Thursday 19 February 2015

शिष्यवृत्ती सराव क्रं.१ते१०

सराव प्रश्नसंच क्रं.१

1. 'उपद्रव' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

भरभराट
त्रास
उत्कर्ष
सुख

2. 'मोती' या शब्दाचा अनेकवचनी शब्द कोणता ?

मोती
मोते
मोत्ये
मोत्या

3. नारळांच्या समूहास काय म्हणतात ?

रास
चळत
पुडके
ढीग

4. 'चोर' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

पोलिस
साव
कामचोर
लबाड

5. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता ?

गर्भश्रिमंत
गर्भश्रीमंत
गर्भसीमंत
गर्भशीमंत

6. खालीलपैकी family शी संबंधित शब्द कोणता ?

school
uncle
hospital
TV

7. दिवाळीच्या सणासाठी खालीलपैकी कोणते Greeting योग्य ठरेल ?

Happy Birthday
Happy New Year
Good Morning
Happy Diwali

8. खालील शब्दातून चुकीचे spelling असलेला शब्द ओळखा.

Thursday
Monaday
Wednesday
Sunday

9. वर्गात मुलांनी शांत बसण्यासाठी काय म्हणाल ?

jump on the spot
clap-clap
keep silence
stand up

10. जसे fruit : apple तसे flower : ?

potato
rose
leaf
tree

11. डोक्याच्या आत असणार्या पोकळीस काय म्हणतात ?

शिरोपोकळी
वक्षपोकळी
उदरपोकळी
कटीपोकळी

12. पाऊस ठरलेल्या वेळेत पडणे याला काय म्हणतात ?

अवकाळी पाऊस
नियमित पाऊस
वादळ
वावटळ

13. उंचावर हवा ..... असते.

जाड
जड
दाट
विरळ

14. किनारपट्टीच्या प्रदेशात कोणते महत्त्वाचे पीक घेतात ?

तांदूळ
ज्वारी
गहू
बाजरी

15. खालीलपैकी कोणत्या अवस्थेला फुलपाखरू म्हणतात ?

अंडी
अळी
कोश
प्रौढ

16. किल्ल्यावर कोणकोणते अधिकारी असत ?

किल्लेदार
सबनीस
कारखानीस
सर्व पर्याय बरोबर

17. बडा सय्यदचा वार आपल्या अंगावर कोणी घेतला ?

जीवा महाल
येसाजी कंक
तानाजी
बाजीप्रभू

18. स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा कोणत्या मंदिरात झाली ?

तुळजापूर
शिवाई
रायरेश्वर
तोरणाई

19. कोंढाण्याचे सुभेदार कोण होते ?

बाजी पासलकर
दादाजी कोंडदेव
उदेभान
मुरारबाजी

20. तानाजी मालुसरे रायबाचे लग्न सोडून कोणता किल्ला लढवण्यासाठी गेले ?

राजगड
पुरंदर
कोंढाणा
रायगड
सराव प्रश्नसंच 2

1. 'पाचावर धारण बसणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता ?

पळून जाणे
खूप भीती वाटणे
अस्वस्थ वाटणे
धीर वाटणे

2. जसे शेळीचे - करडू तसे म्हशीचे - .....

वासरू
शिंगरू
रेडकू
पिल्लू

3. 'अष्टपैलू' या शब्दाचा अचूक अर्थ असणारा शब्दसमूह निवडा.

आठ कलात पारंगत
एका कलेत पारंगत
पैलू पाडणारा
सर्व कलात पारंगत

4. मधमाशीच्या घराला ..... म्हणतात.

जाळे
पोळे
गाळे
शिंकाळे

5. खालीलपैकी शरीराच्या अवयवावरुन असलेली म्हण कोणती ?

गर्जेल तो पडेल काय
कानामागून आली नि तिखट झाली
खाई त्याला खवखवे
चार दिवस सासूचे, चार दिवस सूनेचे

6. Raindrops fall in ..... direction.

upword
downword
left
right

7. तुमचा मित्र चित्रकला स्पर्धेसाठी जात आहे. त्याच्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणता वाक्यप्रयोग वापराल ?

Welcome
Excuse me
Thank you
All the best

8. net हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

Basketball
Volleyball
Baseball
Football

9. पुढीलपैकी कोणती जोडी गटात बसत नाही ?

