Sunday, 3 January 2016

शैक्षणिक ग्रुपचर्चा १८

[1/3, 7:19 PM] Mahesh Lokhande: 🔴 ग्रुपचर्चासत्र   १८ 🔴
🌍आजचा चर्चेचा विषय🌍
🔶 बहुवर्ग अध्यापनात येणार्‍या अडचणी व उपाययोजना🔶
मुद्दे=१)बहुवर्ग अध्यापनातील अडचणी
          २) बहुवर्ग अध्यापनाचा दर्जा वाढीसाठी उपाययोजना.
🔶चर्चेस वेळ आज दि.३/१/२०१६  रात्री ९.३०  ते १०.३०पर्यंत.🔶 सर्वांनी चर्चेत सहभागी व्हावे.🔵
[1/3, 9:25 PM] सुलभा लाडमॅडम: Bhuvrg adhyapnat sarv vrgana asnare samaik ghtak konte yachar krava tyamule adhyapnat susutrta yeil.
[1/3, 9:32 PM] सुलभा लाडमॅडम: Anek vrg yektr niyojnat  adchni yetat vyogtacha prinam
Aaklnavar hot aslyamuleyekra sikvne avghd jail asha veli swadhy tantracha vapor krava
[1/3, 9:36 PM] Mahesh Lokhande: आधी अडचणींची चर्चा करुया.
[1/3, 9:38 PM] थोरात ond: बहुवर्ग अध्यापन -अध्यापनासाठी वेळेची मर्यादा. सर्व विषयातील समान घटकांसाठी एकत्र अध्यापन. गटनायक पद्धत  वापर. ज्ञानरचनावाद पद्धत बहुवर्गासाठी खूप फायदेशीर आहे.
[1/3, 9:41 PM] Mote Gondi: बहुवर्ग - समस्या
१) अभ्यासक्रम पूर्ण होणेस विलंब.
२)सरावाला वेळ कमी.
३) एका वर्गाची पट संख्या  कमी असलेणे उपक्रमात अडथळा.
४) टाचण  समस्पा .
५)  पालकांचा पाहण्याचा  दृष्टीकोण.
६)नियमितजोड वर्ग वा कधी  चार वर्ग.
७)शालेय विद्यार्थांचा किमान दर्जा कसा साध्य करता येईल .
८)इतर कामे.
९)  मूल्यमापन.
१०) अपेक्षांच ओझ .
    🙏?
    नितीन मोटे
[1/3, 9:48 PM] थोरात ond: सहल, सांस्कृतिक कार्यक्रम, सांघिक खेळ इत्यादी साठी खूप मर्यादा येतात. (पट 10ते20)
[1/3, 9:49 PM] Mahesh Lokhande: बहुवर्ग अध्ययन पद्धतीने शिक्षणाच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. तुकडी पध्दत बंद, तुकडीमागील विद्यार्थी संख्येत केलेली वाढ आणि एकाच शिक्षकाकडे एकापेक्षा अधिक वर्गांबरोबरच अधिक विषय शिकवावे लागणार असल्याने विद्यार्थ्यांवरही याचा विपरीत परिणाम होणार आहे. नवीन निकषांनुसार तुकडी पद्धत बंद होत असल्याने याचा थेट परिणाम शिक्षकांच्या संख्येवर आणि शिक्षणाच्या गुणवत्तेवर होणार आहे.
[1/3, 9:51 PM] भुसारीसर रेठरे: अभ्यासक्रम  सर्व वर्गांचा असल्यामुळे घटकांवर लक्ष देता येत नाही.  विद्यार्थ्याचे नुकसान होते. श्री.भुसारी ,जुळेवाडी
[1/3, 9:53 PM] Mahesh Lokhande: नवीन संचमान्यतेनुसार भाषा विषयाला एक शिक्षक, गणित, विज्ञान या विषयांना एक शिक्षक, तर सामाजिक शास्त्र विषयांना एक याप्रमाणे शिक्षकांची नियुक्ती करता येणार आहे, त्यामुळे एकाच शिक्षकाला अनेक विषय शिकवावे लागणार आहेत. याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे ज्या प्राथमिक शाळांमध्ये वीसपेक्षा कमी विद्यार्थी असतील, त्या ठिकाणी शिक्षकांना बहुवर्ग अध्यापन पध्दती अवलंबावी लागणार आहे. परिणामी एकाच शिक्षकावर अवलंबून असणाऱ्या अशा शाळांचे कोंडवाडे बनण्याची भीती आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीतही हीच स्थिती असल्याने विद्यार्थ्यांना सुविधा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचे कसे, असा प्रश्न शिक्षण संस्था आणि शिक्षकांसमोर उभा ठाकला आहे. अशा स्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांची शैक्षणिक गुणवत्ता टिकणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
[1/3, 9:55 PM] भुसारीसर रेठरे: प्रशासकीय कामचे काय? सर्व वर्गाचे नुकसान .
[1/3, 9:56 PM] Mahesh Lokhande: बहुवर्ग बहुविषय अध्यापनपध्दतीमुळे व इतर अनेक शैक्षणिक कामामुळे गुणवत्ता ढासळते.
[1/3, 9:56 PM] मिलिंद अॅ: रचनावाद यावर चांगला उपाय आहे.
[1/3, 9:57 PM] मिलिंद अॅ: समस्या या न संपणाऱ्या आहेत.
त्यावर उपाय काढावा लागेल
[1/3, 9:57 PM] मिलिंद अॅ: प्रसूती रजा 6 मंथ
[1/3, 9:57 PM] मिलिंद अॅ: अशा अनेक अडचणी आहेत
[1/3, 9:59 PM] Mahesh Lokhande: शाळेत काय शिकवले जाते, त्यापकी काय आणि कसे मोजले जाते यावरून गुणवत्तेचे प्रमाण बदलते. इंटरनेट वापरण्याचे कौशल्य मोजायचे असेल तर कोण पुढे जाणार आणि शेतीची अवजारे वापरण्याचे कौशल्य मोजायचे असेल तर कोण जाणार याची उत्तरे आपल्याला माहीत असतात. उपलब्ध संधी आणि साधनसामग्री यामध्ये पराकोटीची भिन्नता असताना एकाच प्रकारच्या कौशल्यांना 'ज्ञान' म्हणण्याची व इतर कौशल्यांकडे दुर्लक्ष करण्याची शिक्षणातली 'परंपरा' गुणवत्तेचे आणखी काही आयाम निश्चित करीत असते.
[1/3, 10:00 PM] भुसारीसर रेठरे: कालावधी जास्त लागतो.वैयक्तिक लक्ष देणे जमत नाही.
