Thursday, 15 October 2015

क्लाऊड स्टोरेज व व्हाॅट्सअप

क्लाऊड स्टोरेज म्हणजे काय? हे जाणून घेण्यापूर्वी जर आपण डेटा सेंटर संदर्भात अधिक माहिती घेतली, तर आपणास क्लाऊड स्टोरेजबाबत चटकन कल्पना येईल. ज्याप्रमाणे स्मार्टफोनमधील माहिती ही मेमरीकार्डवर साठवली जाते, त्याचप्रमाणे इंटरनेटवरील माहिती ही प्रामुख्याने डेटा सेंटरमध्ये साठवली जाते. ‘क्लाऊड स्टोरेज’ एका अशा व्यवस्थेचे नाव आहे, ज्या व्यवस्थेच्या माध्यमातून आपण आपल्याजवळील फाईल्स या अशा डेटा सेंटरमध्ये सुरक्षित ठेवतो. एखाद्या उदाहरणाने ही गोष्ट अधिक चांगल्यारितीने स्पष्ट होईल.

समजा आपण सुट्टिच्या दिवशी बाहेर कुठेतरी फिरायला गेला आहात. आपल्या आयुष्यातील त्या सुरेख दिवसाच्या आठवणी आपण स्मार्टफोनवरील कॅमेरॅच्या सहाय्याने कैद केल्या आहेत. पण घरी परतत असताना आपला स्मार्टफोन हरवला. तर अशावेळी स्मार्टफोनसोबतच त्या दिवसाच्या आठवणीदेखील हरवून जातील. पण आपण जर ‘क्लाऊड स्टोरेज’ सेवेचा वापर करत असाल, तर मात्र आपल्याला आणखी एक संधी मिळू शकेल. कारण त्यातील ‘कॅमेरा बॅकअप’ हा पर्याय जर त्यावेळी सुरु असेल, तर स्मार्टफोनवरुन काढलेले छायाचित्र हे इंटरनेटच्या माध्यमातून तत्काळ अपलोड होऊन क्लाऊड स्टोरेज सेवेच्या डेटा सेंटरमध्ये सुरक्षित जमा झालेले असेल. अशाप्रकारे स्मार्टफोन हरवला तरी देखील छायाचित्रे हरवणार नाहीत.

आपल्या जवळील सर्व प्रकारच्या महत्त्वाच्या फाईल्स डेटा सेंटरमध्ये सुरक्षित ठेवण्याकरीता लागणारे जे माध्यम आहे त्यास ‘क्लाऊड स्टोरेज सर्व्हिस’ असे म्हणतात; आणि या एकंदरीत व्यवस्थेस सर्वसाधारणपणे ‘क्लाऊड स्टोरेज’ असे म्हटले जाते. गूगलची ‘गूगल ड्राईव्ह’ ही सेवा ‘क्लाऊड स्टोरेज’चे एक उत्तम उदाहरण आहे. गूगल ड्राईव्हवर आपण आपल्याजवळील डेटा फाईल्स अपलोड करुन सुरक्षित ठेवू शकतो आणि आवश्यक त्यावेळी त्या फाईल्सचा वापर करु शकतो. त्यामुळे आपल्या स्मार्टफोनवरील, संगणकावरील महत्त्वाच्या फाईल्स जरी हरवल्या, गहाळ झाल्या तरी चिंता करण्याचे काही कारण उरत नाही.स्थिती अद्यान्वित करतो, छायाचित्र अपलोड करतो; पण ही सर्व माहिती नक्की कुठे साठवली जात असेल? असा कधी आपल्याला प्रश्न पडला आहे का? अन्नधान्य हे जसे एखाद्या गोडाऊनमध्ये साठवले जाते, अगदी त्याचप्रमाणे आपण इंटरनेटच्या माध्यमातून अपलोड केलेला सर्व डेटा हा डेटा सेंटरमध्ये साठवला जातो. त्यानंतर मागणीप्रमाणे हा डेटा इतरांना पुरवण्यात येतो. स्मार्टफोनमधील डेटा ज्याप्रमाणे मेमरी कार्डवर साठवला जातो, संगणकावरील डेटा हा ज्याप्रमाणे हार्ड डिस्क ड्राईव्हवर साठवण्यात येतो, त्याचप्रमाणे इंटरनेटच्या माध्यमातून दिसणारा डेटा हा शक्यतो डेटा सेंटरमध्ये साठवलेला असतो.

