Thursday 19 February 2015

वेबसाईट

क्र. संकेतस्थळ क्र. संकेतस्थळ
1 महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद 2 संगणक डॉट इन्फो - माधव शिरवळकर
3 जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा 4 अरविंद गुप्ता यांची पुस्तके आणि खेळणी
5 शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे विभाग, पुणे 6 आम आदमी बिमा योजना
7 सेकंडरी एजुकेशन मॅनेजमेंट इन्फर्मेशन सिस्टीम ( SEMIS ) 8 एजुकेशन फॉर ऑल इन इंडिया
9 स्कूल रिपोर्ट कार्ड 10 ऑफिस ऑफ द रजिस्ट्रार जनरल एंड सेन्सस कमिशनर, इंडिया
11 ICT टीचर ट्रेनिंग 12 प्रगत शिक्षण संस्था
13 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे 14 यशदा, पुणे
15 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे 16 शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभाग, कोल्हापूर
17 मराठी देशा 18 राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र
19 शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक, पुणे 20 सातारा जिल्हा परिषद, सातारा
21 महाराष्ट्र लोकसेवा आयोग 22 U - DISE ( युनिफाईड डिस्ट्रीक्ट इन्फर्मेशन सिस्टीम फॉर एजुकेशन
23 अवकाशवेध 24 राष्ट्रीय संस्कृत संस्थान
25 सर्वांसाठी मोफत शिक्षण 26 महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळ
27 ई-शिष्यवृत्ती ( समाजकल्याण ) 28 महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद विद्या परिषद
29 सातारा जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ 30 महाराष्ट्र शासन
31 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग ( समाज कल्याण विभाग ) 32 मध्याह्न भोजन योजना
33 मराठी विश्वकोश 34 balaee.com
35 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे. 36 सोलापूर जिल्हा परिषद, सोलापूर
37 प्रगत शिक्षण संस्थेचे नवनीत 38 All India School Education Survey
39 साक्षात 40 जात प्रमाणपत्र पडताळणी माहिती प्रणाली
41 ऑनलाईन सांख्यिकी माहिती प्रणाली ( प्राथमिक शिक्षण ) 42 स्वयं अर्थसहाय्यित शाळांच्या परवानगी करिता हेतूपत्र मिळण्यासाठीचा अर्ज
43 ई-शिष्यवृत्ती ( अल्पसंख्यांक ) 44 वयाची सोपी गणना
45 माहिती संप्रेषण तंत्रज्ञान ( ICT ) 46 मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र
47 शिक्षक पात्रता परीक्षा ( TET ) 48 ज्ञान प्रबोधिनी शैक्षणिक साधन केंद्र
49 मोफत गणित ( प्राजक्ता महाजन ) 50 विकासपिडीया
51 सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ, सोलापूर 52 शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग मंत्रालय, मुंबई
53 रवी अकॅडमी अभ्यासक्रम १ ते १० 54 ई-कार्यालय
55 नोकरी मार्गदर्शन केंद्र 56 महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय, मुंबई
57 स्कूल मॅपींग रिपोर्ट

शिष्यवृत्ती सराव प्रश्नसंच २९ते ३२

सराव प्रश्नसंच २९
1. उद्देश व विधेय हे ..... दोन भाग आहेत ?

वाक्याचे
शब्दाचे
नामाचे
अक्षराचे

2. खालीलपैकी कोणते वर्तमानकाळी क्रियापद नाही ?

चालतो
गातो
करेन
चालते

प्रश्न 3 ते 5 हे खालील उतार्यावर आधारीत आहेत. उतारा काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नांची उत्तरे द्या.

     एका शाळेच्या बाईंनी मुलांना वर्गात पर्यावरणाचे महत्त्व सांगितले. बाई म्हणाल्या 'मुलांनो, झाडामुळे आपल्याला फुले-फळे मिळतात, सावली मिळते तसेच पाऊसही मिळतो. झाढांमुळे मातीची झीज होत नाही. प्रत्येकाने एकतरी झाड लावले पाहिजे. उद्या रविवार आहे, आपण उद्या वृक्षदिंडी काढून वृक्षारोपण करु या.' सगळ्या मुलांनी होकार दिला.

3. बाईंनी वर्गात कशाचे महत्त्व सांगितले ?

प्रदूषणाचे
इंधनाचे
पाण्याचे
पर्यावरणाचे

4. झाडांमुळे आपल्याला काय मिळते ?

फळे
फुले
पाऊस
सर्व पर्याय बरोबर

5. झाडे लावण्यासाठी उतार्यात कोणता शब्द आला आहे ?

वृक्षदिंडी
वृक्षारोपण
वृक्षसंवर्धन
झीज

6. खालीलपैकी कोणत्या शब्दातील अक्षरांपासून hen हा शब्द तयार होत नाही ?

Another
Elephant
Northen
Threw

7. जसे Here - there तसे Forword - ?

downword
upword
before
backword

8. खालीलपैकी योग्य ठिकाणी Capital Letter नसलेला शब्द कोणता ?

January
March
april
June

9. खालीलपैकी कोणता रंग निळा आहे ?

Red
White
Blue
Green

10. 'Vegetable' या शब्दापासून अर्थपूर्ण बनणारा शब्द कोणता ?

ege
table
vege
ble

11. आपल्या जागी कोणाला झोपवून शिवाजीराजे पेटार्यातून निघून गेले ?