G - g
F - f
P - q
Y -y

10. ..... ला तीन बाजू असतात.

Square
Triangle
Circle
Cylinder

11. खालील आकृतीत त्रिकोणांची संख्या किती ?





12. प्रत्येक गटात समान पुस्तकांची संख्या याप्रमाणे ७६८ पुस्तकांचे २४ गट तयार झाले तर प्रत्येक गटातील पुस्तकांची संख्या किती ?

२२
३२
२४
३७

13. तीन बाजू बंद असणार्या आकृतीला काय म्हणतात ?

आयत
चौकोन
षटकोन
त्रिकोण

14. अविनाशने प्रत्येकी २ रुपयांच्या २ पेन्सिली व १२ रुपयांचे एक पुस्तक खरेदी करुन दुकानदारास २० रुपयांची एक नोट दिली, तर त्याला किती रक्कम परत मिळेल ?

४ रुपये
२ रुपये
८ रुपये
६ रुपये

15. घनाच्या सर्व बाजूंची लांबी ..... असते.

असमान
समान
लहान
लांब

16. फुलपाखराच्या सुरवंटाचे अन्न काय असते ?

फुलातील रस
झाडाची पाने
रसदार फळे
धान्य

17. ..... संत्री प्रसिद्ध आहेत.

नागपूरची
सोलापूरची
पंढरपूरची
कोल्हापूरची

18. कोणत्या आपत्तीत घरे कोसळतात व ढिगार्याखाली माणसे सापडतात ?

पूर
त्सुनामी
भूकंप
गारपीट

19. आपण आपल्या घराचे रक्षण करण्यासाठी कोणत्या प्राण्याची मदत घेऊ ?

बैल
कुत्रा
मांजर
मेंढी

20. एकमेकांना ..... केली की कोणतीही गोष्ट यशस्वीपणे करता येते.

सूचना
दमदाटी
मदत
तक्रार
सराव प्रश्नसंच क्रं.3

1. 'शेतकरी शेताची मशागत करतो' या वाक्यातील 'शेतकरी' या शब्दासाठी समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता ?

भूप
नंदन
कष्टकरी
कुणबी

2. खालीलपैकी कोणता जोडशब्द नाही ?

दागदागिने
दाणापाणी
दाणेदार
दगडधोंडा

3. तबेल्यात कोण राहतो ?

घोडा
हत्ती
बैल
माणूस

4. 'नरेंद्र विश्वनाथ दत्त' हे नाव कोणाचे आहे ?

संत गाडगेबाबा
स्वामी विवेकानंद
बाबा आमटे
नरेंद्र दाभोळकर

5. 'इवलेसे रोप लावियले दारी' या ओळीतील विशेषण ओळखा ?

रोप
इवलेसे
लावियले
दारी

6. ..... हे संदेशवहनाचे साधन आहे.

विमान
वृत्तपत्र
पालखी
बैलगाडी

7. आपल्या देशाचे संविधान कधी तयार करण्यात आले ?

प्राचीन काळात
स्वातंत्र्यलढ्याच्या काळात
स्वराज्य स्थापनेपूर्वी
स्वातंत्र्य मिळाल्यावर

8. पावसापासून बचावासाठी कशाचा वापर केला जात नाही ?

इरले
सुती कपडे
रेनकोट
छत्री

9. पुढीलपैकी कोकणातील नदी कोणती ?

वैनगंगा
मुळा
सावित्री
तापी

10. कोणत्या रात्री चंद्राचा प्रकाशित भाग अजिबात दिसत नाही ?

पौर्णिमा
अमावस्या
चतुर्थी
अष्टमी

11. खालील गटात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल ?

         

12. एका रांगेत १४ विद्यार्थी उभे आहेत. दोन विद्यार्थ्यांमध्ये ५ मीटरचे अंतर आहे तर त्या रांगेची लांबी किती ?

७० मीटर
६५ मीटर
५० मीटर
५५ मीटर

13. खालील आकृत्यांच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती कोणती ?

          

14. गावात स्वच्छता अभियान सुरु आहे अशावेळी तुमची कोणती कृती योग्य ठरेल ?