आता प्रत्यक्ष या लेखाच्या उदाहरणाने ही माहिती समजावून घेऊ. सध्या मी हा लेख लिहित आहे. हा लेख लिहून झाल्यानंतर मी तो प्रकाशित करेन. प्रकाशित केलेला हा लेख अमेरिकेतील एखाद्या डेटा सेंटरमध्ये साठवला जाईल. त्यानंतर मी फेसबुकवर येऊन या लेखाबद्दल आपल्याला माहिती देईन. ती माहिती देखील फेसबुकच्या डेटा सेंटरमध्ये साठवली जाईल. या लेखाबद्दल माहिती मिळाल्यानंतर आपण हा लेख वाचण्याकरीता या लेखाच्या धाग्यावर क्लिक कराल. तेंव्हा आपण या लेखाची मागणी केली आहे हे लक्षात घेऊन डेटा सेंटरमधून हा लेख आपल्याला पाठवण्यात येईल. अशाप्रकारे डेटा सेंटरच्या माध्यमातून माहितीची देवाण-घेवाण होते.

वरील चित्रफितीत गूगलचे डेटा सेंटर दाखवलेले आहे. डेटा सेंटर हे जणू इंटरनेटचा मेंदू आहे. त्यात साठवलेले ज्ञान हे गरजेप्रमाणे वापरले जाते. आपल्या मेंदूप्रमाणेच डेटा सेंटरला देखील कार्यरत राहण्याकरीता प्रचंड उर्जा लागते. त्यामुळे डेटा सेंटर थंड रहावे याकरीता सुयोग्य व्यवस्था करण्यात आलेली असते. इथे जगभरातील महत्त्वाचा डेटा साठवलेला असल्याने त्याच्या सुरक्षेचासुद्धा चोख बंदोबस्त करण्यात येतो. डेटा सेंटरमुळे पर्यावरणाचा र्‍हास होऊ नये याची देखील विशेष काळजी घेण्यात येते. त्यामुळे अनेक कंपन्या त्याकरीता लागणारी वीज ही पवनउर्जा, सौरउर्जा अशा अपारंपारिक माध्यमातून मिळवतात.

मेमरी कार्डवर आपोआप माहिती साठवणे

अनेकदा साध्या-सोप्या गोष्टी माहित नसल्याने मोठ्या समस्या उद्भवतात. यासंदर्भात आपल्याला ‘स्मार्टफोन मेमरी’चे उदाहरण घेता येईल. ‘स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड होणार्‍या चित्रफिती, ध्वनिफिती, छायाचित्रे किंवा इतर फाईल्स या आपोआप कुठे साठवल्या जाव्यात? मेमरी कार्डवर की इंटरनल मेमरीवर?’, आपला स्मार्टफोन आपल्याला हा पश्न विचारतो. पण अनेकांना त्याचा थांगपत्ताच नसल्याने या सार्‍या फाईल्स आपोआप इंटरनल मेमरीमध्ये साठू लागतात. अशाने स्मार्टफोनच्या इंटरनल मेमरीवरील ताण वाढून आपला फोन हँग होऊ लागतो. हीच गोष्ट मी आता अधिक स्पष्ट करुन सांगतो.

आपल्या स्मार्टफोनच्या Settings मध्ये जा. इथे Device विभागात Storage नावाचा पर्याय दिसेल, त्यावर स्पर्श करा. Default Write Disk मध्ये आपण कोणत्या पर्यायाची निवड केली आहे? ते पहा! आपण जर External SD Card म्हणजेच मेमरी कार्ड निवडले असेल, तर आपल्या सार्‍या फाईल्स या आपोआप मेमरी कार्डवर साठवल्या जात आहेत. पण आपण जर Internal SD Card निवडले असेल, तर याचा अर्थ असा की, सगळ्या फाईल्स आपल्या स्मार्टफोनच्या इंटरनल मेमरीमध्ये साठवल्या जात आहेत. तेंव्हा External SD Card या पर्यायाची निवड करा.