हिरोजी फर्जंद
मदारी मेहतर
संभाजीराजे
संभाजी कावजी

12. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कुतुबशहाने शिवाजी महाराजांच्या स्वागतासाठी तयारी केली ?

विजापूर
दिल्ली
अहमदनगर
गोवळकोंडा

13. शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील सदस्यांना काय मिळत असे ?

वतन
रोख पगार
जहागिरी
इनाम

14. आपेगावचे राहणारे संत कोणते ?

संत ज्ञानेश्वर
संत एकनाथ
संत नामदेव
संत गोरा कुंभार

15. 'मुहम्मद कुलीखान' हे नाव कोणाचे होते ?

सूर्याजी पिसाळ
मुहम्मद घोरी
दिलेरखान
नेताजी पालकर

16. मेथीची चव कशी असते ?

गोड
आंबट
तिखट
कडू

17. मासळी भातासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे ?

सिंधुदुर्ग
सोलापूर
सांगली
सातारा

18. खालीलपैकी वेगळा पदार्थ कोणता ?

क्लोरीन
तुरटी
साखर
ब्लिचिंग पावडर

19. नकाशामध्ये कोणती दिशा दाखविलेली असते ?

पश्चिम
उत्तर
दक्षिण
पूर्व

20. सुरवंट किती वेळा कात टाकतो ?

एक वेळा
दोन वेळा
तीन वेळा
चार वेळा

सराव प्रश्नसंच ३०

1. 'रामप्रहरी खेडेगावामध्ये भूपाळी ऐकू येते' या वाक्यातील 'रामप्रहरी' हा शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दसमूहाबद्दल आला असेल ?

पहाटेची प्रसन्न वेळ
रामाच्या राज्यातील प्रहरी
संध्याकाळच्या वेळी
यापैकी नाही

2. बालकवींचे संपूर्ण नाव काय ?

बाल गंगाधर टिळक
बाल सदाशिव साने गुरुजी
त्र्यंबक बापूजी ठोंबरे
राम गणेश गडकरी

प्रश्न 3 ते 5 रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्यांचा परिच्छेद पूर्ण करा.

3. सर्वांनी जल्लोषात ..... चा कार्यक्रम केला.

मिरवणूकीचा
गाण्याचा
नाचाचा
दहीहंडीचा

4. ..... चा जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात झाला.

माझा
बाळाचा
श्रीरामाचा
श्रीकृष्णाचा

5. श्रीकृष्णजन्माष्टमी निमित्त सर्वांचा ..... होता.

उपास
उपवास
आनंद
नाइलाज

6. small या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

hall
ball
tall
big

7. , या चिन्हाला काय म्हणतात ?

question mark
full stop
exclamatory mark
comma

8. I am ..... boy. रिकाम्या जागी कोणते article येईल ?

an
the
a
on

9. झाडांच्या पानांचा रंग कोणता असतो ?

Red
White
Green
Blue

10. 'numbers' शी संबंधित खालीलपैकी शब्द कोणता ?

Monday
seven
colour
month

11. डोंगरावर प्रत्येक रांगेत काही झाडे लावली असून रांगेतील मधल्या झाडाचा क्रमांक ७ वा आहे. जर रांगांएवढ्याच झाडांच्या ओळी असतील तर डोंगरावर एकूण किती झाडे लावली असतील ?

१६९
१९६
२६९
१३

12. एका सांकेतिक भाषेत A = 2+1, B = 3 - 2 असेल तर A + B = ?

1
2
3
4

13. खालीलपैकी गटात न बसणारा पर्याय कोणता ?

सातारा
सांगली
कोल्हापूर
इस्लामपूर

14. राम शामपेक्षा वयाने मोठा अाहे, शाम भरतपेक्षा वयाने मोठा आहे, तर सर्वात लहान कोण ?

भरत
राम
शाम
शाम व भरत

15. एका रांगेत १७ मुले उभी आहेत. प्रत्येकाच्या मध्ये २ मीटरचे अंतर आहे तर रांगेची लांबी किती मीटर आहे ?

३४ मीटर
३० मीटर
३६ मीटर
३२ मीटर

16. जिजाबाई कोणत्या घराण्यातील होत्या ?

वेरुळ
जावळी
फलटण
सिंदखेड

17. खालीलपैकी कोण बापाच्या वधाचा सूड घेण्यासाठी निघाला ?

फाजलखान
अफजलखान
सिद्दी जौहर
उदेभान

18. अबूल हसन कुतुबशाहा कोणत्या ठिकाणचा कारभार पाहत असे ?

विजापूर
अहमदनगर
गोवळकोंडा
इंदापूर

19. महानुभाव पंथाची स्थापना कोणी केली ?

संत रामदास
श्री चक्रधर स्वामी
संत एकनाथ
संत नामदेव

20. मथुरेत कोणाला ठेवण्यात आले होते ?

