Mahesh Lokhande: नवोपक्रमाचे ३ निकष
🍁 नवीनता
🍁यशस्विता
🍁उपयुक्तता
[1/7, 10:05 PM] थोरात ond: पाठय़पुस्तक चे अध्यापन जसजसे पुढे जाईल तसतसे सर्व क्षमता विद्यार्थ्यांत विकसित करण्यासाठी टप्प्याटप्याने केलेली नवीन कृती म्हणजे नवोपक्रम.
[1/7, 10:06 PM] Mahesh Lokhande: नवोपक्रम कार्यवाही टप्पे
🍁समस्यांची यादी
🍁कारणे
🍁शीर्षक
🍁उद्दिष्टे
🍁नियोजन
🍁कार्यवाही
🍁माहिती संकलन
🍁यशस्विता
[1/7, 10:07 PM] Mote Gondi: प्रत्येक शिक्षक वर्गात नविन उपक्रम राबवितात परंतु ते उपक्रम शब्दांकित न केल्यामुळे असे नाविण्य पुर्ण उपक्रम सर्वज्ञात होत नाहीत.
[1/7, 10:09 PM] Mahesh Lokhande: आपण करत असलेल्या प्रयत्नांची पध्दतशीर नोंद असावीच.आपला अहवाल इतरांना मार्गदर्शक ठरतो.
अहवाललेखन महत्वाचे आहे.
[1/7, 10:09 PM] Mahesh Lokhande: आता नवोपक्रम सुचवा
[1/7, 10:10 PM] Mahesh Lokhande: 🍁कात्रण चित्रणाचे वाचनालय
[1/7, 10:11 PM] Mahesh Lokhande: 🍁रद्दीतुन ग्रंथालय
[1/7, 10:11 PM] Mahesh Lokhande: 🍁पाढेकवायत
[1/7, 10:12 PM] Mahesh Lokhande: 🍁बेंचलेखन
[1/7, 10:13 PM] Mahesh Lokhande: 🍁परिसरअभ्यासदौरा
[1/7, 10:14 PM] Mahesh Lokhande: 🍁बालमंच
[1/7, 10:14 PM] Mahesh Lokhande: 🍁पर्यावरणमंडळ
[1/7, 10:16 PM] Mahesh Lokhande: 🍁पत्रमित्र
[1/7, 10:16 PM] Mahesh Lokhande: 🍁कागदी पिशव्या निर्मिती
[1/7, 10:17 PM] थोरात ond: चिठ्ठी उचलूया वाक्य लिहू या.
वेगळ काहीतरी वाचू या.
[1/7, 10:17 PM] Mote Gondi: 📝 स्व -दिनक्रम
📝 अाहार संतुलन
📝 चांगल्या सवयी
?📝 चित्र -वाचन
?📝 अाजचा प्रश्न
[1/7, 10:18 PM] अरविंद गोळे: पाठ्यसहित्य संचाची निर्मिती
करणे
[1/7, 10:19 PM] थोरात ond: स्वच्छता परिपाठ ..
[1/7, 10:20 PM] भालदार गोळेश्वर: Today's best student...
[1/7, 10:20 PM] अरविंद गोळे: संदर्भ पुस्तक पेढ़ी तयार करणे
[1/7, 10:21 PM] Mahesh Lokhande: 🍁किल्ला तयार करणे
🍁उठावाचे नकाशे बनवणे
[1/7, 10:22 PM] Mahesh Lokhande: 🍁गणितखेळ
🍁शब्दकोडी
[1/7, 10:22 PM] भालदार गोळेश्वर: Shabdachi kodi . Bhendya.
[1/7, 10:22 PM] Mahesh Lokhande: 🍁पाककृती
[1/7, 10:23 PM] थोरात ond: वर्तमान पत्रा ची पाकिटे तयार करणे.
[1/7, 10:23 PM] भालदार गोळेश्वर: Awadichi chitre rekhatne....rangawane...
[1/7, 10:23 PM] थोरात ond: माझी परसबाग.
[1/7, 10:24 PM] अरविंद गोळे: वक्तृत्व ,वादविवाद,गट चर्चा,वाचन,सर्व प्रकारचे खेळ
[1/7, 10:24 PM] भालदार गोळेश्वर: Funny games..