आज सकाळी मी ‘व्हॉट्सअ‍ॅप संदेश मेमरी कार्डवर घेणे’ याबाबत माहिती सांगितली. तेंव्हा व्हॉट्सअ‍ॅपवरुन प्राप्त होणारे संदेश हे आपोआप आपल्या मेमरी कार्डवर साठवले जावेत अशी जर आपली ईच्छा असेल, तर वर सांगितल्याप्रमाणे External SD Cardची निवड करावी. एव्हढासा बदल केल्याने आपल्या स्मार्टफोनची एक मोठ्या समस्या सुटेल आणि त्यामुळे स्मार्टफोन हँग होणार नाही.

व्हाॅट्सअप

जे लोक व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून एखादा ग्रुप चालवतात किंवा जे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये सहभागी आहेत, त्यांच्यासाठी आज मी ही माहिती देत आहे. कारण सहसा ग्रुपच्या माध्यमातूनच संदेशांची मोठ्या प्रमाणात देवाण-घेवाण चालते आणि त्यामुळे मग कालांतराने आपला स्मार्टफोन हँग होऊ लागतो.

व्हॉट्सअ‍ॅपवरुन आलेल्या चित्रफिती, ध्वनिफिती किंवा छायाचित्रे जर स्मार्टफोनच्या इंटरनल मेमरीमध्ये साठवली जात असतील, तर आपल्या स्मार्टफोनवरील ताण वाढतो. कारण आपल्या स्मार्टफोनची इंटरनल मेमरी ही मर्यादीत असते. म्हणूनच व्हॉट्सअ‍ॅपवरुन येणारे संदेश हे मेमरी कार्डवर साठवणे गरजेचे बनते.

व्हॉट्सअ‍ॅप संदेश मेमरी कार्डवर हलवणे

मजकूराच्या (Text) माध्यमातून जे संदेश प्राप्त होतात ते मेमरी कार्डवर हलवण्याची गरज नाही. मुख्यतः चित्रफीत (Video), छायाचित्र (Image) प्रकारातील जे संदेश आहेत, त्यांस अधिकची मेमरी लागते. त्यामुळे आपण केवळ या प्रकारचे संदेश हे मेमरी कार्डवर हलवणार आहोत.

अशाप्रकारचे संदेश हे आपल्या स्मार्टफोनवरील एका स्वतंत्र फोल्डरमध्ये साठवले जातात. इंटरनल मेमरी मधील हे व्हॉट्सअ‍ॅप फोल्डर एक्सटरनल मेमरी, म्हणजेच मेमरी कार्डवर हलवल्यास इंटरनल मेमरीमधील जागा मोकळी होईल, आणि त्यानंतर आपला स्मार्टफोन हँग होणार नाही.

नोंद –

व्हॉट्सअ‍ॅपमार्फत आलेल्या चित्रफिती, छायाचित्रे हे मेमरी कार्डवर घेतल्यानंतर ते आपल्या मेमरी कार्डवर सुरक्षित राहतील व ते आपणास फोटो गॅलरीमध्ये देखील दिसतील; पण ते आपणास व्हॉट्सअ‍ॅपवर दिसणार नाहीत. जिथे पूर्वी चित्रफीत, छायाचित्र होते, तिथे केवळ अस्पष्ट चौकट दिसेल.सगळ्यांचेच व्हॉट्सअ‍ॅप संदेश हे आपोआप इंटरनल मेमरीवर साठवले जातात असे नाही. तेंव्हा आपल्या स्मार्टफोनवर जर भरपूर व्हॉट्सअ‍ॅप संदेश असतील आणि त्यामुळेच आपला स्मार्टफोन हँग होत आहे, असं आपल्याला वाटत असेल, तरच या पद्धतीचा अवलंब करावा. आपला फोन हँग होत नसल्यास या पद्धतीचा तसा अवलंब करण्याची आवश्यकता नाही.व्हॉट्सअ‍ॅपवरुन आलेल्या चित्रफितींचा, ध्वनिफितींचा आणि छायाचित्रांचा जर संगणकावर बॅकअप घ्यायचा असेल, तर अशावेळी देखील ही पद्धत उपयोगी पडेल.

