Friday 15 January 2016

कृतीसंशोधन (शैक्षणिक ग्रुपचर्चा ३०)

[1/15, 6:57 PM] Mahesh Lokhande: 🔴 ग्रुपचर्चासत्र   ३०🔴
🌍 चर्चेचा विषय🌍
🔶 कृतीसंशोधन🔶
मुद्दे=१)कृतीसंशोधन लेखन
        २) कृतीसंशोधन

🔶चर्चेस वेळ  दि. १५/१/२०१६   रात्री ९.३० ते१०.३०पर्यंत.🔶 सर्वांनी चर्चेत सहभागी व्हावे.🔵 आपले योगदान आमच्यासाठी अनमोल आहे.🙏🙏🙏🙏🙏🙏
[1/15, 9:41 PM] अमोल पैठणे बुलढाणा: कृतिसंशोधन- शिक्षकांनी आपल्या समस्या स्वतः सोडवण्यासाठी केलेली शास्त्रीय प्रक्रिया म्हणजे कृतिसंशोधन होय  ***कृतिसंशोधनातील काही संकल्पना-                                  संशोधनाची उद्दिष्टे, गृहीतके, परिकल्पना, कार्यात्मक व्याख्या, व्याप्ती व मर्यादा, कृतिसंशोधनाचा आराखडा, संशोधनाच्या पद्धती
[1/15, 9:44 PM] खोतसर ज्ञा: एखादा विषय व्यापक पध्दतीने  मांडणे म्हणजे कृती संशोधन.
[1/15, 9:46 PM] Mahesh Lokhande: कृतीसंशोधनाचे फायदे कोणते?
[1/15, 9:46 PM] Mahesh Lokhande: कृतीसंशोधनाची गरज काय?
[1/15, 9:47 PM] Mahesh Lokhande: कृतीसंशोधनाची वैशिष्ट्ये कोणती?
[1/15, 9:47 PM] Mahesh Lokhande: कृतीसंशोधनाचे महत्व काय?
[1/15, 9:47 PM] Mahesh Lokhande: या प्रश्नावर मत मांडा
[1/15, 9:50 PM] अमोल पैठणे बुलढाणा: कृतिसंशोधनाचे फायदे- विद्यार्थ्याच्या समस्या शोधून त्यावर उपाययोजना केल्या जातात.
[1/15, 9:56 PM] Mahesh Lokhande: कृतीसंशोधनाचे महत्त्व
१)विद्यार्थी अध्ययनातील त्रुटी दूर केल्या जातात.
२)विद्यार्थ्यांमध्ये विषयाची आवड निर्माण होते.
३)विद्यार्थ्यांमध्ये नवीन कौशल्ये प्राप्त होतात.
४)विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा भागवणेस योग्य मार्ग उपलब्ध होतो.
५)शिक्षकांची अध्यापनाची परिणामकारकता वाढविता येते.
६)शिक्षकांमध्ये विविध कृतीकार्यक्रम करण्याची प्रेरणा निर्माण होते.
७) शिक्षकांना नवे तंत्र नवीन पदधती निवडण्याचे कौशल्य प्राप्त होते.
८)विद्यार्थ्याचे स्वाध्याय आरोग्यसवयी आहार यांबाबत पालकांना योग्य दृष्टीकोन प्राप्त होतो.
९)शिक्षकांची नवनिर्मिती क्षमता वाढीस लागते.
१०)नवनवीन प्रयोगांमुळे शाळांचा गुणात्मक दर्जा वाढणेस मदत होते.
[1/15, 9:59 PM] Mote Gondi: १)समस्येवर स्व प्रयत्नाने उपाय शोधने .
२) चिकित्सक विचार मांडणे.
३) उत्कृष्टतेचा ध्यास ,वेगळी वाट.
४) अध्ययन समस्या सोडविणे साठी .
५) इतरांना  प्रेरणा देणे
[1/15, 9:59 PM] खोतसर ज्ञा: कृती संशोधनामुळे मुलाच्या समश्या समजतात व त्यासमश्या सोडविणेस मदत होते.
[1/15, 10:02 PM] अमोल पैठणे बुलढाणा: कृतिसंशोधनाचे महत्त्व-               १) शिक्षकामध्ये विविध कौशल्ये निर्माण होण्यासाठी उदा अध्यापन, भाषण, विषय स्पष्टीकरण, २) नवनवीन पद्धति, उपक्रम राबविणे. ३) दैनंदिन कामाचा दर्जा उंचावणे. ४) विविध प्रयोग करण्याची प्रेरणा निर्माण होण्यासाठी
[1/15, 10:05 PM] Mote Gondi: शालेय वातावरण चैतन्यनय बणते.
