Tuesday 29 December 2015

शैक्षणिक ग्रुपचर्चा १३

[12/29, 8:03 PM] Mahesh Lokhande: 🔴 ग्रुपचर्चासत्र   १३  🔴
🌍आजचा चर्चेचा विषय🌍
🔶 शारीरिक शिक्षण विषयासाठी क्रीडाकौशल्य विकासासाठी कोणते  लघुखेळ,  शर्यतीप्रकार घेता येतील.🔶
मुद्दे=१) लघुखेळ (कालच्या             अडचणी)
          २) शर्यतीप्रकार
🔶चर्चेस वेळ आज दि.२९/१२/२०१५  रात्री ९.३०  ते १०.३०पर्यंत.🔶 सर्वांनी चर्चेत सहभागी व्हावे.🔵
[12/29, 8:29 PM] बागुलसर: लधुखेळ

चमचा लिंबू
पोत्यातील उड्या
तीन पाय शर्यत
मडके फोडणे
राम राणा
तळ्यात मळ्यात
[12/29, 9:05 PM] वंदना पाटील कापील गोळेश्वर: खार खाेपा
पादञाण शोध
खेचाखेच
टिकली मारणे
गड लढविणे
झेल चेंडू हो राजा
डोक्यावर वही घेऊन चालणे
मानवी मनोरे
धावणे
जलद चालणे
मॅरेथाॅन
उंच उडी
लांब उडी
रीले
अडथळा शर�यत
गोळा फेकब
थाळी फेक
भाला फेक
[12/29, 9:13 PM] मिलिंद अॅ: शारीरिक शिक्षण हस्तपुस्तिकेत इयत्तावार खेळ नियम दिलेले आहेत
[12/29, 9:17 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: मुलांचे हात आणि पाय..भक्कम,मजबूत होण्यासाठी..॰१).अर्धबैठक...२)चौड्यावर जास्तवेळ उभे राहणे.३)जोर ४)बैठका...इ. घेता येईल
[12/29, 9:22 PM] खोतसर ज्ञा: 1)जलद चेंडू देणे. 2)टोपी उचलणे. 3)गुडघ्यात फुटबॉल ठेवून पळण्याची शर्यत 4)होड्या पाकीटे तयार करण्याची शर्यत 5)सेनापती कोण 6)शिवाजी म्हणतो 7)सुईदोर्यची शर्यत 8)मोकाट दौड पळणे चालणे रांगणे लंगडणे उड्या मारणे. 9)सागर गोट्ट्या खेळणे. 10)झिम्मफुगडी खेळाची शर्यत.
[12/29, 9:23 PM] बुरकुलेसर: Tin payanchi sharyat. 'rile
[12/29, 9:25 PM] बुरकुलेसर: Dhoghanchya pathichyamadhe boll thewun dhawaychi sharyat
[12/29, 9:31 PM] Mahesh Lokhande: शर्यती (विनासाहित्य)
१)जलद चालणे
२)जलद चालणे पळणे
३)घोटा धरुन पळणे
४)खेकडाचाल
५)रांगणे
६)नागमोडी रांगणे
७)बदकचाल
८)हत्तीचाल
९)उलट सुलट पळणे
१०)साधी शर्यत
[12/29, 9:37 PM] Mote Gondi: पूरक मनोरंजक खेळात वेळेची मर्यादा असावी साधारन पाच ते दहा मिनीटाचा खेळ असावा .खेळात वर्गातील सर्व मुलांचा सहभाग घ्यावा खेळात विवीधता असावी वेगवेगळे खेळ घ्यावेत   शक्यतो खेळ निवडताना मुलांच्या वयोगटाचा विचार व्हावा . शिक्षकाची उपस्थीती अावश्यक .