शक्य होईल तितका सहभाग घेणे
कोण कोण काम करतात ते पाहणे
किती काम झाले आहे ते बघणे
काम करावे लागेल म्हणून तिकडे न जाणे

15. खालील आकृतीतील अर्धवर्तुळांची संख्या किती ?

पाच
सात
आठ
तीन

16. प्रेमळपणाचे सोंग घेऊन अफजलखानाने शिवरायांना कोणता निरोप पाठवला ?

'आम्हास भेटणे तुमच्या हिताचे आहे'
'तुम्ही माझ्या मुलासारखे, मला भेटायला या'
'आम्ही तुमचे हितचिंतक आहोत, आमची भेट घ्यावी'
'शहाजीराजे आमचे परममित्र आहेत, आम्ही तुमचा आदर करतो'

17. राज्याभिषेकासाठी ..... नद्यांचे पाणी आणले होते.

सात
पाच
आठ
तीन

18. राज्यकारभारात मराठी शब्द वापरता यावेत म्हणून शिवाजी महाराजांनी कोणता ग्रंथ तयार करवून घेतला ?

व्यवहार कोश
राजकोश
राज्यव्यवहार कोश
राजमुद्रा

19. 'ताटी उघडा ज्ञानेश्वरा' हे उद्गार कोणी काढले ?

संत ज्ञानेश्वरांनी
संत मुक्ताबाईंनी
संत सोपानदेवांनी
संत एकनाथांनी

20. शिवरायांनी सुरत शहरावर छापा का घातला ?

सुरतेची संपत्ती लुटण्यासाठी
सुरत जिंकण्यासाठी
औरंगजेबावर वचक बसवण्यासाठी
औरंगजेबाचा पराभव करण्यासाठी
सराव प्रश्नसंच क्रं.4

1. पुढीलपैकी विशेषण नसलेला शब्द कोणता ?

आकर्षक
चांगले
हुशार
कमल

2. खालील शब्दातून एकवचनी शब्द ओळखा ?

बटा
जटा
काटा
विटा

3. वेगळे लिंग असलेला शब्द ओळखा ?

दप्तर
पेन्सिल
लेखणी
शाई

4. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता ?

आकस्मात
अकस्मात
अकसमात
असकमात

5. पहाटे पहाटे कोंबडा ...... ?

चिवचिवतो
आरवतो
केकाटतो
हंबरतो

6. पुढील घोषणा पूर्ण करा - Health is ...... ?

good
wealth
happiness
powerful

7. यंत्राशी संबंधित काम करण्याकरता पुढीलपैकी कोणती वस्तू वापरत नाहीत ?

spanner
hammer
screw-driver
pan

8. खालीलपैकी वाद्याकरता नसलेला शब्द निवडा

violin
bank
drum
tabla

9. एखाद्या परक्या माणसाला वेळ विचारण्याकरीता पुढीलपैकी कोणता वाक्यप्रयोग वापराल ?

Have you a watch ?
What time ?
What's the time' please ?
Tell me the time.

10. सकाळच्या आहाराकरीता असलेला शब्द कोणता ?

lunch
breakfast
dinner
morning food

11. आपल्याला चव कशामुळे समजते ?

जिभेवरील उंचवटे
जिभेचे टोक
जिभेचा रंग
डोळे

12. मराठीबरोबरच विदर्भात कोणती भाषा बोलली जाते ?

मालवणी
वर्हाडी
कोकणी
मराठवाडी

13. खालीलपैकी कोणता परीणाम पुरामुळे होतो ?

उंच लाटा उसळतात
कौले फुटतात
जमीन हादरते
वस्तीत व घरात पाणी शिरते

14. महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वतशिखर कोणते ?

कळसूबाई
हिमालय
महाबळेश्वर
प्रतापगड

15. पुढीलपैकी कोणत्या पदार्थापासून आपणास तेल मिळत नाही ?

तीळ
मिरी
शेंगदाणा
करडई

16. समर्थ रामदासांचे मूळ नाव ..... होते ?

सूर्याजी
नारायण
हरी
रामदास

17. संत नामदेव ...... चे निस्सिम भक्त होते.

विठ्ठलाचे
रामाचे
हनुमानाचे
शंकराचे

18. संत तुकारामांच्या घरी ..... दुकान होते.

कपड्यांचे
पुस्तकांचे
किराणा मालाचे
फळांचे

19. लाखो लोक दरसाल ...... आळंदी-पंढरीला जातात.