समृद्भ अध्ययन अनुभव मिळतात .
नाविन्याची ओढ ,कर्तव्याचीजाणीव होते .
शब्दांकित करणे अावश्यक.
[1/15, 10:06 PM] Mahesh Lokhande: कृतीसंशोधनाची कार्यक्षेत्रे
१)अभ्यासक्रम
२)पाठ्यपुस्तक
३)भौतिक सुविधा
४)शैक्षणिक साहित्याची निर्मिती
५)शालेय स्तरावरील प्रशासन
६)शालेय समित्या
७)शालेय परिसर
८)अध्यापन पदधती व तंत्रे
९)अध्ययन अनुभव
१०)शिक्षक व विद्यार्थी यांची वर्गातील आंतरक्रिया
११)शिक्षक विद्यार्थी पालक यांची वर्गाबाहेरील आंतरक्रिया
१२)अभ्यासानुवर्ती उपक्रम
१३)मूल्यमापन प्रक्रिया
१४)विद्यार्थी व्यक्तीमत्व विकसन
१५)जीवनकौशल्ये विकसन
१६)आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग
१७)उपलब्ध शैक्षणिक साहित्याचा सुयोग्य वापर
१८)सांस्कृतिक उपक्रम
१९)अभ्यासेतर उपक्रम
२०)कार्यानुभव उद्योगक्षेत्रे
[1/15, 10:11 PM] अमोल पैठणे बुलढाणा: कृतिसंशोधनाची वैशिष्ट्ये-           १) शिक्षकास आपले प्रश्न स्वतः सोडवण्यास प्रवृत्त केले जाते. २) एखाद्या विषयात रुची निर्माण करता येते. ३) समस्येचे निराकरण केल्या जाते. ४) शिक्षक या प्रणालीचा एक घटक असतो.
[1/15, 10:17 PM] Mahesh Lokhande: कृतीसंशोधनाची वैशिष्ट्ये
१)कृतीसंशोधन हे मर्यादित वेळेत मर्यादित खर्चात उपलब्ध साधनसामुग्री साहाय्याने केले जाते.
२)कृतीसंशोधन वैयक्तिक शालेय स्तराचे जिल्हास्तराचेही असते.
३)कृतीसंशोधनातुन वर्ग शाळेच्या समस्या सोडविण्याचे उपाय असतात.
४)शाळेपुरते वर्गापुरते निष्कर्ष मर्यादित असते.व्यापक सामान्यीकरण करता येत नाही.म्हणजेच कृतीसंशोधनाचे निष्कर्ष जसेचे तसे सर्व ठिकाणी लागु करता येत नाही.
५)सर्व विद्यार्थी अपेक्षित प्रगती साध्य होईपर्यंत कृतीसंशोधनाची आवर्तने सुरु राहतात.समस्या निराकरणासाठी विशिष्ट कृती असफल ठरल्यास पर्यायी कृतींचा अवलंब केला जातो.
६)कृतीसंशोधन सातत्यपुर्ण प्रक्रिया आहे.
७)कृतीसंशोधनाचा आराखडा लवचिक असतो.
[1/15, 10:19 PM] Mahesh Lokhande: समस्या निवडताना कोणत्या गोष्टींचा विचार करावा?
[1/15, 10:20 PM] Mahesh Lokhande: समस्याविधान म्हणजे काय असते?
[1/15, 10:21 PM] Mahesh Lokhande: शैक्षणिक समस्या अडचणी वेळीच सोडवल्या नाही तर गंभीर प्रश्न निर्माण होतात.शिक्षक समस्या अडचणी सोडवत असतात उपाययोजना करत असतात.यातुन शिक्षकांची कल्पकता सर्जनशीलता विकसित होते.
संशोधनाचे प्रकार१)मूलभूत संशोधन=नव्याने मांडलेले सूत्र,नियम,तत्वे,सिदधांत,उपपती या संशोधनात येतात.न्यूटनचे सिद्धांत या प्रकारात येतात. २)उपयोजित संशोधन=मूलभुत संशोधनचे उपयोजन .३)कृतीसंशोधन=समस्यामागील कारणे दूर करणेसाठी कृतीयुक्त उपाय त्यांची परिणामकारकता याची तपासणी व संपादनाचे मोजमाप या सर्व कृतींचा समावेश कृतीसंशोधनात होते.