[12/29, 9:37 PM] Mahesh Lokhande: ११)वर्तुळ शर्यत
१२)गटवर्तुळ शर्यत
१३)एकमेकांभोवती पळणे
१४)खांबाला वळसा शर्यत
१५)साखळी शर्यत
१६)जोडीबदल शर्यत
१७)तीन पायांची शर्यत
१८)आगगाडी शर्यत
१९)पालखी शर्यत
२०)टांगा शर्यत
[12/29, 9:43 PM] Mahesh Lokhande: २१)ओझे उचलणे
२२)घोडा घोडेस्वार शर्यत
२३)लंगडी
२४)कांगारुउडी शर्यत
२५)बेडूकउडी शर्यत
२६)मानवी अडथळे शर्यत
२७)पाठीवरुन उडी शर्यत
२८)बोगदा शर्यत
२९)लंगडझाप शर्यत
३०)ओळ शर्यत
[12/29, 9:43 PM] Mote Gondi: शक्यतो खेळाच्या नावातच कृती अर्थ अाहे नियमात लवचीकता असावी. अपवादात्मक एखाद्या खेळाची नावातुन कृती समजनार नाही अशा खेळाचे नाव सांगा म्हणजे त्याबद्दल स्पष्टीकरण देता येईल .
[12/29, 9:46 PM] Mahesh Lokhande: साहित्यासह कोणत्या शर्यती घेता येतील ?
[12/29, 9:46 PM] भालदारमॅडम ज्ञा: फुगा शोधणे शर्यत  म्हणजे फुगा फुगवायचा त्यावर स्वतःचे नाव लिहायचे एका खोलीत सर्व फुगे मोकळे सोडायचे त्यातून स्वतःच्या नावाचा फुगा शोधायचा.
[12/29, 9:50 PM] भालदारमॅडम ज्ञा: राम राणा,खार खोपा याखेळाची सविस्तर माहिती हवी आहे.
[12/29, 9:50 PM] Mahesh Lokhande: (साहित्यासह शर्यत)
३१)वस्तुभोवती पळणे
३२)दोरीवरील उड्या शर्यत
३३)दोरीउड्या नागमोडी शर्यत
३४)दोरीउड्या शटल शर्यत
३५)नौका शर्यत
३६)काठीवरुन उडी शर्यत
३७)काठी डोक्यावरुन शर्यत
३८)काठीसह बसुन उड्या
३९)काठीने टोपी देणे शर्यत
४०)काठी डंबेल्स शर्यत
[12/29, 9:55 PM] Mote Gondi: तीन पायाची शर्यत ,रिले ,फुगा पासींग,चूंडू थ्रो, रींग पास करणे इत्यादी
[12/29, 9:56 PM] Mahesh Lokhande: बागुलसर   रामराणा खेळ कसा घेणार?
वंदना पाटीलमॅडम खारखोपा खेळ कसा घेणार?
[12/29, 9:57 PM] भालदारमॅडम ज्ञा: डिगरी,खारी आणि झुडपे,पिच ओह,संख्याबल,तोबा खेळ,लायसन,चाॅकलेट चाॅकलेट,अडमीट किडा,शञूची छावणी,स्टिक पोलो,
[12/29, 10:04 PM] खोतसर ज्ञा: काही खेळाची माहिती आहे कांही खेळाची माहिती नाही त्या खेळाची माहिती मिळावी.
[12/29, 10:04 PM] Mote Gondi: चाॅकलेट चाॅकलेट मध्पे प्रथम गोल अाखावा गौलात मागे तोंडाकरूण ऊभे राहायचे नंतर काठी हातात घेवून म्हनायचे चाॅकलेट चाॅकलेट एस कमीण फेकूका मागचा म्हणतो फेक किंवृ एस मागील सर्भजन कॅच घेणार नाहि घेतलातर पाऊल  सांगन व मापणे,
[12/29, 10:05 PM] Mahesh Lokhande: खारी व झुडपे
दोन  विद्यार्थी समोरासमोर उभे राहुन कमान करतील हीच झुडपे.शिटी वाजता इतरांनी झुडुपातुन जायचे.इतर झाले खारी.शिटी वाजता खारीना झुडुपे झालेले पकडतील.दोन पकडल्यानंतर दुसरे झुडुप तयार. अशी झुडपे वाढत जातील शेवटी राहील तो जिंकला.
[12/29, 10:08 PM] Mote Gondi: अडमीट किडा गटातील मूलांएवढे संखेचा ऊक गोल कमी अाखायचा अाडमिट किडा किसका घर असा प्रश्न डाव असेल त्याने विचारायचा कूठल्याहि एका नुलाचे नाव सांगायचे मग त्याच्याकडे रिंगनात सर्वांणि जायचे जाताना जो सापडेल तो अाउट .