जिजाबाईंना
शिवाजी महाराजांना
औरंगजेबाला
संभाजी महाराजांना
सराव प्रश्नसंच ३१

१. महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे ?
पॅसिफिक महासागर
हिंदी महासागर
अरबी समुद्र
बंगालचा उपसागर

२. खालीलपैकी कोणता सण भाऊ बहिणींचे महत्त्व सांगणारा आहे ?
बैलपोळा
गुढीपाडवा
धुलिवंदन

३. नकाशातील वरची दिशा कोणती असते ?
पूर्व
पश्चिम
दक्षिण
उत्तर

४. खालीलपैकी कोणते वाहन लोहमार्गावरुन धावते ?
बस
विमान
ट्रक
रेल्वे

५. पक्षी स्थलांतर कोणत्या कारणांसाठी करतात ?
अन्न
निवारा
वस्त्र
पर्याय १ व २

६. मुलींना कोणत्या कारणासाठी शिक्षण सोडावे लागते ?
भावंडांना सांभाळणे
घरकाम करणे
पाणी भरावे लागणे
सर्व पर्याय बरोबर

७. जुन्या कपड्यांचा वापर कशासाठी होतो ?
गरजवंताला देण्यासाठी
गोधडी व पायपुसणी बनविण्यासाठी
प्रतिकृती तयार करण्यासाठी
सर्व पर्याय बरोबर

८. वातावरण हे कशाचे आवरण आहे ?
जल
हवा
दगड
माती

९. शिंगाडे कशापासून मिळवितात ?
प्राण्यांपासून
खाणीतून
जमिनीतून
वनस्पतीपासून

१०. आवळ्याची चव कशी असते ?
आंबट
तुरट
कडू
गोड

११. पाण्याच्या बाबतीत खालीलपैकी चुकीची सवय कोणती ?
पाणी घेण्यासाठी लांब दांडीचे ओगराळे वापरावे
भांड्याला नळ असावा
भांड्यावर झाकण ठेवावे
नळाचे पाणी चालू ठेवावे

१२. शरीरात किती ज्ञानेंद्रिये आहेत ?
सहा
पाच
चार
तीन

१३. खालीलपैकी लवकर बरा न होणारा आजार कोणता ?
सर्दी
डोकेदुखी
पाय मुरगळणे
चिकनगुनिया

१४. कोशाच्या आत बिबळ्या कडवा किती दिवस राहतो ?
आठ दिवस
दहा दिवस
बारा दिवस
वीस दिवस

१५. खालीलपैकी पोहण्याच्या शर्यतीमध्ये कोणी नाव कमावले आहे ?
रवींद्र जैन
शरद गायकवाड
सुधाचंद्रन
सीमा आगम

सराव प्रश्नसंच ३२


१. आदिलशाहनी मोर्यांना कोणता किताब दिला ?
चंद्रराव
सरलष्कर
शेरशहा
हिंमतराव

२. अफजलखान वाईचा किती वर्षे सुभेदार होता ?
दहा
आठ
नऊ
बारा

३. शूर पण क्रूर होता -
जयसिंग
सिद्दी जोहर
तानाजी मालुसरे
शिवा काशिद

४. शायिस्तेखानाने कोणत्या किल्ल्याला वेढा दिला ?
पुरंदर
तोरणा
राजगड
रायगड

५. पुरंदरचा तह केव्हा झाला ?
सन १६६५
सन १६६६
सन १६७०
सन १६६८

६. शिवाजी महाराज मिठाईच्या पेटार्यात बसून कोठे निघून गेले ?
दिल्ली
आग्रा
सुरत
विजापूर

७. महाडजवळील उमरठे हे गाव कोणाचे होते ?
शिवाजी महाराज
बाजीप्रभू देशपांडे
तानाजी मालुसरे
सूर्याजी पिसाळ

८. गागाभट्टाचे घराणे मूळचे कोणत्या ठिकाणचे होते ?
काशी
पैठण
पुणे
देहू

९. घोडदळाचे किती विभाग होते ?
दोन
तीन
चार
एक

१०. कुतुबशाहची राजधानी कोणती ?
अहमदनगर
विजापूर
सुरत
गोवळकोंडा

११. चौथाईद्वारे वसुलीचा कितवा हिस्सा मिळत असे ?
एक अष्टमांश
एक चतुर्थांश
एक पंचमांश
दोन तृतीयांश

१२. विजयनगरचा सम्राट कोण होता ?
सम्राट अकबर
कृष्णदेवराय
रामदेव
कुतुबशाह

१३. नरसी गावचे राहणारे कोण ?
संत एकनाथ
संत नामदेव
श्रीचक्रधरस्वामी
संत रामदास

१४. खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता ?
वेरुळचे - भोसले
सिंदखेडचे - जाधव
मुधोळचे - मोरे
फलटणचे - निंबाळकर

१५. पेमगिरीच्या किल्ल्यावर निजामशाहला कोणी घोषित केले ?
शिवाजी महाराज
शहाजीराजे
आदिलशाह
संभाजीराजे

शिष्यवृत्ती सराव प्रश्नसंच २६ते२८

सराव प्रश्नसंच २६

1.'मगरीने पाण्यात पडलेल्या हरिणाच्या पिल्लास फस्त केले' या वाक्यात आलेल्या 'फस्त केले' या वाक्पचाराचा अर्थ काय ?

स्वागत करणे
लगेच खाऊन टाकणे
पळवून नेणे
दडवून ठेवणे

2. 'चटई' या शब्दाचे अनेकवचनी रुप कोणते ?

चटई
चट्या
चटया
यापैकी नाही

3. ५ सप्टेंबर रोजी आपण ..... यांची जयंती साजरी करतो.

महात्मा गांधी
लोकमान्य टिळक
लाला लजपतराय
डॉ. राधाकृष्णन

4. 'क्षमा करण्याची वृत्ती' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा.

दुराग्रही
क्षमाशील
हरिणाक्षी
मृगनयना

5. 'अमृत' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

पेय
विष
पाणी
विजोड

6. खाली दिलेल्या आकृत्यांच्या गटात प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती पर्यायातून ओळखा ?

        

7. एका रांगेत सचिनचा दोन्हीकडून २५ वा क्रमांक येतो तर त्या रांगेत मुले किती ?