[1/3, 10:02 PM] अमोल पैठणे बुलढाणा: बहुवर्ग अध्यापनामुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देता येत नाही, अप्रगत व हुशार विद्यार्थ्यासाठी पूरक उपक्रम अंमलबजावणीत अडचणी येतात.
[1/3, 10:02 PM] थोरात ond: बहुवर्ग अध्यापन व माहिती देवाणघेवाण यात शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागते. माहिती देणे क्रमप्राप्त तर वर्गाकडे दुर्लक्ष झाल्याने मनात अपराधीपणाची भावना निर्माण होते.
[1/3, 10:03 PM] भुसारीसर रेठरे: ऊपाय सुचवा
[1/3, 10:06 PM] भुसारीसर रेठरे: शालेय वेळे पेक्षा जादा वेळ द्यावा लागेल.
[1/3, 10:06 PM] Mahesh Lokhande: राज्यातील शाळांमधून विद्यार्थीसंख्येचे निकष, वर्ग-तुकडीची व्यवस्था बंदी, वर्ग जोडणे, शाळांमधील संरचनात्मक बदल आणि संचमान्यतेचे सुधारित निकष याबाबतीत अनुचित हेतूने अनेक अशैक्षणिक बदल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होऊन विद्यार्थी व शिक्षकांवर अन्याय होणार आहे. पुढीलप्रमाणे प्रश्न व अन्यायकारक तरतुदी अशैक्षणिक आहेत.
विद्यार्थीहितास बगल देऊन  केवळ शिक्षक कमी करण्यासाठी बहुवर्ग अध्यापन पद्धतीचा पुरस्कार करत आहे. सदर पद्धत विद्याथ्र्यांना गुंतवून ठेवण्यासाठी प्रासंगिक व अल्पकाळासाठी उपयोगी ठरते. इयत्ता पहिली व दुसरी या दोन वर्गांत (२५+२५Ÿ) एकूण ५० विद्यार्थी असले तरी सदर दोन वर्ग बहुवर्ग अध्यापन पद्धतीने एका शिक्षकाने चालविण्याचा दुराग्रह विद्याथ्र्यांच्या शैक्षणिक प्रगतीस बाधक आहे. बहुवर्ग अध्यापन पद्धतीचा हेतू विद्यार्थी हित नसून केवळ शिक्षक कपात करणे हाच आहे.
शाळेतील एकूण वर्ग/तुकड्यांच्या संख्येवरून शिक्षकांचा कार्यभार निश्चित होेतो. तसेच विषयाच्या कार्यभारावर शाळेतील शिक्षकांची संख्या निश्चित केली पाहिजे. केवळ विद्यार्थीसंख्येवर शिक्षकांची संख्या निश्चित करणे अशैक्षणिक असून वर्ग/तुकडीमधील सर्व विषयांच्या अध्यापनाचा व प्रात्यक्षिक कामाचा कार्यभार लक्षात घेऊनच शिक्षकांच्या संख्येचे व नियुक्तीचे प्रमाण ठरविले पाहिजे. विद्यार्थीसंख्येपेक्षा विषयाच्या कार्यभारावरून शिक्षकांची पदे मंजूर करावीत. त्यामुळे विषयाला व विद्याथ्र्यांना न्याय
मिळेल. विषय व त्यांचा कार्यभार याच्या आधारे शिक्षकांची पदे मंजूर झाली पाहिजेत.
[1/3, 10:07 PM] थोरात ond: पट 30ते59 असल्यास बहुवर्ग अध्यापन खूप त्रास होतो.
[1/3, 10:07 PM] थोरात ond: पट 30 ते 60 असेल तर खूपच त्रासदायक .
[1/3, 10:07 PM] भुसारीसर रेठरे: जोड वर्गाचे समान घटक निवडुण अध्यापन करने.
[1/3, 10:09 PM] Mahesh Lokhande: एकाच शिक्षकावर सगळ्या भाषा व इतर विषय शिकवण्याची सक्ती होणार किंवा तीन शिक्षकांमध्ये सर्व विषयांचा संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करण्याची सक्ती
[1/3, 10:09 PM] भुसारीसर रेठरे: गटनायक अध्यापन करने
[1/3, 10:09 PM] Mahesh Lokhande: वर्ग पहिली ते आठवी व सहावी ते दहावी या शाळांमध्ये क्रीडा, संगीत व कला शिक्षक बसतो.
[1/3, 10:10 PM] थोरात ond: ज्ञानरचनावाद प्रभावीपणे अंमलबजावणी हा Best उपाय.
[1/3, 10:10 PM] समीरअॅ: बहुवर्ग अध्यापन साठी आम्ही ई लर्निंग चा वापर करा .टँब वापर अध्ययन अध्यापन करावा.जादा वेळ द्यावा लागणार नाही.
[1/3, 10:12 PM] Mahesh Lokhande: १] विद्यार्थ्यांना शैक्षणिक फिल्म्सची माहिती करून देणे २] विद्यार्थ्यांमध्ये शॉर्ट फिल्मसच्या माध्यमातून शैक्षणिक दृष्टीकोन विकसित करणे . ३] शॉर्ट फिल्मसद्वारे जीवन कौशल्यांची विद्यार्थ्यांना ओळख करून देणे. ४] विद्यार्थ्यांना शॉर्ट फिल्मसद्वारे सामाजिक , आर्थिक आणि शैक्षणिक समस्यांची जाणीव करून देणे ५] विद्यार्थ्यांमध्ये शॉर्ट फिल्मसद्वारे पर्यावरण विषयक जाणीव जागृती करणे . ६] विद्यार्थ्यांमध्ये शॉर्ट फिल्मसवर आधारित चर्चेच्या माध्यमातून मुक्त अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य मिळवून देणे . ७] विद्यार्थ्यांमध्ये शॉर्ट फिल्मसच्या माध्यमातून स्वयंशिस्तीची मनोरंजक पद्धतीने रुजावणूक करणे.
[1/3, 10:12 PM] Mote Gondi: मूल्यमापन ?
एकाच तराजूत केले जाते ?
[1/3, 10:12 PM] थोरात ond: सेवा निवृत्त शिक्षक,गावातील स्वयंसेवक याची  मदत
[1/3, 10:14 PM] Mote Gondi: बहुवर्ग समस्यावर उपाय-
१)स्वयं अध्ययनाची सवय लावावी.
२)शिकण्यासाठी सतत प्रेरीत करावे.
३)वैयक्तीक मार्गदर्शन .
४) विद्यार्थ्याचे मानसशास्र जाणुन घ्यावे.
५)विद्यार्थ्याचा काठीण्यस्तर ज्ञात असावा.
६)निर्वर्ग अध्यापनावर भर द्यावा.
७)मुलांचा प्रतीसाद स्विकारावा.
८)प्रभावी गट अध्यापन.