[1/7, 10:24 PM] Mahesh Lokhande: 🍁टाकाऊतुन टिकाऊ
[1/7, 10:25 PM] उदय भंडारे: रोज ५ ईग्रंजी शब्द पाठांतर
[1/7, 10:25 PM] Mahesh Lokhande: 🍁कचरा व्यवस्थापन
[1/7, 10:26 PM] Mahesh Lokhande: 🍁जोडाक्षरी शब्दकोश
[1/7, 10:27 PM] Mahesh Lokhande: 🍁माझी रोजनिशी
[1/7, 10:27 PM] भालदार गोळेश्वर: Nakla ,natika , ekpatri natak, sanwad lekhan.
[1/7, 10:27 PM] Mote Gondi: 📝प्रश्न  तुमचा उत्तर माझे
📝ppt वाचन
📝 कृतीयुक्त प्रतीसाद
📝 इंग्रजी शब्दांचा वापर.
[1/7, 10:27 PM] थोरात ond: शब्द मैत्री उपक्रम
[1/7, 10:28 PM] Mahesh Lokhande: 🍁माझी कविता
🍁माझी गोष्ट
🍁माझा अनुभव
[1/7, 10:28 PM] थोरात ond: डिक्शनरी गेम
[1/7, 10:28 PM] Mahesh Lokhande: 🍁खेळणीनिर्मिती
[1/7, 10:29 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: विविध वर्तमानपञातून  वेगवेगळ्या जाडीचे ...रंगीत शब्द कापून...पूठ्ठ्यावर चिकटवने....वाचन साहीत्य तयार
[1/7, 10:29 PM] भालदार गोळेश्वर: Awadinusar wishayatil muddyawar mulankadun wargatch takte banawne
[1/7, 10:29 PM] Mahesh Lokhande: 🍁माझे पुस्तक
[1/7, 10:29 PM] उदय भंडारे: ,रोज एक action word घेऊन तिन्ही काळातील 12  प्रकारात वाक्य तयार करणे .
[1/7, 10:31 PM] Mahesh Lokhande: 🍁थर्माकोल  रिफील वापरुन अॅबॅकस तयार करणे.
[1/7, 10:31 PM] भालदार गोळेश्वर: English day, Hindi day athawdyatul 1 diwas .
[1/7, 10:32 PM] Mahesh Lokhande: 🍁तरंगबाग
[1/7, 10:32 PM] थोरात ond: Question hour
Fifty words
[1/7, 10:32 PM] अरविंद गोळे: School students bajar
[1/7, 10:32 PM] उदय भंडारे: गावातील लघुउद्योजकांची  ,कारागिरांची मुलाखत .
[1/7, 10:34 PM] अमोल पैठणे बुलढाणा: नवोपक्रम- जिज्ञासा पेटी                        विद्यार्थ्यानी कागदावर प्रश्न लिहून पेटीत टाकावा. आठवड्यातून एकदा शिक्षकांनी सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावी.
[1/7, 10:34 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: शब्द भेंड्या पण,.जरा हटके.....फक्त प्राणी,किंवा पक्षी किंवा.घरातील.वस्तू...यांची नावे
[1/7, 10:35 PM] Mahesh Lokhande: 🍁विनोदसंग्रह
[1/7, 10:35 PM] सुनिता लोकरे: दिनदर्शिकेतील सण- समारंभ
[1/7, 10:35 PM] Mahesh Lokhande: 🍁दिनदर्शिकानिर्मिती
[1/7, 10:35 PM] अरविंद गोळे: गावचा कारभार कसा चालतो ते माहित करुन् देणे
[1/7, 10:36 PM] Mahesh Lokhande: 🍁औजारेनिर्मिती
[1/7, 10:37 PM] अमोल पैठणे बुलढाणा: नवोपक्रम- भाषिक प्रयोगशाळा।            यात शिक्षकांनी व विद्यार्थ्यानी तयार केलेल्या शब्दपट्टया, अक्षर कार्ड, स्वाध्याय कार्ड, कात्रणे इ. साहित्य ठेवावी
[1/7, 10:38 PM] Mahesh Lokhande: 🍁बालनाट्य
🍁हस्तलिखित
🍁शब्दकोश
[1/7, 10:38 PM] भालदार गोळेश्वर: Roj GK var 5 prashna lihun Uttar shodhne...tyancha sangrah karne..