श्रावणी-आषाढीला
आषाढी-कार्तिकीला
पौष-कार्तिकीला
चैत्र-पौर्णिमेला

20. संत ज्ञानेश्वरांपूर्वी धर्माचे ज्ञान ..... ग्रंथांमध्ये बंदिस्त झाले होते.

मराठी
हिंदी
संस्कृत
पाली

सराव प्रश्नसंच क्रं.5

1. राई कोणाची ?

फुलांची
फळांची
पानांची
झाडांची

2. खालील शब्दातून शुद्ध शब्द निवडा ?

सूरक्षित
सुरक्षीत
सुरक्षित
संरक्शित

3. 'मृत्यूवर जय मिळविणारा' या शब्दसमूहाबद्दल शब्द निवडा ?

मृत्यूंजय
अमर
अजिंक्य
मृत्यदाता

4. 'जाणून घेण्याची इच्छा' या वाक्यासाठी खालीलपैकी कोणता शब्द वापरला जातो ?

आवड
जिज्ञासा
आस्तिक
तत्त्वज्ञान

5. खालीलपैकी चुकीची जोडी शोधा ?

दुसर्यावर अवलंबून असणारा - परावलंबी
घोडा बांधण्याची जागा - गोठा
सापाचे खेळ करणारा - गारुडी
पंधरा दिवसांचा - पंधरवडा

6. १ ते २० अंकांमध्ये किती मूळ संख्या आहेत ?




१०

7. 'क़' ही एक विषम संख्या आहे तर तिच्यामागील समसंख्या कोणती ?

क + १
क - २
क + २
क - १

8. खालीलपैकी कोणत्या संख्येला ४ ने पूर्ण भाग जाईल ?

२५३४
९४२०
२३४६
३५८२

9. ३५० किलोमीटरवरील एका गावात सुरेशला मोटारसायकलने जाण्यास ७ तास लागले व परत येण्यास ५ तास लागले तर परत येताना सुरेशने मोटारसायकलचा वेग ताशी किती किलोमीटरने वाढवला ?


१०
२०
३०

10. वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेला ..... म्हणतात.

परीघ
व्यास
त्रिज्या
वर्तुळकेंद्र

11. कळसूबाई शिखराची उंची किती ?

१६४६ मीटर
१६४६ फूट
१६४६ इंच
१६४६ किमी

12. एका वर्षात किती महिने असतात ?

४८
१२
२४
३६५

13. राष्ट्रीय वीरता पुरस्कार कोणाच्या हस्ते दिले जातात ?

मुख्यमंत्र्यांच्या
राज्यपालांच्या
राष्ट्रपतींच्या
पंतप्रधानांच्या

14. पिण्यासाठी पाणी निर्धोक करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात ?

जलशुद्धीकरण
जलवितरण
जलसंजीवन
जलसिंचन

15. समाजाची वाटचाल कोणत्या दिशेने व्हावी याविषयीच्या तरतुदी ...... असतात.

संसदेत
संविधानात
न्यायालयात
कायद्यात

16. योगेशचा रांगेतील क्रमांक दोन्हीकडून २३ वा आहे तर रांगेत मुले किती ?

४६
४५
२२
२३

17. वर्षाची सुरुवात एप्रिल महिन्यापासून झाल्यास क्रमाने पाचवा महिना कोणता येईल ?

ऑगस्ट
सप्टेंबर
मे
जून

18. माधव व विकास क्रिकेट खेळतात, केतन व विकास फुटबॉल खेळतात, माधव व केतन बास्केटबॉल खेळतात, अभय व माधव कॅरम खेळतात तर फक्त एक खेळ खेळणारा कोण आहे ?

माधव
विकास
अभय
केतन

19. कोमल, स्वाती व अंजली यांच्या आजच्या वयाची बेरीज ५२ वर्षे आहे तर ३ वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती ?

४९ वर्षे
४३ वर्षे
५२ वर्षे
४५ वर्षे

20. 'महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद' या वाक्यात प हे अक्षर किती वेळा आलेले आहे ?

एक
तीन
दोन
चार
सराव प्रश्नसंच क्रं.6

1. खालील पर्यायातील एकवचनी पर्याय ओळखा ?