File Manager मधून Internal Memoryचा विभाग उघडा. यात Whatsapp नावाचे फोल्डर असेल, त्यावर स्पर्श करा. त्यात पुन्हा Media नावाचे फोल्डर असेल, त्यावर स्पर्श करा. इथे आपणास Whatsapp Audio, Whatsapp Images,  Whatsapp Video, अशा निरनिराळ्या फोल्डर्सची यादी दिसेल. त्यापैकी Whatsapp Video हे फोल्डर प्रथम उघडा व तिथे दिसणारे सर्व संदेश कॉपी करुन मेमरी कार्डवरील एखाद्या फोल्डर मध्ये घ्या. त्यानंतर पुन्हा Whatsapp Video या फोल्डरमध्ये येऊन तेथिल चलचित्रे डिलीट करा. आपणास हे सारे जर व्यवस्थित जमत असेल, तर कॉपी-पेस्ट-डिलीट करण्याऐवजी थेट कट-पेस्ट केले तरी चालेल.


युट्यूबवर मराठी चित्रपटांकरीता एक स्वतंत्र विभाग असल्याचं मी यापूर्वीच आपल्याला सांगितलं आहे. पण त्यावर मराठी कार्यक्रमांसाठी देखील एक वेगळा विभाग असल्याचं आपल्याला माहित आहे का? युट्यूबवर मराठी कार्यक्रमांसाठी एक खास विभाग असून आपण या विभागास सब्स्क्राईब (Subscribe) देखील करु शकतो.

मराठी कार्यक्रमांचा विभाग

युट्यूबवर (YouTube) प्रत्येक मराठी कार्यक्रमाचे स्वतःचे असे एक चॅनल आहे. मराठी कार्यक्रमांच्या विभागात या सर्व चॅनल्सची म्हणजेच कार्यक्रमांची योग्य तर्‍हेने मांडणी करण्यात आलेली आहे. यात टिव्हीवर सध्या सुरु असलेल्या आणि नसलेल्या अशा अनेकानेक कार्यक्रमांचा समावेश आहे. ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘उंच माझा झोका’, असे पूर्वप्रसारित जुने लोकप्रिय कार्यक्रम पुन्हा पहायचे असल्यास या ऑनलाईन विभागास आवर्जून भेट द्यावी.

युट्यूबवर कार्यक्रम पाहण्याचे ५ फायदे!

टिव्हीवरील आपल्या आवडीचे पूर्वप्रसारित जुने कार्यक्रम पुन्हा पाहता येतात.सध्या रोज प्रसारित होणारे कार्यक्रम आपल्या सवडीने बघता येतात.इथे अत्यंत तुरळक जाहिराती असल्याने ३० मिनिटांचा कार्यक्रम अगदी २० मिनिटांत संपतो.युट्यूवरील कार्यक्रम आपण आपल्या स्मार्टफोनवर किंवा स्मार्टटिव्हीवर देखील पाहू शकतो.कार्यक्रमातील नको असलेला भाग पुढे ढकलता येतो, किंवा आवडलेला भाग पुन्हा पाहता येतो.



पॉडकास्ट म्हणजे काय?

‘ध्वनिफीत’ (Audio) अथवा ‘चित्रफीत’ (Video) या माध्यमांतून इटंरनेटवरुन जे कार्यक्रम प्रसारित केले जातात, त्यास ‘पॉडकास्ट’ असे म्हणतात. अ‍ॅपलच्या iPod (आयपॉड) वरुन ‘पॉडकास्ट’ या नावाचा उगम झाला आहे. परदेशात ‘पॉडकास्ट’ हा प्रकार लोकप्रिय असून अनेक हौशी तसेच व्यावसायिक लोक हे स्वतःचे कार्यक्रम तयार करुन अशाप्रकारे इंटरनेटवरुन प्रसारित करतात.