[1/7, 10:39 PM] उदय भंडारे: बोधकथा संग्रह , सुविचार संग्रह
[1/7, 10:39 PM] सुनिता लोकरे: आजची कलाकुसर
[1/7, 10:40 PM] Mahesh Lokhande: 🍁चित्रसंग्रह
🍁कात्रणसंग्रह
🍁बातमीसंग्रह
[1/7, 10:40 PM] Pratiksha: हजेरी स्वतः लावणे.
[1/7, 10:40 PM] उदय भंडारे: वाढदिवस साजरा करणे.
[1/7, 10:41 PM] सुनिता लोकरे: प्राण्यांचे प्रकार पाळीव जंगली सरपटणारे ......
[1/7, 10:41 PM] Mote Gondi: शब्द तुमचे लेखन माझे
उदा. रोज वेगळा विषय (घटक) मुलांना द्यायचा जसे - मसाल्याचे पदार्थ

मुले घरी गेल्यावर त्याविषयावर घरातील व्यकींच्या कडून माहिती घेईल व त्या वस्तु पदार्थाचे प्रत्यक्ष भा चित्रात निरीक्षण करेल अनुभव घेईल ,हाताळेल दुसर्र्या दीवशी माहिती वाशब्द सांगेल त्या माहिती शब्दांचे लेखन शिक्षक चौफेर फलकावर करूण ईतरांच्या कडूण वाचन वअनुलेखन  घेतील .
दुसर्या दिवशी दुसरा शब्द वा विषय .
[1/7, 10:42 PM] अमोल पैठणे बुलढाणा: थिम बोर्ड व अॅक्टीव्हेशन बोर्ड-    एक थिम देऊन उदा. दिवाळी तर या विषयासंबंधीत चित्रे, निबंध, कोलाज, वर्तमानपत्रातील कात्रणे, हस्तलिखित माहिती इ. अॅक्टीव्हेशन बोर्डवर चिकटवणे.
[1/7, 10:42 PM] Mahesh Lokhande: 🍁विशेषणांचा अभ्यास =चक्रव्युहभेद
[1/7, 10:42 PM] सुनिता लोकरे: व्यक्ति विशेष
[1/7, 10:43 PM] थोरात ond: परिपाठात दररोजच्या दिनांकाचा पाढा म्हणणे.
[1/7, 10:43 PM] सुनिता लोकरे: नामांकित महिला
[1/7, 10:44 PM] Mahesh Lokhande: 🍁वर्गपंचायत
🍁वर्गतंटामुक्तीसमिती
[1/7, 10:45 PM] थोरात ond: दररोज एक इंग्रजी अक्षरावर आधारित शब्द सांगणे.
[1/7, 10:45 PM] सुनिता लोकरे: परिपाठा नंतर रोज एका समाजसुधारकांची माहिती
[1/7, 10:47 PM] थोरात ond: पाठावर आधारित पुरवणी वाचन.
[1/7, 10:48 PM] भालदारमॅडम ज्ञा: इंग्रजी एका शब्दावरून अनेक शब्दतयार करणे
[1/7, 10:48 PM] भालदारमॅडम ज्ञा: मसालामाती तयार करणे, नवदाम्पत्यशाळेत सत्कार करणे
[1/7, 10:49 PM] सुनिता लोकरे: वर्तमानपत्रातील शैक्षणिक  बातम्याचा संग्रह
[1/7, 10:51 PM] Mote Gondi: पाच वाक्ये प्रथम लिहावयाची कार्डशीट वा साध्या कागदावर नंतर प्रत्येक शब्द वेगळा कट करावयाचा उदा .भारत
माझा देश अाहे .अशी नंतर सर्व पाच वाक्यांचे शब्द एका खोक्यात ठेवूण पाच मुलांचा गटात तू खोके देवून त्याना एक   वाक्य तयार करावयास सांगावे पहिला शब्द घेनारे कार्डाचेच  वाक्य तयार होते बाकिचे शब्द कार्ड खोक्यातच राहतील .