शालेय समस्या स्वतः सहकारी मदतीने सोडविण्यास उपक्रमांची अमंलबजावणी शास्रशुदध सहेतुक केली जाते.स्वः कृती करुन संशोधन करुन काढलेले निष्कर्ष अमलात आणताना आंतरिक प्रेरणा मिळते.
[1/15, 10:22 PM] Mote Gondi: समस्यचे स्वरूप.
कालावधी.
[1/15, 10:22 PM] Mahesh Lokhande: कृतीसंशोधनाचे चार टप्पे =१)कृतींचे नियोजन
२)कृती
३)निरीक्षण
४)चिंतन व प्रत्याभरण
🍁 कृती संपूर्णपणे सफल न झाल्यास पुनर्नियोजन
🍁कृती
🍁निरीक्षण
🍁चिंतन व प्रत्याभरण  अशी ४टप्प्यांची आवर्तने होतात.
[1/15, 10:26 PM] Mahesh Lokhande: समस्या तीव्रता
समस्या प्राधान्य
समस्या अधिकारक्षेत्र
उपलब्ध कालावधी
शालेय कामकाज निगडित
शालेय प्रशासन अन्य घटक सहकार्य
अनुभव व पुरेसा अभ्यास
भौगोलिक मर्यादा
अभ्यासगट
पाठ्यांशमर्यादा
पाठ्यांश कृतीकार्यक्रम
कृतीकार्यक्रमाचे परिणाम मोजता  येईल त्याची साधने
[1/15, 10:27 PM] Mahesh Lokhande: समस्या विशिष्ट विधान स्वरुपात मांडली जाते यालाच समस्याविधान म्हणतात.
[1/15, 10:28 PM] Mahesh Lokhande: समस्याविधानात
कोणत्या गावातील शाळेतील विद्यार्थ्याबाबत पाठ्यांशाबाबत समस्येबाबत आहे याची स्पष्टता असावी.
[1/15, 10:29 PM] Mote Gondi: एखाद्या समस्येच्या मुळाशी जावून ती दूर करण्या साठी उपक्रम ,नवोपक्रम, प्रकल्प ,कृतिसंशोधन करणे अाश्यक अाहे
[1/15, 10:33 PM] Mahesh Lokhande: कृतीसंशोधनाची चले
१)स्वाश्रयी चले=ज्याचा परिणाम साधावयाचा तो घटक
२)आश्रयी चले =योजलेले उपक्रम(स्वाश्रयी चलांचा परिणाम ज्या बाबींवर होतो तो घटक) वर्तन बदल.
३) नियंत्रित चले
[1/15, 10:33 PM] Mote Gondi: 🙏?
खूप उपयुक्त माहिती मिळाली .
अाभारी अाहे.
धन्यवाद !
[1/15, 10:36 PM] ‪+91 97620 24079‬: Kruti sanshodhan he pratyekane kelech pahije
[1/15, 10:37 PM] Mahesh Lokhande: कृतीपरिकल्पना
उपाययोजना कार्यवाहीत आणण्याचे संभाव्य परिणाम काय होतील याबददलचे पुर्वकथन म्हणजे कृतीपरिकल्पना.
कृतीपरिकल्पनेचे २ भाग होतात
१)उपाय
२)कोणता परिणाम संभवतो.
[1/15, 10:38 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: कृपया कोणी असे संशोधन केले असेल तर..थोडक्यात..उदाहरणासह पाठवा🙏
[1/15, 10:38 PM] Mahesh Lokhande: अभ्यासगट
ज्या गटाबाबत समस्या जाणवतो  या नमुना गटास अभ्यासगट म्हणतात.कृतीसंशोधनासाठी विद्यार्थी संख्येची अट नसते.
[1/15, 10:40 PM] अरविंद गोळे: Sorry mahesh sir mala ya vishayavar mahiti ahe paan vel nahi🙏🙏🙏
[1/15, 10:40 PM] Mahesh Lokhande: नमुना निवड पदधती
ज्यांना गरज आहे असाच नमुना निवडणे म्हणजे प्रासंगिक नमुना निवड.विशिष्ट क्षेत्रातील नमुना सकारण निवडणे म्हणजे सहेतुक नमुना निवड होय.