९)शै. राहित्याचा वापर .
१०) समान घटक निवड व अध्यापन.
११) इयत्ता १ली  २ री तच अावश्यक क्षमतांचा विकास करावा.
१२)सर्व विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रभुत्व पातळी पर्यंत घेवूण जान्याचा  प्रयत्न करावा.
१३)अर्ध वर्तुळाकार मुलांची बैठक व्यवस्था करावी.
१४)कृतीवर भर द्यावा.
१५)स्वावलंबन व स्वयंशिस्त लावावी .
१६) प्रात्यक्षिक ,प्रयोगावर व प्रत्यक्ष अनुभवावय भर द्यावा.
१७) वेळापत्रकात  लवचिकता ठेवावी.
१८) वरच्या वर्गातील मुलांच्याकडूण खालच्या वर्गातील मुलांचा अभ्यासासाठी मार्गदर्शण  द्यावे .
१९)  गट प्रमुखाला ( मिनी टिचर) बनविण्याच्या दृष्टिने उद्बोधन ,मार्गदर्शन ,करूण उपयोग  करावा .
२०) ज्ञाताकडूण - अज्ञाताकडे, मूर्ताकडूण- अमूर्ताकडे, पूर्णाकडून- भागाकडे  , विशिष्टाकडुण- सामान्याकडे , विश्लेषणाकडून- संश्लेषणाकडे या अध्यापण सूत्राचा जणावपूर्वक  अवलंब व्हावा.
  🙏🀊 नितीन मोटे
[1/3, 10:14 PM] Mahesh Lokhande: एबीएल पद्धती वापर 
एबीएल म्हणजे कृतीद्वारे शैक्षणिक क्षमतेची संपादणूक होणारी तांत्रिक पद्धत आहे. ज्ञानेंद्रियांद्वारे जे ज्ञान आपण मिळवितो, ते कालांतराने विसरू शकतो; परंतु जे आपण स्वत: कृतीद्वारे शिकतो, ते कायमस्वरूपी मनात पक्के राहते.
[1/3, 10:15 PM] Mahesh Lokhande: कृतियुक्त अध्ययन कार्यक्रम (अ‍ॅक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग प्रोग्राम)
[1/3, 10:17 PM] समीरअॅ: बहुवर्ग अध्यापन करताना भरपूर शैक्षणिक साहित्याचा वापर करतो.आश्चर्य वाटेल की आम्ही दुपार नंतर आम्ही शिकवत नाही .त्यासाठी आम्ही भरपूर साहित्य बनविले.तसेच ABL सुध्दा चालू केले.
[1/3, 10:20 PM] Mote Gondi: अाजच्या परिस्थितीत तंत्रज्ञानाचा वापर बहूवर्गासाठी अत्यंत उपयुक्त अाहे .
[1/3, 10:20 PM] Mahesh Lokhande: अ) आदर्श परिपाठ - एखाद्या कार्याची चांगली सुरुवात म्हणजे अर्धे यश. Well begining is half done या उक्तीप्रमाणे शालेय कामकाजाची सुरुवात पूर्णपणे विद्यार्थ्यांच्या सहभागातून, सूत्रसंचालनातून सादर केला जाणारा आदर्श, नमुना परिपाठ. परिपाठातून राष्ट्रगीत, तिन्ही भाषांतून नेमून दिलेल्या दिवशी प्रतिज्ञा, संविधानाचे सामूहिक वाचन सादर होते. राष्ट्रभक्ती, समाजभक्ती व संविधानाचा आदर यातून रुजवला जातो. 1) जो दिनांक, तो पाढा, 2) दिनविशेष, बातमीपत्र, 3) दिनांक, तिथी, वार, 4) समूहगीत, 5) प्रार्थनागीत, 6) प्रश्नमंजुषा, 7) बोधकथा, 8) सुविचार अशा अनेक उपक्रमांत वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा आलटून पालटून सहभाग असतो. यात सर्व शाळा प्रभावी सादरीकरण करतात. जि.प.प्रा.शा. दसवाडी, जि.प.प्रा.शा. किनी (कदू), प्रा.शा. सावरगाव थोर, कें.प्रा.शा. हिप्पळगाव, प्रा.शा. लांजी, प्रा.शा. विळेगाव येथे नमुना सादरीकरण आहे.
आ) उपस्थिती कार्डे - प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये प्रामाणिकपणा व नियमितपणा येण्यासाठी सर्व नंदादीप शाळांमध्ये या कार्डाची योजना करण्यात आली. विद्यार्थी स्वत:ची उपस्थिती स्वत: नोंदवतो. काल गैरहजर असल्यास तशी नोंद करतो. त्यातून त्याच्यातील प्रामाणिकपणाला व नियमितपणाला प्रेरणा मिळते.
इ) उपस्थिती ध्वज - ज्या वर्गात सर्वाधिक उपस्थिती, त्या वर्गाला उपस्थिती ध्वज देऊन स्वागत केले जाते. त्यामुळे प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांना आपल्या वर्गाची 100% उपस्थिती ठेवण्यास प्रेरणा मिळते. चुरस वाढते.
ई) विविध अध्ययन कोपरे - या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनास, संग्रह वृत्तीस चालना मिळाली.
1) वाचन कोपरा - गोष्टींची, चित्रांची, गाण्यांची विविध पुस्तके येथे ठेवली जातात. विद्यार्थी रुचीनुसार अवांतर वाचन  करतो. त्यातून विविधांगी वाचनाची गोडी निर्माण होते.
2) गणित कोपरा - विविध भूमितीय आकाराच्या वस्तू, शंख, शिंपले, चिंचोके, मणी अशा विविध साहित्याचा संग्रह या कोपऱ्यात केला जातो. यातून विद्यार्थी स्वयंअध्ययनातून विविध गणिती क्रिया करण्याचा प्रयत्न करतो.
3) निसर्ग कोपरा - (विज्ञान कोपरा) - रोपांच्या कुंडया, विविध चित्रे, चार्ट तसेच विविध विषयांचे सराव कार्डे, खेळाची विविध साधने यांची रचना केली जाते.
उ) स्वयंअध्ययन कार्ड - विद्यार्थ्यांना स्वत: शिक्षण घेण्याचे हे एक प्रभावी व परिणामकारक साहित्य होय. विषयनिहाय, वर्गनिहाय प्रत्येक पाठावरील छोटे छोटे प्रश्न एका कार्डावर छापून वर्गातील विद्यार्थ्यांचे गट करून गटागटात कार्ड वितरित केले जाते. एका विद्यार्थ्याने एका प्रश्नाचे वाचन केल्यानंतर सर्वांनी पाठातील उत्तर शोधून वहीत लिहून काढण्याचा हा अत्यंत प्रभावी उपक्रम आहे. शासकीय अथवा खाजगी कामामुळे एखाद्या वर्गाचे शिक्षक रजेवर असतील, तर बहुवर्ग अध्यापनासाठी स्वयंअध्ययन कार्डाचा वापर शिक्षकमित्रांना अत्यंत उपयुक्त ठरतो आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा अध्ययनाचा दर्जा विकसित झाला आहे. हा अहमदपूर पॅटर्नचा पाया आहे.