वर्ग व काठिन्य पातळि नुसार बदल करावा .
[1/7, 10:51 PM] थोरात ond: पर्यावरण पूरक एक गोष्ट दररोज करणे.समीरसर,भालदारमॅडम,अंबवडेसर,मोटेसर,लाडमॅडम,अरविंद गोळेसर,थोरातसर,भालदारसर,तांबोळीसर,उदय भंडारेसर,अमोलसर,लोकरेमॅडम,गायकवाडमॅडम सर्वांचे आभार.
या ज्ञानयज्ञास असाच दररोज प्रतिसाद द्या या ज्ञानयज्ञास आपल्या सहभागाने विचारांनी सदैव प्रज्वलित ठेवा🙏🙏🙏

Wednesday, 6 January 2016

शैक्षणिक ग्रुपचर्चा २१

[1/6, 4:53 PM] Mahesh Lokhande: 🔴 ग्रुपचर्चासत्र   २ १🔴
🌍 चर्चेचा विषय🌍
🔶 मोठ्या पटाच्या वर्गातील  समस्या व उपाययोजना🔶
मुद्दे=१)समस्या
          २) उपाययोजना.
🔶चर्चेस वेळ  दि.६/१/२०१६   रात्री ९.३० ते१०.३०पर्यंत.🔶 सर्वांनी चर्चेत सहभागी व्हावे.🔵 कागदावर लिहुन फोटो पोस्ट केला तरी चालेल.आपले योगदान आमच्यासाठी अनमोल आहे.🙏🙏🙏🙏🙏🙏
[1/6, 9:31 PM] समीरअॅ: आजकाल प्रत्येक वर्गात ६०,७० मुले असतात.त्यामुळे त्यांच्याकडे वैयक्तिक लक्ष देता येत नाही.शिक्षक तास पध्दत असल्यामुळे सर्व मुलांची नीट ओळख ही होत नाही . फक्त हुशार मुलांची ओळख होते .बाकीची मुले शाळा बुडवितात.वर्गात गोंधळ जास्त होतो.
उपाय - १)पट मर्यादित असावा.
             २)भरपूर शैक्षणिक साहित्य निर्मिती
              ३)ई लर्निंग साहित्य वापर
               ४) तास पध्दत बंद करावी.
[1/6, 9:32 PM] Mahesh Lokhande: आजचा विषय= (Large class )मोठ्या पटाच्या वर्गातील समस्या व उपाय
[1/6, 9:33 PM] Mahesh Lokhande: किती पटाच्या वर्गास Large class  मोठा वर्ग म्हणावा?
[1/6, 9:34 PM] Mahesh Lokhande: खरोखरच वर्गाची साईज मुलांच्या शिक्षणावर परिणाम करते?
[1/6, 9:35 PM] समीरअॅ: मला वाटते ६० ते७० पट असलेला वर्ग
[1/6, 9:35 PM] ‪+91 98223 29291‬: प्रत्येक विद्यार्थी कडे वैयक्तिक लक्ष केंद्रित करता येत नाही
हुशार मुलांकडे जास्त लक्ष केंद्रित होते
अप्रगत मूल अप्रगत राहतात
[1/6, 9:36 PM] Mahesh Lokhande: ४०/५० पटाचा वर्गही काहींना मोठा वाटतो
[1/6, 9:36 PM] ‪+91 98223 29291‬: 40 च्या पुढे पट असल्यास जास्त पट संख्या वर्ग मोठा
[1/6, 9:36 PM] उमाटे mlkpur: होय🙏🙏
[1/6, 9:37 PM] वायदंडे मॅडम: वर्गखोली लहान नी विद्यार्थि संख्या जास्त मुलांची मानसिकता रहात नाही
[1/6, 9:37 PM] समीरअॅ: जि.प.शाळेसाठी ठिक  आहे .संस्थेत जास्त पट असतो.
[1/6, 9:38 PM] Mahesh Lokhande: Large classमोठ्या वर्गास शिकवणे चॅलेंज आहे.
[1/6, 9:39 PM] Mahesh Lokhande: मोठ्या पटाच्या वर्गात शिक्षकांस खूप संधी असतात असे वाटते.