सारा
धारा
गारा
वारा

2. 'पोपट' या शब्दाला विरूद्धार्थी शब्द ओळखा ?

रावा
मिठू
मैना
शुक

3. खालील पर्यायातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा ?

नदी
ओढा
समुद्र
प्रवाह

4. 'किल्याभोवतालची भिंत' या शब्दसमूहासाठी खालीलपैकी कोणता शब्द वापरला जातो ?

गड
तट
पट
चिरेबंदी

5. लता मंगेशकर या कोण आहेत ?

लेखिका
गायिका
कवयित्री
नर्तकी

6. खालीलपैकी कोणती जोडी गटात बसत नाही.

A-a
d-d
E-e
B-b

7. 'क़' या उच्चारासाठी खालीलपैकी कोणते अक्षर वापरतात ?

A
B
S
C

8. Sunday, Monday, Tuesday यानंतर क्रमाने येणारा वार कोणता ?

Friday
Wednesday
Saturday
Thursday

9. आपल्याकडून एखादी चूक झाली असल्यास कोणता शब्द वापराल ?

Please
Thanks
Sorry
Hello

10. 'रेड' या शब्दाचे खालीलपैकी योग्य स्पेलिंग कोणते ?

Rad
Red
Rid
Rod

11. ५४९ - ४४३ = ? याचे उत्तर आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कोणते ?

106
206
306
406

12. ४०४०४ ही संख्या अक्षरी कशी लिहाल ?

चाळीस हजार चारशे चाळीस
चाळीस हजार चारशे चार
चार हजार चारशे चार
चार लाख चार हजार चार

13. १, २, ३ हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरुन तीन अंकी दोनशे पेक्षा मोठ्या किती संख्या तयार होतील ?





14. ५५४९ चे विस्तारीत रुप निवडा

५००० + ५०० + ४० + ९
५००० + ५०० + ३० + ९
५०००० + ५०० + ४० + ९
५०० + ५० + ४ + ९

15. १ ते ५० संख्यांमध्ये १ हा अंक किती वेळा येतो ?

१४
१५
१६
१७

16. गटात न बसणारा पर्याय ओळखा ?

तलाव
टाक्या
धरणे
नदी

17. मिठागर म्हणजे काय ?

मीठ तयार करतात ते ठिकाण
मीठाचे दुकान
मिठाईचे दुकान
मीठ साठवून ठेवतात ते ठिकाण

18. पृथ्वीला स्वत:भोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती अवधी लागतो ?

एक वर्ष
एक आठवडा
एक दिवस
एक महिना

19. पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत ?

कार्ले
कापेश्वर
सज्जनगड
कंधार

20. झाडावरील मोहोर म्हणजे काय ?

झाडावरील कोवळी पाने
झाडावरील छोटी फळे
झाडाची पानगळ
झाडावरील फुलोरा
सराव प्रश्नसंच 7

1. 'ल, सू, फू, र्य' या अक्षरापासून तयार होणार्या अर्थपूर्ण शब्दातील शेवटून तिसरे अक्षर कोणते ?

फू
सू

र्य

2. 'गीताई' हे पुस्तक कोणी लिहिले ?

व्यास
वाल्मिकी
विनोबा भावे
महात्मा गांधी

3. योग्य शब्द भरुन घोषणा पूर्ण करा.
'....... पर्यावरण, शुद्ध जीवन !'

शुद्ध
अशुद्ध
बेशुद्ध
अशुभ

4. 'सु' हा उपसर्ग पुढीलपैकी कोणत्या शब्दाला लावता येईल ?

मराठी
संस्कृत
गणित
इतिहास

5. 'चमक्तार' हा अशुद्ध शब्द शुद्ध कसा लिहाल ?

चकत्मार
चमत्कार
चमतकार
चमम्कार

6. पक्षी या अर्थाचा समानार्थी शब्द निवडा.

किटक
खग
पंख
पशु

7. 'bird' या शब्दाशी संबंधित शब्द खालीलपैकी कोणता ?

hands
jaws
mouth
wings

8. पाहुणे घरी आल्यावर काय म्हणाल.

Best wishes
Welcome
Congratulations
Good evening

9. bus : bus stop :: aeroplane : ?

stand
station
airport
junction

10. Grass is .....

Red
Green
White
Blue

11. ३ एप्रिल १६८० रोजी शिवरायांचे ..... किल्ल्यावर निधन झाले.

