Tuesday 7 June 2016

स्मार्टफोनमुळे होणारे आजार व उपाय

स्मार्टफोन आणि लॅपटॉप ने होतात ७ आजार त्यापासुन बचावाचे उपाय

गैजेट डेस्क। स्मार्टफोन आणि लॅपटॉप ची सवय झालेली आहे. पण तुम्हाला माहीत आहे रात्री झोपताना 1 तासापुर्वी मोबाइल फोन आपणापासुन दूर ठेवला पाहिजे नाहीतर अनेक आजार मागे लागतील. UCLA स्कूल ऑफ मेडिसिन चे डॉक्टर डैन सीगल यांचे म्हणण्यानुसार रात्रि  स्मार्टफोन चा वापर केल्याने झोपेसबंधी अनेक आजार होतात.गैजेट्स चा वापर कामाला सोपे करणेसाठी करावयाचा असतो.पण गरजेपेक्षा अधिक वापर अनेक आजारांस कारण ठरतो. स्मार्टफोन व लॅपटापच्या अधिक वापराने होणारे आजार व उपाय पाहुया.

1. कम्प्यूटर विजन सिंड्रोम

आपले डोळे असे बनलेले नाहीत की आपण एका  प्वॉइंटवर आपण तासनतास पाहत राहु व त्याला काही नुकसान होणार नाही.सतत तासनतास कम्प्यूटर स्क्रीन वर पहात राहिल्याने कम्प्यूटर विजन सिंड्रोम आजार होऊ शकतो.याने डोळे थकणे,टोचणे,लाल होणे,व अंधुक दिसणे या समस्या दिसु लागतात.

उपाय-

तुम्ही जो स्मार्टफोन, किंवा कंप्युटर ,टैबलेट,लॅपटाॅप वापरता त्या गैजेट ची डिस्प्ले सेटिंग्स बदला. कारण कम्प्यूटर मध्ये ब्राइटनेस, शार्पनेस, किंवा कलर जर वाढला असेल तर कमी करा.ज्यादा ब्राइट किंवा शार्प स्क्रीन वापरकर्त्याच्या डोळ्यांवर अधिक ताण टाकते.

याशिवाय जर गैजेट चा फॉन्ट साइज खुप छोटा असेल तर मोठे डॉक्युमेंट्स वाचताना त्रास होतो. यासाठी आपल्या गैजेट ची डिस्प्ले सेटिंग्स ला असे सेट करा की डोळ्यांना त्रास होणार नाही. जर आपली स्क्रीन HD आहे तर 45 % कलर आणि ब्राइटनेस ने सुद्धा चांगली डिस्प्ले क्वालिटी येईल व नुकसान कमी होईल.


२)इन्सोम्निया-

गैजेट्स चा अधिक वापराने होऊ शकतो आजार इन्सोम्निया. गरजेपेक्षा ज्यादा गैजेट्स वापराने इन्सोम्निया हा आजार होतो. 

उपाय

20-20-20 नियम ध्यानात ठेवा-

जर सातत्याने आपण स्मार्टफोन, टैबलेट किंवा कम्प्यूटर चा वापर करत असाल तर ध्यानात ठेवा नियम. प्रत्येक 20 मिनिटांनी 20 फुट दुरची वस्तु ला 20 सेकंद पहाणे.ही labnol.org ची एक ट्रिक आहे जी डोळ्यांच्या एक्सरसाइज चे काम करते.ज्याने डोळ्यांना आराम मिळतो व व्यायामही होतो.

जर आपल्या ध्यानात रहात नसेल तर विंडोजसाठी ब्रेकटेक ( BreakTaker) किंवा एप्पल मैक साठी टाइम आउट (Time Out) प्रोग्राम वापरा.हे  प्रोग्राम्स यूजर्सला ब्रेक घेण्यासाठी बनवले आहेत.