पॉडकास्ट हा देखील ब्लॉगसारखाच एक प्रकार असून याचे वैशिष्ट असे की, यात मजकूरचा (Text) प्रामुख्याने वापर न कराता त्याऐवजी ध्वनिफीत, चित्रफीत यांचा वापर केला जातो. एका पॉडकास्टच्या माध्यमातून प्रसारित केले जाणारे कार्यक्रम हे सहसा एकाच ‘फाईल फॉरमॅट’ मध्ये असतात. उदाहरणार्थ, mp3 फाईल फॉरमॅट.

पॉडकास्ट ऐकण्याकरीता अँड्रॉईड अ‍ॅप स्टोअरवर अनेकानेक अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. त्या अ‍ॅप्सच्या माध्यमातून आपण आपल्या आवडीचे पॉडकास्ट्स ‘सब्स्क्राईब’ करु शकतो. पॉडकास्ट मार्फत प्रसारित होणारे कार्यक्रम हे सहसा डाऊनलोड करता येतात. त्यामुळे आपणास ते आपल्या सोयीने ऐकता येतात.




Thursday, 24 September 2015

जि.प.प्राथमिक शाळा शिंदेमळा (शरदनगर)

जि.प.प्राथमिक शाळा शिंदेमळा (शरदनगर) पहिली १

शिक्षक उपयोगी वेबसाईड

काही महत्वाच्या वेबसाईड शिक्षकांच्या कामाच्या

१)www.sahaygiri.com
२)www.navnirmitilearning.org
३)www.majalgaonbrc.com
४)www.baljagat.com
५)Abhijitghorpade.wordpress.com
६)networkedblogs.com
७)http://www.palakneeti.org/  ( e books )
८)joshworth.com/dev/pixelspace/pixelspace solarsystem.html
९)http://www.learningwhiledoing.in/
१०)shiksha .com
११)http://study.taaza.com/
१२)http://www.meracareerguide.com/
१३)inmyschool.in
१४)http://boltipustake.blogspot.in
१५)www.teacherofindia.org
१६)http://www.whereincity.com
१७)www.majalgaonbrc.com
१८)www.avakashvedh.com
१९)www.quest.org.in
२०)http://marathidesha.com
२१)www.zpkolhapur.gov.in
२२)http://www.prajakt-zaware.blogspot.in
२३)http://inmyschool.in
२४)http://www.balbharati.in
२५)www.swselearn.com
२६)http://www.zpschoolmaliwada.com
२७)www.virtualuniversity.com
२८)http://www.mscert.net
२९)www.killedar.org
३०)http://ebooks.netbhet.com
३१)www.swselearn.com
३२)http://www.mscert.net
३३)www.impnewszpgr.hpage.com
३४)www.trgmdm.nic.in
http://mahanews.gov.in
३५)www.ssa.nic.in
३६)http://dgipr.maharashtra.gov.in                                 ३७)www.mpsp.org.in
३८)www.testsandtips.in
३९)www.epapergallery.com
४०)www.dise.in
४१)www.indiacode.nic.in
४२)http://www.academics-india.com
४३)www.chandamama.com
४४)www.popcornbreak.com
४५)http://nagarzp.gov.in
४६)http://www.dakhal.in
४७)www.psvaijapur.com
४८)www.first-school.ws
४९)www.imd.gov.in
५०)http://ecastevalidity.in
५१)http://www.arvindguptatoys.com
५२)http://ildc.inwww.mscepune.in
५३)http://pragatshikshansanstha.org/
५४)www.balajijadhav.in
५५)www.santoshdahiwal.in
५६)www.khaderaju.blogspot.com
५६)www.shikshakmitra.blogspot.in
५७)www.zppsmaliwasti.blogspot.in
५८)www.mahazpteacher.blogspot.in
५९)www.mahaeducatenet.com
६०)www.zpteacher.blogspot.in
६१)www.kathabodh.blogspot.in
६२)www.aadarshshala.blogspot.in
६३)www.marathishala.in
६४)www.mahazpteacher.blogspot.in
ववरिल सर्वच साईड शैक्षणिक असुन शिक्षकांच्या उपयोगी आहेत.