रायगड
राजगड
सिंहगड
पुरंदर

12. शिवरायांनी लाल महालात शायिस्ताखानावर कोणत्या तारखेला हल्ला केला ?

७ एप्रिल १६६३
५ एप्रिल १६६३
५ एप्रिल १६७३
७ एप्रिल १६७३

13. राज्याभिषेकासाठी शिवरायांनी ..... सिंहासन तयार करुन घेतले.

चांदिचे
संगमरवरी दगडाचे
तांब्याचे
सोन्याचे

14. शिवरायांची राजमुद्रा ..... भाषेत होती.

संस्कृत
मराठी
फारसी
हिंदी

15. निजामशाही वाचवण्यासाठी कोण निकराने लढले ?

शहाजीराजे व शरीफजी
शहाजीराजे व मलिक अंबर
मालोजी आणि विठोजी
विठोजी आणि लखुजीराव

16. पुढीलपैकी कोणता पदार्थ कच्चा खाण्याचा नाही ?

काकडी
बटाटा
चिंच
द्राक्ष

17. शरीरात ग्रासिकेचे स्थान कोठे आहे ?

वक्षपोकळीत
उदरपोकळीत
कटीपोकळीत
शिरोपोकळीत

18. पुढीलपैकी कोणती गोष्ट नैसर्गिक गोष्ट नाही ?

नदी
तळे
धरण
जंगल

19. आंब्याच्या फुलोर्याला काय म्हणतात ?

पालवी
मोहर
कैरी
बोंडे

20. स्थानिक शासनसंस्थांवर लोक त्यांचे ..... निवडून देतात.

नातेवाईक
मित्र
परिचित
प्रतिनिधी
सराव प्रश्नसंच क्रं.8

1. 'त्रास सहन केल्याशिवाय मोठेपण मिळत नाही' या अर्थाची म्हण ओळखा.

गाढवाला गुळाची चव काय
प्रयत्नांती परमेश्वर
पालथ्या घड्यावर पाणी
टाकीचे घाव सोसल्याशिवाय मोठेपण मिळत नाही

2. 'प्रवासी लोक मोरांना पाहण्यासाठी जयपूरला जातात' या वाक्यातील उद्देश्य विभाग ओळखा.

मोरांना
जयपूरला जातात
प्रवासी लोक
प्रवासी लोक मोरांना

3. खालीलपैकी पुल्लिंगी असलेला शब्द कोणता ?

समुद्र
होडी
लाट
नदी

4. खालीलपैकी भूतकाळी क्र‍ियापद कोणते ?

पाहीन
पाहिला
पाहणार आहे
पाहतो

5. '........ सुंदर फूल आहे' या वाक्यात गाळलेल्या जागी शुद्ध शब्द निवडा.

गूलाब
गुलाब
गुलाभ
गुलब

6. वेगळ्या उच्चाराने सुरु होणारा शब्द निवडा.

bag
pad
bat
bad

7. तुमच्या शिक्षणाची काळजी कोण घेते ?

neighbours
elder brother
uncle
parents

8. मालवाहतूक करणार्या वाहनाचे नाव सांगा.

car
truck
jeep
tanker

9. द्राक्षांना खालीलपैकी इंग्रजी शब्द कोणता ?

Bannana
Apple
Grapes
Chickoo

10. गाईच्या पिल्लाला काय म्हणतात ?

cub
calf
lamb
kid

11. पिवळ्याला हिरवा म्हटले, हिरव्याला लाल म्हटले, लालला पांढरा म्हटले, पांढर्याला काळा म्हटले, काळ्याला निळा म्हटले तर गवताचा रंग कोणता ?

लाल
हिरवा
पांढरा
काळा

12. पाच प्राण्यांच्या धावण्याच्या शर्यतीत हत्तीच्या मागे वाघ पळत होता, सशाच्या पुढे घोडा पळत होता, हत्ती आणि ससा यांच्यामध्ये उंट पळत होता तर सर्वात शेवटी कोण पळत होते ?

हत्ती
वाघ
उंट
घोडा

13. संगिताचे वय आईच्या वयाच्या निमपट आहे. जर संगिताचे वय ३१ वर्षे असेल तर आईचे वय किती ?