३)टेक्स्टर्स नेक (Texter’s Neck)

टेक्स्टर्स नेक सिंड्रोम त्या लोकांना होतो जे स्मार्टफोन, लैपटॉप आणि टैबलेट्स चा वापर करताना मान खाली वाकवतात . जर हा सिंड्रोम वाढला तर मानेचे मसल्स  पोजीशन ला अडैप्ट करेल व मान सरळ करण्यास अडचणी येतील. 

उपाय-
कोणत्याही गैजेटचा वापर करण्यापुर्वी हे  ध्यानात ठेवा की त्याची पोजीशन काय आहे. जर तुम्ही कम्प्यूटरचा वापर करत असाल तर तो मॉनिटर कमीत कमी 20-30 इंचाच्या अंतरावर ठेवा. जर स्मार्टफोन किंवा लैपटॉपचा वापर करत असाल तर मान झुकवण्याऐवजी पोजीशन मानेची अशी ठेवा की मानेवर स्ट्रेस पडणार नाही. टेक्स्टिंग थोड़ी कमी करा.मानेवर स्ट्रेस ज्यादा टेक्स्टिंगच्या कारणाने पड़तो.

४) टोस्टेड स्किन सिंड्रोम-

जर आपण गरजेपेक्षा  ज्यादा लैपटॉपला आपल्या मांडीवर ठेवतो तेव्हा  स्किन डिसऑर्डर हा आजार होऊ शकतो.लैपटॉप मधुन सतत गरम हवा बाहेर येत असते. ज्यादा वापराने स्किन सूकुन जाते. जर तुमची स्किन सेंसिटिव असेल तर तिचा कलर बदलेल व खाजही सुटेल.

उपाय-

लैपटॉप चा ज्यादा वापर करत असाल तर  कूलिंग पैड जरूर घ्या.कूलिंग पैड लैपटॉपमधुन निघणार्‍या गरमीला थंड बनवते.200 रु. पासुन  1500 पर्यंत लैपटॉप कूलिंग पैड व कूलिंग टेबल उपलब्ध आहेत. जर कूलिंग पैड नसेल तर उशीचा वापर करा. लैपटॉप ला टेबलवर ठेवुन वापर करा.

५)श्रवणदोष बहिरेपणा

इयरफोनचा अधिक वापर केल्याने बहिरेपणा येऊ शकतो. ही सवय परमनेंटली आपली ऐकण्याची क्षमता खराब करुन टाकते.

उपाय-

सतत म्यूजिक ऐकताना कानात हेडफोन लावुन ठेवु नका. वॉल्यूम कमी ठेवा.

६)रेडिएशन इफेक्ट=
मोबाइल फोन ने असे रेडिएशन येत नाहीत की आपणास कैंसर होईल पण हेल्थ सबंधी अनेक व्याधी होतात. मेंटल स्ट्रेस पासुन ते इन्सोम्नियापर्यंत आजार होऊ शकतात.

उपाय-

कधीही फोन जवळ घेवुन झोपु नये.फोन जादा वेळ कानाजवळ ठेवु नये.खुप बोलायचे असेल तर हेडफोन वापरा. जर फोन मध्ये सिग्नल कमी असेल तर बोलु नये.

७)स्ट्रेस (RSI)

RSI म्हणजे रिपिटेटिव स्ट्रेस इंजुरी त्यांना होते जे जादा कम्प्यूटर्सवर दररोज तासनतास काम करतात. जे लोक ज्यादा टेक्स्टिंग करतात. त्यांना हा आजार होतो. ह्या इंजुरी मध्ये हातात निशान पड़तात.  टाइपिंग च्यावेळी होतो. जेव्हा तळहाताखाली निशाण पडु लागतात.

उपाय-

यासाठी सॉफ्टवेयर Workpace ची आपणास मदत होईल. सॉफ्टवेयर इंस्टॉल होताच बैकग्राउंड ला काम करु लागतो.हा कधी ब्रेक घ्यायचा कितीवेळा हात उचलायचा सांगतो. अलावा, टाइपिंग करताना योग्य पॉश्चर चे होनेही गरजेचे आहे.