Saturday, 22 August 2015

तंत्रस्नेही सहविचारसभेस केंद्रनिहाय तंत्रस्नेही दि.२२/८/२०१५

अ.नं शिक्षकाचे नाव शाळा केंद्र
1नांगरे किरण रमेश किवळ चिखली
2वाघ कृष्णा चंद्रकांत कवठे हेळगाव
3तांबोळी रशीद दस्तगीर टेंभू गोळेश्वर
4शिरतोड आबा राजाराम रेठरे खुर्द वाठार
5पाटील विजय राजाराम बाबरमाची बनवडी
6हिले जमुना पांडुरंग वारुंजी सुपने
7वायदंडे सुरेखा प्रभाकर नारायणवाडी काले
8कुंभार सुजाता प्रदीप शास्त्रीनगर मलकापूर
9यादव माधुरी बा.यशवंतनगर नं.२ मलकापूर
10लोकरे सुनिता शंकर आगाशिवनगर नं.२ मलकापूर
11पांढरपट्टे रुपाली राजेंद्र केंद्रशाळा विंग विंग
12उमाटे रामचंद्र ज्ञानदेव केंद्रशाळा मलकापूर मलकापूर
13बसागरे जोतीराम बसागर कोपर्डे हवेली कोपर्डेहवेली
14शेंडे संजय महादेव विठोबाचीवाडी ओंड
15फल्ले अमित चंद्रकांत लटकेवाडी ओंड
16कुत्ते आनंद वसंतराव आणे विंग
17नागे सुनील तातोबा कोरीवळे इंदोली
18शिंदे संतोष विलास माध्य.विद्यालय बेलवडे हवेली वहागाव
19चव्हाण दिपक रणजीत वाघेरी बनवडी
20देवकर नकुशी पांडुरंग वाघेश्वर मसूर
21राऊत सीमा सदाशिव शहापूर मसूर
22गवळी सतीश खाशाबा मनु उंडाळे
23शेख अनिस हैदर यादवमळा कासारशिरंबे वाठार
24जंगम उमाकांत राजाराम मोरेमळा विंग विंग
25रासाटे शशिकांत नानासो बेलवडे बु वाठार
26नायकवडी निलम कासम शिबेवाडी कोळे
27भंडारे विशाल संभाजी काटेकरवाडी येवती
२८महेश शहाजी लोखंडे शिंदेमळा शरदनगर गोळेश्वर
   

Friday, 21 August 2015

मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.सातारा मिटिंग दि. १९/८/२०१५ अहवाल

मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.सातारा मिटिंग दि. १९/८/२०१५ अहवाल

मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.सातारा  मिटिंग दि. १९/८/२०१५ अहवाल                                                                  आज दि.१९/८/२०१५ रोजी क्रीडाशिक्षक ,योगशिक्षक ,व तंत्रस्नेही शिक्षक प्रत्येक तालुक्यातून आलेले होते. .आदरणीय मा.श्री.नरळेसाहेब यांनी ई लर्निंग आढावा घेतला.स्वागत केले. मा.श्री .नितीन पाटीलसाहेब मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.सातारा यांनी केलेल्या भाषणाचे प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे                                                                                                                                                    आपणा सर्वांना एकत्र काम करायचे आहे .या वर्षी नाविन्यपूर्ण प्रोग्राम सुरु करत आहोत.सगळे कन्व्हर्जन प्रोग्राम आहेत. शिक्षण काही आरोग्याहून वेगळे नाही.शिक्षण आरोग्य समाजकल्याणापेक्षा वेगळे नाही .शिक्षणात इमोशनल क्वोशंट, नैतिक शिक्षण ,शैक्षणिक आरोग्य या गोष्टी आल्या.जे चांगले  चालू आहे ते चालू ठेवावे.आज आपण पाच प्रोग्राम सुरु करत आहोत.                                                                                                                                  १)सातारा ऑरग्यनिक  -काही ठिकाणी दुष्काळ काही टिकाणी खूप पाऊस पडतो उत्पन्न वाढविण्यास खूप फर्टिलायजर  वापरतात जमीन कस कमी झा ला शाश्वत सेन्द्रीयशेती  हा यापाठीमागचा  उपाय आहे महिला बचतगट शिक्षक यात काम  करतील.स्वयंस्फूर्तीने  रेसोर्स पर्सन काम  करणारे हवेत.                                                 २)आपले आरोग्य आपल्या हाती-डायबेटीस  शुगर  हे आजारांचे कारण व्यायाम कमी मनावर ताबा कमी मिटींगला डॉक्टर बोलावले नाही कारण  आजारी पडू नये म्हणून काम  करायचे आहे. सीडी तयार आहे तालुकास्तरीय समन्वयक नेमायचे आहेत.आपला आहार.व महिलांचे आरोग्य महत्वाचा  भाग आहे.                   ३)आपली वाटचाल स्वावलंबना साठी  -महिलास रोजगार उपलब्ध करून देणे .                                            ४)मैत्री -विपश्यना आनापान ,क्रीदापातुंचे मन स्थिर हवे.तालुका समन्वयक नेमायचे आहेत.                                 ५)तालुका रिलेटेड प्रोग्राम -दुष्काळ माण  खटाव  मध्ये काम करणे .                                                                                    इतर      प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र ,क्रीडाप्रबोधिनी ,ई लर्निंग,कला सांस्कृतिक गोष्टींचाही समावेश करता येईल .                                                                                                                                   
*क्रीडाप्रबोधिनी आढावा -बरकडे सर क्रीडा समन्वयक फलटण यांनी २००९-०१० साली भुजबळ सरांनी ३ मुले क्रीडाप्रबोधीनीस निवड बालेवाडीस कशी झाली२०१०-०११ तालुक्यातून १८ मुले लागली राज्याच्या ७२ मध्ये २५%पुढे २०११-०१२ साली जिल्ह्यातून १६२ राज्याशी प्रमाण होते ६७%२०१२-०१३ साली स्पर्धा झाली नाही निकष कडक झाले २०१३-०१४ साली राज्यात ४८ निवडली त्यात सातारा जिल्ह्याची ४१ म्हणजे राज्यात ८३%प्रमाण होते.पुढे विकास भुजबळ सरांनी १० वर्ष कसे प्रयत्न केले घरी मुलांचा केलाला सांभाळ मित्रांची मदत  जिल्हा विभाग राज्य मेडिकल लोकांचे सहकार्य ,झालेला त्रास १६२ विद्यार्थी निवड होऊनही निकष बदलांनी मंत्रालयात लक्षवेधी प्रश्न बनवण्यास झालेला ध्येयवादी  लढा व विजय राज्यास दिलेले धक्के व राज्यभर निर्माण केलेला सातारा जिल्ह्याचा गुणगौरव  अशी विजयगाथा ऐकवली. मुलांची निवड पद्धत विविध स्पर्धा व नियोजन याची माहिती दिली . आदरणीय पाटीलसाहेब यांनी याची रोजगारनिर्मितीशी जोड देऊया पोलिसभरती व मिलिट्री भरती मध्ये या मुलांस काय करता येईल का याचा विचार मांडला.स्वावलंबन हेच खरे शिक्षण. मुले स्वताच्या पायावर उभी राहायला शिकावीत.स्वता समस्या सोडवायला शिकावीत.