९३
४३
६१
६२

14. एका घड्याळात ६ ठोके होण्यास अर्धा मिनिट वेळ लागतो, तर त्याच घड्याळात १५ ठोके होण्यास किती सेकंद लागतील ?

७५
९०
१५०
१०५

15. ४२ मुलांच्या रांगेत समोरुन ८ व्या मुलाचा मागून कितवा क्रमांक येईल ?

३४ वा
३५ वा
३६ वा
३७ वा

16. अफजलखानाच्या वधानंतर शिवरायांनी विजापूरकरांच्या ताब्यातील ..... किल्ला जिंकला.

विशाळगड
पन्हाळगड
पुरंदर
रोहिडा

17. बडा सय्यदला कोणी ठार केले ?

जिवा महालाने
संभाजी कावजीने
येसाजी कंकने
पंताजी गोपीनाथने

18. आदिलशाहाने 'चंद्रराव' हा किताब कोणाला दिला ?

शहाजीराजांना
खंडोजी आणि बाजी घोरपडेला
जावळीच्या मोर्यांना
फलटणच्या निंबाळकरला

19. मावळात राहणार्या लोकांना ..... म्हणत.

माळकरी
मावळे
सैनिक
मराठे

20. आदिलशाहाने शहाजीराजांना ..... हा किताब दिला.

सरनोबत
सरनाईक
वजीरे आजम
सरलष्कर
सराव प्रश्नसंच क्रं.9

1. पुढील गटातील चुकीचे पद ओळखा ?
वांगी, टोमॅटो, भोपळा, बटाटा, दोडका

दोडका
भोपळा
टोमॅटो
बटाटा

2. दिवाळीची २१ दिवसांची सुट्टी ११ ऑक्टोबरला सुरु झाली, तर सुट्टी संपल्यानंतर शाळा कोणत्या तारखेला सुरु होईल ?

३ नोव्हेंबर
४ नोव्हेंबर
१ नोव्हेंबर
२ नोव्हेंबर

3. कवायतीसाठी जेवढ्या रांगा आहेत, तेवढीच मुले प्रत्येक रांगेत आहेत. जर प्रत्येक रांगेत १८ मुले असतील, तर मैदानावरील सर्व मुलांच्या पायांची संख्या किती ?

६४८
३२४
१६२
५७८

4. संग्राम मंदिराकडे तोंड करुन उभा होता. त्याच्या उजव्या बाजूला उत्तर दिशा होती. तो तीन वेळा काटकोनात डावीकडे वळला, तर त्याच्या पाठीमागील दिशा कोणती ?

उत्तर
दक्षिण
पश्चिम
पूर्व

5. पुढीलपैकी चुकीची तारीख ओळखा ?

३१ जानेवारी २०१८
३१ जून २००९
३० ऑगस्ट २०२९
३० डिसेंबर २०१२

6. शरीराच्या वाढीवर व हालचालींवर कोणत्या इंद्रियाचे नियंत्रण असते ?

फुफ्फुसे
मेंदू
डोळा
जठर

7. पुढीलपैकी सरड्याचे अन्न कोणते ?

गवत
उंदिर
झाडपाला
किडे

8. मानवाच्या अन्नमार्गाची लांबी सुमारे ..... असते.

१ मीटर
९ मीटर
५० मीटर
४ मीटर

9. उजनी धरण ..... नदीवर आहे.

पूर्णा
नीरा
भीमा
प्रवरा

10. आपल्यासाठी सर्वात मोठा दिवस कोणता ?

२२ डिसेंबर
२१ जून
२२ मार्च
२१ मे

11. पुढीलपैकी वर्तमानकाळी वाक्य कोणते ?

मी अभ्यास करतो
मी अभ्यास करीत होतो
मी अभ्यास करीन
मी अभ्यास केला

12. खांब या शब्दाचे अनेकवचन कोणते ?

खांबा
खांब
खंबा
खांबे

13. 'डोंगराआडून सूर्य उगवला. ...... दृश्य सुंदर होते' या वाक्यात रिकाम्या जागी कोणते सर्वनाम येईल?

तो
ती
त्या
ते

14. घुबडाच्या घराला काय म्हणतात ?