ऊ) शिक्षणोत्सव, विज्ञान प्रदर्शन - अहमदपूर तालुक्यात दर वर्षी शाळास्तरावर शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या सहभागातून निर्माण केलेल्या शैक्षणिक साहित्याची व विज्ञानाच्या विविध प्रयोगांची मांडणी करून शिक्षणप्रेमी ग्रामस्थांसाठी व पालकांसाठी प्रदर्शन मांडले जाते. या कार्यक्रमात विद्यार्थी स्वत: साहित्याची माहिती, उपयोग, प्रयोगाचे सादरीकरण करतात. त्यामुळे नेतृत्वगुणांसह निर्मितीचा आनंद व आत्मविश्वास वाढतो. पालकांमध्ये शाळेविषयी सहकार्याचा भाव वाढतो.
ए) विविध अध्ययन फलक - विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला वाव मिळावा, म्हणून इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व वर्गांत चार प्रकारचे फलक लावलेले आहेत. त्यातून विद्यार्थ्यांचा ज्ञानसंग्रह वाढतो.
1) प्रेरणा फलक - ज्या घटकाचे अध्यापन चालू आहे. त्यातील नवीन संकल्पना, नवीन शब्द या फलकावर प्रदर्शित केले जातात. मुले उत्स्फूर्तपणे वाचनास प्रवृत्त होतात.
2) सृजनानंद फलक - एखाद्या विषयाला अनुसरून विद्यार्थ्याने लेखन, कथन करून तो लेख या फलकावर लावला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशक्तीचा विकास होतो. सर्जनाचा आनंद मिळतो.
3) कात्रण फलक - विद्यार्थ्यांनी वृत्तपत्रे, मासिकातून विविध निसर्गचित्रे, रंगवलेली विविध चित्रे, प्रसंगचित्रे इ.ची कात्रणे जमवून ती या फलकावर लावण्यात येतात.
4) संदर्भ सूचक फलक - वर्गनिहाय व विषयनिहाय चालू घटकाच्या अनुषंगाने 'मुद्दयांचे' प्रदर्शन या फलकावर केले जाते.
5) हवामान फलक / तापमान फलक - या फलकावर विद्यार्थी आपापल्या वर्गातील तापमापीचे निरीक्षण करून तापमानाची नोंद करतात.
या सर्व उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचन, ज्ञानसंग्रह, निर्मिती व संग्रह, स्वयंअध्ययन, नेतृत्व अशा गुणांचा विकास होतो. आत्मविश्वास वाढतो.
[1/3, 10:25 PM] Mahesh Lokhande: ई लर्निंगमुळे समान घटक जोडवर्गास सहज शिकता येतात.
[1/3, 10:26 PM] Mahesh Lokhande: दोन वर्ग किंवा चारही वर्ग एकास शिक्षकास शिकवावे लागत असतील तर कसे शिकवावेत?
[1/3, 10:28 PM] Mahesh Lokhande: मातकाम,कागदकाम,ठसेकाम ,चित्र असे कला ,कार्या, शारीरिक शिक्षण विषयाचे सर्व घटक सर्व इयत्तांस एकावेळी सहज घेता येतील
[1/3, 10:29 PM] मिलिंद अॅ: गणित विषय यात बरेच घटक समान असतात शिकवत येईल
[1/3, 10:29 PM] मिलिंद अॅ: सृतलेखन
[1/3, 10:29 PM] मिलिंद अॅ: अनुलेखन
[1/3, 10:29 PM] मिलिंद अॅ: व्याकरण
[1/3, 10:30 PM] Mahesh Lokhande: इंग्रजी,मराठी कवितागायन समुहगीत कृतीगीते स्फुर्तीगीतगायन एकत्र घेता येईल.
[1/3, 10:30 PM] मिलिंद अॅ: प्रयोग
[1/3, 10:31 PM] Mahesh Lokhande: विविध स्पर्धा
[1/3, 10:31 PM] Mote Gondi: नाट्यीकरण
[1/3, 10:31 PM] Mahesh Lokhande: जयंती पुण्यतिथी समारंभ बालसभा
[1/3, 10:32 PM] Mahesh Lokhande: बाबालआनंदमेळावा
[1/3, 10:32 PM] अमोल पैठणे बुलढाणा: भूमिकाभिनय, कळसूत्री बाहुल्यांचा वापर
[1/3, 10:32 PM] थोरात ond: कवायत, खेळ सर्व वर्गांना एकत्र घेणे.
[1/3, 10:32 PM] Mote Gondi: ppt सराव
[1/3, 10:33 PM] Mahesh Lokhande: पाढेवाचन गायन पाढेकवायत
[1/3, 10:34 PM] सुलभा लाडमॅडम: Kla kar yanubhav sha.shi yektrghene
[1/3, 10:34 PM] Mote Gondi: अभ्यास ,स्वाध्याय सोडवून घेणे.
[1/3, 10:35 PM] Mahesh Lokhande: पुरकवाचन वाचनालय पुस्तकवाचन
[1/3, 10:36 PM] Mahesh Lokhande: निबंध व कथालेखन
[1/3, 10:36 PM] Mote Gondi: अवांतर वाचन ,गोष्टीची पुस्तके ,कागद कान ,भाषिक ,गणितीती खेळ घेणे.
[1/3, 10:37 PM] अमोल पैठणे बुलढाणा: इंग्रजी सुचना, कवितागायन, चित्र-शब्द कार्ड वाचन, गोष्टीच्या पुस्तकांचे वाचन
[1/3, 10:49 PM] भालदारमॅडम ज्ञा: लोखंडे सर 🙏🏻दोनदिवस तब्बेत बरी नसल्याने सहभागी होऊ शकले नाही. आज ही बरी नाही पण राहावत नाहीये. बहुवर्ग अध्यापनात रचनावादा ने बरीच मात करता येते .आपण जर एखाद्या वर्गाला कविता शिकवत असू तर शिक्षकाने कवितेचे आर्दश वाचन केल्यानंतर आपण मुलांना त्यातील कठीण शब्दार्थ शब्दार्थ शोधायला लावू शकतो तो पर्यत दु सर्रा वर्गाला वेळ देऊ शकतो.
[1/3, 10:51 PM] Mahesh Lokhande: लाडमॅडम,थोरातसर,मोटेसर,भुसारीसर,मिलिंदसर,अमोलसर,समीरसर,भालदारमॅडम सर्वांचे आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
[1/3, 10:52 PM] भालदारमॅडम ज्ञा: यावर उपाय वेगवेगळे अध्ययन अनुभव जसे की,प्र श्न र्निमीती ,
[1/3, 10:54 PM] भालदारमॅडम ज्ञा: क्षेञभेट,गणिती कोडी,शाब्दीककोडी,
[1/3, 10:54 PM] Mahesh Lokhande: भालदारमॅडम आपण आजारी असतानाही ग्रुपला योगदान देता.आपलेकडून अनेक गोष्टी सर्वांना प्रेरणा देणार्‍या आहेत आपण लवकर बरे व्हा काळजी घ्या.आपले आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.
[1/3, 10:57 PM] घनश्याम सोनवणे: चर्चा फारच छान 
👌🏻👌🏻👏🏻👍🏻👆🏻