आजारांचा आहाराशी संबध आहे.                                                                                                     * योगा आढावा -योगशिक्षक जावळी  यांनी सूर्यनमस्कार १०० स्पर्धेत सुवर्ण अक्षराने नाव लिहिलेले प्रमाणपत्र दिले. पाच पांढरी विषे -साखर,मैदा,दुध,मीठ,तांदूळ यांची माहिती दिली म्याडमनी मटकी,मुग,मोड ,शेंगदाणे ,लाडू कुट उकडलेले पदार्थ भाजलेला बटाटा ,फळे १५० रुपयांत सकस आहार कसा बनवतात सांगितले.कच्चे पदार्थ सर्वात उत्तम, .,भाजलेले चांगले.उकडलेले ठीक ,शिजवलेले बरे व तळलेले सर्वात वाईट असे मत मांडले.एका सरांनी सोयाबीन तेल वाईट चायनीज वाईट आहार प्रमाण सांगितले.भात कधी खावा सांगितले.एका सरांनी कुरकुरे शाळा जवळील दुकानातील खाण्याचा परिणाम सांगितला.एका सरांनी दुध पदार्थ सकाळी दही,दुपारी ताक,रात्री दुध योग्य उशः पान पाणी पिण्याची पद्धत्ती व प्रमाण सांगितले.एका शिक्षकांनी बॉबी जाळण्याचा प्रयोग सांगितला.एका सरांनी दीर्घ श्वसनाचे फायदे सांगितले.मुद्रा फायदा सांगितला.कराडच्या म्याडमनी प्राणायामाचे फायदे सांगितले तृण रसाचे फायदे सांगितले एका सरांनी आर्ट ऑफ लिविंग कसे उपक्रम घेते ते सांगितले आदरणीय पाटील साहेबांनी आयुष्यभर उपयोगी ठरेल हे असे शिक्षण द्या गेल्या आठवड्यात विपश्यना करणारे बोलावले तसे आर्ट ऑफ लिविंग चे बोलवा तालुकानिहाय योग समन्वयक नेमायचे आहेत .                                                                                                                    *तंत्रस्नेही आढावा -महेश लोखंडे सरांनी नंदकुमार साहेबांनी पुणे येथे तंत्रस्नेही कार्यशाळा घेतल्यानंतर पंचायत समिती ब्लॉग तयार करून गुगल फॉर्म द्वारे तंत्रस्नेही निवड केली व आता पंचसूत्री कार्यक्रम सुरु आहे . १) ब्लॉग शाळांचे तयार करणे ब्लॉग तयार करायला शिकविणे २ )शाळांचे apps बनविणे apps बनवायला शिकविणे ३)शैक्षणिक विडीओ तयार करणे तयार करायला शिकविणे ४)software तयार करणे उपलब्ध व वापर करणे ५)whatsapp ग्रुप करून ई लर्निंग देवाण घेवाण करणे                                                                             tech savvy teachers karad ५०० शिक्षकांचा ग्रुप सुरु आहे                                                                                    बालाजी जाधव यांनी तिसरी व शिष्यवृत्तीचा ऑफलाईन apps तयार केले राज्याच्या टीममध्ये काम  करत आहोत आपणास युजर ण बनवता क्रियेटर बनवायचे आहेत  असे मत मांडले.                                                         राम सालगुडे सरांनी मार्डी केंद्र कसे पेपरलेस केले त्यावरून सरल डाटाबेस संकल्पना माण तालुक्याने महाराष्ट्राला दिलेली आहे राज्याच्या टीममध्ये रिपोर्टवर काम सुरु आहे सांगितले .                                             कराडचे नांगरे सरांनी एकविसाव्या शतकाचा ताणताणाव शाप तर संगणक तंत्रज्ञान वरदान आहे पाटीलसाहेबांचे मायक्रोप्लानिंग आहे क्रीडाशिक्षकांचे  ८० दिवस क्रीडाप्रबोधिनी   स्पर्धात जातात शाळांचे नुकसान झाले कि मानसिकता राहत नाही तरी त्या काळात बदली शिक्षक मिळावा ही मागणी केली                    पाटीलसाहेबांनी अहंकार ण ठेवता काम करा मी केले म्हणू नका .                                                                       आदरणीय शिक्षणाधिकारी गुरव madam यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले   आदरणीय मा.श्री नरळेसाहेबांनी संगणक शिक्षकांना शाळांना पुरविण्याची मागणी केली .                                                                                                       मा.श्री थाडेसाहेब प्रकल्पसंचालक जि.ग्रा.वी.यं.सातारा जि प,. यांनी जे चांगले आनंददायी ते द्या ३ लाख महिला १५ हजार बचतगट अंगणवाडी सेविका मदतनीस यांना घेऊन आपण आरोग्य शिक्षण स्किल devlopment रोजगार शिष्यवृत्ती असे काम करूया तुम्ही एक्स्पर्ट हिरे आहात .                                                     शेवटी आभार मानले व ही जवळ जवळ तीन तास चाललेली मिटिंग संपली