[1/6, 9:40 PM] Atpade.Madam: bolaki mulech upkramamdhe sahbhagi hotat
[1/6, 9:41 PM] उमाटे mlkpur: माझ्याकडे ५० मुले आहेत.
जरा कठीण आहे...
[1/6, 9:42 PM] Atpade.Madam: shy student ans yet asun suddha bolat nahit
[1/6, 9:42 PM] Mote Gondi: वैयक्तीक मार्गदर्शन करता येत नाही.
[1/6, 9:42 PM] उमाटे mlkpur: केंद्रशाळा मलकापूर
[1/6, 9:43 PM] ‪+91 98223 29291‬: कमी हुशार मूल चर्चा उपक्रम क्रुती कवायत यात जास्त सहभाग घेतला जात नाही.
[1/6, 9:43 PM] Mote Gondi: प्रत्येक गटाएवढे शै.साहित्य निर्माण करणे .
[1/6, 9:44 PM] Mote Gondi: भिन्न विद्यार्थी स्तर असतो.
[1/6, 9:44 PM] हिलेमॅडम: मोठा पट असेल तर dnyanrachnavad पद्धतीने शिकवणे अवघड जाते
[1/6, 9:44 PM] Mote Gondi: बैठक व्यवस्थेत समस्या.
[1/6, 9:44 PM] Atpade.Madam: jast patamule swarakade persanaly laksh deta yet nahi hi khant watte
[1/6, 9:45 PM] ‪+91 98223 29291‬: प्रत्येक विद्यार्थी च्या वैयक्तीक समस्या सोडवणे शक्य नाही
[1/6, 9:45 PM] Mote Gondi: मूल्यमापनास जास्त कालावधी लागतो.
[1/6, 9:45 PM] Mahesh Lokhande: संधी=
१)शिकविण्याची पध्दत अधिक विकसित करण्याची संधी
२)आनंददायी अध्यापन करण्याची संधी
३)व्यवस्थापकिय कौशल्य विकसित करण्याची संधी
४)आयोजन कौशल्यविकासाची संधी
५)नवनिर्मिती कौशल्यविकासाची संधी
६)आंतरक्रिया कौशल्यविकासाची संधी
७)सादरीकरण कौशल्यविकासाची संधी
८)पुर्वतयारी कौशल्यविकासाची संधी
९)मूल्यमापन कौशल्यविकासाची संधी
१०)कल्पकता अनुभवसमृदधी व दर्जेदार अध्यापनाची कौशल्ये विकसित करण्याची संधी
एवढ्या संधी मोठ्या वर्गात शिक्षकांना मिळतात.
[1/6, 9:46 PM] हिलेमॅडम: प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक लक्ष्य देता येत नाही
[1/6, 9:46 PM] Mote Gondi: बहुस्तर विद्यार्थी असलेणे नियोजनात अभाव.
[1/6, 9:46 PM] उमाटे mlkpur: सर्वांना न्याय देउ शकत नाही
[1/6, 9:47 PM] Mote Gondi: वर्ग नियंत्रणात समस्या.
[1/6, 9:48 PM] Mote Gondi: गट अध्यापनास मर्यादा येतात.
[1/6, 9:48 PM] ‪+91 98223 29291‬: जास्त पटामूळे संपूर्ण विद्यार्थी चा मूलभूत विकास करता येत नाही
[1/6, 9:48 PM] Mote Gondi: गोंधळ,बडबड,दंगा समस्या येतात.
[1/6, 9:49 PM] Ambawade Prashant: Basnyachi samasya
[1/6, 9:50 PM] हिलेमॅडम: मोठ्या पटाच्या वर्गामध्ये विविध भाषा असणाऱ्या मुलांकडे वैयक्तिक लक्ष्य देता येत नाही तेवढा वेळ देता येत नाही
[1/6, 9:50 PM] Mahesh Lokhande: सर्वांना कसे मॅनेज करायचे? या समस्या सोडवता येतील का?
[1/6, 9:51 PM] ‪+91 98223 29291‬: वर्ग नियंत्रणात आणण्यासाठी अडथळे येतात मुलांवर नियंत्रण राहत नाही
[1/6, 9:53 PM] घनश्याम सोनवणे: मोठा पट  असेल  तर  विद्यार्थी कडे  वैयक्तिक  लक्ष्य  देता  येत  नाही ...