Saturday, 2 January 2016

शैक्षणिक ग्रुपचर्चा १७

[1/2, 6:24 PM] Mahesh Lokhande: 🔴 ग्रुपचर्चासत्र   १७  🔴
🌍आजचा चर्चेचा विषय🌍
🔶 मूल्यशिक्षणासाठी (जीवनमूल्ये रुजविण्यासाठी) कोणते उपक्रम घेता येतील ? 🔶
मुद्दे=१)मूल्यशिक्षण गरज
          २) मूल्यशिक्षणासाठी उपक्रम
🔶चर्चेस वेळ आज दि.२/१/२०१६  रात्री ९.३०  ते १०.३०पर्यंत.🔶 सर्वांनी चर्चेत सहभागी व्हावे.🔵
[1/2, 9:23 PM] बागुलसर: 🌏मूल्यशिक्षणासाठी उपक्रम🌍
1⃣परिपाठात बोधकथा सांगणे.
2⃣दिनविशेष बद्दल अधिक माहिती देणे.
३.अध्यापनात पाठातून मूल्य सांगणे.
४.प्रसोंगोपात उपक्रमात मूल्यांची रूजवणूक.(उदा. जयंती, पुण्यतिथी.)
५.सामाजिक, शैक्षणिक,क्रीडा क्षेत्रात विशेष कामगीरी करणारया व्यक्तींची माहिती देणे.
............. . . .  .  .   .
[1/2, 9:26 PM] संदेमँडम शरद. गोळेश्वर: बालकाचे वाढदिवस साजरे करणे
शाळेत आजी आजोबा याचा मेळावा भरवणे
मुलगा मुलगी समान  वागणूक देणे
दोघाना समान कामाची वाटणी
[1/2, 9:27 PM] खोतसर ज्ञा: 1)शिबिर मेळावे 2)मुलाखती 3)गीतमंच 4)गटस्पर्धा 5)अभ्यासक्रम सहली 5)शालेय परि पाठ 6)प्रर्थना7)प्रतिज्ञा 8)चिंतन 9)मौन 10)अभ्यासपूरक कार्यक्रम                     ♦निसर्ग कविता, स्पूर्तिगीते यांचा संग्रह करणे. ♦कथाकथनातून परदुःखाची, येणार्य अडचणींची जाणिव करून घेणे. ♦थोर संत, समाजसेवक, क्रातिकारक यांच्या जीवनातील प्रेरक प्रसंग सांगणे. ♦नाट्यछटा♦प्रसंगनाट्य♦मूकनाट्य♦संवाद♦अभिनय गीते🌓अपंगशाळा♦अनाथाश्रम♦राष्टीय स्मारके♦प्रदर्शन♦वृदाश्रम♦सेवाभावी संस्था यांना भेटी देणे. ♦वर्तमानपत्रातील कात्रणे कापून वहीत चिटकवणे. ♦शेजारच्यांसंबधी माहिती गोळा करणे. ♦परिसरातील वृक्षाची ओळख करून घेणे.
[1/2, 9:30 PM] Mahesh Lokhande: प्रथम मूल्यशिक्षणाची गरज का आहे?
मूल्यशिक्षणाने काय होईल यावर चर्चा करुया.
[1/2, 9:31 PM] खोतसर ज्ञा: थोर व्यक्तीच्या जयंती वपुण्यथतिथी शाळेत साजरी करणे.
[1/2, 9:34 PM] खोतसर ज्ञा: संवेदनशिलता कमी झालेली आहे म्हणून.
[1/2, 9:36 PM] विकास माने: Sarv dharmiyanchya prthana ghene
[1/2, 9:37 PM] Mahesh Lokhande: महापुरुषांच्या जीवनातुन प्रेरणा मिळते.त्यांची आदर्श जीवनमूल्ये नवीन आयुष्याला दिशा देतात.
[1/2, 9:39 PM] अमोल पैठणे बुलढाणा: विवेकाने वागणारा सुजाण नागरिक होण्यासाठी, समाजातील दु:खी कष्टी लोकांचे दु:ख समजून घेऊन झटण्यासाठी, सर्व धर्माविषयी आदरभाव निर्माण करणे, स्त्रियांचा सम्मान करणे इ. साठी मूल्यशिक्षण आवश्यक आहे.
[1/2, 9:40 PM] हिलेमॅडम: किशोरवयिन मुलींचे मेळावे घेणे.विविध संस्कार शिबिरांचे आयोजन क्रय येईल.
[1/2, 9:46 PM] हिलेमॅडम: मूल्यशिक्षणाची गरज-मुलांमध्ये चागल्या संस्काराचि रुजवणुक व् मुलांमधील संवेदनशीलता जागृत करने काळाची गरज आहे.
[1/2, 9:49 PM] Mahesh Lokhande: मूल्यशिक्षणाची गरज
१)निरोगी व निरामय जीवन जगण्यासाठी मूल्यशिक्षण गरजेचे आहे
२)कुटुंबातील सर्वांशी आदरयुक्त जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित होण्यासाठी मूल्यशिक्षण गरजेचे आहे.
३)परिसराबद्दल प्रेम वाढण्यासाठी मूल्यशिक्षण गरजेचे आहे.
४) निसर्ग प्राणीमात्र व कलाकृती संरक्षण व जोपासना करण्याची भावना वाढण्यासाठी मूल्यशिक्षण गरजेचे आहे.
५)बंधुभावाची वाढ होणेसाठी मूल्यशिक्षण गरजेचे आहे.
६)सामाजिक बांधिलकी वाढण्यासाठी मूल्यशिक्षण गरजेचे आहे.
७)सर्वधर्मसहिष्णुता वाढीस लागणेसाठी मूल्यशिक्षण गरजेचे आहे.
८)सामाजिक एकता वाढण्यासाठी मूल्यशिक्षण गरजेचे आहे.
९)स्वतंत्र राष्ट्राचा नागरिक म्हणुन लोकशाही ,राष्ट्रीय एकात्मता वाढणेसाठी मूल्यशिक्षण गरजेचे आहे.
१०) राष्ट्रीय विकासासाठी मुल्यशिक्षण गरजेचे आहे.
[1/2, 9:50 PM] खोतसर ज्ञा: व्यक्तगत व सामाजिक जीवनाची जबाबदारी पेलू शकणारे नागरिक निर्माण करणेसाठी.
[1/2, 9:50 PM] खोतसर ज्ञा: वेगवेगळ्या धर्माचे सण, उत्सव साजरे करणे.
[1/2, 9:51 PM] Mahesh Lokhande: ११)चंगळवादी संस्कृती वाढत असताना मुल्यशिक्षणाची गरज आहे.
[1/2, 9:52 PM] Mahesh Lokhande: १२)प्रसारमाध्यमाच्या वाईट प्रभावापासुन व दुष्परिणामातुन पिढी वाचवण्यासाठी मूल्यशिक्षण गरजेचे आहे.
[1/2, 9:55 PM] जोशीसर: मूल्यशिक्षणाने लहान पणीच मूल्य रुजवाली जातात मूल्य नसलेले बालक वाईट मार्गला लागतात
[1/2, 10:03 PM] Mahesh Lokhande: १३)विश्वबंधुत्वाची भावना वाढीस लागावी म्हणुन मूल्यशिक्षण गरजेचे आहे.
१४)मानवी जीवनाला कल्याणकारी बनविण्यासाठी मूल्यशिक्षण गरजेचे आहे.
१५)वैयक्तिक व्यक्तीमत्वाच्या विकासासाठी मूल्यशिक्षण गरजेचे आहे.
१६)सामाजिक मूल्यांचे संस्कार होऊन सामाजिक विकासासाठी मूल्यशिक्षण गरजेचे आहे.
१७)राष्ट्रीय विकासास उपकारक गुणांच्या विकासासाठी मूल्यशिक्षण गरजेचे आहे.
१८)संवेदनशीलता वाढणेसाठी मूल्यशिक्षण
१९)नीटनेटकेपणा वाढणेसाठी मूल्यशिक्षण
२०)सौजन्यशीलता वाढण्यासाठी मूल्यशिक्षण
२१)वक्तशीरपणा वाढणेसाठी मूल्यशिक्षण
२२)श्रमप्रतिष्ठा  वाढणेसाठी मूल्यशिक्षण
२३)वैज्ञानिक दृष्टिकोन वाढणेसाठी मूल्यशिक्षण
२४)स्त्री पुरुष समानता वाढणेसाठी मूल्यशिक्षण
२५)सर्वधर्मसहिष्णुता वाढणेसाठी मूल्यशिक्षण
२६)राष्ट्रीय एकात्मता वाढणेसाठी मूल्यशिक्षण
२७)राष्ट्रभक्ती वाढीसाठी मूक्षल्यशिक्षण
२८)स्वावलंबन वाढीसाठी
२९)खिलाडुवृत्ती वाढीसाठी
३०)मानवतेच्या रक्षणासाठी मूल्यशिक्षण गरजेचे आहे.
[1/2, 10:04 PM] Mote Gondi: 🙏?