[1/15, 10:41 PM] अरविंद गोळे: Ded sati me to subject teach kela ahe
[1/15, 10:42 PM] Mahesh Lokhande: कृतीसंशोधनासाठी अभिकल्प
एका गटावर प्रयोग केल्यामुळे अभिकल्पास एकलगट पुर्वोत्तर चाचणी अभिकल्प म्हणतात.
[1/15, 10:43 PM] Mahesh Lokhande: संशोधन थोडक्यात मांडणे शक्य नाही किमान ५० पाने असतात.
[1/15, 10:45 PM] Mahesh Lokhande: कृतीकार्यक्रम  कल्पकतेने तयार करणे व मांडणे हा कृतीसंशोधनाचा आत्मा आहे.
[1/15, 10:46 PM] चव्हाणसर ज्ञा: समस्या शोधून त्यावर आधारित संशोधन करून  समस्या निराकरण करण्यास मदत होते .
[1/15, 10:47 PM] हिलेमॅडम: मी बी.एड ला असताना पाढे पाठान्तर करताना मुलांना येणाऱ्या अडचणी यावर कृतिसंशोधन केले आहे.
[1/15, 10:51 PM] Mahesh Lokhande: संशोधनाची साधने
१)माहिती संकलन साधने
🍁प्रश्नावली
🍁मुलाखत
🍁पदनिश्चयनश्रेणी
🍁पडताळासूची
🍁प्रासंगिक नोंदी
🍁संपादन चाचणी
🍁प्रगतीपुस्तक
🍁उपस्थितीपत्रक
🍁प्रकल्पातील सहभाग
🍁संकलित नोंदपत्रक
🍁तोंडीकाम
🍁प्रात्यक्षिक प्रयोग सहभाग
🍁स्वाध्याय वर्गकार्य
🍁छायाचित्र
🍁ध्वनीफीत ध्वनीचित्रफीत
२)माहिती विश्लेषण साधने
[1/15, 10:52 PM] Mahesh Lokhande: माहितीविश्लेषणसाधने
१)टक्केवारी
२)आलेख
[1/15, 10:56 PM] विकास माने: Sir give information about methods of action research
[1/15, 10:57 PM] Mahesh Lokhande: कृतीसंशोधन ओघतक्ता(कार्यवाही)
१समस्या निश्चिती
गटाच्या सद्यस्थितीचा अभ्यास
त्रुटीशोधनासाठी साधननिर्मिती
पुर्वचाचणी
उपक्रमासाठी साहित्य व साधननिर्मिती
कृतीकार्यक्रमांची अंमलबजावणी
उत्तरचाचणी
प्रत्याभरण
आवर्तनाचे पुनर्नियोजन व अंमलबजावणी
संकलित माहिती विश्लेषण
निष्कर्ष व शिफारशी
[1/15, 11:01 PM] Mahesh Lokhande: कृतीसंशोधन अहवालरचना
🍁प्राथमिक विभाग
१)मुखपृष्ठ
२)प्रथमपृष्ठ
३)प्रतिज्ञापत्र
४)मुख्याध्यापक प्रमाणपत्र
५)मार्गदर्शक प्रमाणपत्र
६)ऋणनिर्देश
७)अनुक्रमणिका
८)सारणींची यादी
९)आलेखांची यादी
१०)नकाशायादी
११)आकृतीयादी
[1/15, 11:03 PM] Mahesh Lokhande: 🍁प्रमुख विभाग
१)प्रास्ताविक
२)संदर्भ साहित्याचा आढावा
३)कृतीसंशोधन कार्यपदधती
४)माहितीचे संकलन विश्लेषण अर्थनिर्वचन
५)निष्कर्ष व शिफारशी
[1/15, 11:06 PM] Mahesh Lokhande: 🍁अंतिम विभाग
🌷संदर्भसूची
१)संदर्भ ग्रंथ
२)नियतकालिके
३)वर्तमानपत्रे
४)संकेतस्थळे
🌷परिशिष्टे
१)विद्यार्थी यादी
२)शाळांची यादी
३)प्रश्नावली नमुना
४)मूल्यमापन साधन नमुना
५)गुणयादी
६)दृकश्राव्यसाधन नमुने
७)छायाचित्रे
[1/15, 11:19 PM] Mahesh Lokhande: दिगंबर यादवसर,अमोल पैठणेसर,खोतसर,मोटेसर,उज्वला पाटीलमॅडम,प्रशांत अंबवडेसर,रशीद तांबोळीसर,अरविंद गोळेसर,चव्हाणसर,हिलेमॅडम,विकास मानेसर सर्वांचे आभार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