[12/29, 10:14 PM] Mahesh Lokhande: पिंच ओ ह
१५ मीटरवर दोन समांतर रेषा आखाव्यात.एका रेषेवर मुले हात पकडुन दुसर्‍या रेषेकडे पाठ करुन उभे राहावे.राज्य घेणार्‍याने दुसर्‍या रेषेजवळुन पिंच म्हणावे .पहिल्या रेषेवरील पहिल्याने हात दाबावा हात दाबता ओह म्हणेल .पहिला दुसर्‍या रेषेपुढे पळेल.साखळी हात दाबणे ओह ओह ओह पुढे चालेल राज्य घेणाराने अधिकांस रेषेपलीकडे जाणेपुर्वी शिवावे.ते बाद होणारे बाजुला उभे राहतील.पुन्हा सर्व राज्य घेतील व पिंच म्हणतील व पळणारास बाद करतील.सर्व खेळाडू बाद होईपर्यंत खेळ चालू ठेवावा.
[12/29, 10:14 PM] वाघमॅडम: Tikali lavane.                      Shivaji mhanaho basa    .beduk udi                        Ball badalit takane
[12/29, 10:18 PM] उदय भंडारे: राम राम पाव्हण .
गोल करुन बसावे . डाव असणार्‍याने एकाला एकमेकाला शेकहॅन्ड करुन राम राम पाव्हणं म्हणावे . दोघानी विरुद्ध दिशेने गोलाभोवती पळावे . अगोदर येऊनबसेल तो जिंकला . डाव आलेल्या मुलाने दुसर्‍याला राम राम पाव्हणं म्हणुन पुढे डाव चालु करावा .
[12/29, 10:21 PM] Mahesh Lokhande: संख्याबल
दोन गट समान करावेत.२०मीटरवर समोरासमोर गट थांबतील.क्रमांकानुसार पुढच्यास टाळी देवुन पळणे.पळणारांस रेषेपलीकडे जाणेपुर्वी शिवावे.बाद झालेले बाद करणार्‍याच्या मागे थांबतील.संख्याबल असे वाढत जाईल .
[12/29, 10:22 PM] उदय भंडारे: लाॅक अॅन्ड कि
रिंगणामध्ये सर्वांनी पळावे . डाव असणार्‍याने ज्याला पकडेल त्याला लाॅक म्हणावे . लाॅक झालेल्याने जागेवर उभे रहावे . बाकी मुलांनी त्याला स्पर्श करुन कि म्हटले कि मगच पळावे .
[12/29, 10:23 PM] Mahesh Lokhande: ४१)घोडा शर्यत
४२)वस्तु देणे शर्यत
४३)वस्तु उडवणे पकडणे
४४)रास उचलणे
४५)बटाटा शर्यत
४६)चेंडुपास
४७)सायकल शर्यत
४८)डोक्यावरुन चेंडू देणे
४९)पायांतुन चेंडू देणे
५०)बगलेतुन मागे दिलेला चेंडू घेऊन पळणे
[12/29, 10:26 PM] उदय भंडारे: सोनसाखळी
रिंगणात सर्वानी पळावे . डाव असणार्‍याने ज्याला पकडेल त्यांची साखळी . अशी साखळी वाढत जाईल . फक्त साखळी तुटु द्यायची नाही . साखळीतुन तुटणारे रिंगणाबाहेर जातील .
[12/29, 10:29 PM] भालदारमॅडम ज्ञा: लघुखेळावर आपण बरीच चर्चा केली. पण जो दुसरा मुद्दा शर्यतीचा आ हे तो आत्ताच्या ज्ञानरचना वादात आपणास सामाविष्ट करता येणार नाही कारण या पदधतीत मुलांच्यात शर्यत लावणे निषिद्ध आहेत्यामुळे अशा खेळांना आपण दुसरे काही नाव देता येते का तू पाहुःया का?
[12/29, 10:31 PM] Mahesh Lokhande: तोबा खेळ
वर्तुळावर आत तोंड करुन बसलेल्यांचे मागुन राज्य घेणारा रुमाल घेवुन पळेल न कळता एकाच्या मागे रुमाल टाकावे.इतरांनी मागे न पहाता हातांनी चाचपुन पहावे.रुमाल टाकणारा पळत जाईल.जागा पकडेल.ज्याचे मागे रुमाल असेल तो पळत जाऊन टाकणारास शिवावे.कळलेच नाही वेढा मारला तरी तर टाकणाराने पाठीत धप मारुन तोबा म्हणावे व त्याला राज्य घेण्यास रुमाल द्यावा.