[1/6, 9:53 PM] Mote Gondi: जास्त पटसंख्येमुळे मुलांच्या अध्ययन क्षमते नुसार शिक्षकांना अध्यापनस्तर टिकवूण ठेवणे कठिण जाते.
[1/6, 9:53 PM] Mahesh Lokhande: सर्व मुलांकडे लक्ष देता यावे शिक्षक सर्वांच्या वाट्यास यावेत सर्वांना लाभ व्हावा मार्गदर्शन व्हावा असे काय करता येईल.
[1/6, 9:53 PM] रजपुतमॅडम कल्याणी: Apragat mulankade durlaxy hote hushar mulana kade pn jast laxsh deu shakat nahit class control hot nahi anek problems face karave lagatat
[1/6, 9:53 PM] हिलेमॅडम: मोठ्या पटाच्या वर्गात मुलांचे तिन स्तरात वर्गीकरण करून गटनायक नेमुण् आपला उद्देश् साध्य करता येईल
[1/6, 9:53 PM] सुलभा लाडमॅडम: Kami yenarya mulankde durlksh hote
[1/6, 9:53 PM] ‪+91 98223 29291‬: विद्यार्थी गुणवत्ता राखण्यात अपयश येते.
[1/6, 9:54 PM] Ambawade Prashant: Nahi yawar 1 upay dnyan rachnawad
[1/6, 9:54 PM] घनश्याम सोनवणे: अनेक वेळा गटातच  विद्यार्थ्यांना  अभ्यास  द्यावा  लागतो  तेव्हा  चांगले  अध्ययन  होते
[1/6, 9:55 PM] Mote Gondi: ई-लर्निगचा प्रभावी वापर .
[1/6, 9:55 PM] रजपुतमॅडम कल्याणी: Class control karne tyasathi secretory nemmun teaching karne
[1/6, 9:55 PM] सुलभा लाडमॅडम: Kahi mule tshich rhun jatat
[1/6, 9:55 PM] Ambawade Prashant: Ho pn mul swat vichar bahi karat e-learning made
[1/6, 9:56 PM] घनश्याम सोनवणे: जास्त  पट  असल्याने  गैरहजेरी  ही  तेवढ्याप्रमाणात  जास्त  असते... त्याचा  परिणाम  शिक्षकांच्या  मानसिकतेवर  होतो
[1/6, 9:56 PM] रजपुतमॅडम कल्याणी: Class madhil kami hushar mulana hushar mulankadun vachan padhe english shabad manayas lavane
[1/6, 9:56 PM] घनश्याम सोनवणे: मी  तर  गटपद्धती वापरतो
[1/6, 9:56 PM] Mote Gondi: ज्ञानरचनावाद पद्धतीचा अबलंब करणे
[1/6, 9:57 PM] Ambawade Prashant: Mi pn gat padhati pb dnyan rachnawadatun
[1/6, 9:57 PM] घनश्याम सोनवणे: माझ्याकडे  ५ वीला  ५८ पट  आहे....
[1/6, 9:57 PM] सुलभा लाडमॅडम: Mule v shikshk doghanchihi mansikta rahat nahi
[1/6, 9:57 PM] ‪+91 98223 29291‬: प्रभावी साधन तंत्राचा वापर करावा
[1/6, 9:57 PM] रजपुतमॅडम कल्याणी: Jast patamule teacher la yogya veli yogya margdarshn mulana deta yet nahit
[1/6, 9:57 PM] Mote Gondi: शै.साहित्याचा भरपूर व प्रभावी वापर .
[1/6, 9:58 PM] घनश्याम सोनवणे: ज्ञानरचनावाद  व  E-learning  या  दोघांचा  अवलंब  करायला  पाहिजे
[1/6, 9:58 PM] हिलेमॅडम: गट तयार करुण अभ्यास देता येईल व गटनायकाकडून अभ्यास तपासून घेता येईल परन्तु गटनायक रोज बदलला पाहिजे सर्वाना संधि मिळाली पाहिजे.