५०
४८
५१
४९

8. दिलेल्या पहिल्या पदाचा दुसर्या पदाशी जो संबंध आहे तसाच तिसर्या पदाचा चौथ्या पदाशी आहे तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते पर्यायातून निवडा.

        

9. विशालला वर्गामध्ये ५० रुपये सापडल्यावर त्याची कोणती कृती योग्य ठरेल ?

त्या पैशाचा खाऊ घेईल
पैसे आपल्याजवळ ठेवेल
ते पैसे वर्गशिक्षकाकडे जमा करेल
ते पैसे मित्रांना वाटेल

10. दुपारी ३ वाजता घड्याळात किती अंशाचा कोन होईल ?

६० अंश
९० अंश
३० अंश
१२३ अंश

11. पुढीलपैकी कोणता राष्ट्रीय सण आहे ?

स्वातंत्र्यदिन
दिवाळी
दसरा
नाताळ

12. खालीलपैकी कोणत्या पक्ष्यांच्या पायात चिठ्ठी बांधून संदेश पाठविले जायचे ?

पोपट
कावळा
चिमणी
कबूतर

13. उबेचे कपडे कोणत्या ॠतूत वापरतात ?

ग्रीष्म
उन्हाळा
पावसाळा
हिवाळा

14. 'पूर' हे संकट कोणत्या ॠतूत येते ?

पावसाळा
उन्हाळा
हिवाळा
सर्व बरोबर

15. खालीलपैकी कोणता पदार्थ पाण्यात विरघळत नाही ?

मीठ
साखर
तुरटी
तेल

16. 'ते बडा सय्यदला भितात. त्याला तेवढं दूर करा' हे उद्गार कोणी काढले ?

येसाजी कंक
कृष्णाजी भास्कर
संभाजी कावजी
पंताजी गोपीनाथ

17. खालीलपैकी कोणाची हत्या निजामशाहाच्या दरबारात झाली ?

लखुजी जाधव
खंडोजी घोरपडे
बाजी घोरपडे
मदारी मेहतर

18. परगण्याच्या अधिकार्यास काय म्हणत ?

पाटील
कुळकर्णी
हवालदार
सुभेदार

19. लाल महाल कोठे आहे ?

सुरत
पुणे
विजापूर
नाशिक

20. राज्याभिषेकाचे वेळी पुरोहितांच्या हाती कशाचे कलश होते ?

तूप
दही
मध
सर्व पर्याय बरोबर

सराव प्रश्नसंच २७

1. 'भगिनी' या शब्दाला विरुद्धलिंगी शब्द कोणता ?

मैत्रिण
बंधू
बालिका
बहिण

2. 'विवाह' या शब्दाला समानार्थी शब्द कोणता ?

वधू-वर
नवरदेव
लग्न
यापैकी नाही

3. आंब्याची काय ?

गढी
थप्पी
गड्डी
अढी

4. 'हिंडून करावयाचा पहारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा.

पादचारी
गस्त
हेर
माहूत

5. 'सिंहगडावर तोफा आहेत' या वाक्यातील 'तोफा' या शब्दाचे वचन कोणतें ?

एकवचन
अनेकवचन
आदरार्थी बहुवचन
यापैकी नाही

6. खाली दिलेल्या आकृत्यांच्या गटात प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती पर्यायातून ओळखा ?

        

7. तास व मिनिट काटे हे दोन्ही एका सरळ रेषेत कधी असतात ?

बारा वाजता
सव्वानऊ वाजता
नऊ वाजता
सहा वाजता

8. खालील आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून निवडा.

        

9. 'वाचनालय' हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास तो कसा तयार होईल ?

लयनाचवा
यलनावाच
यलनाचवा
यलचनावा

10. गुढीपाडवा : कडुनिंबाची पाने :: दसरा : ?

सोन्याची पाने
आपट्याची पाने
वडाची पाने
तोरणाची पाने

11. ५० पैशांची ८० नाणी देऊन त्याबदल्यात ५ रुपयांची किती नाणी येतील ?


४०
२५

12. ११ तारखेनंतर १५ दिवसांनी कोमल प्रवासाला निघणार आहे तर प्रवासाला निघण्याची तिची तारीख कोणती ?

१६
२४
२५
२६

13. ८७४३ या संख्येची विस्तारीत मांडणी खालीलपैकी कोणती ?

८०००० + ७०० + ४० + ३
८००० + ७०० + ४ + ३
८००० + ७० + ४० + ३
८००० + ७०० + ४० + ३

14. एका संख्येला १८ ने भागले असता भागाकार १५ येतो व बाकी ७ येते तर ती संख्या कोणती ?

२७७
२७०
३७७
३७०

15. ३, ५ व ९ यांनी नि:शेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती ?

२७
१८
३६
४५

16. खालील शब्दांपैकी घराशी संबंधित नसलेला शब्द कोणता ?

walls
roof
floor
road

17. Which month does not have 31 days ?

April
January
October
March

18. खालीलपैकी शब्दसंग्रहात न बसणारा वेगळा शब्द ओळखा.

party
gifts
grass
cake

19. बेकरीवाला काय विकतो ?

meat
bread
sugar
fruit

20. Flower शी संबंधित असलेला शब्द खालीलपैकी कोणता ?

Net
Table
Dog
Rose

सराव प्रश्नसंच २८
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 30 दिवस राहिले

1. खालीलपैकी प्रत्यय नसलेला शब्द कोणता ?