मूल्यशिक्षणाची गरज-
  १) तंत्र विज्ञृनाच्या विकासामुळे  नैतिक मूल्याचा ह्रास .
२) भौतीक सुधारनांचा सुयोग्य व संतुलीत वापर न झाल्यामुळे.
३)  बालमन हे संवेदनशील असते  म्हणुन 
४) मूल्यांचं  शिक्षण  अभ्यासक्रमाच्या माध्यमातुन  व्हावे म्हणुन.
५) अादर्श  नागरीक बनविणेसाठी.

६)  समाज  सुव्यवस्थीत चालणे साठी.
७) समाजातील अनिष्ट  चालीरितींना प्रतिकारासाठी.
८) संस्कृती  संवर्धनासाठी.
९) काळाची  गरज.
१०)  निरोगी  व्यक्तीमत्व राकारण्यासाठी.

      नितीन  मोटे  🙏?
[1/2, 10:05 PM] खोतसर ज्ञा: सुसंस्कृत विद्यार्थी घडविणेसाठी.
[1/2, 10:06 PM] Mahesh Lokhande: चला आता मूल्यांच्या रुजवणुकीसाठी कोणते उपक्रम घ्यावेत यावर चर्चा करुया.
[1/2, 10:07 PM] Mahesh Lokhande: संवेदनशीलता कशी रुजवता येईल?
[1/2, 10:08 PM] Mahesh Lokhande: आपण जे बोलतो वागतो त्याचा इतरांवर काय परिणाम होतो हे कळण्यासाठी,इतरांचे दुःख लक्षात येण्यासाठी काय करावे?
[1/2, 10:10 PM] Mote Gondi: वृद्धाश्रम,अपंगाच्या कार्यशाळा,अनाथाल येपुनर्वसन केंद्र,अशासेवाभावि संस्थांना भेटी देणेतूथील कार्यपद्धती समजावून घेणे -  संवेदनशीलता
[1/2, 10:10 PM] Mahesh Lokhande: आजुबाजुचा प्रसंग त्यातील बरे वाईट ओळखुन सकारात्मक प्रतिक्रिया देणारी व्यक्ती संवेदनशील असते.
[1/2, 10:12 PM] Mote Gondi: झोपडपट्या अदीवाशी दुर्गम  भागांना भेटी देणे.
[1/2, 10:12 PM] Mahesh Lokhande: मुले कधी आनंदात कधी उदास असतात समजुन घ्यायला हवे गप्पा मारुन मनमोकळे करायला हवे.
[1/2, 10:13 PM] Mahesh Lokhande: आजारी मित्रास पहायला जाणे
मित्राच्या वाढदिवसास जाणे
हे सुखदुःखात सहभागी होणेच आहे.
[1/2, 10:13 PM] Mote Gondi: वृक्षतोड ,जंगलतोड थबविण्याचे अावाहान करणे.
[1/2, 10:14 PM] Mahesh Lokhande: संवेदनशीलता विकासासाठी श्यामची आई पुस्तकाचे वाचन घ्यायला हवे.
[1/2, 10:15 PM] Mote Gondi: रूग्नांना भेटणे त्यांना गोष्टी वाचुन दाखविणे.
[1/2, 10:16 PM] Mote Gondi: अंधश्रृद्धा निर्मूलनाचे कार्यक्रम घेणे.
[1/2, 10:16 PM] Mahesh Lokhande: अंधअपंगास मदत,घरात मोठ्यांना मदत,मित्रांस मदत,आजी आजोबांस मदत.
[1/2, 10:17 PM] Mahesh Lokhande: वक्तशीरपणा वाढणेसाठी काय उपक्रम घ्यावेत?
[1/2, 10:17 PM] Mote Gondi: प्राणी  मात्रावर दया.
[1/2, 10:18 PM] Mahesh Lokhande: वेळापत्रकानुसार कामकाज
वेळच्यावेळी कामे करण्याची सवय लावणे .
[1/2, 10:19 PM] विकास माने: Manvatavad
Samata
Vastavad
Vaidnyanik drushtikon
Ya sankalpana spasht karne
Garjeche ahe
[1/2, 10:19 PM] Mote Gondi: वक्तशुरपणा वाढणेसाठी वेळेवर उपस्थीत राहण्याचा प्रयत्न करणे.
[1/2, 10:19 PM] Mahesh Lokhande: नीटनीटकेपणा वाढीसाठी कोणते उपक्रम घेता येतील?
[1/2, 10:21 PM] Mahesh Lokhande: स्वतःची राहणी,घरातील वस्तुंची मांडणी,कामाची पदधत,सर्व वस्तु जागच्या जागी ठेवण्याची सवय लावणे.स्वच्छता टापटीप सवय.
[1/2, 10:22 PM] Mote Gondi: फलकावर वक्तशीरपणाचे महत्व सांगणारे विचार ,काव्यक्ती लीिहण उदा.
एक टाका वेळेवर घालाल तर नऊ टाके वाचतील .
[1/2, 10:22 PM] Mahesh Lokhande: वैज्ञानिक दृष्टीकोन विकासासाठी उपक्रम सुचवा.
[1/2, 10:22 PM] विकास माने: Smart & shrap work
[1/2, 10:23 PM] Mahesh Lokhande: आजुबाजुच्या घडणार्‍या घटनांचा कार्यकारणभाव अचुक समजुन घेऊन योग्य कृती करणे.
[1/2, 10:23 PM] Mahesh Lokhande: अंधश्रदधा,गैरसमजुती काढुन टाकणे.
[1/2, 10:24 PM] विकास माने: Nirkshan nodvane
[1/2, 10:24 PM] Mahesh Lokhande: सौजन्यशीलता वाढणेसाठी कोणते उपक्रम घ्यावेत
[1/2, 10:25 PM] Mahesh Lokhande: स्वार्थी व इतरांविषयी बेफिकीरवृत्ती घालवणेसाठी काय करावे
[1/2, 10:25 PM] Mote Gondi: पर्यावरण दिन,वृक्षदिंडी ,व्यसनमुक्ती,अाकाशमंडल निरीक्षण,पक्षी निरीक्षण,विज्ञानजट्रा ,उद्दोगधंद्यांना भेटी ,औषधी वनस्पती ,हभानान अंदाज इत्यदी
[1/2, 10:25 PM] थोरात ond: प्रत्येक गोष्टीमागची कारणे  प्रयोगातून दाखवणे.
[1/2, 10:27 PM] थोरात ond: संस्कार कथा प्रोजेक्टरवर दाखवणे.
[1/2, 10:27 PM] Mote Gondi: सातत्याने जाणिव करून देणे व परिवर्तनाचा प्रयत्न करणे.
[1/2, 10:27 PM] Mahesh Lokhande: एकमेकापासुन दुरावा न वाढता मने जोडली जावीत स्नेह आनंद वाढणेसाठी खुप मित्र मिळणेसाठी आचार विचार कृती प्रतीसादातुन इतरांबददल सदभाव,न दुखवण्याचा व्यवहार घडायला हवा.
[1/2, 10:28 PM] Mahesh Lokhande: स्त्री पुरुष समानतेसाठी उपक्रम सुचवा
[1/2, 10:29 PM] Mote Gondi: 🙏?