[1/6, 9:58 PM] Ambawade Prashant: Nahi tasa nahi
[1/6, 9:59 PM] Mahesh Lokhande: वर्गवातावरणनिर्मिती महत्वाची आहे
भरपुर प्रकाश,स्वच्छता,भरपुर मोकळी जागा हालचालीस ,विद्यार्थी सादरीकरण प्रदर्शनबोर्ड,वर्गाबाहेरील जागेचा वापर हवा.
[1/6, 9:59 PM] Mote Gondi: अभ्यासपूर्वक मनोरंजक अध्ययनपद्धतीचावापर .
[1/6, 9:59 PM] रजपुतमॅडम कल्याणी: Teaching method vaparatna sarvach mulancha kal laxyat gheun Jr teaching kele tr student na fayada hoil
[1/6, 9:59 PM] ‪+91 98223 29291‬: गटचर्चा आयोजित करावी
[1/6, 9:59 PM] Ambawade Prashant: Tyapeksha tumhi tyanchi competition ghya response changala yeto
[1/6, 10:00 PM] रजपुतमॅडम कल्याणी: Class madhe bolkya pataka charts lavne
[1/6, 10:00 PM] समीरअॅ: गट पध्दतीचा वापर उत्कृष्ट
[1/6, 10:00 PM] सुलभा लाडमॅडम: Gatnayak  he tya tya vishyat tyariche hvet
[1/6, 10:00 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: १)काहीही झाले तरी मुळ पाया..भक्कम करणे अत्यावश्यकच आहे२)कारण  आपण फक्त पाठ्यपुस्तक शिकवून संपवतो...पण.पुस्तक हे साधन आहे...३)यासाठी वाचन,लेखन,गणिती क्रीया..परिपूर्ण करून घेण्याकडेच..शिककाचा...कल असावा🙏
[1/6, 10:01 PM] घनश्याम सोनवणे: जास्त  पट असतो  परंतु मुलांना  बसायला  जागा  नसते
[1/6, 10:01 PM] Mote Gondi: प्रात्यक्षिक ,कृती , उपक्रमावर भर द्यावा.
[1/6, 10:01 PM] Mahesh Lokhande: मोठ्या वर्गास गटपध्दतीने छोटा करता येतो व गटात शिक्षकांना सहज मार्गदर्शन करणे व वैयक्तिक लक्ष देणे जमते.गटप्रमुख मदत करतात.
[1/6, 10:01 PM] ‪+91 98223 29291‬: शैक्षणिक साधनांचा भरपूर प्रमाणात  वापर करावा
[1/6, 10:02 PM] ‪+91 98223 29291‬: कला कार्यानुभव शा शि मध्ये प्रत्येक विद्यार्थी ला सहभागी करून घ्यावे
[1/6, 10:02 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: गट करताना सर्व स्तर एकञ असावेत..
[1/6, 10:04 PM] हिलेमॅडम: E-learning चा उपयोग करुण वाचन कविता गायन संवाद् इ.विषयी माहिती देताना प्रभावी ठरते
[1/6, 10:04 PM] Mahesh Lokhande: विद्यार्थी नामकार्ड चेहरानावफलक अभिनवहजेरीपध्दती
यांनी सर्वांची नावे लक्षात राहतील.
[1/6, 10:05 PM] Mote Gondi: संदर्भ  साहित्याचा वापर करावा.
[1/6, 10:05 PM] उमाटे mlkpur: common lecture is d best method but for 5,6,7std
[1/6, 10:05 PM] Mahesh Lokhande: वर्गमत्रीमंडळ(वर्गव्यवस्थापन समिती)महत्वाची मदत करते.
[1/6, 10:06 PM] रजपुतमॅडम कल्याणी: Tyacha chart class made lavne
[1/6, 10:06 PM] Mahesh Lokhande: वर्गशिस्त नियमावली करता येईल.
[1/6, 10:07 PM] Mahesh Lokhande: वर्गाचे संविधान क्लासरुम पाॅलिसी बोर्ड
[1/6, 10:07 PM] घनश्याम सोनवणे: ✔✔✔ वर्गमंडळ  हवेच  वर्गात
[1/6, 10:08 PM] भुसारीसर रेठरे: लहान-लहान गट करणे व गट नायक पध्दत वापरणे. विद्यार्थी जोड्यातयार करणे.