जवान
गाडीवान
धनवान
शीलवान

2. 'बिन' हा उपसर्ग खालीलपैकी कोणत्या शब्दासाठी योग्य आहे ?

योग्य
हजर
चूक
रूप

3. फुलझाडांच्या समूहाला काय म्हणतात ?

लोंगर
पुंजका
गट
ताटवा

4. खाली असलेल्या म्हणीचा गाळलेला अर्धा भाग पर्यायातून निवडा.
भीक नको ..........

पण मोर नाचवा
पण कुत्रा आवर
पण उंदिर काढ
पण हत्ती पळवा

5. खालील शब्दातून शुद्ध शब्द निवडा.

उज्वल
उज्ज्वल
उज्वल्ल
उजवल

6. जमिनीचा ..... झाला की पेरणी करतात.

मळणी
उफणणी
लावणी
वाफसा

7. महाराष्ट्रातील प्रमुख पश्चिमवाहीनी नदी कोणती ?

कृष्णा
गोदावरी
वैनगंगा
तापी

8. फुलपाखरांचा निवारा कोठे असतो ?

दगडांच्या सानिध्यात
प्राण्यांच्या सानिध्यात
वनस्पतींच्या सानिध्यात
सूक्ष्मजीवांच्या सानिध्यात

9. कडधान्यांना आलेले मोड म्हणजेच -

वनस्पतीचा माहोर
वनस्पतीचे खोड
वनस्पतीचा अंकुर
वनस्पतीची पालवी

10. महाराष्ट्रात हळदीचे पीक ..... जिल्ह्यात अधिक होते ?

सोलापूर
सांगली
कोल्हापूर
नांदेड

11. खालीलपैकी कोणत्या संख्येतील ७ या अंकाच्या स्थानिक किंमतींची बेरीज सर्वात कमी आहे ?

२७६७
७२६७
२७७६
७७६२

12. २५ च्या वर्गातून ९ चा वर्ग वजा केल्यास उत्तर किती येईल ?

१४४
१५
६२५
५४४

13. अशा किती दोन अंकी संख्या आहेत ज्यांची बेरीज १० येते ?



१०
११

14. प्रत्येकी ५० ग्रॅमप्रमाणे १२० जणांना वाटण्यासाठी किती किलोग्रॅम बदाम लागतील ?





15. जर १ डझन संत्र्यांची किंमत ९६ रुपये असेल तर ४ संत्र्यांची किंमत किती ?

३८४ रुपये
४६ रुपये
३० रुपये
३२ रुपये

16. एका रांगेत १९ मुले होती, तर शेवटून दुसरा क्रमांक असणार्या मुलाचा समोरुन कितवा क्रमांक असेल ?

१५ वा
१६ वा
१७ वा
१८ वा

17. एका सांकेतिक भाषेत भारत हा शब्द ४२८ असा ल‍िहितात व परत हा शब्द ८२९ असा लिहितात तर त्या सांकेतिक भाषेत प साठी कोणता अंक वापरला असेल ?





18. दिनकरचा वाढदिवस सोमवारी झाला, त्याच्यापेक्षा ४ दिवसांनी मोठा असणार्या राहुलचा वाढदिवस कोणत्या वारी येईल ?

शुक्रवार
शनिवार
गुरुवार
बुधवार

19. वायव्य ही उपदिशा कोणत्या दोन दिशांच्या मध्ये असते ?

पश्चिम आणि दक्षिण
पश्चिम आणि उत्तर
पूर्व आणि दक्षिण
उत्तर आणि पूर्व

20. महादेवची आई ३ ऑगस्टपासून शिक्षकदिनापर्यंत तलावाच्या कामावर जात होती तर तिने किती दिवस काम केले ?

३३
३२
३५
३४

शिष्यवृत्ती सराव प्रश्नसंच २१ते२५

सराव प्रश्नसंच २१

1. 'अंधार' या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.

प्रकाश
तामस
तमा
तम

2. जसे साधूंचा जथा, तसे लमाणांचा ......

घोळका
जमाव
तांडा
ताफा

3. रयत शिक्षण संस्था कोणी स्थापन केली ?

कर्मवीर भाऊराव पाटील
स्वामी विवेकानंद
रवींद्रनाथ टागोर
महाराजा सयाजीराव गायकवाड

4. पुढील शब्दापैकी पुल्लिंगी शब्द कोणता ?

गाय
बैल
वासरू
पिलू

5. प्रत्यय असणारा शब्द ओळखा.

सुगंध
कष्टकरी
विचित्र
कुप्रसिद्ध

6. जर blackboard शी निगडीत duster हा शब्द असेल, तर farm शी निगडीत शब्द कोणता ?

play
plough
bird
dust

7. ग्रेगरीयन वर्षाची सुरुवात पुढीलपैकी कोणत्या महिन्याने होते ?

December
July
June
January

8. Golden या शब्दापासून अर्थपूर्ण होणारा शब्द कोणता ?

gode
gold
gen
ned

9. तूमच्या वर्गाच्या कबड्डी संघाने सामना जिंकला आहे. तुम्ही तुमच्या कर्णधाराचे अभिनंदन कसे कराल ?

Thank you !
Very good !
Congratulations !
What a surprise !

10. 'छत्तीस हजार एकोणऐंशी' ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कशी लिहाल ?

36089
36079
३६०७९
३६०८९

11. खालील संख्यांपैकी कोणत्या संख्येतील ७ या अंकाची स्थानिक किंमत ७०० येईल ?