मूल्यशिक्षणासाठी उपक्रम

१) दैनंदिन परिपाठ -
२) शालेय सफाई-
३) दैनंदिन माहिती फलकाचे लेखन-
४) शिक्षक  विद्यार्थी बेठक व्यवस्था-
५) सामूहिक राष्र्टगीत -
६) शालेय प्रार्थनेतील दहा मुद्दे-
७) वैयक्तीक  स्वच्छता पाहणी.-
८)वाढदिवस शुभचिंतन-
९)प्रश्नावली-
१०)  अभिप्राय -
———————————
१०— नीती मूल्ये शाॅर्टफाॅर्म अाठवनीत ठेवने साठी -
श्र-व -सौ -रा -रा -स्रि- वै- नी- स -सं  )

वरिल मूल्यांसाठी प्रत्येकी एक उपक्रम पुढील प्रमाने 

१) श्रमसंस्कार शिबीर घेणे.
२) बालवीर - वीरबाला पथके स्थापन करणे.
३) स्री -पुरूषांचे( मुला-मुलींचे) जनजागर मेळावे घेणे.
४) प्रत्येक  जाती धर्माच्या विशिष्ट संस्कृतीची ओळख करूण देणे .
५) राज्यवार वेशभूषा करूण बाहूली नाट्य ,संवाद सादर करणे.
६)  दैनंदिन विज्ञानाची सजीव निर्जिव निंसर्ग ओळख अनुभव देणे.
७) वन्यजीव सप्ताह साजरा करणे.संस्कार शिबिरे घेणे.
८) पत्र -मैत्री प्रकल्प राबविणे.
९) स्व - दिनचर्या वेळापत्रक करूण  तंतोतंत  कार्य करणे .
१०) नीटनेटकेपणामुळे सौंदर्यदृष्टी येते यासाठी नियमात जानीवपूर्वक  दक्ष राहणे

🙏?
  नितीन मोटे
[1/2, 10:29 PM] उदय भंडारे: एकत्र बैठक व्यवस्था
[1/2, 10:29 PM] Mahesh Lokhande: समान काम
समान संधी
समान दर्जा
समान आहार
मुलामुलीत भेदभाव नको.
समान हक्क अधिकार
[1/2, 10:29 PM] थोरात ond: परिपाठ. .मुलामुलींना समान संधी देणे.
[1/2, 10:30 PM] उदय भंडारे: सर्व कामाची समान विभागणी
[1/2, 10:30 PM] Mahesh Lokhande: श्रमप्रतिष्ठा वाढीसाठी उपक्रम सुचवा
[1/2, 10:30 PM] विकास माने: Shramdan
[1/2, 10:31 PM] उदय भंडारे: हे काम मुलाचे , हे मुलीचे असा भेदाभेद नको .
[1/2, 10:31 PM] Mahesh Lokhande: कोणत्याही कामाची लाज वाटु नये शारीरिक काम हलके समजु नये सर्व कामे उत्साहाने करावी
[1/2, 10:31 PM] थोरात ond: ओढ्यावर विद्यार्थ्यांचे सहकार्याने छोटे बंधारे बांधणे
[1/2, 10:31 PM] उदय भंडारे: बागकाम
[1/2, 10:32 PM] उदय भंडारे: शालेय स्वच्छता
[1/2, 10:32 PM] Mahesh Lokhande: श्रमिकांबददल आदर वाढावा.त्यांचा मान राखावा.
[1/2, 10:32 PM] Mahesh Lokhande: सर्वधर्मसहिष्णुतेसाठी उपक्रम सुचवा.
[1/2, 10:32 PM] उदय भंडारे: स्चावलंबन
[1/2, 10:32 PM] खोतसर ज्ञा: मोठ्याचा मान राखणे
[1/2, 10:33 PM] Mote Gondi: मुलींसाठी मुलांच्या