[12/29, 10:31 PM] भालदार गोळेश्वर: Shrawan kaushalya sathi -  don olinna pahilya mulachya kanat shabd sangawev... Tyanni halu pathimagil mulala kanat sangave ...yapadhhatine shewat paryant jaun shewatchta mulane to shabd sangava....  pahilyanda Jo sangel to vijeta... Yat shewat khoop veglach shabd yeto.....khoop mjya yete...
[12/29, 10:32 PM] Mahesh Lokhande: ४१)घोडा शर्यत
४२)वस्तु देणे शर्यत
४३)वस्तु उडवणे पकडणे
४४)रास उचलणे
४५)बटाटा शर्यत
४६)चेंडुपास
४७)सायकल शर्यत
४८)डोक्यावरुन चेंडू देणे
४९)पायांतुन चेंडू देणे
५०)बगलेतुन मागे दिलेला चेंडू घेऊन पळणे
५१)चेंडू ढकलत नेणे
५२)ड्रिबल शर्यत
५३)कडी शर्यत
५४)पिंप ढकलणे
५५)पोशाख घालणे
५६)विटावरुन चालणे
५७)रणगाडा शर्यत
५८)अष्टाकृती चेंडू शर्यत
५९)तीन पायांची शर्यत
६०)चेंडू सरपटी ढकलणे
[12/29, 10:33 PM] भालदारमॅडम ज्ञा: लोखंडे सर आपण ही दररोज ची चर्चा संग्रही राहील असे काही तरी करुया म्हणजे केवळ आपल्या ग्रुप पुरते नराहाता इतरांना फायदा होईल.
[12/29, 10:35 PM] भालदारमॅडम ज्ञा: लोखंडे सर तोबा खेळ       याच खेळाचे दुसरे नाव आई माझ पञ हरवल
[12/29, 10:35 PM] Mahesh Lokhande: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेमळा (शरदनगर) कराड http://zppsshindemalasharadnagar.blogspot.com/
[12/29, 10:39 PM] विकास माने: Gol kho kho
[12/29, 10:40 PM] भालदार गोळेश्वर: Hasnyachi gammat. - shikshakane kathi/ HAAT yane Khali -var  dishela halwava.  Jasa haat var jail tasa jorat hasave...haat Khali yeil tase halu halu awaj yeil  yaat khup maja yete mule khup anandi v fresh hotat...
[12/29, 10:44 PM] Mahesh Lokhande: शत्रुची छावणी
दोन समान संघ करणे.दोन्ही संघाच्या विरुध्ददिशेला वर्तुळ आखावे.संघप्रमुखांकडे खडू द्यावा.संघाने आपल्या संघाचे रक्षण करुन दुसर्‍या संघाच्या छावणीत फुल्या माराव्या जो जास्त मारेल तो विजयी.
[12/29, 10:47 PM] होनरावमॅम ज्ञा: रास उचलने खेळ याची
माहिती सांगा
.
[12/29, 10:49 PM] Mahesh Lokhande: स्टिकपोलो
दोन समान संघ.सर्वाजवळ स्टीक .दोन्ही संघ विरुध्द रेषांवर.मध्ये चेंडू.सुरु होता चेंडू स्टिकने पास करत रेषेपलीकडे नेणे.रेषेपलीकडे चेंडू गेल्यास गोल.जास्त गोल करणारा विजयी.
[12/29, 10:54 PM] Mahesh Lokhande: बागुलसर,वंदना पाटीलमॅडम,मिलिंदसर,तांबोळीसर,खोतसर,बुरकुलेसर,मोटेसर,भालदारमॅडम,वाघमॅडम,भंडारेसर,थोरातसर,भालदारसर,विकास मानेसर,होनरावमॅडम,सर्वांचे आभार .आज लवकर चर्चा वेळेपुर्वी सुरु होवुन खुप वेळ चालली.सर्वांचे आभार.
[12/29, 11:02 PM] Mahesh Lokhande: रास उचलणे
दोन गट.२०मीटरवर रेषा.तिथे वर्तुळात १०वस्तु त्या एक एक आणुन अलीकडील रेषेजवळील वर्तुळात ठेवणे हा रास उचलणे खेळ.