३५७३९
५३७४
७८९०
७७०७७

12. एका गावामध्ये १४०८४ पुरुष व १३१०९ स्त्रिया आहेत, तर त्या गावची एकूण लोकसंख्या किती ?

२७२९३
२७१९३
२७०९३
२७१८३

13. ४४ च्या आधीची पाचवी विषम संख्या कोणती ?

३७
३३
३९
३५

14. २ हा अंक असलेल्या दोन अंकी संख्या एकूण किती आहेत ?

१८
१९
२०
२१

15. सुती कापडाचा मूळ स्रोत कोणता ?

प्राणी
रेशमी किडे
खनिज तेल
वनस्पती

16. खालीलपैकी पाण्यात तरंगणारी वस्तू कोणती ?

खोडरबर
प्लॅस्टीकची पट्टी
खिळा
खडे

17. पृथ्वीवर दिवस व रात्र कशामुळे होतात ?

पृथ्वीचे परिवलन
चंद्राचे परिवलन
सूर्याचे परिवलन
चंद्राचे परिभ्रमण

18. 'बंड केलिया मारले जाल' हे उद्गार कोणाचे ?

चंद्रराव मोरे
आदिलशाहा
शिवाजी महाराज
यशवंतराव मोरे

19. शिवराय बालपणी कर्नाटकात असताना कोंढाण्याचे सुभेदार कोण होते ?

तानाजी मालुसरे
दादाजी कोंडदेव
उदेभान
चंद्रराव मोरे

20. मुरारबाजीने कोणत्या किल्ल्यावर अतुल पराक्रम गाजवला ?

कोंढाणा
पन्हाळा
शिवनेरी
पुरंदर

सराव प्रश्नसंच २२

1. खालीलपैकी वर्तमानकाळी क्रियापद ओळखा ?

आणतो
आणेल
आणणार
आणले

2. बैलाच्या ओरडण्याला काय म्हणतात ?

हंबरणे
रेकणे
डुरकणे
भुंकणे

3. जल या अर्थाचा शुद्ध शब्द कोणता ?

पाणी
पाणि
पानि
पानी

4. 'ससा हा चपळ प्राणी आहे' या वाक्यातील ससा या शब्दाचा अनेकवचनी शब्द कोणता ?

ससा
ससे
ससवे
ससू

5. खालील गटातील नाम ओळखा.

धीट
आंबा
उत्कृष्ट
शूर

6. शनिवार व सोमवार यामध्ये कोणता दिवस येतो ?

monday
sunday
friday
thursday

7. दूधवाला खालीलपैकी काय विकतो ?

sugar
bottle
bread
milk

8. small या शब्दाचा अर्थ कोणता ?

मऊ
लहान
सुंदर
मोठा

9. ४००२५ ही संख्या अक्षरात कशी लिहाल ?

चार हजार पंचवीस
पंचवीस हजार चाळीस
चाळीस हजार पंचवीस
चाळीस हजार दोनशे पाच

10. ५ ने नि:शेष भाग जाणारी संख्या पुढीलपैकी कोणती ?

१२६७३
१२०७५
१२०७४
१२३९२

11. खालीलपैकी चुकीचे विधान कोणते ?

चौकोनाच्या सर्व बाजू नेहमी समान असतात
आयताचे सर्व कोन काटकोन असतात
त्रिकोणाला तीन शिरोबिंदू असतात
चेंडू गोल असतो

12. आयताचे किती कोन काटकोन असतात ?




13. हापूस आंबा या फळासाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील गाव कोणते ?

ठाणे
पंढरपूर
कोल्हापूर
रत्नागिरी

14. दूधापासून आपणास कोणता पदार्थ मिळत नाही ?

तेल
तूप
दही
लोणी

15. ऊसापासून काय तयार करता येत नाही ?

गूळ
साखर
काकवी
साबूदाणा

16.'मामांनी मोनिकासाठी मासिक मागवले' या वाक्यात म हे अक्षर किती वेळा आले आहे ?




17. आदिलशहाने 'सरलष्कर' हा किताब कोणाला दिला ?

शहाजीराजांना
शिवाजीराजांना
संभाजीराजांना
यशवंतराव मोरे यांना

18. निजामशहाची हत्या करणारा खालीलपैकी कोण ?

मलिकअंबर
अफजलखान
फत्तेखान
बडीसाहेबा

19. शिवनेरी हा किल्ला कोणत्या राज्यात आहे ?

कर्नाटक
महाराष्ट्र
आंध्रप्रदेश
केरळ

20. महाराष्ट्रातील कोणते संत पंजाबात गेले होते ?

संत तुकाराम
संत रामदास
संत ज्ञानेश्वर
संत नामदेव


सराव प्रश्नसंच २३

1. ‘वामनराव उत्तम गवई आहेत’ या वाक्यातील ‘गवई’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

लेखक
कवी
गीतकार
गायक

2. खालील अक्षरांपासून तयार होणार्या अर्थपूर्ण शब्दाचे मधोमध येणारे अक्षर कोणते ? : भा र त हा म


हा
भा

3. ‘गिर्हाईकाने दुकानदाराला तांदळाचा भाव विचारला’ या वाक्यातील ‘भाव’ हा शब्द कोणत्या अर्थाने वापरला आहे ?

किंमत
भक्ती
भावना
मान

4. खालीलपैकी वर्तमानकाळी वाक्याचा पर्याय कोणता ?