मुलांसाठी मुलींच्या
कामाच्या स्पर्धाअायोजित करणे .
स्री-पुरूष समानते साठी  त्यानुळे कामाचे महत्त्व कळेल व एकमेकाचा अादर राखला जाईल.
[1/2, 10:34 PM] Mahesh Lokhande: सर्व धर्मशिकवणुकींचा आदर,
शिकवणुकींचा संग्रह
सणसाजरे करणे
[1/2, 10:34 PM] Mahesh Lokhande: राष्ट्रभक्तीसाठी उपक्रम सुचवा
[1/2, 10:34 PM] उदय भंडारे: सर्व धर्मातील सण साजरे करणे .
सणाचे महत्च सांगणे
[1/2, 10:35 PM] खोतसर ज्ञा: वेगवेगळ्या सणाच्या वेळी भेटी देणे.
[1/2, 10:35 PM] उदय भंडारे: सर्व धर्मातील समान तत्व सांगणे .
[1/2, 10:35 PM] Mote Gondi: राष्र्टभक्ती वरील चित्रपट
[1/2, 10:36 PM] खोतसर ज्ञा: भेदभाव न ठेवणे
[1/2, 10:36 PM] उदय भंडारे: माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म हे समजावुन देणे
[1/2, 10:36 PM] Mahesh Lokhande: देश,समाज,संस्कृती,चालीरीती,परंपरा,इतिहास,भाषा,राष्ट्रीय प्रतिके,सण,उत्सव,दूशबांधव,निसर्ग यांचा अभिमान प्रेम.
[1/2, 10:36 PM] थोरात ond: सांस्कृतिक कार्यक्रमातून देशभक्तीपर गितांचे सादरीकरण
[1/2, 10:36 PM] Mote Gondi: वस्तु ,वास्तू ,शिल्य चित्र प्रदर्शण भरविणे.
[1/2, 10:36 PM] Mahesh Lokhande: समुहगीते स्फुर्तीगीते देशभक्तीपरगीते
[1/2, 10:37 PM] Mahesh Lokhande: राष्ट्रीय एकात्मता विकासासाठी उपक्रम सुचवा.
[1/2, 10:37 PM] उदय भंडारे: माजी सैनिकांची मुलाखत घेणे .
[1/2, 10:37 PM] Mote Gondi: देशभावना निर्मान करनार्या नाटीका घेणे.
[1/2, 10:38 PM] खोतसर ज्ञा: ग्रथ प्रदर्शन भरवणे
[1/2, 10:38 PM] उदय भंडारे: देशभक्तीपर गाणी
[1/2, 10:39 PM] Mote Gondi: राष्र्टमहिमा सांगणारे पोवडे ,गाणी,सनरगीते ध्वनिक्षेपकावा ऐकविणे.
[1/2, 10:39 PM] उदय भंडारे: विविध धर्मीय वेशभुषा करणे
[1/2, 10:39 PM] थोरात ond: सैनिक कवायत, विजयदिवस समारोह भेट.
[1/2, 10:39 PM] खोतसर ज्ञा: देशभक्तीपर चित्रपट दाखविणे.
[1/2, 10:40 PM] Mote Gondi: कांतिकारकची कात्रणे संग्रह .
[1/2, 10:40 PM] Mahesh Lokhande: धर्मवंश,चालीरीती,आहारविहार,कला,संस्कृती,क्रीडा,सण उत्सव,भौगोलिक परिस्थिती वेगळेपणा व अस्मिता राष्ट्रीय मानचिन्ह आदर,भावनिक एकसंघ कृतीशील धागा राष्ट्रीय एकात्मता.
[1/2, 10:40 PM] उदय भंडारे: थोर पुरुषांच्या चरित्राचा परिचय
[1/2, 10:42 PM] थोरात ond: मिलिट्री व्हिडिओ चित्रीकरण . देशभक्तीपर चित्रपट दाखवणे
[1/2, 10:42 PM] Mote Gondi: भारताच्या प्राचीण परंपरा ,संस्कृती,वाडमय,साहित्य कला विज्ञान इ.क्षेत्रातील प्रगतीविषयी माहिती जमा करणे त्याचे सामूहिक प्रकट वाचन घेणे.
[1/2, 10:44 PM] खोतसर ज्ञा: कबबुलबुल व स्काउट गाईड यामाध्यमातून प्रेरणा देणे
[1/2, 10:50 PM] थोरात ond: किल्ले, ऐतिहासिक वास्तू भेटी किंवा माहिती सांगणे, चित्रफित दाखवणे
[1/2, 10:56 PM] Mahesh Lokhande: 🔵उपक्रम🔵
🌸श्रमप्रतिष्ठा🌸
१)वृक्षारोपण
२)वर्ग परिसर स्वच्छता
३)सफाई ही देवपुजा
४)सफाईपत्रक
५)स्वच्छतादूत

🔶राष्ट्रभक्ती🔶
१)संविधान
२)प्रतिज्ञा
३)राष्ट्रीय सण
४)राष्ट्रपुरुष जयंत्या
५)राष्ट्रभक्ती कथा
६)देशभक्तांच्या कथा

🔶स्त्री पुरुष समानता🔶
१)वर्ग व शालेय मंत्रीमंडळ
२)कर्तबगार स्त्रिया परिचय
३)नेतृत्व संधी
४)सर्वांना समान संधी मत्रीमंडळात ५०% मुली,परिपाठ सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धात सर्वत्र समान संधी.

🔶सर्व धर्मसहिष्णुता🔶
१)सर्व धर्मीयांचे सण
२)सर्व धर्मपरिचय
३)नीतीवचनांचा संग्रह
४)सर्वधर्मवही
५)सर्वधर्ममित्र

🔶राष्ट्रीय एकात्मता🔶
१)बोलीभाषा
२)भौगोलिक विविधता
३)लोकजीवन संस्कृती
४)एकात्मतेची गीते
५)समुहगायननृत्य
६)गीतमंच वाद्यवृंद

🔶वैज्ञानिक दृष्टीकोन🔶
१)अंधश्रदधा
२)निसर्गरक्षणसंवर्धन
३)विज्ञानतंत्रज्ञान
४)विज्ञानकथा
५)विज्ञानगमती
६)प्रयोग
७)विज्ञानखेळ
८)विज्ञानखेळणी
९)टाकाऊतुन टिकाऊ
१०)परसबाग
११)खतखडडा

🔶संवेदनशीलता🔶
१)कुटुंबातील घटना
२)शेजारील घटना
३)समाजातील घटना
४)शाळेतील घटना
५)पर्यावरणविषयक

🔶संवेदनशीलता🔶
६)वर्गमित्र
सौजन्यशीलता
१)कुटुंबातील वर्तन
२)वडिलधार्‍यांशी वर्तन
३)शिक्षकांसोबत वर्तन
४)समाजाशी वर्तन
५)तंटामुक्त शाळा
६)शिवीमुक्त शाळा
७)ताई दादा
८)तंटामुक्त वर्ग
९)शाळा तंटामुक्त समिती
१०)शालेय तक्रार निवारण मंच

🔶वक्तशीरपणा🔶
१)कामाचे नियोजन
२)उपस्थिती
३)अभ्यासवेळ
४)हाजीर तो वजीर
५)उपस्थिती ध्वज

🔶नीटनेटकेपणा🔶
१)पोशाख
२)स्वच्छता
३)गणवेश स्वच्छता
४)गृहकार्य
५)सुंदर वर्ग
[1/2, 11:00 PM] Mahesh Lokhande: बागुलसर,संदेमॅडम,खोतसर,विकास मानेसर,अमोलसर,हिलेमॅडम,जोशीसर,मोटेसर,थोरातसर,भंडारेसर,सोनवणेसर सर्वांचे खुप खुप आभार🙏🙏🙏🙏🙏🙏