ढोली
पागा
गोठा
वारुळ

15. पुढीलपैकी कोणत्या शब्दाला प्रत्यय लागलेला नाही ?

यशवंत
जिवंत
गुणवंत
बलवंत

16. तानाजी हा कोकणातील ....... गावचा राहणारा होता.

महाड
उमरठे
रत्नागिरी
पोलादपूर

17. स्वराज्याची पहिली राजधानी कोणती ?

राजगड
रायगड
पुणे
प्रतापगड

18. ...... रक्ताने घोडखिंड पावन झाली.

बाजी घोरपडेच्या
तानाजी मालुसरेच्या
बाजीप्रभूच्या
मुरारबाजीच्या

19. ....... हे मूळ गुजरातमधील एक राजपुत्र होते.

संत ज्ञानेश्वर
श्रीचक्रधर स्वामी
संत एकनाथ
समर्थ रामदास

20. चाकणचा किल्ला ..... ने दोन महिने लढवला.

मुरारबाजी
तानाजी मालुसरे
बाजीप्रभू देशपांडे
फिरंगोजी नरसाळा
सराव प्रश्नसंच क्रं.10

1. 'कर' या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा ?

काम
डोके
कर्म
हात

2. 'माझ्या आजोबांनी मला वर दिला.' या वाक्यातील 'वर' या शब्दाचा अर्थ काय ?

दिशा
पण
आशीर्वाद
खाली

3. 'आपली सहल फेब्रुवारी महिन्यात दौलताबादला जाईल.' या वाक्याचा काळ ओळखा ?

भविष्यकाळ
वर्तमानकाळ
भूतकाळ
यापैकी नाही

4. 'मोरगावला खूप मोर असतात.' या वाक्यात किती नामे आली आहेत ?




5. 'बालवीर' या शब्दाचा विरूद्धलिंगी शब्द पुढीलपैकी कोणता ?

राजपुत्री
वीरबाला
अभिनेत्री
भगिनी

6. How many letters comes between a and i ?

six
seven
eight
nine

7. जर girl : boy तर man : ?

aunt
sister
mother
woman

8. तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर पुढीलपैकी कोणत्या योग्य ठिकाणी खेळाल ?

Hospital
Garden
Bus-stop
Theatre

9. गाणी ऐकण्यासाठी शरीराच्या कोणत्या अवयवाचा प्रामुख्याने उपयोग होतो ?

Nose
Eyes
Ears
Teeth

10. घोड्याच्या पिल्लाला ...... म्हणतात ?

Cub
Foal
Kid
Calf

11. १०० मधून १६ ची चार पट वजा केल्यास उत्तर किती येईल ?

३६
६४
१६
८४

12. आयताचे सर्व कोन ..... मापाचे असतात ?

६० अंश
९० अंश
४५ अंश
१८० अंश

13. घनापेक्षा इष्टिकाचितीला किती पृष्ठे जास्त अथवा कमी असतात ?

२ ने जास्त
१ ने कमी
४ ने जास्त
समान असतात

14. एकाच वर्तुळातील त्रिज्या व्यासाच्या ...... असते ?

निमपट
दुप्पट
तिप्पट
चारपट

15. दिड किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम ?

२५०० ग्रॅम
१५०० ग्रॅम
३५०० ग्रॅम
१००० ग्रॅम

16. रयतेला सुखी करण्यासाठी शिवाजी महाराजांनी ...... स्थापना केली.

वतनाची
स्वराज्याची
न्यायाची
जहागिरीची

17. आदिलशाहाने शहाजीराजांची ...... प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली.

कर्नाटकातील
खानदेशातील
कोकणातील
बंगालमधील

18. शिवरायांकडे पुणे, सुपे, चाकण व ...... या परगण्यांची जहागिरी होती.

सासवड
वेल्हे
इंदापूर
जुन्नर

19. आग्र्याच्या कैदेत शिवरायांबरोबर कोण राहिले ?

संभाजीराजे
संभाजीराजे, हिरोजी फर्जंद व मदारी मेहतर
हिरोजी फर्जंद
येसाजी कंक

20. शिवरायांच्या मुलकी व्यवस्थेत परगण्यावर ..... हा अधिकारी असे.

सुभेदार
जुमलेदार
शिलेदार
हवालदार

No comments:

Post a Comment

आपली प्रतिक्रिया द्या .