स्नेहा गोष्ट सांगणार आहे
स्नेहा गोष्ट सांगत आहे
स्नेहाने गोष्ट सांगितली
स्नेहा गोष्ट सांगेल

5. 'गौरवचे वडील आजारी पडल्यावर ....... घेतात.' या वाक्यात गाळलेल्या जागी शुद्ध शब्द निवडा ?

अवषद
औषध
औषद
औशद

6.’सुधीर नेहमी उधळपट्टी करतो, पैसे नसल्यास शांत राहतो’ या वाक्यासाठी योग्य म्हण सुचवा.

आवळा देऊन कोहळा काढणे
असल्यास दिवाळी नसल्यास शिमगा
आपला हात जगन्नाथ
आडात नाही तर पोहर्यात कोठून

7. ‘हसे करुन घेणे’ या वाक्प्रचारातील ‘हसे’ या शब्दाचा अर्थ कोणता ?

आनंद
हसणे
नाराजी
फजीती

8. बालकवी कोणास म्हणतात ?

राम गणेश गडकरी
त्र्यंबक बापूजी ठोंबरे
कुसुमाग्रज
प्रल्हाद केशव अत्रे

9. वेगळ्या अक्षराने सुरु होणारा शब्द शोधा

dust
dark
print
drink

10. वेगळ्या अक्षराने शेवट होणारा शब्द शोधा

paid
pot
said
cloud

11. The person who grows vegetables is …………..

farmer
hawker
peon
milkman

12. What is the plural form of ‘bus’ ?
(‘bus’ या शब्दाचे अनेकवचन खालीलपैकी कोणते ?)

bushes
buses
buss
busis

13. १ ते १०० पर्यंत ३ हा अंक किती वेळा लिहावा लागतो ?

११
२१
१९
२०

14. कोणत्याही दोन मूळ संख्यांचा गुणाकार निश्चितपणे कोणती संख्या असते ?

संयुक्त
विषम व मूळ
सम
मूळ

15. अहमदनगरजवळील भिंगार या गावात ९०५३ पुरूष असून ८७०७ स्त्रिया आहेत. एकूण लोकसंख्येतील १२०४८ साक्षर आहेत, तर त्या गावातील निरक्षरांची संख्या किती ?

४९३३
६०२५
६०६२
५७१२

16. पंधरवडा हा काळ किती दिवसांचा असतो ?

३० दिवस
१५ दिवस
७ दिवस
८ दिवस

17. दगडी कोळसा हे इंधन वापरुन कोणते वाहन चालते ?

आगगाडी
विमान
मोटारकार
ट्रक

18. गाईम्हशींच्या शेणाचा उपयोग कशासाठी होतो ?

खत म्हणून
गोवर्या थापण्यासाठी
सर्व पर्याय बरोबर
गोबरगॅस चालवण्यासाठी

19. उत्तर भारतात यमुना नदीवरील ........ ही आपल्या देशाची राजधानी आहे ?

मथुरा
दिल्ली
वाराणसी
आग्रा

20 खालीलपैकी पाण्याचा कोणता स्त्रोत नैसर्गिक नाही ?

झरे
ओहळ
नदी
कूपनलिका

सराव प्रश्नसंच २४

1. खालील वाक्यांपैकी शुद्ध वाक्याचा पर्याय क्रमांक शोधा.

रयत शिक्षन संस्थेने उच्च शिक्षनासाठी महाविद्यालये सुरू केली.
रयत शिक्षण संस्थेणे उच्च शिक्षनासाठी महाविद्यालये सुरू केली.
रयत शीक्षण संस्थेने उच्च शिक्षणासाठी महाविद्यालय सुरू केली.
रयत शिक्षण संस्थेने उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये सुरू केली.

2. 'उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग' या म्हणीचा अचूक अर्थ कोणता ?

नवरा उतावळा असू नये.
नवरा उतावळा असावा, परंतु त्याने गुडघ्याला बाशिंग बांधू नये.
उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन करणे.
कितीही अवघड गोष्ट प्रयत्नांनी साध्य होते.

3. जसे साधासुधा तसे साधा........

भोळा
सौदा
गोळा
अर्धा

4. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
१७, डॉ. आंबेडकर रोड, पुणे – ४११००१
वरील पत्त्यातील ४११००१ हा ........ आहे.

फोन नंबर
पिनकोड नंबर
दिनांक
घर नंबर

5. 'हिप हिप हुर्रे !' या वाक्याचा प्रकार कोणता ?

नकारार्थी
उद्गारार्थी
प्रश्नार्थी
होकारार्थी

6. चपाती तयार करण्याकरता कोणती वस्तू वापरली जात नाही ?

rolling board
spoon
pan
rolling pin

7. खालीलपैकी कोणता शब्द क्रियावाचक नाही ?

come
go
jump
happy

8. जर प्रत्येक रांगेत १८ रोपे लावली, तर अशा २८५ रांगांमध्ये किती रोपे लावता येतील ?

५२१०
५१३०
५१२०
५३१०

9. नेहाजवळ शंभर रूपयांच्या आठ नोटा, पाच रूपयांच्या सात नोटा व दहा रुपयांच्या पाच नोटा आहेत, तर नेहाजवळ एकूण रुपये किती ?

८५८
८९५
८८५
८५९

10. साडेतीन किलोमीटर = किती मीटर ?

३००
३५००
३५०
५००

11. ताशी १२ कि.मी. वेगाने ६ तासात एका सायकलस्वाराने कापलेले अंतर किती ?

७२ कि.मी.
७२० कि.मी.
७२० मी.
७२ मी.

12. गोदावरी नदी कोठून उगम पावते ?