[1/6, 10:08 PM] घनश्याम सोनवणे: माझ्या  वर्गात  आहे ... सर्वजण  छान  शिस्तबद्ध  कामं  करतात
[1/6, 10:10 PM] Mahesh Lokhande: सकारात्मक स्वयंशिस्तपध्दती विकसित करणे.शांततेने काम गटात करण्याची पध्दती.
[1/6, 10:11 PM] Mahesh Lokhande: मुलांना बोअर होणारी कंटाळवाणी पध्दती सोडून देणे.
[1/6, 10:12 PM] Mahesh Lokhande: गटप्रमुख आपले टिचिंग असिस्टंट असतात.
[1/6, 10:15 PM] ‪+91 98223 29291‬: प्रभावी माध्यम साहित्य
संमेलन साधन तंत्राचावापर करण्यात यावा
[1/6, 10:16 PM] Mahesh Lokhande: गटकार्य सहअध्ययन महत्वाचे ठरते.
[1/6, 10:18 PM] Mahesh Lokhande: पुर्वतयारी टाईम मॅनेजमेंट घटक,उददिष्टे,पध्दती,वर्गरचना,कृती,साधने,प्रतिसाद,स्वाध्याय याचा आधी विचार करायलाच हवा.टाईम बजेट महत्वाचे आहे.
[1/6, 10:19 PM] अरविंद गोळे: Teacher ni adikadik sadanacha vapar karava
[1/6, 10:20 PM] Mahesh Lokhande: वर्गातील बेंचचा प्रभावी ,फरशीचा प्रभावी वापर,तळफळ्याचा प्रभावी वापर करायलाच हवा.
[1/6, 10:20 PM] अरविंद गोळे: Varga sajavat
[1/6, 10:23 PM] अरविंद गोळे: Teacher avaj sudha kitihi vidyarti sankhyavar niyantran karto
[1/6, 10:25 PM] अरविंद गोळे: Me sudha eka veli 100 te 150 students na teach karto
[1/6, 10:27 PM] अरविंद गोळे: Pan mala vat thye class cantrol teacher var defined ahe
[1/6, 10:28 PM] अरविंद गोळे: Your personality
[1/6, 10:32 PM] अरविंद गोळे: Prabhavi adhyapan
[1/6, 10:32 PM] अरविंद गोळे: Adhyapanat vividhata
[1/6, 10:35 PM] अरविंद गोळे: Teacher हावभाव
[1/6, 10:36 PM] Mahesh Lokhande: Large class मोठ्या वर्गास शिकवण्यासाठी उपाय=
१)नियोजन आधीच करणे.
२)अनावश्यक फर्निचर काढणे.वर्गातील बाहेरील जागेचा प्रभावी वापर करणे.
३)विद्यार्थी नावाने ओळखणे व सर्वास कामात गुंतवणे
४)गटात काम करुन घेणे
५)सहअध्ययन
६)स्वयंअध्ययन
७)कृतीत व्यस्त ठेवणे
८)विद्यार्थ्यांशी जवळीक आपलेपणा वाढणे.
९)सर्वांच्या शंकासमाधानास शालेय वेळेत तयार असणे उपललब्ध असणे.
१०)ग्रुपमार्गदर्शन करणे
११)नैदानिक चाचण्या साप्ताहिक चाचण्या घेणे.
१२)गटकार्य,भुमिकासादरीकरण
१३)ई लर्निंग
१४)प्रश्ननिर्मिती विद्यार्थ्यांनी करणे
१५)स्वाध्यापेपर
अशा अनेक गोष्टीनी मोठ्या वर्गास प्रभावी अध्यापन शक्य आहे.
[1/6, 10:46 PM] भालदार गोळेश्वर: Mulanche manasshastracha janun mulancha kal samjun ghene far garjeche.....
[1/6, 10:51 PM] Mahesh Lokhande: समीरसर,कांबळेसर,उमाटेसर,वायदंडेमॅडम,संदेमॅडम,मोटेसर,हिलेमॅडम,घनश्याम सोनवणेसर,रजपुतमॅडम,लाडमॅडम,अंबवडेसर,तांबोळीसर,भुसारीसर,गोळेसर,भालदारसर सर्वांचे आभार🙏🙏🙏🙏