महाबळेश्वर
त्र्यंबकेश्वर
भीमाशंकर
सातपुडा

13. पोष्टाच्या तिकिटांवरील चित्रातून आपल्याला कोणती माहिती मिळते ?

माणसांचा इतिहास
प्राण्यांची माहिती
पक्ष्यांची माहिती
समाजात झालेल्या बदलांची माहिती

14. मतदान यंत्रावर केलेल्या ........ लिपीच्या सोयीमुळे दृष्टिहीन व्यक्तीही इतरांप्रमाणे गुप्त मतदान करु शकतात.

ब्रेल
मोडी
देवनागरी
रोमन

15. घड्याळातील तासकाटा व मिनिटकाटा हे किती वाजता एका सरळ रेषेत असतात ?

११.३० वाजता
३ वाजता
९ वाजता
६ वाजता

16. फूल : पाकळ्या :: पुस्तक : ?

धडे
पाने
परीच्छेद
मजकूर

17. रस्त्यावर केळीचे साल पडलेले दिसले, तर काय कराल ?

स्वत: साल उचलून कचराकुंडीत टाकू
पाय घसरुन कोण पडेल याचे निरीक्षण करु
मित्राला साल उचलण्यास सांगू
दुर्लक्ष करु

18. मालोजीराजे कोणत्या लढाईत मारले गेले ? .

भातवडीच्या
पन्हाळगडाच्या
इंदापूरच्या
अहमदनगरच्या

19. गागाभट्टांचे घराणे मूळचे ....... ?

काशीचे
पैठणचे
पुण्याचे
नाशिकचे

20 . .... रक्ताने घोडखिंड पावन झाली.

बाजी घोरपडेच्या
तानाजी मालुसरेच्या
मुरारबाजीच्या
बाजीप्रभू देशपांडे याच्या

सराव प्रश्नसंच २५

1. राई कोणाची ?

फुलांची
फळांची
पानांची
झाडांची

2. खालील शब्दातून शुद्ध शब्द निवडा ?

सूरक्षित
सुरक्षीत
सुरक्षित
संरक्शित

3. 'मृत्यूवर जय मिळविणारा' या शब्दसमूहाबद्दल शब्द निवडा ?

मृत्यूंजय
अमर
अजिंक्य
मृत्यदाता

4. 'जाणून घेण्याची इच्छा' या वाक्यासाठी खालीलपैकी कोणता शब्द वापरला जातो ?

आवड
जिज्ञासा
आस्तिक
तत्त्वज्ञान

5. खालीलपैकी चुकीची जोडी शोधा ?

दुसर्यावर अवलंबून असणारा - परावलंबी
घोडा बांधण्याची जागा - गोठा
सापाचे खेळ करणारा - गारुडी
पंधरा दिवसांचा - पंधरवडा

6. १ ते २० अंकांमध्ये किती मूळ संख्या आहेत ?




१०

7. 'क़' ही एक विषम संख्या आहे तर तिच्यामागील समसंख्या कोणती ?

क + १
क - २
क + २
क - १

8. खालीलपैकी कोणत्या संख्येला ४ ने पूर्ण भाग जाईल ?

२५३४
९४२०
२३४६
३५८२

9. ३५० किलोमीटरवरील एका गावात सुरेशला मोटारसायकलने जाण्यास ७ तास लागले व परत येण्यास ५ तास लागले तर परत येताना सुरेशने मोटारसायकलचा वेग ताशी किती किलोमीटरने वाढवला ?


१०
२०
३०

10. वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेला ..... म्हणतात.

परीघ
व्यास
त्रिज्या
वर्तुळकेंद्र

11. कळसूबाई शिखराची उंची किती ?

१६४६ मीटर
१६४६ फूट
१६४६ इंच
१६४६ किमी

12. एका वर्षात किती महिने असतात ?

४८
१२
२४
३६५

13. राष्ट्रीय वीरता पुरस्कार कोणाच्या हस्ते दिले जातात ?

मुख्यमंत्र्यांच्या
राज्यपालांच्या
राष्ट्रपतींच्या
पंतप्रधानांच्या

14. पिण्यासाठी पाणी निर्धोक करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात ?

जलशुद्धीकरण
जलवितरण
जलसंजीवन
जलसिंचन

15. समाजाची वाटचाल कोणत्या दिशेने व्हावी याविषयीच्या तरतुदी ...... असतात.

संसदेत
संविधानात
न्यायालयात
कायद्यात

16. योगेशचा रांगेतील क्रमांक दोन्हीकडून २३ वा आहे तर रांगेत मुले किती ?

४६
४५
२२
२३

17. वर्षाची सुरुवात एप्रिल महिन्यापासून झाल्यास क्रमाने पाचवा महिना कोणता येईल ?

ऑगस्ट
सप्टेंबर
मे
जून

18. माधव व विकास क्रिकेट खेळतात, केतन व विकास फुटबॉल खेळतात, माधव व केतन बास्केटबॉल खेळतात, अभय व माधव कॅरम खेळतात तर फक्त एक खेळ खेळणारा कोण आहे ?

माधव
विकास
अभय
केतन

19. कोमल, स्वाती व अंजली यांच्या आजच्या वयाची बेरीज ५२ वर्षे आहे तर ३ वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती ?

४९ वर्षे
४३ वर्षे
५२ वर्षे
४५ वर्षे

20. 'महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद' या वाक्यात प हे अक्षर किती वेळा आलेले आहे ?

एक
तीन
दोन
चार